विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.22 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२४ 104 112415 237659 237658 2026-10-04T12:03:52Z JayashreeVI 4058 237659 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>ठेवून पहावा. अनोख्या आनंदाचा ठेवा सापडेल.
{{gap}}आपल्या पारंपरिक जीवनशैलीत देवाधर्माच्या नावावर का होईना आरत्या, पदे, स्तोत्रे, अभंग, भजने हे सर्वांच्या गात्या गळ्याला प्रवाही ठेवत होते. एक परीने ते गाण्यामधले ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन (सक्रीय सहभाग) होते. आता नुसते दूरस्थ बसून ऐकणे पाहणे हे फार 'पॅसिव्ह' होत आहे. शरीर आणि मन दोन्हींची गुंतवणूक कलेत हवी, तरच पुरता आनंद भोगता येतो. अन्यथा चिंता, ताण, अस्वस्थता माणसाला ग्रासून टाकते.
{{gap}}कला आणि क्रीडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत ते पोटापाण्याचा आणि रुपये आण्याच्या विनिमयाचे साधन होत नाही, तोवर त्यातून निखळ आनंद मिळतो. त्यामुळे चिंता ताण यातून तोल सावरतो. जी निर्मिती केवळ स्वान्तः सुखाय असते, ती माणसाला स्वर्गीय समाधान देते.
{{gap}}जी. ए. कुलकर्णी यांची एक सुंदर कथा आहे. एक फीडल वादक असतो. जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ फीडलवादक व्हायचे, ही त्याची महत्त्वाकांक्षा असते तो खूप मेहनत घेतो; अनेक स्पर्धा गाजवतो, महफिली गाजवतो. यशाच्या धुंदीत जगू पाहतो. पण मन शांत होत नाही. अशांतच राहते. हातात अखंड वाद्य असते. आता सर्वकाळ तो आणि वाद्य हेच एकमेकांचे असतात. त्याला खाण्यापिण्याचेही भान रहात नाही. चालता चालता एका पर्वतश्रेणीतून एका अरुंद वाटेवरून वाद्य वाजवीतच चालत राहतो, पाहणारांना भीती वाटते की, हा वाद्याच्या नादात कुठेतरी तोल जाऊन पडेल; पण घडते भलतेच. एका क्षणी नादावल्या अवस्थेत तो फिडल् फेकून देतो. पाहणारा म्हणतो, "आता त्याला दुसऱ्या कशाची गरज नाही. तोच एक फीडल् झाला आहे. आता तो तोल जाऊन पडणार नाही." कलावंताची कलेची समाधी म्हणतात ती हीच! त्याला आता बाहेरच्या कोणत्याच साधनाची गरज नाही. पूर्णपणे आत्मरंगात तो दंग झाला. सुख-दुःखाच्या, ईर्ष्या स्पर्धेच्या अतीत पल्याड जाऊन तो पोचला.
{{gap}}जी.एं.ची ही कथा जगण्याचं, आनंदानं सफल जगण्याचं एक फार मोठं सूत्र सांगते. एक परीने "आत्मरंगी मन रंगले|" म्हणणाऱ्या संतांसारखी ही कलेची आत्मलीन समाधीच समाधानाची परमावधी ठरते. सुख सुख म्हणतात, ते वस्तूत आणि इयेत थोडंच सापडलं?
{{gap}}'''सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।'''
{{gap}}हा जीवनाचा नित्य अनुभव असतो.
{{gap}}'''वेड्या मना कर विचार । सुख थोडे दुःख फार ।'''
{{gap}}असं आधुनिक कवीही सांगतात; पण या दुःखावर मात करण्याचा उताराही<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / २३}}</noinclude> fvoefzar09saicbuxirnsy58cllcdwc 237660 237659 2026-10-04T12:05:48Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237660 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>ठेवून पहावा. अनोख्या आनंदाचा ठेवा सापडेल.
{{gap}}आपल्या पारंपरिक जीवनशैलीत देवाधर्माच्या नावावर का होईना आरत्या, पदे, स्तोत्रे, अभंग, भजने हे सर्वांच्या गात्या गळ्याला प्रवाही ठेवत होते. एक परीने ते गाण्यामधले ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन (सक्रीय सहभाग) होते. आता नुसते दूरस्थ बसून ऐकणे पाहणे हे फार 'पॅसिव्ह' होत आहे. शरीर आणि मन दोन्हींची गुंतवणूक कलेत हवी, तरच पुरता आनंद भोगता येतो. अन्यथा चिंता, ताण, अस्वस्थता माणसाला ग्रासून टाकते.
{{gap}}कला आणि क्रीडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत ते पोटापाण्याचा आणि रुपये आण्याच्या विनिमयाचे साधन होत नाही, तोवर त्यातून निखळ आनंद मिळतो. त्यामुळे चिंता ताण यातून तोल सावरतो. जी निर्मिती केवळ स्वान्तः सुखाय असते, ती माणसाला स्वर्गीय समाधान देते.
{{gap}}जी. ए. कुलकर्णी यांची एक सुंदर कथा आहे. एक फीडल वादक असतो. जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ फीडलवादक व्हायचे, ही त्याची महत्त्वाकांक्षा असते तो खूप मेहनत घेतो; अनेक स्पर्धा गाजवतो, महफिली गाजवतो. यशाच्या धुंदीत जगू पाहतो. पण मन शांत होत नाही. अशांतच राहते. हातात अखंड वाद्य असते. आता सर्वकाळ तो आणि वाद्य हेच एकमेकांचे असतात. त्याला खाण्यापिण्याचेही भान रहात नाही. चालता चालता एका पर्वतश्रेणीतून एका अरुंद वाटेवरून वाद्य वाजवीतच चालत राहतो, पाहणारांना भीती वाटते की, हा वाद्याच्या नादात कुठेतरी तोल जाऊन पडेल; पण घडते भलतेच. एका क्षणी नादावल्या अवस्थेत तो फिडल् फेकून देतो. पाहणारा म्हणतो, "आता त्याला दुसऱ्या कशाची गरज नाही. तोच एक फीडल् झाला आहे. आता तो तोल जाऊन पडणार नाही." कलावंताची कलेची समाधी म्हणतात ती हीच! त्याला आता बाहेरच्या कोणत्याच साधनाची गरज नाही. पूर्णपणे आत्मरंगात तो दंग झाला. सुख-दुःखाच्या, ईर्ष्या स्पर्धेच्या अतीत पल्याड जाऊन तो पोचला.
{{gap}}जी.एं.ची ही कथा जगण्याचं, आनंदानं सफल जगण्याचं एक फार मोठं सूत्र सांगते. एक परीने "आत्मरंगी मन रंगले|" म्हणणाऱ्या संतांसारखी ही कलेची आत्मलीन समाधीच समाधानाची परमावधी ठरते. सुख सुख म्हणतात, ते वस्तूत आणि इयेत थोडंच सापडलं?
{{gap}}''सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।''
{{gap}}हा जीवनाचा नित्य अनुभव असतो.
{{gap}}''वेड्या मना कर विचार । सुख थोडे दुःख फार ।'' {{gap}}असं आधुनिक कवीही सांगतात; पण या दुःखावर मात करण्याचा उताराही<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / २३}}</noinclude> kh05crz0kocqd7wt9qx4b34yzoow0vl पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२५ 104 112416 237661 237654 2026-10-04T12:13:22Z JayashreeVI 4058 237661 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>माणसाजवळच असतो. एखाद्या कलेची थोडी जरी 'कळ' अवगत असली तरी दुःखाच्या 'कळा' विसरता येऊ शकतात. "तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी।"
{{gap}}म्हणून तर क्रौंच पक्ष्याच्या आनंदमन जोडीतल्या नराला पारध्याचा बाण लागला आणि क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून हळव्या हृदयाचे महर्षी वाल्मिकी शोकाकुल झाले; पण दुसऱ्याच क्षणी तो शोक प्रसंगच त्यांच्या अंत:करणातल्या प्रतिभावंत कवीला प्रेरणा देणारा ठरला आणि करुणरसपूर्ण, शोकसंतप्त भावना व्यक्त करणारा सुमधुर अनुष्टुभ् छंदातला श्लोक त्यांच्या मुखातून उमटला. तो जगाच्या पाठीवरच्या एका महान् महाकाव्याचा 'रामायणा'चा प्रारंभबिंदू होता. महाकवीच्या प्रतिभास्पर्शाने 'शोक' श्लोकरूप झाला. त्या रामायण महाकाव्याने अक्षरश: पिढ्यान्पिढ्यांच्या जनमानसाला मात्र समाधान दिले आहे. आनंद दिला आहे. महाकवींमुळे, कलावंतांमुळे वेदनेचा वेद होतो. आसूचे रूपांतर हसूमध्ये होते. हे सामर्थ्य आहे कलेचे! कलात्मक रसिक वृत्तीचे !
{{gap}}आपण सगळे काही महाकवी वाल्मिीकीची (किंवा व्यास मुनींची) प्रतिभा घेऊन जन्माला आलो नाहीत हे खरे! ते प्रतिभेचा महासागर होते हेही खरे! पण आपल्याजवळ त्या महासागरातला एखादा बिंदू निश्चित असतो. तो आपल्यामधल्या कलावंताची सर्जनशीलता, नवनिर्माणक्षमता चेतवतो आणि आपल्याही दुःखावर उतारा देणारे क्षणाचे हसू का होईना फुलवू शकतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांना सरस्वतीकन्या बहिणाबाई चौधरींनी दिलेला संदेश या संदर्भात फार महत्त्वाचा वाटतो. आनंदाच्या चंद्रज्योती फुलवणारा वाटतो. बहिणाबाई म्हणतात- {{block center|<poem>"रडू नको माझ्या जीवा। तुला रड्याची रं सवंऽऽ (सवय)।
रडू हंसव रे जरा । त्यात संसाराची चव।।"</poem>}} हेच खरे!<noinclude>{{right|गाना आये ना आये / २४}}</noinclude> 3qkhcz86azqa2y34c6r99hwafumbhx8 पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२६ 104 112417 237662 2026-10-04T12:14:29Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ सुंदर मुली मध्यंतरी लागोपाठ सुंदर मुलींचे समूहच्या समूह एकत्रित पहायला मिळाले आणि सौंदर्यदर्शनाने नेहमीच जसा आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि वेगळ्या प्रकारचा आ..." 237662 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ सुंदर मुली मध्यंतरी लागोपाठ सुंदर मुलींचे समूहच्या समूह एकत्रित पहायला मिळाले आणि सौंदर्यदर्शनाने नेहमीच जसा आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि वेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवता आला. एखाद्या जागतिक पातळीवरच्या सौंदर्यस्पर्धेला किंवा मेळाव्याला मी गेले होते की काय अशी शंका कदाचित येईल, जागतिक सोडा... गेला बाजार जिल्हा स्तरावरच्या किंवा शहरस्तरावरच्या सौंदर्यवतींच्या मेळाव्याला हजर राहण्याचा योग आला असावा, असेही वाटले असेल; पण अशा कोणत्याही मेळाव्याला, स्पर्धेला जाण्याचा प्रसंग आला नव्हता, हे आधीच सांगितलेले बरे! व्याख्यानानिमित्ताने मराठवाड्यातल्या ग्रामीण म्हणता येईल अशा एका गावी जाण्याचा योग आला होता. स्टॅण्डवर उतरताच एक सुंदर मुलगी तत्परतेने सामोरी आली आणि माझं नाव विचारून "तीच मी', अशी खात्री करून घेत माझ्या हातातल्या सामानाचा ताबा घेतला. तिच्या झपझप चालीशी जमवून घेणं मला जरा कठीणच गेलं आणि पुढे दोन दिवस ती आणि तिच्या परिवारातल्या संस्थेतल्या मुलींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. त्यातली ती स्वतः प्रतिभा आणि तिची एक मैत्रीण अंजली एकदमच लक्षात राहून गेल्या. प्रतिभा ठेंगणी, ठुसकी, चुटचुटीत, एकाच वेळी अनेक कामाचं व्यवधान लीलया सांभाळणारी नळाला लावलेली पाण्याची बादली वाहून जाऊ नये म्हणून धावत असतानाच दुसरीकडे परगावी असलेल्या वकिलांशी मोबाईल फोनवरून बोलत कायद्याच्या कलमांचे सहज संदर्भ देत बोलणारी आणि त्याच वेळी फाटकातून आत येत असलेल्या पोलीस ऑफिसरचे हसतमुखाने स्वागत करीत क्षणात रसोईखान्यात आजचा स्वयंपाक व्यवस्थित चालला आहे ना? इकडे नजर टाकून येणारी अष्टभुजेसारखी सगळीकडे लवलवणारी! त्यामानाने अंजलीची चाल धीमी; पण तिचा उंचपुरा उफाड्याचा बांधा २५<noinclude></noinclude> g093o0x4zixea83x6at73cv6aa5s6nf 237663 237662 2026-10-04T12:19:06Z JayashreeVI 4058 237663 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{Center|{{xx-larger|'''सुंदर मुली'''}}}} {{gap}}मध्यंतरी लागोपाठ सुंदर मुलींचे समूहच्या समूह एकत्रित पहायला मिळाले आणि सौंदर्यदर्शनाने नेहमीच जसा आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि वेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवता आला.
{{gap}}एखाद्या जागतिक पातळीवरच्या सौंदर्यस्पर्धेला किंवा मेळाव्याला मी गेले होते की काय अशी शंका कदाचित येईल, जागतिक सोडा... गेला बाजार जिल्हा स्तरावरच्या किंवा शहरस्तरावरच्या सौंदर्यवतींच्या मेळाव्याला हजर राहण्याचा योग आला असावा, असेही वाटले असेल; पण अशा कोणत्याही मेळाव्याला, स्पर्धेला जाण्याचा प्रसंग आला नव्हता, हे आधीच सांगितलेले बरे!
{{gap}}व्याख्यानानिमित्ताने मराठवाड्यातल्या ग्रामीण म्हणता येईल अशा एका गावी जाण्याचा योग आला होता. स्टॅण्डवर उतरताच एक सुंदर मुलगी तत्परतेने सामोरी आली आणि माझं नाव विचारून "तीच मी', अशी खात्री करून घेत माझ्या हातातल्या सामानाचा ताबा घेतला. तिच्या झपझप चालीशी जमवून घेणं मला जरा कठीणच गेलं आणि पुढे दोन दिवस ती आणि तिच्या परिवारातल्या संस्थेतल्या मुलींनी माझ्या मनाचा ताबा घेतला. त्यातली ती स्वतः प्रतिभा आणि तिची एक मैत्रीण अंजली एकदमच लक्षात राहून गेल्या.
{{gap}}प्रतिभा ठेंगणी, ठुसकी, चुटचुटीत, एकाच वेळी अनेक कामाचं व्यवधान लीलया सांभाळणारी नळाला लावलेली पाण्याची बादली वाहून जाऊ नये म्हणून धावत असतानाच दुसरीकडे परगावी असलेल्या वकिलांशी मोबाईल फोनवरून बोलत कायद्याच्या कलमांचे सहज संदर्भ देत बोलणारी आणि त्याच वेळी फाटकातून आत येत असलेल्या पोलीस ऑफिसरचे हसतमुखाने स्वागत करीत क्षणात रसोईखान्यात आजचा स्वयंपाक व्यवस्थित चालला आहे ना? इकडे नजर टाकून येणारी अष्टभुजेसारखी सगळीकडे लवलवणारी!
{{gap}}त्यामानाने अंजलीची चाल धीमी; पण तिचा उंचपुरा उफाड्याचा बांधा<noinclude>{{center|२५}}</noinclude> hbqbvrp46oirvfl1m218rdyn66frzaj