विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:छन्दोरचना.djvu/९७ 104 5348 237693 15099 2026-10-06T12:02:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237693 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''७०'''|}}</noinclude>{{Block center|<poem>। णच्चअि चंचल । बिज्जुलिआ साह । जाऽणअे । मम्मह खग्ग कि- । णीसअि जलहर । साऽणअे | फुल्ल कअंबअ । अंबर डंबर | दीऽसअे । पाअुस पाअु घ- । णाघण सुमुहि व-। रीऽसअे (प्रापै १। १८८)</poem>}} {{gap}}शंकर आणि अितःपर यांचे अुच्चार शङ्-क-र आणि अि-तह्-प-र असे होत असल्याने अनुस्वार आणि विसर्ग यांच्यामुळे अक्षर व्यञ्जनान्त म्हणजे संवृत म्हणजे गुरु होतें हें अुघड आहे. 'संवय' सारख्या शब्दांत शीर्षबिन्दु हा अनुस्वार व्यक्त करीत नाही, केवळ नाकांतून अुच्चार करायचा हें व्यक्त करितो. तेथे शीर्षबिन्दूने गुरुत्व येत नाही. महत्व अुच्चाराला आहे, लेखाला नाही हें ध्यानांत वागविलें पाहिजे.
{{gap}}ऋलृ यांचा विचार संयुक्त अक्षरांचा विचार केल्यानन्तर करू.
{{center|{{x-larger|संयुक्तवर्णपूर्व अक्षर}}}} {{gap}}'संयोग ऱ्हस्वास गुरुत्व देतो' हा नियम केवळ लेखाकडे लक्ष्य देअून केलेला आहे. काही जोडाक्षरापूर्वील लघूस गुरुत्व येत नाही हें जेव्हा आढळून आलें तेव्हा आघात असल्यासच गुरुत्व येतें अशी या नियमाला पुस्ती जोडण्यांत आली. अुच्चारदृष्ट्या अक्षरघटना कशी होते हे पाहिलें असतें तर साराच घोटाळा दूर झाला असता.
{{gap}}शब्दाची सारी अक्षरें आपण सलग आणि लागोपाठ अुच्चारितों त्यामुळे शब्दांत कोठे दोन वा अधिक व्यञ्जनें संयुक्त असली तर त्यांतील पहिलें व्यञ्जन तत्पूर्वील अक्षरांत समाविष्ट होतें. विप्र या शब्दाचीं लेखनदृष्ट्या वि आणि प्र अशी दोन अक्षरें दिसतात; परन्तु अुच्चारदृष्ट्या विप्-र अशीं दोन अक्षरें पडतात. सूक्ष्मपणाने पाहिलें तर असें दिसतें की प् चा अुच्चार प्रथमाक्षरान्तीं सम्पून मग तो द्वितीय अक्षराच्या आरम्भीं येतच नाही असें नाही. अुच्चार काटेकोरपणाने लिहून दाखवायचा तर तो विप्- प्र असाच लिहिला पाहिजे. पण तें असो. मुख्य गोष्ट ही की महत्त्व लेखापेक्षां अुच्चाराला आहे. 'छन्दसा लक्षणं येन श्रुतमात्रेण बुध्यते' असें श्रुतबोधाच्या आरम्भींच साङ्गितलें आहे. शब्दांत कोठे संयुक्त व्यञ्जनोच्चार असला तर त्यांतील पहिला<noinclude></noinclude> 0gmzomeujhc7jnm3ph7hjl1r5tj3bs0 पान:छन्दोरचना.djvu/९८ 104 5349 237694 15100 2026-10-06T12:20:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237694 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''७१'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>व्यञ्जनोच्चार तत्पूर्वील अक्षरांत मिळून जातो आणि तें अक्षर लघु असल्यास त्यास व्यञ्जनान्त म्हणजे गुरु करितो.
{{center|{{x-larger|संयुक्तवर्ण दृश्य नको श्राव्य हवा.}}}} {{gap}}मराठीत हकार जेव्हा काही व्यञ्जनांत मिळून जातो तेव्हा दिसायला संयुक्त अशीं सहा अक्षरें ण्ह, न्ह, म्ह, ऱ्ह, ल्ह, आणि व्ह हीं होतात. अुच्चारदृष्ट्या हीं अितर संयुक्त व्यञ्जनांसारखी नाहीत. कोणताहि स्वर नाकांत अुच्चारितां येतो. हा अनुनासिक अुच्चार केल्याने लघूस गुरुत्व येतें असें मुळीच नाही. हँ हे अक्षर लघु आहे पण 'हम्' हें अक्षर व्यञ्जनान्त अतअेव गुरु आहे. हा अनुनासिक अुच्चार जसा स्वराशी अगदी अेकजीव होअून जातो तसाच हा हकार म्हणजे महाप्राण हा अेकजीव होअून जाअू शकतो. हा महाप्राण अक्षरांत अेकजीव होअून जातो म्हणूनच प्राचीन लिपींत या महाप्राणयुक्त अक्षरांसाठी पृथक् चिन्हें निर्माण केलीं गेली. महाप्राणयुक्त क म्हणजेच ख होय. पुढे मराठीत जेव्हा महाप्राणयुक्त ण्, न्, म्, र्, ल् आणि व् हे अुच्चार नवीन आले तेव्हा शास्त्रशुद्ध रीत्या या अुच्चारांसाठी पृथक् चिन्हें निर्माण व्हायला हवी होती. तशीं स्वतन्त्र चिन्हें असती तर ख् हा वर्ण ज्याप्रमाणे संयुक्त वाटत नाही, त्याप्रमाणे हे नवे वर्ण संयुक्त वाटले नसते. परन्तु लिपींत हे नवे महाप्राणयुक्त अुच्चार ण्ह, न्ह, म्ह, ऱ्ह, ल्ह, व्ह असे दिसूं लागले म्हणूनच ते संयुक्त वर्ण वाटू लागले. वस्तुतः ते संयुक्त वर्ण नव्हेत. म्हणूनच कण्हेर, पन्हें, तुम्ही, वऱ्हाडी, वल्हें, नव्हे अित्यादि शब्दांत प्रथमाक्षर गुरु होत नाही. अक्षरांचे स्पष्ट अुच्चार करूनहि तीं क-ण्हे-र अशींच पडतात.
{{gap}}ण्ह, न्ह, म्ह, ऱ्ह, ल्ह, व्ह हे उच्चारच संस्कृतांत नाहीत म्हणूनच हीं लिपिचिन्हेंहि नाहीत. ज्या संयुक्त व्यञ्जनांत प्रथम व्यञ्जन ह् आहे अशीं ह्र, ह्म, हृ, ह्लृ सारखीं काही संयुक्त व्यञ्जनें आहेत. यांचे मराठींत जे अुच्चार होतात त्यांत वर्णांचा विपर्यय होऊन ह्ण, ह्म, हृ, ह्लृ यांचे अुच्चार अनुक्रमें ण्ह, म्ह, ऱ्ह, ल्ह असे होतात; आणि चिन्ह, ब्रम्ह, अऱ्हस्व, प्रल्हाद अित्यादि शब्दांत या संयुक्तवर्णाचा अुच्चार करितांना प्रथम वर्णाचें द्वित्व होतें जसें चिन्न्ह, ब्रम्म्ह, अऱ्ऱ्हस्व, प्रल्ल्हाद. या ठिकाणीं चिन्-न्ह, ब्रम्-म्ह, अर्-<noinclude></noinclude> qewsjufoedv8kgucyo1vg0nsv2nfrv3 पान:छन्दोरचना.djvu/९९ 104 5350 237695 15101 2026-10-06T12:34:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237695 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''७२'''|}}</noinclude>ऱ्हस्व, प्रल्-ल्हाद अशी अक्षरविभागणी होत असल्याने पहिली अक्षरें व्यञ्ज- नान्त अतअेव गुरु होतात. चिन्ह, ब्रम्ह, प्रल्हाद अित्यादि शब्दांत अनुक्रमें न्, म्, ल् या व्यञ्जनाचें द्वित्त्व होतें हे त्यांची अनुक्रमें भिन्न, ढम्म, जल्लाद या शब्दांशी तुलना केली असतां तत्काळ स्पष्ट होअील. या शब्दांतील अुच्चाराच्या अनुकरणाने तुम्ही, अुन्हें, वल्हें यांचे अुच्चारसुद्धा जेव्हा तुम्म्ही, अुन्न्हें (कोल्हापुराकडील बोलींत अुन्ने,) वल्ल्हें (वल्लें) असे होतात तेव्हा प्रथमाक्षर व्यञ्जनान्त आणि गुरु होतें.
{{gap}}मराठी शब्दांत व्यञ्जनांचा जेव्हा 'या'शी (आणि केव्हा केव्हा 'ये'शी) संयोग होतो तेव्हा हा यकार असाच त्या अक्षरांत अेकजीव होअून जात असल्याने नद्या, करित्यें या शब्दांत दिसायला जरी द्य आणि त्य हीं संयुक्तव्यञ्जनें असली तरी वस्तुतः ती तशी नसतात. शब्दांची न-द्या, क-रि-त्ये अशीच अक्षरविभागणी होते; आणि या संयुक्त भासणाऱ्या वर्णापूर्वीचें लघु अक्षर गुरु होत नाही. परन्तु संस्कृत शब्दांत तीं संयुक्त व्यञ्जनें असल्याने मराठींत त्यांचा अुच्चार करितांना पहिल्या व्यञ्जनाचें द्वित्व होतें, आणि त्यांतील पहिले व्यञ्जन पूर्वीच्या अक्षरांत मिळून त्यास व्यञ्जनान्त अतअेव गुरु करतें जसें, नद्याम् (नद्-द्याम् ). सत्याने (< सत्य) आणि बत्त्याने (< बत्ता) या दोन शब्दांच्या अुच्चारांची तुलना केल्यास संस्कृत शब्दांचा मराठींत अुच्चार करितांना य्-च्या पूर्वीच्या संयोगी वर्णाचें द्वित्व कसें होतें हे स्पष्ट होअील. पुढील अुदाहरणांत मात्र 'र्-यु' याचा अुच्चार 'र्यु' असा न होतां मराठी 'ऱ्यु' प्रमाणे होअून तत्पूर्वील लघूस गुरुत्व येत नाही. {{Block center|<poem>"अटति यद्भवानह्नि काननं त्रुटिऱ्युगायते त्वामपश्यताम् कुटिलकुन्तलं श्रीमुखंच ते जड अदीक्षतां पक्ष्मकृदृशाम्" (भाग १०।३१।१५)</poem>}} {{gap}}तेव्हा अक्षरांचा सलग आणि स्पष्ट अुच्चार केला असतां अेखाद्या अक्षरांत जर पुढील जोड वर्णातील प्रथमवर्णाचा अुच्चार येअून मिळत असेल तरच तें अक्षर लघु असल्यास गुरु होतें असा निरपवाद नियम समजावा.{{nop}}<noinclude></noinclude> 4lkiif1l86keyyaksgkqypbm6xmbyzp पान:छन्दोरचना.djvu/१०० 104 5351 237716 15102 2026-10-07T10:34:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237716 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''७३'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{gap}}परन्तु या नियमालाहि काही अपवाद असावेत अशी म्हणण्याची प्रवृत्ति केव्हा होते? विप्र याचा अुच्चार निरपवादपणें विप्- प्र (_ ‿) असा होतो; पण हाच प्र जर अेखाद्या पदारम्भी आला तर तत्पूर्वील लघूस गुरुत्व यावें की नाही? ज्ञान-प्रकाश हा शब्द [ _ ‿, ‿ _ ‿] असा अुच्चारावा की ज्ञानप्-प्रकाश [ _ _ ‿ _ ‿] असा अुच्चारावा. दैनिक बोलींत तर याचा अुच्चार [_, ‿ _ ‿] ज्ञान्-प्रकाश असा होतो. तेव्हा पद्यांत ग्राह्य कोणता मानायचा हा प्रश्न आहे. डोळ्यापुढे पद्यांतील अुदाहरण पाहिजे म्हणून पुढील अुदाहरण रचून पाहूं या. {{Block center|<poem>रवि प्रकाश हा पडला भूवर, रविप्रकाशीं सुवर्णसुन्दर मुलांस या हिरवळीं क्रीडुं द्या- असो काळजी अुद्याची अुद्या.</poem>}} {{gap}}छन्दोभङ्ग टाळायचा असला तर पहिल्या चरणांतील 'वि' हें दुसरें अक्षर लघुच ठेविलें पाहिजे; आणि तीव्र प्रयत्नाने, हट्टाने तें लघुच ठेवायचें म्हणजे 'वि'च्या मागून किञ्चित् अडखडळल्यासारखें थाम्बून मग पुढील 'प्र'चा अुच्चार अस्पष्ट निसरडा करावा लागतो.<ref>यालाच तीव्रप्रयत्नोच्चारण म्हणतात. "यदा तीव्रप्रयत्नेन संयोगादेरगौरवम् । नच्छन्दोभङ्ग अित्याहुस्तदा दोषाय सूरयः" (सरस्वतीकण्ठाभरणं १।१२३) या वचनाला फार महत्व देतां कामा नये.</ref> असें न केलें तर दुसऱ्या चरणांतील वि-प् यांच्या सहजसंयोगाप्रमाणे पहिल्या चरणांतहि संयोग होऊन, विप् असें होअून दुसऱ्या अक्षराला गुरुत्व येतें. सलग, स्पष्ट आणि स्वाभाविक अुच्चाराला महत्त्व देणारा कवि पहिला चरण 'पडे हा रविप्रकाश सुन्दर' असा सुधारून घेअील. अेका चरणांत अेक नियम आणि दुसऱ्या चरणांत दुसराच नियम असें निरङ्कुशत्व त्याला रुचणार नाही. पद्यांत चरणांतील सारी अक्षरें सलग आणि स्पष्ट अुच्चारावयाची असतात. तेव्हा चरणांत कोठेहि संयुक्त वर्ण आला असला, आणि तो कानालाहि संयुक्त प्रतीत होत असला तर तत्पूर्वील लघु हा निरपवादपणे गुरु झाला पाहिजे. क्र, प्र अित्यादि संयुक्त वर्णोच्या प्रकरणी सुद्धा अपवाद करण्यांत येअू नये.{{nop}}<noinclude>
{{reflist}}</noinclude> dzm0fs98ekd7byda1u8p7zbs5u6xvgl पान:छन्दोरचना.djvu/101 104 5817 237718 15604 2026-10-07T10:42:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237718 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''७४'''|}}</noinclude>{{Block center|<poem>( १ ) "सा मङ्गलस्नानविशुद्धगात्री {{gap}}गृहीतप्रत्युद्गमनीयवस्त्रा” (कुमार ७।११) ( २ ) "प्राप्यनाभिहृदमजनमाशु {{gap}}प्रस्थितं निवसनग्रहणाय" (शिशु १०।६०)</poem>}} {{gap}}या अवतरणांतील छन्दोभङ्गाच्या दोषाच्या परिहारासाठी 'प्रेऱ्हेवा' म्हणून जें सूत्र पिङ्गलाच्या नावावर विकण्यांत येतें त्याचा पिङ्गलाच्या छन्दःशास्त्रांत तरी पत्ता लागत नाही.
{{gap}}चरणान्तीं खटका तरी असतोच, तेव्हा अेखाद्या चरणारम्भी संयुक्त वर्ण आल्यास त्यांतील पहिला व्यञ्जनोच्चार काही त्याच्या पूर्वीच्या चरणाच्या अन्तीं असलेल्या अक्षरांत मिळायला जात नाही; आणि तें चरणान्त्य अक्षर लघु ठेवायचे असल्यास तसें राहूं शकते. {{Block center|<poem>जलबिन्दु जसा पद्मदलस्थित क्षणभङ्गुर हे तैसें जीवित.</poem>}} {{gap}}येथे प्रथमचरणान्तीं खटका असल्याने तक्-क्षण असा संयोग होऊं शकत नाही. म्हणूनच केदारभट्टाने {{Block center|<poem>"पादादाविह वर्णस्य संयोगः क्रमसंज्ञकः पुरःस्थितेन तेन स्याल्लघुताऽपि क्वचिद् गुरोः" (के १।१०)</poem>}} असा नियम साङ्गून {{Block center|<poem>"अल्पव्ययेन सुन्दरि ग्राम्यजनो मिष्टमश्नाति"</poem>}} हे अुदाहरण दिलें आहे.
{{center|{{x-larger|ऋलृ हे शुद्ध स्वर नव्हेत.}}}} {{gap}}ऋ, लृ यांचा विचार आता करणें योग्य होअील. संस्कृतांत यांना स्वर मानतात; आणि मराठी भाषेत हे संस्कृतशब्दाव्यतिरिक्त अितर कोठेहि आढळत नाहीत. लृ हा क्लृप्ति या अेकच शब्दांत आढळतो. ऋ आणि लृ यांचा अुच्चार प्राचीनकाळीं संस्कृतांत कसा होत असेल तो असो. आ, अी, अू, अे, हे<noinclude></noinclude> 029i1yidzrpk2cvor4jcvqjzijrram1 पान:छन्दोरचना.djvu/102 104 5818 237729 15605 2026-10-07T11:08:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237729 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''७५'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>आपले स्वरच काय, परन्तु अिङ्ग्रजीतून मराठीत आलेले बॅट् हॅट् अित्यादि शब्दांतील ॲ, नि बॉल मधील ऑ हे अिङ्ग्रेजींतील स्वरहि सारेच 'अ' ची निरनिराळीं निर्भेळ रूपे वाटतात. ऋ-लृ चे आजचे प्रचलित अुच्चार पहातां ते तसे अच्या रूपावलीत बसत नाहीत. ज्ञ म्हणजे ज्-ञ याचा अुच्चार जसा मराठींत ज् आणि ञ् यांच्या संयोगाहून अगदीच भिन्न, 'द्न्य' असा होतो त्याप्रमाणे ऋ-लृ यांचे आज होत असलेले अुच्चार प्राचीन, अकाराच्या रूपावलीत बसतील अशा अुच्चाराहून अगदीच भिन्न वाटतात. वस्तुतः केवळ व्यञ्जनांचा अुच्चार करून दाखविणें अशक्य आहे; परन्तु क्, ख्, ग्, र्, ल् अशीं पाय मोडलेलीं व्यञ्जनें अुच्चारून दाखवितांना ज्या स्वराचा आश्रय घेण्यांत येतो, जो धड अि नाही धड अु नाही पण यांमधीलच असा, जर्मन Ö सारखा स्वर, तो र् आणि ल् या व्यञ्जनांना मिळाला असतां जे अुच्चार होतील ते अनुक्रमें ऋ-लृचे अुच्चार होत. अर्थात् आधुनिक मराठींत ऋ-लृ हे स्वर नसून हीं रि-लि वा रु-लु यांसारखी अक्षरे आहेत. अेखादें स्वरान्त अक्षर दीर्घ अुच्चारीत राहिलें असतां लाम्बविलेला अुच्चार हा त्या स्वराचा अुच्चार असतो. का हें अक्षर लाम्बवून अुच्चारिलें की आऽऽऽऽ हा स्वर प्रतीत होतो. कृ हें अक्षर लाम्बवून अुच्चारिलें की जो स्वर प्रतीत होतो तो कृमधील शुद्ध स्वर होय. ककार आणि रकार हे लाम्बविले जात नाहीत. ऋ आणि लृ या अक्षरांत जो स्वर प्रतीत होतो त्याच्यासाठी जर ृ हे चिन्ह अपयोगिलें तर ऋ आणि लृ हीं अक्षरें -ृ आणि लृ अशीं लिहिली जातील; आणि मृ हे साधें अक्षर न राहतां म्रृ असें संयुक्त अक्षर होअील. अर्थात् अमृत शब्दाचीं अक्षर अम्-मृ-त (_ ‿ ‿) अशीं पडून ऋकारयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराला गुरुत्व येअील.
{{gap}}मग कवींच्या रचनेंत ऋकाराने तत्पूर्वील लघूला गुरुत्व आल्याचीं अुदाहरणें दुर्मिळ कां? अितर संयुक्तवर्णीपूर्वीच्या लघूस गुरुत्व न आल्याचीं अुदाहरणें जेथे अगणित आहेत, अेखाद्या पदारम्भी संयुक्त वर्ण आला असतां तत्पूर्वील लघु तीव्रप्रयत्नाने लघु ठेवण्याची जेथे वहिवाट दिसते तेथें ऋ-लृ यांच्या पूर्वील लघूस गुरुत्व आल्याचें अुदाहरण नाही या गोष्टीला महत्त्व नाही. "वीर पडुनि रणि स्वर्ग जिङ्किती" (केपगु ४९) असा चरण पादाकुलकजातींत लिहिणारे कवि "अुज्ज्वल मुगुटशिरीं धरि नृपती" (केपगु ४९) असा चरण लिहितील<noinclude></noinclude> rrtfc4mghigizj7u832qg5ev2wvvpjj पान:छन्दोरचना.djvu/103 104 5819 237730 15606 2026-10-07T11:20:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237730 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''७६'''|}}</noinclude>यांत नवल नाही. परन्तु ऋ आणि लृ हे स्वर आहेत असें मानणारे हेच कवि– श्री० नरसिंह चिन्तामण केळकर जेव्हा सहजगत्या शार्दूलविक्रीडितांत
{{gap}}"देअी धीर मनासि आजवर मी, झाले प्रयत्न वृथा" (केपगु ६९) असा चरण लिहितात तेव्हा ऋकारयुक्त अक्षरापूर्वील लघु गुरु व्हायला पाहिजे हें आपोआप सिद्ध होतें. अक्षरांचे अुच्चार सलग आणि स्पष्ट केले असतां ऋकारयुक्त व्यञ्जनापूर्वील लघूस गुरुत्व आलेच पाहिजे. "प्रवृत्ति परिसूनिया स्तिमित सर्वही मानसी" (लेति २) या पृथ्वीवृत्तांतील चरणांतील प्रवृत्ति या शब्दाचा अुच्चार आणि "निवृत्ती ही प्रवृत्तीशी झुन्जे नित्य विलोकी" (टिक १।१२४) या साकीजातींतील चरणांतील प्रवृत्ति या शब्दाचा अुच्चार यांची तुलना केली असतां आधुनिक मराठीतील रूढ आणि प्रचलित अुच्चाराच्या दृष्टीने टिळकांचाच चरण शुद्ध वाटतो.
{{center|{{x-larger|हृचा अपवाद होतो का?}}}} {{gap}}मग सहृदय या शब्दामध्ये प्रथमाक्षर गुरु का होअू नये? हृ मध्ये संयुक्त व्यञ्जन नाही हेच कारण होय. संस्कृतलेखनपद्धतीप्रमाणे हृ हे अक्षर लिहिलें जात असलें तरी अुच्चारतः तें ह् + र् +अ (hro) असें नसून ऱ्ह + अृ rhö असें आहे. म्हणजे ऱ्ह् मध्ये अेक विशिष्ट स्वर मिळून हें अक्षर होतें. अर्थात् 'तऱ्हा' मध्ये ज्याप्रमाणे प्रथमाक्षराला गुरुत्व येत नाही, त्याचप्रमाणे 'सहृदय' मध्ये प्रथमाक्षराला गुरुत्व येत नाही.
{{center|{{x-larger|स्वरभक्ति}}}} {{gap}}ज्या संयुक्त वर्णात पहिला वर्ण र् आहे अशा संयुक्त वर्णाची फाळणी वृत्ताच्या सोयीसाठी मध्ये अेखादा अिकार घालून प्राचीन संस्कृत काव्यांत करण्यांत येते असें दिसतें. {{Block center|<poem>"यं वै श्वसन्तमनु विश्वसृजः श्वसन्ति यं चेकितानमनु चित्तय अुच्चकन्ति भूमण्डलं सर्षपायति यस्य मूर्ध्नि तस्मै नमो भगवतेऽस्तु सहस्रमूर्ध्न" (भाग ६।१६।४८)</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude> ikk3amyvtz0sqlfzou94mdhs1t6fuho पान:छन्दोरचना.djvu/104 104 5820 237731 15607 2026-10-07T11:32:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237731 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''७७'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{gap}}येथे सर्ष याचा अुच्चार सरिष असा करावयाचा आहे. मराठींतहि वर्ष याचें वरिस असें रूप होतें. पण मराठींत वर्ष लिहून वरिस अुच्चारीत नाहीत तर 'वरिस' असें लिहितात.
{{center|{{x-larger|चरणान्त्य अकार}}}} {{gap}}चरणान्ती विरामपूर्व स्वर दीर्घ होतो या न्यायाने चरणान्त्य अकार अवश्य असल्यास दीर्घ करितां येतो. या दीर्घ अ-साठी लिपींत निराळें चिन्ह नाही त्यामुळे तो दिसायला अेकमात्रक अच दिसला तरी छन्दाच्या आवश्यकतेप्रमाणे तो दीर्घ अुच्चारावयाचा असतो. चरणान्त्य अकार हा ऱ्हस्व असूंच शकत नसता तर त्याच्यासाठी निराळें चिन्ह असण्याची आवश्यकता नव्हती. पण चरणान्त्य अकार कित्येकदा ऱ्हस्व असूं शकतो. तेव्हा शुद्धलेखन करायचें म्हणजे कवितेंत तो जेव्हा दीर्घ असेल तेव्हा स्वर अेका मात्रेने पुढे लाम्बवायचा आहे हें दाखवायला त्याच्यापुढे ऽ हें चिन्ह घालावें. {{Block center|<poem>"तेव्हा आम्ही म्हटलें, "ही ऱ्हासाची रजनी केव्हा जाअिल विरूनि साची?- स्वतन्त्रतेची पहाट ती येअीलऽ?" अुत्कर्षाचा दिन केव्हा सुचवीलऽ" (केक २०)</poem>}} {{gap}}चरणान्तीं अेक मात्रेच्या विरामाचीहि कूस नसते, केवळ खटका असतो तेव्हा अन्त्य अकार ऱ्हस्वच अुच्चारावा लागतो. {{Block center|<poem>( १ ) "भुललों देखुनि सकळहि सुन्दर {{gap}}सुराङ्गना तों नाचति भूवर." (केक १४३) ( २ ) "मन किती अुताविळ घेत धाव {{gap}}कधि वरिन नोवरी हीच हाव." (देशा ३७) ( ३ ) "आम्ही श्रीरामाचे चाकर{{gap}}{{gap}}ध्रु. "हरिकीर्तन आमुचा मुशारा, रामनाम तुपसाखर{{gap}}१ अमृतरूप घरिं बसल्या देतो स्वात्मसुखाची भाकर." २ (अक १३७)</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude> 3x5g8cpafmgq1wovm4s4ge9ss1vpm1k 237732 237731 2026-10-07T11:33:50Z कल्पनाशक्ती 3813 237732 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''७७'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{gap}}येथे सर्ष याचा अुच्चार सरिष असा करावयाचा आहे. मराठींतहि वर्ष याचें वरिस असें रूप होतें. पण मराठींत वर्ष लिहून वरिस अुच्चारीत नाहीत तर 'वरिस' असें लिहितात.
{{center|{{x-larger|चरणान्त्य अकार}}}} {{gap}}चरणान्ती विरामपूर्व स्वर दीर्घ होतो या न्यायाने चरणान्त्य अकार अवश्य असल्यास दीर्घ करितां येतो. या दीर्घ अ-साठी लिपींत निराळें चिन्ह नाही त्यामुळे तो दिसायला अेकमात्रक अच दिसला तरी छन्दाच्या आवश्यकतेप्रमाणे तो दीर्घ अुच्चारावयाचा असतो. चरणान्त्य अकार हा ऱ्हस्व असूंच शकत नसता तर त्याच्यासाठी निराळें चिन्ह असण्याची आवश्यकता नव्हती. पण चरणान्त्य अकार कित्येकदा ऱ्हस्व असूं शकतो. तेव्हा शुद्धलेखन करायचें म्हणजे कवितेंत तो जेव्हा दीर्घ असेल तेव्हा स्वर अेका मात्रेने पुढे लाम्बवायचा आहे हें दाखवायला त्याच्यापुढे ऽ हें चिन्ह घालावें. {{Block center|<poem>"तेव्हा आम्ही म्हटलें, "ही ऱ्हासाची रजनी केव्हा जाअिल विरूनि साची?- स्वतन्त्रतेची पहाट ती येअीलऽ?" अुत्कर्षाचा दिन केव्हा सुचवीलऽ" (केक २०)</poem>}} {{gap}}चरणान्तीं अेक मात्रेच्या विरामाचीहि कूस नसते, केवळ खटका असतो तेव्हा अन्त्य अकार ऱ्हस्वच अुच्चारावा लागतो. {{Block center|<poem>( १ ) "भुललों देखुनि सकळहि सुन्दर {{gap}}सुराङ्गना तों नाचति भूवर." (केक १४३) ( २ ) "मन किती अुताविळ घेत धाव {{gap}}कधि वरिन नोवरी हीच हाव." (देशा ३७) ( ३ ) "आम्ही श्रीरामाचे चाकर{{gap}}{{gap}}ध्रु. {{gap}}"हरिकीर्तन आमुचा मुशारा, रामनाम तुपसाखर{{gap}}१ {{gap}}अमृतरूप घरिं बसल्या देतो स्वात्मसुखाची भाकर." २ (अक १३७)</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude> 15g6ir2854fbnq2xb2wjzokowg3uh0l पान:छन्दोरचना.djvu/105 104 5821 237733 15608 2026-10-07T11:46:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237733 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''७८'''|}}</noinclude>{{gap}}चरणान्त्य अकार हा छन्दाच्या सोयीसाठी जसा दीर्घ होअू शकतो तसा तो छन्दाच्या सोयीसाठी गाळतांहि येतो. हा गाळावयाचा अकार वर्णाखाली हलचिन्ह काढून दाखविणें हें शुद्धलेखन होअील. {{Block center|<poem>"पाखरा, येशिल का परतून्? मत्प्रेमाने दिल्या खुणांतुनि अेक तरी अठवून्?” (टिक १।१४१)</poem>}} अशा ठिकाणी अन्त्य अक्षर अकारविरहित असूनहि तो वर्ण पाय मोडून लिहिणे कित्येकांना चुकीचें वाटतें. जो अकार अुच्चारावयाचा नाही तो खुणेने तसा दाखविण्यांत चूक कोणती? तो अकार अुच्चारावयाचा असतो असा ज्यांना भ्र‍म होतो त्यांच्या भ्रमाचा निरास करण्यासाठी वरील पद्याच्याच जातींतील संस्कृत पद्य देतों. तुलना अवश्य करून पहावी. {{Block center|<poem>"विजयते रामदूत हनुमान् यो रघुपतिनासह सुग्रीवं मैत्र्या योजितवान्" (विदप ८)</poem>}} {{gap}}हा अन्त्य अकार अुच्चारित आहे असें समजून त्याचा अेक लघु गणून अरविन्दादि भिन्न वृत्तें हिन्दी छन्दःप्रभाकरांत साङ्गितलेलीं आहेत; परन्तु ह अकार अनुच्चारित आहे तसा गणल्यास वृत्तभेद होत नाही. अुदाहरणार्थ, छन्दःप्रभाकरांतील अरविन्द (पृ. २०७) हे वृत्त वस्तुतः दुर्मिलच होय.
{{gap}}अकार गाळण्याची ही मोकळीक चरणान्तींच ठेविलेली आहे, अितरत्र नाही. दैनिक बोलींत शब्दान्त्य अचा अुच्चार क्वचितच होतो; आणि जर, मग कळ अित्यादि द्व्यक्षरी शब्दांतील अन्त्य अकार गळून अुपान्त्य अ हटकून दीx होतो. तरी पद्यांत हा शब्दान्त्य अकार अुच्चारावा आणि अुपान्त्य अकार ऱ्हस्वच गणावा अशी वहिवाट आहे. जर मग, कळ अित्यादि शब्दांचें लगत्वलेखन (‿ ‿) असेंच होतें. बोलतो, चालतो अित्यादि शब्दांतहि मधला अकार गळून सामान्य अुच्चार बोल्तो, चालतो असा होतो; तथापि या अुच्चाराला अद्यापि मान्यता मिळालेली नाही. अेरव्हीचा अुच्चार आणि काव्यपठनांतील अुच्चार यांतील ह भेद स्वाभाविकपणाला थोडा मारक होतो हें निःसंशय खरें आहे. हा भेx काढून टाकिल्यास भाषेचें स्वरूप किती निराळें दिसेल या कल्पनेनेच डोx<noinclude></noinclude> ohsnvnwl74iyqqg0my214hoq42s1uxj पान:छन्दोरचना.djvu/106 104 5822 237734 15609 2026-10-07T11:57:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237734 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''७९'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>मिटून घ्यावेसे वाटतात. तथापि ही क्रान्ति बहुजनांच्या योजनेने आणि दण्डकाने घडवून आणल्यास तें अनिष्ट होअील असें मात्र नाही.
{{gap}}'राजा शिवाजी' या काव्याचे कर्ते महादेव मोरेश्वर कुण्टे<ref>मूळांत शब्द पुढीलप्रमाणे आहेत. "It is not pure Marathi words that are at fault, but the system of quantification now in force is irregular and unnatural. Marathi words are not written as they are pronounced. For instance nobody pronounces अुचलून as consisting of four full syllables, but च् is only a consonant and is amalgamated with अु which therefore becomes long by position. So long as this difference between Marathi written and Marathi spoken is not removed or atleast recognized; so long as some innovation founded on the knowledge of this difference is not introduced the cause of Marathi metrical composition should suffer. Aware of this, I fearlessly adopted the method of writing words as they are spoken in my poem. So the reader will find खाल्चा instead of खालचा which is really unmusical." (Preface p. 23)</ref> हे ख्रिस्तशके १८६९ मधील आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, "हा शुद्ध मराठी शब्दांचा दोष नाही; पण अक्षरविभागणीची आणि अक्षरमोजणीची पद्धत ही अनियमित आणि अस्वाभाविक आहे. मराठी शब्द जसे अुच्चारिले जातात तसे ते लिहिण्यांत येत नाहीत. अुदाहरणार्थ अुचलून या शब्दाचा अुच्चार करितांना पूर्ण चार अक्षरें कोणीहि अुच्चारीत नाही. च हें केवळ व्यञ्जन असून तें तत्पूर्वील 'अु' मध्ये समाविष्ट होतें आणि त्यामुळे तें अक्षर गुरु होतें. लेखी मराठी आणि बोललेली मराठी यांच्यातील हा भेद जोंपर्यन्त दूर करण्यांत येत नाही, निदान ओळखला जात नाही, या भेदाच्या जाणीवेवर जोपर्यन्त अेखादी नवी पद्धति स्थापण्यांत येत नाही तोपर्यंत मराठी पद्यरचनेच्या कार्याची ही हानिच होत रहाणार. हें जाणून शब्द जसे अुच्चारण्यांत येतात तसेच ते माझ्या काव्यांत लिहिण्याची पद्धति मी निर्भीडपणे स्वीकारिली. म्हणून वाचकाला 'खालचा'च्या ठिकाणी 'खाल्चा' असें आढळेल. 'खालचा' हें रूप खरोखर कर्णकटु आहे."{{nop}}<noinclude>
{{reflist}}</noinclude> rlju64um9vyhxey3l2m4y9zo7pa2suq पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/२९ 104 112099 237715 236611 2026-10-07T10:29:06Z Shurpalimedha 5041 237715 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>टेबलावरची तीन फूट जागा अडविली जाई. पुस्तके इतकी लठ्ठ की, शेवटचे पान वाचून संपेपर्यंत पहिल्या पानावर वाचलेले सपाट होई. हे सात विषय डोक्यात कोंबताना कवटी फुटते की काय, असे वाटायचे. दिलीपला परीक्षेचे इतके टेन्शन असे की, कधी कधी तो केळे सोलून साल तोंडात व गर खिडकीबाहेर टाकायचा.
{{gap}}पहाटे भिंतीला झाडू टेकवून विडीच्या धुराची वलये सोडणारा रस्त्यावरचा सफाई कामगार आमच्याहून अधिक सुखी वाटायचा. मारुतीच्या किंवा शंकराच्या मंदिरात त्या त्या दैवतांच्या वारी आमची गर्दी व्हायची. तोंडी परीक्षेच्या वेळी परीक्षक म्हणजे यमाचा दूत वाटायचा. एखाददुसरा परीक्षक कनवाळू असायचा; इतरांची दृष्टी वाघासारखी व आम्ही त्याच्या तावडीत सापडलेल्या गायीसारखे! परीक्षा जवळ आली की अधोरेखित केलेले वाचणे, गेल्या वर्षी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वगळणे, महत्त्वाचीच प्रकरणे पाठ करणे, प्रश्नपत्रिका काढणाऱ्याचे आवडते विषय कोणते याची माहिती मिळविणे, गेल्या पाच वर्षांतील प्रश्नपत्रिका सोडवणे, इतर कॉलेजातील विद्यार्थ्यांनी फोनद्वारे कळविलेल्या 'टिप्स'ची यादी करून त्यानुसार अभ्यास करणे व जमलेच तर वशिला मारून परीक्षकाला आपला नंबर देणे, हे सर्व चाले. इतके करूनही 'दांडी गुल' झाली, की तो विद्यार्थी 'नंबर दिला म्हणून त्या परीक्षकाने मला मुद्दाम नापास केले' अशी शिव्यांची लाखोली वाहायचा. पास झाला म्हणजे आपल्याच हुशारीने आपण पास झालो, असे म्हणायचा. हे नंबर देण्याघेण्यात तथ्य नसे. कुठलाही जबाबदार परीक्षक केवळ एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने नंबर दिला म्हणून 'ढ' विद्यार्थ्याला पास करू शकणार नव्हता. पास होण्यासाठी शक्य ते प्रयत्न केल्याचे समाधान मिळण्यासाठी विद्यार्थी आपला नंबर देई. यावरून एक आख्यायिका आठवते. एकदा एक परीक्षक अमुक एका नंबरच्या विद्यार्थ्याला पास करायलाच हवे, असा हट्ट धरून बसले. त्यांच्या सहकाऱ्याने विचारले, 'त्याच विद्यार्थ्याविषयी तुम्हाला इतकी कळकळ का बरं?' ते परीक्षक उत्तरले, 'या एकाच विद्यार्थ्याचा नंबर मला अजून कुणी दिलेला नाही. त्याला कोणी गॉडफादर नसावा म्हणून मला त्याचा गॉडफादर व्हावेसे वाटते.' आपलाच विषय काय तो जगात महत्त्वाचा, अशा आविर्भावाने परीक्षक कानाकोपऱ्यांतले प्रश्न विचारायचे. परीक्षक आपली विद्यार्थीदशा कसे विसरतात, असा प्रश्न पडे. परीक्षेच्या वेळचा मानसिक ताण, छातीतील मी डॉक्टर झालो । २५<noinclude></noinclude> mfia43qqs6tj3l77xxj2cs2i6k3vi00 237717 237715 2026-10-07T10:37:34Z Shurpalimedha 5041 237717 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>टेबलावरची तीन फूट जागा अडविली जाई. पुस्तके इतकी लठ्ठ की, शेवटचे पान वाचून संपेपर्यंत पहिल्या पानावर वाचलेले सपाट होई. हे सात विषय डोक्यात कोंबताना कवटी फुटते की काय, असे वाटायचे. दिलीपला परीक्षेचे इतके टेन्शन असे की, कधी कधी तो केळे सोलून साल तोंडात व गर खिडकीबाहेर टाकायचा.
{{gap}}पहाटे भिंतीला झाडू टेकवून विडीच्या धुराची वलये सोडणारा रस्त्यावरचा सफाई कामगार आमच्याहून अधिक सुखी वाटायचा. मारुतीच्या किंवा शंकराच्या मंदिरात त्या त्या दैवतांच्या वारी आमची गर्दी व्हायची. तोंडी परीक्षेच्या वेळी परीक्षक म्हणजे यमाचा दूत वाटायचा. एखाददुसरा परीक्षक कनवाळू असायचा; इतरांची दृष्टी वाघासारखी व आम्ही त्याच्या तावडीत सापडलेल्या गायीसारखे! परीक्षा जवळ आली की अधोरेखित केलेले वाचणे, गेल्या वर्षी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वगळणे, महत्त्वाचीच प्रकरणे पाठ करणे, प्रश्नपत्रिका काढणाऱ्याचे आवडते विषय कोणते याची माहिती मिळविणे, गेल्या पाच वर्षांतील प्रश्नपत्रिका सोडवणे, इतर कॉलेजातील विद्यार्थ्यांनी फोनद्वारे कळविलेल्या 'टिप्स'ची यादी करून त्यानुसार अभ्यास करणे व जमलेच तर वशिला मारून परीक्षकाला आपला नंबर देणे, हे सर्व चाले. इतके करूनही 'दांडी गुल' झाली, की तो विद्यार्थी 'नंबर दिला म्हणून त्या परीक्षकाने मला मुद्दाम नापास केले' अशी शिव्यांची लाखोली वाहायचा. पास झाला म्हणजे आपल्याच हुशारीने आपण पास झालो, असे म्हणायचा. हे नंबर देण्याघेण्यात तथ्य नसे. कुठलाही जबाबदार परीक्षक केवळ एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने नंबर दिला म्हणून 'ढ' विद्यार्थ्याला पास करू शकणार नव्हता. पास होण्यासाठी शक्य ते प्रयत्न केल्याचे समाधान मिळण्यासाठी विद्यार्थी आपला नंबर देई.
{{gap}}यावरून एक आख्यायिका आठवते. एकदा एक परीक्षक अमुक एका नंबरच्या विद्यार्थ्याला पास करायलाच हवे, असा हट्ट धरून बसले. त्यांच्या सहकाऱ्याने विचारले, 'त्याच विद्यार्थ्याविषयी तुम्हाला इतकी कळकळ का बरं?' ते परीक्षक उत्तरले, 'या एकाच विद्यार्थ्याचा नंबर मला अजून कुणी दिलेला नाही. त्याला कोणी गॉडफादर नसावा म्हणून मला त्याचा गॉडफादर व्हावेसे वाटते.'
{{gap}}आपलाच विषय काय तो जगात महत्त्वाचा, अशा आविर्भावाने परीक्षक कानाकोपऱ्यांतले प्रश्न विचारायचे. परीक्षक आपली विद्यार्थीदशा कसे विसरतात, असा प्रश्न पडे. परीक्षेच्या वेळचा मानसिक ताण, छातीतील
{{right|मी डॉक्टर झालो । २५}}<noinclude></noinclude> 615c2aujca8gvegjhxi13m3cf65ksg6 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३० 104 112100 237719 236612 2026-10-07T10:42:52Z Shurpalimedha 5041 237719 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>धडधड, वारंवार सू लागणे, जीभ कोरडी पडणे, झोप न लागणे, त्याच विषयाची स्वप्ने पडणे हे सर्व आता गमतीशीर वाटते. आता या वयातही स्वप्ने पडतात. परीक्षा तोंडावर आलीय, माझा अभ्यास झालेला नाहीय, नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसावे लागणार, या भीतीने जाग येते, तेव्हा बरे वाटते. लोकांना काय काय छान स्वप्ने पडतात; गोपी नदीत आंघोळ करताहेत, आपण कृष्णासारखे झाडावर बसून त्यांची साडी-चोळी सांभाळतोय, वगैरे. अशी स्वप्ने पडायला नशीब लागते.
{{gap}}अमेरिकन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मोजमाप अधिक योग्य रीतीने करणारी आहे, असे वाटते. आम्हाला प्रो. लुईस हे 'जागतिक आरोग्य संघटने'ने नियोजित केलेले एक प्रोफेसर फॉर्माकॉलॉजी शिकवीत. आधी न कळवता एखादे दिवशी एकाएकी आमच्या हातात प्रश्नपत्रिका पडे. त्यात शंभरएक प्रश्न असत. भराभर उत्तरे लिहून मोकळे व्हायचे. एका तासात परीक्षा संपे. कुठलेही टेन्शन नसे. रोज अभ्यास करणारा सहज पास होई. मात्र पास होण्याकरिता शंभरांत ७५ मार्क मिळवावे लागत. परीक्षेचे अवडंबर न माजवता वर्षभरात अशा प्रकारच्या अनेक परीक्षा देऊन पास/नापास ठरवले तर किती सुखावह होईल, असे वाटे.
{{gap}}आमचे अॅनाटॉमीचे असिस्टंट प्रोफेसर म्हणजे एक वल्ली होती. टांगेवाल्यासारखी आखूड पँट, जाड चष्मा, कपाळावर सदा आठ्या, तोंडात सतत पान, कधी रंगात आले म्हणजे कविता म्हणायच्या चालीवर भावगीत गायचे. दाताच्या कवळीने पान चघळताना 'चंद्रावरती दोन गुलाब' ऐवजी 'चंद्रावरती दोन जुलाब' असे ऐकायला यायचे! त्यांच्या ऑफिसात रांगेत कवट्या ठेवलेल्या असल्यामुळे जादूगाराच्या खोलीचे स्वरूप आले होते. कवटीसंबंधी त्यांचे काही संशोधन चाललेले असे. चुकून एकदा ते मला बसमध्ये भेटले. गुरुवर्यांच्या प्रेमामुळे मी त्यांचे बसचे तिकीट काढले. फ्लोरा फाऊंटनला जाईपर्यंत त्यांनी कवटीविषयी मला आकलन न होणारी इतकी माहिती सांगितली, की माझी कवटी आऊट व्हायच्या बेतात आली. त्यांचे तिकीट काढल्याबद्दल ही महाभयंकर शिक्षा होती. यापुढे कधी भेटले तर आपण त्यांना चुकवून दुसन्या बसमध्ये बसायचे, असा निश्चय केला.
{{gap}}कॉलेजात तास कंटाळवाणा असला म्हणजे आम्ही मागच्या दाराने पळ काढीत असू. तिघे-चौघे जमले की कोपऱ्यावरचे 'शांती उपाहारगृह' गाठायचो. माझ्याबरोबर माझा मित्र दिलीप व त्याची मैत्रीण सुधा असायची. या दोघांचे वैशिष्ट्य असे की, आपसात भांडण उकरून काढायला काही
२६ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> ad225mtpmrl2debu7nlvsgc9an2j1eo पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३२ 104 112102 237720 236616 2026-10-07T10:52:53Z Shurpalimedha 5041 237720 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>कारण लागत नसे. 'खडाष्टक' नाटक त्यांना पाहून लिहिले असावे, असे कुणालाही वाटावे. अनेक वेळा ही भांडणे 'शांती उपाहारगृहा'त होत. चहा प्यायल्यावर मग तावातावाने भांडत ही दोघे निघून जात. बिल मात्र मला भरावे लागे. पुढे त्या दोघांनी लग्न केले. भांडणाचे प्रमाण कमी झाले नसले, तरी ते आता तर जेवायलाच त्यांच्या घरी बोलावतात; तेव्हा बिलाचा प्रश्नच उरत नाही.
{{gap}}शवविच्छेदनागाराच्या बाहेरील गॅलरीत बसून मी रात्रीचा अभ्यास करायचो. आत छिन्नविच्छिन्न प्रेते पडलेली असली, तरी भुताखेतांवर विश्वास नसल्यामुळे एकाग्र होण्यात मला व्यत्यय येत नसे. सर्वत्र सामसूम असायची. नाही म्हणायला गच्चीवरील प्रयोगशाळेतील शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्यांची आर्त विव्हळणी अधूनमधून ऐकायला यायची. एकदा तिथला रखवालदार येऊन म्हणाला, "साहेब, तुम्हाला माहीत आहे का? इथे रोज रात्री भूत येते. "
{{gap}}"छट्. भूतबित सब झूट है" मी म्हटले.
{{gap}}"मी दाखवतो. या." असे म्हणून तो मला कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरच्या शेवटच्या खोलीजवळ घेऊन गेला. दारे-खिडक्या बंद होती. आतील काही दिसत नव्हते. इतक्यात आत दिवा लागला. रखवालदार म्हणाला, “बघितलंत! असं हे भूत रात्रभर दिवा लावतं-विझवतं.” आपल्या हातातला दंडुका जमिनीवर आपटीत रखवालदार ओरडला, "ए, दिवा बंद करो; बंद करो बोला ना?" आणि काय आश्चर्य! दिवा विझला. मीही गडबडलो. माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. रखवालदार पुढे म्हणाला, "आता हे बघा साहेब, हे एका बाईचे भूत आहे. नीट ऐका. तिच्या बुटांचा आवाज येतोय." मी कान टवकारून ऐकू लागलो. आतून तालबद्ध आवाज येत होता. टप् टप् टप, टप्. तशी माझ्या छातीत आणखी धडकी भरली. हॉस्टेलमधील मित्रांना घेऊन आलो. कुणालाही याचा उलगडा होईना. त्या रात्री बराच वेळ मला झोप लागली नाही. नंतर स्वप्न पडले तेदेखील भुताटकीचे.
{{gap}}सकाळी उठल्याबरोबर प्रथम कॉलेजात भुताटकीच्या खोलीत गेलो. घडलेला सर्व प्रकार तिथले लेक्चरर डॉ. चाफेकरना सांगितला. ते मला आत घेऊन गेले व म्हणाले, "ये तुला भूत दाखवतो." कोपऱ्यात एक जुना 'इन्क्युबेटर' होता. त्याच्या बाहेर जोडलेला एक दिवा होता. ऑटोमॅटिक इस्त्री किंवा फ्रीजचे उष्णतामान ठरावीक प्रमाणात राखण्यासाठी विजेचा प्रवाह आपोआप चालू-बंद होतो, तद्वत योजना या इन्क्युबेटरमध्ये होती. आतील
२८ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> n09g8mtzt5h782hgz7cky6v30nzn4ke पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३३ 104 112103 237721 236617 2026-10-07T10:57:47Z Shurpalimedha 5041 237721 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>उष्णतामान कमी झाले, की विजेचा प्रवाह सुरू व्हायचा व दिवा लागायचा. उष्णतामान वाढले, की विजेचा प्रवाह बंद होई व दिवा विझे. कोपन्यात एक स्टेनलेस स्टीलचे बेसिन होते. त्यावरील नळातून एक थेंब थेंब पाणी पडत असताना आवाज येत होता, टप्, टप्, टप्, टप्. भुताटकीचा असा उलगडा झाला, तेव्हा आम्हा दोघांचीही हसता हसता पुरेवाट झाली.
{{gap}}हॉस्पिटलमध्ये मानद डॉक्टर रुग्णाशेजारी बसून विद्यार्थ्यांना शिकवीत. या प्रात्यक्षिक शिक्षणाला 'क्लिनिक्स' म्हणत. कुणाच्या क्लिनिकला तोबा गर्दी व्हायची; तर कुणाला चार-पाच विद्यार्थ्यांचीच हजेरी लाभायची.
{{gap}}वैद्यकीय शिक्षणात ही क्लिनिक्स फार महत्त्वाची. काही थोर गुरुवर्यांनी शिकविलेल्या रोगनिदानाच्या पद्धती आजही आठवतात. डॉ. रुस्तम जाल वकील यांचा उल्लेख करायला हवा. ठीक साडेनऊ वाजता त्यांची गाडी हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये थांबायची. त्यांचे क्लिनिक म्हणजे एक मेजवानी असायची. साध्या सोप्या सरळ भाषेत क्लिनिक संपायचे, ते ठीक साडेदहा वाजता. दुसरे एक सर्जन याविरुद्ध दुसऱ्या टोकाचे. ते कधीच वेळेवर येत नसत. एक स्त्रीरोगतज्ज्ञ प्रत्येक वाक्यात 'यू सी', 'यू सी' जोडीत असत, तर कुणी विद्यार्थिनींनाच खास प्रश्न विचारीत. 'टेस्ट द पेशंट्स युरिन' असे सांगत, स्वतः युरिनमध्ये तर्जनी बुडवीत व मधले बोट आपल्या जिभेवर ठेवीत. विद्यार्थिनी फसत व युरिनमध्ये बुडविलेले बोट स्वतःच्या जिभेवर ठेवीत. कुणी 'मटेरिया मेडिका बडी बेवफा, सुबह को पढो, शाम को सफा,' असे सांगून औषधाचा डोज विचारीत. अशा अनेक गुरुजनांनी आम्हांला घडवले. त्यांनी आम्हांला केवळ वैद्यक नव्हे; तर इतर बरेच काही शिकविले. मेडिकल कॉलेजातील पाच वर्षांत (त्या काळी इन्टर्नशिप नव्हती) आम्ही काय काय शिकलो? कॉलेजात शिरताना आम्हाला मिशी दाढी नव्हती. आम्ही आता मेजर झालो. समाजात प्रतिष्ठा (?) लाभली. आमच्या अक्कलहुशारीने एखाद्याला जीवदान मिळणार होते; तर आमच्या चुकीने एखाद्याचे प्राण गमावणेही शक्य होते. जन्म-मृत्यूच्या चक्रात आमच्या शिक्कामोर्तबाला आता किंमत आली होती. निरनिराळे असंख्य तऱ्हेचे आजार अभ्यासले होते. आपण लहान-मोठे आजार सहज बरे करू शकू, अशी हवा डोक्यात शिरली होती. (याला आम्ही 'न्युमोक्रेनियम' म्हणत असू. कालपरत्वे ही डोक्यात शिरलेली हवा निघून गेली; फुग्याला टाचणी टोचल्यावर हवा जावी तशी.)
{{gap}}याशिवाय असंख्य गोष्टी पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या. दुःख भरपूर पाहिले होते; वेदना ऐकल्या होत्या. रक्त व अश्रूंचे पाट वाहताना पाहिले
{{right|मी डॉक्टर झालो । २९}}<noinclude></noinclude> 2par7puae4eyfw7bdmaohfxdyofzasm पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३२ 104 112424 237696 237689 2026-10-07T05:14:17Z JayashreeVI 4058 237696 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>उपचार करणे हे वैद्यकशास्त्राचे नीतितत्त्व मानले जाते आणि तसे उपचार करणे हे वैद्यकक्षेत्रातील तज्ज्ञांचे कर्तव्य मानले जाते. पण त्यासाठी प्राथमिक, आद्य आणि महत्त्वाची अट म्हणजे रोगाचे नेमके निदान होणे!
{{gap}}आधुनिक वैद्यक (मेडिसिन) शास्त्रानुसार 'निदान' नेमके होण्यासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. आजार काही का असेना पण आधी रक्त, थुंकी, लघवी अशा तपासण्या ही जवळ जवळ सर्वसामान्य बाब झाली आहे. जोडीला स्कॅनिंग, एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी असतात. या सगळ्या तपासण्यांची दरवेळी गरज असतेच का? असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो. अर्थात त्याखेरीज नेमके निदान करणे कठीण जाते एखादे वेळी साध्या आजारातही गंभीर आजाराची मुळे असू शकतात असे युक्तिवाद वैद्य मंडळी (डॉक्टर) करतातच. तरी असे प्रमाण किती? त्याचा अंदाज येईल एवढे प्राथमिक निदान तरी सर्व तपासण्या करण्यापूर्वी तज्ज्ञांना का करता येऊ नये? मग त्यांना तज्ज्ञ का म्हणायचे? अशा शंका सामान्य माणसांना येतातच.
{{gap}}तर अशाच तपासणी चक्रात अडकलेल्या एका गुंड्याभाऊंची ही कथा! 'जिवाची मुंबई' करायला म्हणून गुंड्याभाऊ मुंबईला गेले. तेथे त्यांना एके सकाळी दोन-चार शिंका आल्या. ज्यांच्या घरी ते गेले होते ते म्हणाले, "मुंबईची हवा फार वाईट. तुम्ही आधी डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन या. त्या काळात सहकारी तत्त्वावर सर्व तपासण्या एकाच ठिकाणी करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे संघ नव्हते. त्यामुळे गुंड्याभाऊंना फार आटापिटा करावा लागला. रक्त, लघवी, थुंकी, दात इ. तज्ज्ञ मंडळींकडे हेलपाटे मारून आणि रिपोर्ट गोळा करून गुंड्याभाऊ जिकिरीला आले. मुंबई बघण्यासाठी आणलेले पैसे डॉक्टरी तपासण्यात संपले. सगळे रिपोर्ट घेऊन ते मूळ डॉक्टरांकडे गेले. तेथे मेडिकल कॉलेजच्या शिकाऊ मुलांची झुंड आली होती. सगळे रिपोर्ट पाहून डॉक्टर मुलांना (भावी डॉक्टरांना) म्हणाले, "हे पहा निरोगीपणाचे मॉडेल! त्यांच्या नखातही दोष नाही. इतके ताजे निरोगी रक्त सँपल म्हणूनसुद्धा पहायला मिळणार नाही." असे म्हणताच 'सँपल' म्हणून रक्त काढण्यासाठी भावी डॉक्टरांची झुंड सुया सरसावीत पुढे आली. हा किस्सा आहे आद्य विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या "गुंड्याभाऊचे दुखणे" या लेखातला. सुमारे सत्तर वर्षांपूर्वीचे हे वर्णन! आधुनिक वैद्यकशास्त्रावर मल्लिनाथी करणारे!
{{gap}}आमची आजी लहानपणी एक गोष्ट सांगायची. एका दरिद्री शेतकऱ्याची एक रूपवती कन्या होती. रानात शिकारीला आलेल्या राजाच्या नजरेत ती भरली. त्याने तिच्याशी लग्न केले. आता राणी वैभवात लोळत होती; पण ते सुख तिच्या<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ३१}}</noinclude> m86580cxdhn93ouh390b4po2bqz3m6f 237697 237696 2026-10-07T05:14:51Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237697 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>उपचार करणे हे वैद्यकशास्त्राचे नीतितत्त्व मानले जाते आणि तसे उपचार करणे हे वैद्यकक्षेत्रातील तज्ज्ञांचे कर्तव्य मानले जाते. पण त्यासाठी प्राथमिक, आद्य आणि महत्त्वाची अट म्हणजे रोगाचे नेमके निदान होणे!
{{gap}}आधुनिक वैद्यक (मेडिसिन) शास्त्रानुसार 'निदान' नेमके होण्यासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. आजार काही का असेना पण आधी रक्त, थुंकी, लघवी अशा तपासण्या ही जवळ जवळ सर्वसामान्य बाब झाली आहे. जोडीला स्कॅनिंग, एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी असतात. या सगळ्या तपासण्यांची दरवेळी गरज असतेच का? असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो. अर्थात त्याखेरीज नेमके निदान करणे कठीण जाते एखादे वेळी साध्या आजारातही गंभीर आजाराची मुळे असू शकतात असे युक्तिवाद वैद्य मंडळी (डॉक्टर) करतातच. तरी असे प्रमाण किती? त्याचा अंदाज येईल एवढे प्राथमिक निदान तरी सर्व तपासण्या करण्यापूर्वी तज्ज्ञांना का करता येऊ नये? मग त्यांना तज्ज्ञ का म्हणायचे? अशा शंका सामान्य माणसांना येतातच.
{{gap}}तर अशाच तपासणी चक्रात अडकलेल्या एका गुंड्याभाऊंची ही कथा! 'जिवाची मुंबई' करायला म्हणून गुंड्याभाऊ मुंबईला गेले. तेथे त्यांना एके सकाळी दोन-चार शिंका आल्या. ज्यांच्या घरी ते गेले होते ते म्हणाले, "मुंबईची हवा फार वाईट. तुम्ही आधी डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन या. त्या काळात सहकारी तत्त्वावर सर्व तपासण्या एकाच ठिकाणी करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे संघ नव्हते. त्यामुळे गुंड्याभाऊंना फार आटापिटा करावा लागला. रक्त, लघवी, थुंकी, दात इ. तज्ज्ञ मंडळींकडे हेलपाटे मारून आणि रिपोर्ट गोळा करून गुंड्याभाऊ जिकिरीला आले. मुंबई बघण्यासाठी आणलेले पैसे डॉक्टरी तपासण्यात संपले. सगळे रिपोर्ट घेऊन ते मूळ डॉक्टरांकडे गेले. तेथे मेडिकल कॉलेजच्या शिकाऊ मुलांची झुंड आली होती. सगळे रिपोर्ट पाहून डॉक्टर मुलांना (भावी डॉक्टरांना) म्हणाले, "हे पहा निरोगीपणाचे मॉडेल! त्यांच्या नखातही दोष नाही. इतके ताजे निरोगी रक्त सँपल म्हणूनसुद्धा पहायला मिळणार नाही." असे म्हणताच 'सँपल' म्हणून रक्त काढण्यासाठी भावी डॉक्टरांची झुंड सुया सरसावीत पुढे आली. हा किस्सा आहे आद्य विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या "गुंड्याभाऊचे दुखणे" या लेखातला. सुमारे सत्तर वर्षांपूर्वीचे हे वर्णन! आधुनिक वैद्यकशास्त्रावर मल्लिनाथी करणारे!
{{gap}}आमची आजी लहानपणी एक गोष्ट सांगायची. एका दरिद्री शेतकऱ्याची एक रूपवती कन्या होती. रानात शिकारीला आलेल्या राजाच्या नजरेत ती भरली. त्याने तिच्याशी लग्न केले. आता राणी वैभवात लोळत होती; पण ते सुख तिच्या<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ३१}}</noinclude> pina6tvelhuoo8nosf0s5v3mqs71alk पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३३ 104 112425 237698 237690 2026-10-07T05:19:30Z JayashreeVI 4058 237698 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>अंगी लागेना. ती कृश होत चालली. विविध वैद्यांनी खूप औषधे दिली तरी गुण येईना. एकदा राणीच्या माहेरची एक गरीब म्हातारी राजाकडे आली आणि म्हणाली, "मी हिला औषध देते. पण सकाळ-संध्याकाळ मी तिला औषध देताना तिथे दुसरे कोणीही असता उपयोगी नाही." आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिनाभरात राणी आरोग्यसंपन्न झाली, असे काय औषध दिले होते म्हातारीने? काही नाही. रोज सकाळ-संध्याकाळ ताजी भाकरी, घट्ट दही, तिखट, कांदा असे लहानपणापासूनचे तिच्या सवयीचे जेवण होते ते!
{{gap}}त्यावरूनच एक कथा सांगितली जाई "धट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती'ची! गरिबांचे अन्न आणि त्यांची शारीरिक हालचाल, कष्ट यांचे संतुलन झाले की, औषधाची गरज लागत नाही हे तात्पर्य असे. हे खरे तर सर्वांच्याच बाबतीत खरे आहे. ताजे, स्वच्छ, सीमित आणि नियमित अन्न आणि शारीरिक हालचाली, श्रम यांचे संतुलन महत्त्वाचे!
{{gap}}लहानपणापासून ज्या अन्नाची सवय झालेली असते. ते सहज पचते. आमच्या एका ध्येयवादी स्नेह्यांनी अनाथ आश्रमातल्या मुलीशी लग्न केले. गर्भवती असताना डॉक्टर मंडळी तिला दूध घ्यायला सांगत; पण तिला त्याची कधीच सवय नसल्याने तिला दूधच मानवत नसे. उलटून पडे. आदिवासींच्या आहाराबाबत अनेकदा शहरी तज्ज्ञ मंडळी निदान करतात; पण आदिवासींना तसे अन्न मानवत नाही. त्यांच्या सवयीच्या अन्नातच थोडेफार फेरफार केले तर त्याचा उपयोग चांगला होतो असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. म्हणजे पुन्हा त्याचेही नेमके निदान (डायग्नोसिस) महत्त्वाचे! {{gap}}एरव्ही अनेक तपासण्या करून आणि अंदाजाने दिलेल्या औषधांचे "साईड डिफेक्ट्स" अनुभवून एखादा रुग्ण म्हणेल, "औषध न लगे मजला!" नको ते औषध! अर्थात् आरोग्य संपन्नतेमुळे औषधाची गरजच न लागणे हे सर्वात उत्तमच!<noinclude>{{right|औषध नलगे मजला / ३२}}</noinclude> m7ggh0cy7wtl0dzcowmusi64kea0ozm 237699 237698 2026-10-07T05:19:47Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237699 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>अंगी लागेना. ती कृश होत चालली. विविध वैद्यांनी खूप औषधे दिली तरी गुण येईना. एकदा राणीच्या माहेरची एक गरीब म्हातारी राजाकडे आली आणि म्हणाली, "मी हिला औषध देते. पण सकाळ-संध्याकाळ मी तिला औषध देताना तिथे दुसरे कोणीही असता उपयोगी नाही." आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिनाभरात राणी आरोग्यसंपन्न झाली, असे काय औषध दिले होते म्हातारीने? काही नाही. रोज सकाळ-संध्याकाळ ताजी भाकरी, घट्ट दही, तिखट, कांदा असे लहानपणापासूनचे तिच्या सवयीचे जेवण होते ते!
{{gap}}त्यावरूनच एक कथा सांगितली जाई "धट्टी कट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती'ची! गरिबांचे अन्न आणि त्यांची शारीरिक हालचाल, कष्ट यांचे संतुलन झाले की, औषधाची गरज लागत नाही हे तात्पर्य असे. हे खरे तर सर्वांच्याच बाबतीत खरे आहे. ताजे, स्वच्छ, सीमित आणि नियमित अन्न आणि शारीरिक हालचाली, श्रम यांचे संतुलन महत्त्वाचे!
{{gap}}लहानपणापासून ज्या अन्नाची सवय झालेली असते. ते सहज पचते. आमच्या एका ध्येयवादी स्नेह्यांनी अनाथ आश्रमातल्या मुलीशी लग्न केले. गर्भवती असताना डॉक्टर मंडळी तिला दूध घ्यायला सांगत; पण तिला त्याची कधीच सवय नसल्याने तिला दूधच मानवत नसे. उलटून पडे. आदिवासींच्या आहाराबाबत अनेकदा शहरी तज्ज्ञ मंडळी निदान करतात; पण आदिवासींना तसे अन्न मानवत नाही. त्यांच्या सवयीच्या अन्नातच थोडेफार फेरफार केले तर त्याचा उपयोग चांगला होतो असा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. म्हणजे पुन्हा त्याचेही नेमके निदान (डायग्नोसिस) महत्त्वाचे! {{gap}}एरव्ही अनेक तपासण्या करून आणि अंदाजाने दिलेल्या औषधांचे "साईड डिफेक्ट्स" अनुभवून एखादा रुग्ण म्हणेल, "औषध न लगे मजला!" नको ते औषध! अर्थात् आरोग्य संपन्नतेमुळे औषधाची गरजच न लागणे हे सर्वात उत्तमच!<noinclude>{{right|औषध नलगे मजला / ३२}}</noinclude> jdutqzj2e83ift2lgyvxbapt7seceus पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३४ 104 112426 237700 237691 2026-10-07T05:25:50Z JayashreeVI 4058 237700 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''सती, सवत आणि चेअरमन!'''}}}} {{gap}}"'''अ'''ग तेच ते! त्यांची मधली मुलगी माझ्या मावसभावाला दिलीय्!” "मुलगी दिलीय्' काय म्हणता? आपल्यासारख्यांनी तरी शब्द जरा विचारपूर्वक वापरायला हवेत. 'मुलगी दिली' म्हणताना आपणच स्त्रीच्या वस्तुपणावर शिक्कामोर्तब करतो आहोत असं नाही वाटत?" हे सगळं भाषण काहीशा तीव्र स्वरात सात्विक संतापाच्या आवेशाची धार असणारं होतं, म्हणून स्वाभाविकच त्याकडे लक्ष गेलं. तिच्या म्हणण्यात चांगलंच तथ्य होतं. कै. धोंडो केशव कर्वे यांच्या विचारानुसार 'कन्यादान' न करता प्रौढ वधू-वरांनी 'परस्पर दानाचा' विधी करणे कालोचित होईल का ?ते असो पण व्यवहारातली भाषा, वाक्प्रचार हे सगळे समाजाच्या स्थूल व्यवहाराचे आणि मानसिक धारणांचेच वाहक असतात हे खरे! ते इतके तोंडवळणी आणि कानवळणी पडलेले असतात की, त्यात काही गैर आहे, हेही कुणाच्या सहजासहजी लक्षात येऊ नये.
{{gap}}एकदा एका जाहीर व्याख्यानात भाषांच्या भेसळीचा विचार मांडताना एक वक्ता सहजच बोलून गेला की, "कोणतीही भाषा सलग शुद्ध बोलली जात नाही. मराठी, हिंदी, इंग्रजीची भेळ करून एक धेडगुजरी भाषा..." वाक्य पूर्ण होण्याच्या आतच श्रोतृवर्गातून निषेधाचे सूर उमटले आणि "धेडगुजरी" हा शब्द अनवधानाने तोंडून गेला, कोणत्याही जातीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता." असे सांगून वक्त्याला माफी मागावी लागली.
{{gap}}स्त्रियांबाबत सवयीने वापरल्या जाणाऱ्या भाषेतून अधोरेखित होणारी स्त्रीची अवस्था मात्र सहजासहजी लक्षात येत नाही; कारण भाषा समजातून घडत जाते. समाजाच्या स्थितीगतीचे प्रतिबिंब दैनंदिन भाषेतून ठसठशीतपणे प्रतिबिंबित होते. 'सती', 'सवत' असे काही शब्द मराठीत स्त्रीलिंगीच आहेत. याचे कारण अगदी स्पष्ट आहे कारण त्या शब्दात अभिप्रेत असलेली प्रत्यक्ष अवस्था समाज फक्त स्त्रीच्या बाबतीतच अपेक्षित धरतो. 'सती' स्त्रीनेच जायचे आणि 'सतित्त्वात अपेक्षित' गुणधर्म स्त्रीतच असले पाहिजेत. पुरुषाच्या बाबत त्यांची अपेक्षाच<noinclude>{{center|३३}}</noinclude> h16dqtpaxzda3bb966nbv2n8ckwhrtn 237701 237700 2026-10-07T05:26:19Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237701 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''सती, सवत आणि चेअरमन!'''}}}} {{gap}}"'''अ'''ग तेच ते! त्यांची मधली मुलगी माझ्या मावसभावाला दिलीय्!” "मुलगी दिलीय्' काय म्हणता? आपल्यासारख्यांनी तरी शब्द जरा विचारपूर्वक वापरायला हवेत. 'मुलगी दिली' म्हणताना आपणच स्त्रीच्या वस्तुपणावर शिक्कामोर्तब करतो आहोत असं नाही वाटत?" हे सगळं भाषण काहीशा तीव्र स्वरात सात्विक संतापाच्या आवेशाची धार असणारं होतं, म्हणून स्वाभाविकच त्याकडे लक्ष गेलं. तिच्या म्हणण्यात चांगलंच तथ्य होतं. कै. धोंडो केशव कर्वे यांच्या विचारानुसार 'कन्यादान' न करता प्रौढ वधू-वरांनी 'परस्पर दानाचा' विधी करणे कालोचित होईल का ?ते असो पण व्यवहारातली भाषा, वाक्प्रचार हे सगळे समाजाच्या स्थूल व्यवहाराचे आणि मानसिक धारणांचेच वाहक असतात हे खरे! ते इतके तोंडवळणी आणि कानवळणी पडलेले असतात की, त्यात काही गैर आहे, हेही कुणाच्या सहजासहजी लक्षात येऊ नये.
{{gap}}एकदा एका जाहीर व्याख्यानात भाषांच्या भेसळीचा विचार मांडताना एक वक्ता सहजच बोलून गेला की, "कोणतीही भाषा सलग शुद्ध बोलली जात नाही. मराठी, हिंदी, इंग्रजीची भेळ करून एक धेडगुजरी भाषा..." वाक्य पूर्ण होण्याच्या आतच श्रोतृवर्गातून निषेधाचे सूर उमटले आणि "धेडगुजरी" हा शब्द अनवधानाने तोंडून गेला, कोणत्याही जातीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता." असे सांगून वक्त्याला माफी मागावी लागली.
{{gap}}स्त्रियांबाबत सवयीने वापरल्या जाणाऱ्या भाषेतून अधोरेखित होणारी स्त्रीची अवस्था मात्र सहजासहजी लक्षात येत नाही; कारण भाषा समजातून घडत जाते. समाजाच्या स्थितीगतीचे प्रतिबिंब दैनंदिन भाषेतून ठसठशीतपणे प्रतिबिंबित होते. 'सती', 'सवत' असे काही शब्द मराठीत स्त्रीलिंगीच आहेत. याचे कारण अगदी स्पष्ट आहे कारण त्या शब्दात अभिप्रेत असलेली प्रत्यक्ष अवस्था समाज फक्त स्त्रीच्या बाबतीतच अपेक्षित धरतो. 'सती' स्त्रीनेच जायचे आणि 'सतित्त्वात अपेक्षित' गुणधर्म स्त्रीतच असले पाहिजेत. पुरुषाच्या बाबत त्यांची अपेक्षाच<noinclude>{{center|३३}}</noinclude> 2tq0v9gv11tfv3we1dc55pfaee328jd पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३५ 104 112427 237702 2026-10-07T05:26:44Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नसल्यामुळे त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दच मराठी भाषेत नाहीत. तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषालाच बहुपत्नीत्वाची मुभा असल्याने 'सवत' हे नातेही केवळ स्त्रीच्या बाबतीतच..." 237702 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ नसल्यामुळे त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दच मराठी भाषेत नाहीत. तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषालाच बहुपत्नीत्वाची मुभा असल्याने 'सवत' हे नातेही केवळ स्त्रीच्या बाबतीतच अस्तित्वात असते. व्याकरणाच्या सोयीसाठीसुद्धा 'सवता' सारखा पुल्लिंगी शब्द अस्तित्वात येऊ शकला नाही. संस्कृतमधील 'सूतिका' किंवा मराठीतील 'बाळंतीण' अशासारखे शब्द फक्त स्त्रीच्या प्राकृतिक भूमिकेतून येणे समजू शकते पण त्याच अवस्थेतून 'सुईण' आणि 'दाई' ही येते; कारण स्त्रीजीवनसंबद्ध ही कामेही स्त्रीचीच झाली आहेत. म्हणून त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दही नाहीत. व्याकरणातील अनियमितता म्हणून काही शब्द केवळ पुल्लिंगात (उदा. मासा, ससा) किंवा काही शब्द केवळ स्त्रीलिंगात (उदा. माशी, पाल) असणे हा वेगळा भाग आहे. पण स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्थानावरील अपेक्षेतून भाषेत येणारे शब्द हे त्या त्या समाजातील स्त्री-पुरुष विषयक मानसिक धारणांचे प्रतिबिंब असते. सौ. कु. श्रीमती सारख्या उपाधींची सवय स्त्रीचे पुरुषसापेक्ष अस्तित्व अधोरेखित करते, याची अनेकवार चर्चाही होते. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत स्त्रीच्या स्थितीगतीचा विविध विषयांच्या अनुषंगाने धांडोळा घेणाऱ्या अभ्यासकांनी स्त्रीवादी भूमिकेतून असे भाषिक अभ्यासही केले आहेत. मराठीत आणि एकूणच भारतीय भाषांतून मात्र फार खोलवर जाऊन अजून. असा भाषिक अभ्यास झालेला दिसत नाही. विशेषत: म्हणी, उखाणे, वाक्प्रचार या भाषेच्या सहज प्रवाही आविष्कारातून स्त्रीच्या स्थितीगतीबद्दल समाजाच्या मानसिक धारणातील संगती विसंगती खूप प्रकर्षाने जाणवते. पुरुषप्रधान व्यवस्था ही प्रामुख्याने पितृसत्ताक अर्थव्यवस्था आहे. त्यातून आलेले एक भाषिक उदाहरण गंमत म्हणून पाहू. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपावरून आणि वारसा हक्कातून येणारा शब्द 'भाऊबंदकी' फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. 'बहीण बंदकी' अजून तरी नाही. कदाचित नवीन कायद्यानुसार स्त्रिया पैतृक संपत्तीबाबत भांडू लागल्या तर 'बहीणबंदकी'चीही भर भाषिक शब्दसंपत्तीत पडू शकेल. इंग्रजीमधील एक उदाहरण नेहमी दिले जाते. अध्यक्षपदासाठी असलेला 'चेअरमन' हा शब्द फक्त 'man' पुरुषवाचकच आहे. आता स्त्रियाही अध्यक्ष बनू लागल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, 'आता आम्ही शब्द बदलू.' तेव्हापासून शब्द प्रचारात आला आहे 'चेअरपर्सन !' क्षणभर बरे वाटले. पण क्षणात लक्षात आले की, अरेच्चा! यातही 'सन' आहे. 'डॉटर' कुठे आहे? सती, सवत आणि चेअरमन ! / ३४<noinclude></noinclude> 18xdjbk2x7b7zqxiwwhix8dvg70wo5h 237703 237702 2026-10-07T05:33:08Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237703 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>नसल्यामुळे त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दच मराठी भाषेत नाहीत.
{{gap}}तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषालाच बहुपत्नीत्वाची मुभा असल्याने 'सवत' हे नातेही केवळ स्त्रीच्या बाबतीतच अस्तित्वात असते. व्याकरणाच्या सोयीसाठीसुद्धा 'सवता' सारखा पुल्लिंगी शब्द अस्तित्वात येऊ शकला नाही.
{{gap}}संस्कृतमधील 'सूतिका' किंवा मराठीतील 'बाळंतीण' अशासारखे शब्द फक्त स्त्रीच्या प्राकृतिक भूमिकेतून येणे समजू शकते पण त्याच अवस्थेतून 'सुईण' आणि 'दाई' ही येते; कारण स्त्रीजीवनसंबद्ध ही कामेही स्त्रीचीच झाली आहेत. म्हणून त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दही नाहीत.
{{gap}}व्याकरणातील अनियमितता म्हणून काही शब्द केवळ पुल्लिंगात (उदा. मासा, ससा) किंवा काही शब्द केवळ स्त्रीलिंगात (उदा. माशी, पाल) असणे हा वेगळा भाग आहे. पण स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्थानावरील अपेक्षेतून भाषेत येणारे शब्द हे त्या त्या समाजातील स्त्री-पुरुष विषयक मानसिक धारणांचे प्रतिबिंब असते. सौ. कु. श्रीमती सारख्या उपाधींची सवय स्त्रीचे पुरुषसापेक्ष अस्तित्व अधोरेखित करते, याची अनेकवार चर्चाही होते.
{{gap}}गेल्या पंचवीस-तीस वर्षांत स्त्रीच्या स्थितीगतीचा विविध विषयांच्या अनुषंगाने धांडोळा घेणाऱ्या अभ्यासकांनी स्त्रीवादी भूमिकेतून असे भाषिक अभ्यासही केले आहेत. मराठीत आणि एकूणच भारतीय भाषांतून मात्र फार खोलवर जाऊन अजून असा भाषिक अभ्यास झालेला दिसत नाही.
{{gap}}विशेषत: म्हणी, उखाणे, वाक्प्रचार या भाषेच्या सहज प्रवाही आविष्कारातून स्त्रीच्या स्थितीगतीबद्दल समाजाच्या मानसिक धारणातील संगती विसंगती खूप प्रकर्षाने जाणवते.
{{gap}}पुरुषप्रधान व्यवस्था ही प्रामुख्याने पितृसत्ताक अर्थव्यवस्था आहे. त्यातून आलेले एक भाषिक उदाहरण गंमत म्हणून पाहू. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपावरून आणि वारसा हक्कातून येणारा शब्द 'भाऊबंदकी' फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. 'बहीण बंदकी' अजून तरी नाही. कदाचित नवीन कायद्यानुसार स्त्रिया पैतृक संपत्तीबाबत भांडू लागल्या तर 'बहीणबंदकी'चीही भर भाषिक शब्दसंपत्तीत पडू शकेल.
{{gap}}इंग्रजीमधील एक उदाहरण नेहमी दिले जाते. अध्यक्षपदासाठी असलेला 'चेअरमन' हा शब्द फक्त 'man' -पुरुषवाचकच आहे. आता स्त्रियाही अध्यक्ष बनू लागल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, 'आता आम्ही शब्द बदलू.' तेव्हापासून शब्द प्रचारात आला आहे 'चेअरपर्सन !' क्षणभर बरे वाटले. पण क्षणात लक्षात आले की, अरेच्चा! यातही 'सन' आहे. 'डॉटर' कुठे आहे?<noinclude>{{right|सती, सवत आणि चेअरमन! / ३४}}</noinclude> efi0dkofy134bahsnlti17tmkodi1ay 237704 237703 2026-10-07T05:33:38Z JayashreeVI 4058 237704 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>नसल्यामुळे त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दच मराठी भाषेत नाहीत.
{{gap}}तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषालाच बहुपत्नीत्वाची मुभा असल्याने 'सवत' हे नातेही केवळ स्त्रीच्या बाबतीतच अस्तित्वात असते. व्याकरणाच्या सोयीसाठीसुद्धा 'सवता' सारखा पुल्लिंगी शब्द अस्तित्वात येऊ शकला नाही.
{{gap}}संस्कृतमधील 'सूतिका' किंवा मराठीतील 'बाळंतीण' अशासारखे शब्द फक्त स्त्रीच्या प्राकृतिक भूमिकेतून येणे समजू शकते पण त्याच अवस्थेतून 'सुईण' आणि 'दाई' ही येते; कारण स्त्रीजीवनसंबद्ध ही कामेही स्त्रीचीच झाली आहेत. म्हणून त्यांचे वाचक पुल्लिंगी शब्दही नाहीत.
{{gap}}व्याकरणातील अनियमितता म्हणून काही शब्द केवळ पुल्लिंगात (उदा. मासा, ससा) किंवा काही शब्द केवळ स्त्रीलिंगात (उदा. माशी, पाल) असणे हा वेगळा भाग आहे. पण स्त्री-पुरुषांच्या सामाजिक स्थानावरील अपेक्षेतून भाषेत येणारे शब्द हे त्या त्या समाजातील स्त्री-पुरुष विषयक मानसिक धारणांचे प्रतिबिंब असते. सौ. कु. श्रीमती सारख्या उपाधींची सवय स्त्रीचे पुरुषसापेक्ष अस्तित्व अधोरेखित करते, याची अनेकवार चर्चाही होते.
{{gap}}गेल्या पंचवीस-तीस वर्षांत स्त्रीच्या स्थितीगतीचा विविध विषयांच्या अनुषंगाने धांडोळा घेणाऱ्या अभ्यासकांनी स्त्रीवादी भूमिकेतून असे भाषिक अभ्यासही केले आहेत. मराठीत आणि एकूणच भारतीय भाषांतून मात्र फार खोलवर जाऊन अजून असा भाषिक अभ्यास झालेला दिसत नाही.
{{gap}}विशेषत: म्हणी, उखाणे, वाक्प्रचार या भाषेच्या सहज प्रवाही आविष्कारातून स्त्रीच्या स्थितीगतीबद्दल समाजाच्या मानसिक धारणातील संगती विसंगती खूप प्रकर्षाने जाणवते.
{{gap}}पुरुषप्रधान व्यवस्था ही प्रामुख्याने पितृसत्ताक अर्थव्यवस्था आहे. त्यातून आलेले एक भाषिक उदाहरण गंमत म्हणून पाहू. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपावरून आणि वारसा हक्कातून येणारा शब्द 'भाऊबंदकी' फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. 'बहीण बंदकी' अजून तरी नाही. कदाचित नवीन कायद्यानुसार स्त्रिया पैतृक संपत्तीबाबत भांडू लागल्या तर 'बहीणबंदकी'चीही भर भाषिक शब्दसंपत्तीत पडू शकेल. {{gap}}इंग्रजीमधील एक उदाहरण नेहमी दिले जाते. अध्यक्षपदासाठी असलेला 'चेअरमन' हा शब्द फक्त 'man' -पुरुषवाचकच आहे. आता स्त्रियाही अध्यक्ष बनू लागल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, 'आता आम्ही शब्द बदलू.' तेव्हापासून शब्द प्रचारात आला आहे 'चेअरपर्सन !' क्षणभर बरे वाटले. पण क्षणात लक्षात आले की, अरेच्चा! यातही 'सन' आहे. 'डॉटर' कुठे आहे?<noinclude>{{right|सती, सवत आणि चेअरमन! / ३४}}</noinclude> 63ra7boxfja367bqrll7il16g4t2ean पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३६ 104 112428 237705 2026-10-07T05:34:06Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ कुटुंबव्यवस्था : थोडे मुळाकडे "घरकाम, स्वयंपाक करणे हे कमी दर्जाचे काम आहे, असे मी मानीत नाही. तिनेही ते मानू नये असे मला वाटते. घर सांभाळणे हे सर्वार्थाने कठीण काम आहे, असे म..." 237705 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ कुटुंबव्यवस्था : थोडे मुळाकडे "घरकाम, स्वयंपाक करणे हे कमी दर्जाचे काम आहे, असे मी मानीत नाही. तिनेही ते मानू नये असे मला वाटते. घर सांभाळणे हे सर्वार्थाने कठीण काम आहे, असे मला वाटते. " विशेष श्रेणीत इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, आपल्या आईवडिलांच्या एकुलत्या एक मुलाने दहा पंधरा वर्षांपूर्वी आपल्या भावी वधूबद्दलच्या अपेक्षा पत्रातून व्यक्त केल्या होत्या. या मुलांचे वय होते तेव्हा पंचवीस वर्षाचे! म्हणजे ऐन "गद्धेपंचवीशीतले !"स्वप्नरंजनाचे! अवास्तव अपेक्षा करण्याचे विशेष म्हणजे मुलीच्या सौंदर्याविषयीही त्याच्या गैरवाजवी अपेक्षा नव्हत्या. स्वत: ला साजेसे आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींमध्ये (दिसायला) सामावून जावी, असे व्यक्तिमत्त्व असावे असेही त्याने लिहिले होते. लग्नासाठी उभी असलेली प्रत्येक मुलगी ही प्रपंचाची म्हणजेच घरकामाची आवड असलेली. हसतमुखाने स्वतःचे व्यक्तिमत्त्व कुटुंबात विरघळवून टाकणारी असतेच असे गृहित धरलेले नव्हते. याचा अर्थ वरील मुलाने पत्नीने फक्त घरातच रहावे असे म्हटले नव्हते "घरकाम कमी दर्जाचे मी मानीत नाही" हे त्याचे म्हणणे दुहेरी अर्थाने महत्त्वाचे आहे. एक म्हणजे पत्नीने ते केले तर तिला मी कमी दर्जाची मानणार नाही आणि मला स्वतःला घरकाम करताना कमीपणा वाटत नाही." यातला उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. कारण पिढ्यान् पिढ्या आपल्या समाज व्यवस्थेत रूजलेल्या कुटुंब व्यवस्थेत घरकाम हे 'फक्त' स्त्रीचेच 'कर्तव्य' आहे आणि ते करवून घेणे हा अन्य विशेषतः कुटुंबातील पुरुष सदस्यांचा 'हक्क' आहे, हे गृहीत असते. एक व्यक्ती म्हणून स्त्रीला कुटुंबात स्वतंत्र स्थान आहे. याचे भान उरलेले नाही. त्यामुळे प्रचलित कुटुंबव्यवस्था ही प्रामुख्याने गृहिणीच्या आत्मविलोपनावर उभी असलेली आणि टिकून राहिलेली व्यवस्था आहे. व्यक्तित्वशून्य गृहिणी ही परंपरेत आदर्श मानली जाते. ही परंपरा तरी कोणती? ही केवळ भारतीय किंवा ३५<noinclude></noinclude> 8hsvp5h24bxje927qdj58bxfwzwie9e 237709 237705 2026-10-07T05:42:35Z JayashreeVI 4058 237709 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कुटुंबव्यवस्था : थोडे मुळाकडे'''}}}} {{gap}}"'''घ'''रकाम, स्वयंपाक करणे हे कमी दर्जाचे काम आहे, असे मी मानीत नाही. तिनेही ते मानू नये असे मला वाटते. घर सांभाळणे हे सर्वार्थाने कठीण काम आहे, असे मला वाटते."
{{gap}}विशेष श्रेणीत इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, आपल्या आईवडिलांच्या एकुलत्या एक मुलाने दहा पंधरा वर्षांपूर्वी आपल्या भावी वधूबद्दलच्या अपेक्षा पत्रातून व्यक्त केल्या होत्या. या मुलांचे वय होते तेव्हा पंचवीस वर्षाचे! म्हणजे ऐन "गद्धेपंचवीशीतले!"स्वप्नरंजनाचे! अवास्तव अपेक्षा करण्याचे विशेष म्हणजे मुलीच्या सौंदर्याविषयीही त्याच्या गैरवाजवी अपेक्षा नव्हत्या. स्वत:ला साजेसे आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींमध्ये (दिसायला) सामावून जावी, असे व्यक्तिमत्त्व असावे असेही त्याने लिहिले होते.
{{gap}}लग्नासाठी उभी असलेली प्रत्येक मुलगी ही प्रपंचाची म्हणजेच घरकामाची आवड असलेली, हसतमुखाने स्वतःचे व्यक्तिमत्त्व कुटुंबात विरघळवून टाकणारी असतेच असे गृहित धरलेले नव्हते. याचा अर्थ वरील मुलाने पत्नीने फक्त घरातच रहावे असे म्हटले नव्हते "घरकाम कमी दर्जाचे मी मानीत नाही" हे त्याचे म्हणणे दुहेरी अर्थाने महत्त्वाचे आहे. एक म्हणजे पत्नीने ते केले तर तिला मी कमी दर्जाची मानणार नाही आणि मला स्वतःला घरकाम करताना कमीपणा वाटत नाही." यातला उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. कारण पिढ्यान् पिढ्या आपल्या समाज व्यवस्थेत रूजलेल्या कुटुंब व्यवस्थेत घरकाम हे 'फक्त' स्त्रीचेच 'कर्तव्य' आहे आणि ते करवून घेणे हा अन्य विशेषतः कुटुंबातील पुरुष सदस्यांचा 'हक्क' आहे, हे गृहीत असते. {{gap}}एक व्यक्ती म्हणून स्त्रीला कुटुंबात स्वतंत्र स्थान आहे. याचे भान उरलेले नाही. त्यामुळे प्रचलित कुटुंबव्यवस्था ही प्रामुख्याने गृहिणीच्या आत्मविलोपनावर उभी असलेली आणि टिकून राहिलेली व्यवस्था आहे. व्यक्तित्वशून्य गृहिणी ही परंपरेत आदर्श मानली जाते. ही परंपरा तरी कोणती? ही केवळ भारतीय किंवा<noinclude>{{center|३५}}</noinclude> exhxc2h5zyjy44o3vrh0oes3pe0tsx6 237710 237709 2026-10-07T05:42:57Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237710 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कुटुंबव्यवस्था : थोडे मुळाकडे'''}}}} {{gap}}"'''घ'''रकाम, स्वयंपाक करणे हे कमी दर्जाचे काम आहे, असे मी मानीत नाही. तिनेही ते मानू नये असे मला वाटते. घर सांभाळणे हे सर्वार्थाने कठीण काम आहे, असे मला वाटते."
{{gap}}विशेष श्रेणीत इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, आपल्या आईवडिलांच्या एकुलत्या एक मुलाने दहा पंधरा वर्षांपूर्वी आपल्या भावी वधूबद्दलच्या अपेक्षा पत्रातून व्यक्त केल्या होत्या. या मुलांचे वय होते तेव्हा पंचवीस वर्षाचे! म्हणजे ऐन "गद्धेपंचवीशीतले!"स्वप्नरंजनाचे! अवास्तव अपेक्षा करण्याचे विशेष म्हणजे मुलीच्या सौंदर्याविषयीही त्याच्या गैरवाजवी अपेक्षा नव्हत्या. स्वत:ला साजेसे आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींमध्ये (दिसायला) सामावून जावी, असे व्यक्तिमत्त्व असावे असेही त्याने लिहिले होते.
{{gap}}लग्नासाठी उभी असलेली प्रत्येक मुलगी ही प्रपंचाची म्हणजेच घरकामाची आवड असलेली, हसतमुखाने स्वतःचे व्यक्तिमत्त्व कुटुंबात विरघळवून टाकणारी असतेच असे गृहित धरलेले नव्हते. याचा अर्थ वरील मुलाने पत्नीने फक्त घरातच रहावे असे म्हटले नव्हते "घरकाम कमी दर्जाचे मी मानीत नाही" हे त्याचे म्हणणे दुहेरी अर्थाने महत्त्वाचे आहे. एक म्हणजे पत्नीने ते केले तर तिला मी कमी दर्जाची मानणार नाही आणि मला स्वतःला घरकाम करताना कमीपणा वाटत नाही." यातला उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. कारण पिढ्यान् पिढ्या आपल्या समाज व्यवस्थेत रूजलेल्या कुटुंब व्यवस्थेत घरकाम हे 'फक्त' स्त्रीचेच 'कर्तव्य' आहे आणि ते करवून घेणे हा अन्य विशेषतः कुटुंबातील पुरुष सदस्यांचा 'हक्क' आहे, हे गृहीत असते. {{gap}}एक व्यक्ती म्हणून स्त्रीला कुटुंबात स्वतंत्र स्थान आहे. याचे भान उरलेले नाही. त्यामुळे प्रचलित कुटुंबव्यवस्था ही प्रामुख्याने गृहिणीच्या आत्मविलोपनावर उभी असलेली आणि टिकून राहिलेली व्यवस्था आहे. व्यक्तित्वशून्य गृहिणी ही परंपरेत आदर्श मानली जाते. ही परंपरा तरी कोणती? ही केवळ भारतीय किंवा<noinclude>{{center|३५}}</noinclude> cg0e429uu3q7hnjh3vgz72lsf8ukexl पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३७ 104 112429 237706 2026-10-07T05:34:38Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ केवळ पौर्वात्य परंपरा नव्हे, ही पुरुषप्रधान परंपरा आहे. जगभरची. मध्ययुगात क्रमाक्रमाने दृढ होत गेलेली. तिचा प्रारंभ झाला माणसाचे भटके वन्य जीवन संपून स्थिर जीवन प्रारंभ..." 237706 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ केवळ पौर्वात्य परंपरा नव्हे, ही पुरुषप्रधान परंपरा आहे. जगभरची. मध्ययुगात क्रमाक्रमाने दृढ होत गेलेली. तिचा प्रारंभ झाला माणसाचे भटके वन्य जीवन संपून स्थिर जीवन प्रारंभ करण्याच्या टप्प्यातच ! - स्त्री-पुरुषांच्या खरे तर नर-मादीच्या एकत्रीकरणाखेरीज जीवनचक्र चालणे अशक्य आहे. हे एकत्रीकरण जोपर्यंत नैसर्गिक ओढीपुरतेच असते, तोवर स्वामित्व, एकमेकांवर कुरघोडी हे प्रश्न उद्भवत नाहीत. स्वाभाविकच गुलामगिरीचाही प्रश्न उद्भवत नाही. पण माणूस हा निसर्गाने दिलेल्या प्रेरणांवरच समाधान मानणारा प्राणी नाही तो निसर्गदत्त प्रेरणा आणि स्व-सामर्थ्य यांच्याच आधारे नैसर्गिक बाबींवर स्वामित्व प्राप्त करू पाहतो. हा त्याचा प्रवास कोट्यवधी वर्षांचा आहे. त्यालाच तो मानवी संस्कृती म्हणत आला आहे. प्राकृतिक जीवनाचे माणसाला एकीकडे आकर्षण असले तरी तेथे दर क्षणी अस्तित्वासाठीचा संघर्ष अटळ असतो. माणसाची बुद्धी अन् प्रयत्न यातून माणूस स्वतःची सुरक्षितता शोधीत आला आहे. ही सुरक्षितता शारीरिक अन् मानसिक अशी दोन्ही स्तरांवरची खरे तर परस्परावलंबी आहे. - प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच वंशसातत्यासाठी नर- - मादींचे एकत्र येणे याच माणसाच्या मूलभूत शारीरिक गरजा आहेत. त्या मिळतील की नाही? कशा मिळतील? मिळाल्या तर टिकतील की नाही? टिकल्या तर अधिक काळ आणि अधिक चांगल्या रीतीने कशा टिकवता येतील ? या प्रश्नांची उत्तरे माणूस शोधीत राहिला तो दुहेरी स्तरांवर. एकीकडे प्रत्यक्ष भौतिक परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करीत दुसरीकडे अमूर्त मानसिक पातळीवर एखाद्या अद्वितीय श्रेष्ठ शक्तीचा आधार शोधीत ! ती शक्ती कधी भूत असेल तर कधी दानव असेल. तीच शक्ती अनुकूल झाली की देवरूपात भासेल. त्या अमूर्त शक्तींच्या अनुकूलतेसाठी मग मध्यस्थ भगत (शॅमन ) विधिविधाने, तोडगे, मंत्रतंत्र असा पसारा वाढत गेला. प्रथम वन्यपशूंसम जंगली अवस्था, नंतर प्राथमिक पाषाण युगात शिकारीसाठी नैसर्गिक अणकुचीदार दगडांचा वापर, उत्तर पाषाणयुगात स्वतः दगडाची शस्त्रे घडविण्याचे कौशल्य आत्मसात करीत विकसित करीत नेणे, उत्तर टप्प्यात काहीशी भटकी वन्य पशुपालन अवस्था आणि सामूहिक रीतीने योजनाबद्ध शिकार करणे या अवस्थांतून समाजाची बांधणी होत गेली. समूह जीवनात अधिक सुरक्षितता आणि जीवनाची अधिक शाश्वती मिळते. ही जाणीव हा शोधही नैसर्गिक प्रेरणा अधिक मानवी प्रयत्न यांचे संयुक्त अपत्य आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. तरी अजून शिकार हेच उपजीविकेचे प्राथमिक आणि कुटुंबव्यवस्था : थोडे मुळाकडे / ३६<noinclude></noinclude> sx9z98u9kjjau2phs76i930ycmjp3qn 237711 237706 2026-10-07T05:50:08Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237711 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>केवळ पौर्वात्य परंपरा नव्हे, ही पुरुषप्रधान परंपरा आहे. जगभरची. मध्ययुगात क्रमाक्रमाने दृढ होत गेलेली. तिचा प्रारंभ झाला माणसाचे भटके वन्य जीवन संपून स्थिर जीवन प्रारंभ करण्याच्या टप्प्यातच!
{{gap}}स्त्री-पुरुषांच्या खरे तर नर-मादीच्या एकत्रीकरणाखेरीज जीवनचक्र चालणे अशक्य आहे. हे एकत्रीकरण जोपर्यंत नैसर्गिक ओढीपुरतेच असते, तोवर स्वामित्व, एकमेकांवर कुरघोडी हे प्रश्न उद्भवत नाहीत. स्वाभाविकच गुलामगिरीचाही प्रश्न उद्भवत नाही.
{{gap}}पण माणूस हा निसर्गाने दिलेल्या प्रेरणांवरच समाधान मानणारा प्राणी नाही तो निसर्गदत्त प्रेरणा आणि स्व-सामर्थ्य यांच्याच आधारे नैसर्गिक बाबींवर स्वामित्व प्राप्त करू पाहतो. हा त्याचा प्रवास कोट्यवधी वर्षांचा आहे. त्यालाच तो मानवी संस्कृती म्हणत आला आहे.
{{gap}}प्राकृतिक जीवनाचे माणसाला एकीकडे आकर्षण असले तरी तेथे दर क्षणी अस्तित्वासाठीचा संघर्ष अटळ असतो. माणसाची बुद्धी अन् प्रयत्न यातून माणूस स्वतःची सुरक्षितता शोधीत आला आहे. ही सुरक्षितता शारीरिक अन् मानसिक अशी दोन्ही स्तरांवरची खरे तर परस्परावलंबी आहे.
{{gap}}प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच वंशसातत्यासाठी नर-मादींचे एकत्र येणे याच माणसाच्या मूलभूत शारीरिक गरजा आहेत. त्या मिळतील की नाही? कशा मिळतील? मिळाल्या तर टिकतील की नाही? टिकल्या तर अधिक काळ आणि अधिक चांगल्या रीतीने कशा टिकवता येतील? या प्रश्नांची उत्तरे माणूस शोधीत राहिला तो दुहेरी स्तरांवर.
{{gap}}एकीकडे प्रत्यक्ष भौतिक परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न करीत दुसरीकडे अमूर्त मानसिक पातळीवर एखाद्या अद्वितीय श्रेष्ठ शक्तीचा आधार शोधीत! ती शक्ती कधी भूत असेल तर कधी दानव असेल. तीच शक्ती अनुकूल झाली की देवरूपात भासेल. त्या अमूर्त शक्तींच्या अनुकूलतेसाठी मग मध्यस्थ भगत (शॅमन) विधिविधाने, तोडगे, मंत्रतंत्र असा पसारा वाढत गेला. {{gap}}प्रथम वन्यपशूंसम जंगली अवस्था, नंतर प्राथमिक पाषाण युगात शिकारीसाठी नैसर्गिक अणकुचीदार दगडांचा वापर, उत्तर पाषाणयुगात स्वतः दगडाची शस्त्रे घडविण्याचे कौशल्य आत्मसात करीत विकसित करीत नेणे, उत्तर टप्प्यात काहीशी भटकी वन्य पशुपालन अवस्था आणि सामूहिक रीतीने योजनाबद्ध शिकार करणे या अवस्थांतून समाजाची बांधणी होत गेली. समूह जीवनात अधिक सुरक्षितता आणि जीवनाची अधिक शाश्वती मिळते. ही जाणीव हा शोधही नैसर्गिक प्रेरणा अधिक मानवी प्रयत्न यांचे संयुक्त अपत्य आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. तरी अजून शिकार हेच उपजीविकेचे प्राथमिक आणि<noinclude>{{right|कुटुंबव्यवस्था : थोडे मुळाकडे / ३६}}</noinclude> g3jee1uaupida0e4yr1lqi6jqrvstdt पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३८ 104 112430 237707 2026-10-07T05:35:10Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ महत्त्वाचे साधन असते. शेतीचा शोध हा खऱ्या अर्थाने आजच्या मानवी संस्कृतीचा प्रारंभबिंदू आहे. भटक्या शिकारी अवस्थेत अपत्यधारणा, प्रसूती, संगोपन ही जबाबदारी प्रामुख्याने..." 237707 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ महत्त्वाचे साधन असते. शेतीचा शोध हा खऱ्या अर्थाने आजच्या मानवी संस्कृतीचा प्रारंभबिंदू आहे. भटक्या शिकारी अवस्थेत अपत्यधारणा, प्रसूती, संगोपन ही जबाबदारी प्रामुख्याने स्त्रीवरच आली. एकीकडे शिकारीतही तिचा सहभाग होता. पण त्याचे प्रमाण कमी होणे स्वाभाविक होते. पण स्त्री स्वस्थ नव्हतीच तिचे भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण चालूच होते. त्यातून फल-मूल-धान्यादि जीवनोपयोगी उत्पन्ने जशी निसर्ग आपोआप देतो, तशीच ती आपण थोड्याशा प्रयत्नातून स्वत: निर्माण करू शकतो, हेही तिने केलेल्या निरीक्षण प्रयोगातून तिला उमगले. आपोआप उगवलेल्या धान्य- फलमूलांची बीजे आपल्या निवासस्थानाभोवती लावली! तर निवासाजवळच पोटासाठी उत्पन्न मिळते, हे स्त्रीला उमगले. मग तिचे प्रयोग सुरू झाले. हा शेतीच्या शोधाचा प्रारंभ! त्याचे श्रेय स्त्रीचेच ! आपल्या झोपडीच्या अवती-भोवतीची जमीन कठीण लाकडाच्या दांड्याने (खननयष्टी) खणून तिची मशागत करून पीक काढणे अधिक सुलभ होते, हे ही स्त्रीला समजले. स्त्रीप्रधान शेती ही शेतीची आद्यावस्था. शेतीची निर्मिती मूलतः स्त्रीची | म्हणजे शरीर सुरक्षिततेसाठी अन्न, वस्त्र, निवारा अन् वंशसातत्यासाठी अपत्य निर्मिती, संगोपन या जीवनचक्रातल्या सर्वात आद्य, मूलभूत बाबींचा विकास स्त्रीने केला आहे. प्राथमिक शेतीची ती स्वामिनी होती. ही प्राथमिक शेती अ हल्य (नांगरविरहित ) शेती होती. हल म्हणजे नांगर. पुरुष अजून 'हलधर' झाला नव्हता. त्याने नांगर धरला अन् शेतीची मशागत करून काढलेल्या उत्पन्नाचा स्वामी होत गेला. तो 'सीतापती' (नांगरलेल्या भूमीचा स्वामी) झाला. पण मूलतः भूमीची स्वामिनी ही स्त्रीच ! स्थिर आणि सुरक्षित मानवी जीवन निर्माण करण्यात तिचा सहभाग मोठा म्हणून कुटुंब हा शब्दच भूमिवाचक उपजीविकेसाठी सम्बद्ध अशा आशयाचा बनला. - कुंकुणा हे भूमिवाचक नाम. त्यातून कुटि, कुट शब्द आले. त्यातला मूळ शब्द 'कुल' म्हणजे भूमीशी सम्बद्ध मनुष्य समूह ! स्त्री-पुरुष मुले यांचा गट. जमिनीची मशागत करणारा. मुळात हा शब्द आस्ट्रोएशियाटिक भाषा कुळातला. त्याचे किमान दोन वेळा संस्कृतीकरण झाले असावे असे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात. (संदर्भ 'मराठी व्युत्पत्तिकोश संपा कृ. पां. कुलकर्णी) बाळबोध मराठीत केवळ पत्नी या - अर्थाने 'कुटुंब' शब्द आजही क्वचित वापरला जातो. त्यामुळे मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेली कुटुंबसंस्थेची निर्मिती आणि त्यामुळे आलेली भाषावैज्ञानिक निरगाठ -‍ उ-सुरगाठ / ३७<noinclude></noinclude> nnt1hbk7p2079io3lfedzs87vx5bpm7 पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३९ 104 112431 237708 2026-10-07T05:37:01Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ - भूमिकेतून कुटुंब शब्दाची व्युत्पत्ती या दोन्हीचे परस्पर पूरकत्व पाहता स्त्री आणि मुले बाळे हाच कुटुंबाचा आद्य घटक आहे, केवळ स्त्री आणि मुलेबाळे असली की आजही कुटुंब उभे..." 237708 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ - भूमिकेतून कुटुंब शब्दाची व्युत्पत्ती या दोन्हीचे परस्पर पूरकत्व पाहता स्त्री आणि मुले बाळे हाच कुटुंबाचा आद्य घटक आहे, केवळ स्त्री आणि मुलेबाळे असली की आजही कुटुंब उभे राहते पुरुष सदस्यावाचून फारसे अडत नाही. कारण एकूण अपत्यसंभव प्रक्रियेतही त्याचा सहभाग निमित्तमात्रच असतो. परंतु स्त्री सदस्याखेरीज कुटुंब संभवतच नाही. हे कळत असले तरी वळवून घेतले जात नाही. कुटुंबसंस्थेच्या स्थापनेत आणि धारणेत स्त्रीचा सिंहाचा (खरे तर सिंहिणीचा ) वाटा होता आणि आहे, हे वेगळे सिद्ध करण्याची गरज नाही. मग कुटुंबात आज तिचे स्थान अन् प्रतिष्ठा अशी नगण्य का आणि कशी झाली? हा खरे तर विस्तृत विवेचनाचा विषय आहे. प्रस्तुत तेवढा अवकाश नसल्याने केवळ सूत्र मांडीत आहे. प्राथमिक अवस्थेत स्त्रिया आणि मुले ही उपजीविकेची साधने मिळवण्यात सहभागी होतीच. आधुनिक जीवनापासून जसजसे भूतकाळाकडे जावे, तसतसा उपजीविकेची साधने मिळविण्यात स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसतो. प्रसूती इत्यादी काळात आज मध्यमवर्गीय स्त्री जशी दुबळी, परावलंबी दिसते तशी ती श्रमजीवीमध्ये नसते. नव्हती, त्यामुळे स्त्रीचे नैसर्गिक दुबळेपण वगैरे कल्पित Myth Making आहे. एक 'प्राणी' म्हणून अन्य माद्या जितक्या सहज हा निसर्गक्रम पेलतात, तसाच ती मानवी स्त्रीही पेलते पेलू शकते. जीवनात जसजशी उत्पादनसाधनांची स्थिरता आणि शाश्वती येत जाते, तसतशी एकूणच माणसाची जात (स्त्री पुरुष दोन्ही) शारीरिक दृष्ट्या कमकुवत बनत जातात. नैसर्गिक परिस्थितीशी सामना करण्याची, जुळवून घेण्याची क्षमता उणावत जाते. आज त्या दृष्टीने एकुणातच माणूस दुबळा झाला आहे. पण दुसरीकडे माणसाने निसर्ग अनुकूल करून घेण्यासाठी आपली बुद्धी अन् शक्ती खर्ची घालून प्रचंड भौतिक साधनसामुग्री गोळा केली आहे. या सगळ्या प्रक्रियेत कुटुंबव्यवस्थेत जर आपल्याला स्थान अन् सुरक्षितता हवी असेल तर केवळ अपत्यजन्मासाठी निमित्त असून चालणार नाही. संबंधित अपत्य व स्त्री या दोघांसाठी बाह्य साधनांची उपलब्धता करून देण्यात सहभाग वाढला तरच ते शक्य आहे. हे पुरुषाच्या ध्यानी आले. त्यातूनच क्रमाने उत्पन्नाचे स्थिर साधन असलेल्या शेतीवर पुरुषाचा सहभाग वाढत अखेर ताबा प्रस्थापित झाला. शेती स्त्रीच्या ताब्यातून पुरुषांच्या ताब्यात गेली. भू-स्वामिनी असलेली, भू-स्वरूपा असलेली स्त्री नाममात्र 'लक्ष्मी' राहिली आणि भूपती' चे राज्य आले. 'लक्ष्मी'चे स्वयंप्रेरकत्व संपले. ती 'पांगळी' झाली. स्थिर शेतीपरंपरेत हे पांगळेपण दृढ होत गेले. भूमी आणि स्त्री दोन्हींचा उपयोग तर जीवनधारणेसाठी कुटुंबव्यवस्था थोडे मुळाकडे / ३८ :<noinclude></noinclude> jai5im28wuza8j2cvy9v75aeeh1bttg पान:निरगाठ सुरगाठ.pdf/४० 104 112432 237712 2026-10-07T05:50:44Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ व्हावा, मात्र त्यांचे स्वातंत्र्य बंदिस्त व्हावे यासाठी मग "एक एव पतिर्नार्या" स्त्रीला एकच पती, तिच्या गर्भावर (क्षेत्र) फक्त त्याचेच स्वामित्व । त्यासाठी सतीत्व, पातिव..." 237712 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ व्हावा, मात्र त्यांचे स्वातंत्र्य बंदिस्त व्हावे यासाठी मग "एक एव पतिर्नार्या" स्त्रीला एकच पती, तिच्या गर्भावर (क्षेत्र) फक्त त्याचेच स्वामित्व । त्यासाठी सतीत्व, पातिव्रत्य, सौभाग्य माहात्म्य, विधवांची अवहेलना, प्रत्येक स्त्रीला विवाहाची सक्ती, गृहिणीची गृहकर्तव्ये, नावाची 'लक्ष्मी' पण अशा खऱ्याखोट्या, बऱ्यावाईट, शारीरिक-मानसिक बंदिवासात स्त्री जखडली गेली. तिचा सर्वार्थाने फायदा तर करून घेता यावा पण तिचे स्वामित्व कुठेच नसावे ती सदैव असुरक्षित असली तरच तिच्यावर ताबा ठेवणे सोपे जाईल. म्हणून बाप आणि पती दोघांच्या संपत्तीत तिला वाटा नाही. फक्त अन्नवस्त्राची सोय ! तीही तिचा कष्टासाठी, सर्व सेवांसाठी साधन म्हणून निरपेक्षपणे वापर करून घेता यावा म्हणून! या पद्धतीने जी वागेल तिचा पतिव्रता, सुगृहिणी, सुमाता इ. म्हणून गौरव. एरव्ही अवहेलना - हे दृश्य परिचित आहे. एकूण आजच्या कुटुंब व्यवस्थेचे हे दृश्य आहे. तिला घरात बंदिस्त करून बाहेरच्या जगातही तिला स्थान ठेवले नाही. घराबाहेर तथाकथित पराक्रमाचे जग पुरुषांचे, प्रतिष्ठेचे! स्त्रीचे जग स्वयंपाकपाणी, पोरेबाळे सांभाळणे, घरातल्या सेवा हे सर्व गौण झाले. घरकाम बिनडोकपणाचे, ते पुरुषाने करणे म्हणजे पुरुषार्थाचा अधःपात! असे समजण्यापर्यंत आपण आलो आहोत. पण विज्ञानयुगात उत्पादनसाधने ही वेगाने बदलत आहेत. केवळ एका जमिनीच्या तुकड्याला धरून राहण्याची गरजच संपल्यामुळे कुटुंबाचे स्वरूप बदलणे अपरिहार्य आहे, हे समजून घेणे भाग आहे. विज्ञान साधनांमुळे उपजीविकेचे अन्य मार्ग वेगाने उपलब्ध होत आहेत. स्त्री कष्ट करीतच होती. आता तिला कुटुंबाला बांधून घेऊनच 'साधन' बनून राहण्याची गरज नाही. जेथे स्त्री 'घर' करून राहते तेथे कुटुंब होतेच. अपत्यधारणेवरही ती स्वामित्व मिळवू शकते. याचे भानही तिला येत आहे. त्यासाठी तिच्याभोवती उभ्या केलेल्या भावनात्मक, खोट्या सती व पतिव्रत्याच्या Myth च्या भिंतीनाही तडा जातो आहे. या सर्वांचे भान या पुरुषप्रधान व्यवस्थेला मात्र जितक्या गंभीरपणे यायला हवे. तसे येत नाही. हे दुर्दैव आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि पुरुषांनाही आपले 'कृत्रिम' स्वामित्व झुगारून आता अधिक वास्तवाची जाण येणे आवश्यक आहे. म्हणूनच या लेखाच्या प्रारंभी सांगितलेल्या तरुणाची समंजस भूमिका महत्त्वाची आहे. ही जसजशी वाढेल तसतसा समतोल आला तरच कुटुंब टिकेल अन्यथा मोड तोड अटळ आहे. निरगाठ - सुरगाठ / ३९<noinclude></noinclude> fuquzbytzhigyitl88udfaokllltczu पान:निरगाठ सुरगाठ.pdf/४१ 104 112433 237713 2026-10-07T05:51:05Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ जननी आणि माता... लहानपणी ऐकलेल्या दोन गोष्टी मला आज आठवतात; त्या आधी सांगते. एका न्यायाधीशापुढे एका अट्टल दरोडेखोराचा खटला चालला होता. सगळ्या पुराव्यांच्या आधारे न्यायाध..." 237713 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ जननी आणि माता... लहानपणी ऐकलेल्या दोन गोष्टी मला आज आठवतात; त्या आधी सांगते. एका न्यायाधीशापुढे एका अट्टल दरोडेखोराचा खटला चालला होता. सगळ्या पुराव्यांच्या आधारे न्यायाधीशाने त्या दरोडेखोराला खूप मोठी सक्त मजुरीची शिक्षा दिली. त्यावेळी त्या दरोडेखोराची आई तिथे हजर होती. तिला फार दुःख झालं. हंबरडा फोडीतच तिने मुलाला मिठी मारली. त्याक्षणी मुलाने आईच्या कानांचा कडाडून चावा घेतला आणि म्हणाला, "ही तुला शिक्षा! माझी शिक्षा मला आता भोगावीच लागणार आहे. पण लहानपणी मी पहिली चोरी केली तेव्हा तू मला शिक्षा करून समज का दिली नाहीस? उलट तू माझ्या चुकीवर पांघरूण का घातलेस? त्यामुळे माझी चोरीची सवय वाढत गेली आणि आज ही वेळ आली." आई म्हणाली, "अरे पण माझी आईची वेडी माया तुला कशी कळणार ? तुला शिक्षा करणे माझ्या जीवावर आले," "तेच तुझे चुकले. ही कसली भिकार माया ? मुलाला त्याच्या चुकीची योग्य वेळी शिक्षा करणे, समज देणे, ते खऱ्या प्रेमळ आईचे कर्तव्य असते. ते तू केले नाहीस, म्हणून आज माझे आयुष्य वाया गेले. याला तूच जबाबदार आहेस. नुसता मुलांना जन्म दिला म्हणजे चांगली आई होता येत नाही." आईला आता चूक कळली तरी काही उपयोग नव्हता. दुसरी गोष्ट थोडी वेगळी आहे. एकदा एका न्यायालयात एक चमत्कारिक खटला आला. एका चार-पाच वर्षांच्या मुलावर दोन बायका आईपणाचा अधिकार सांगू लागल्या. एक चांगली श्रीमंत देखणी होती. तर दुसरी गरीब शेतमजूर होती. न्यायाधीश काय करतात इकडे लोकांचे लक्ष होते. न्यायाधीशांनी जमिनीवर एक खडूचे वर्तुळ काढले. मध्ये मुलाला उभे कले आणि दोघी बायकांना सांगितले की मुलाचा एकेक हात धरून खेचा जी बाई त्या मुलाला वर्तुळाबाहेर खेचून घेईल, तिला मुलाची मालकी मिळेल, दोघींनी ४०<noinclude></noinclude> d2crp0g7gh513a90ywl2tb73rdcygw7 पान:निरगाठ सुरगाठ.pdf/४२ 104 112434 237714 2026-10-07T05:51:44Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ थोडेफार खेचताच ते मूल वेदनेने रडू लागले. लगेच गरीब बाईने त्याचा हात सोडून दिला, तिच्या डोळयात मुलाच्या वेदना पाहून पाणी आले. ती म्हणाली, "खरे तर हे मूल माझे आहे. त्याचा हात ख..." 237714 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ थोडेफार खेचताच ते मूल वेदनेने रडू लागले. लगेच गरीब बाईने त्याचा हात सोडून दिला, तिच्या डोळयात मुलाच्या वेदना पाहून पाणी आले. ती म्हणाली, "खरे तर हे मूल माझे आहे. त्याचा हात खेचला तर दुखतो, तो रडतो, ते मला पाहवत नाही. म्हणून मी खेचणार नाही. त्या श्रीमंत बाईला हवे असेल तर त्याला देऊन टाका, कुठे का असेना, माझे बाळ सुखात असू दे.' 27 ती पुन्हा रडू लागली. तेव्हा न्यायाधीशाने निकाल दिला की, ही गरीब स्त्रीच मुलाची खरी आई आहे. श्रीमंत बाईने जरी मुलाला जन्म दिला असला तरी त्याच्यावर खरी माया, ममता या गरीब बाईचीच आहे. म्हणून तीच त्याची माता आहे. मुलाला केवळ जन्म देऊन जननी होणे एकवेळ सोपे आहे. पण मुलावर खरी ममता करून माता होणे कठीण आहे. डोळसपणे प्रेम, ममता करते तीच खरी माता. म्हणून तर देवकी कृष्णाची जननी असली तरी यशोदा त्याची माता म्हणून श्रेष्ठ ठरली. माँ, अम्मा, अम्बा, आऊ, आई, माता, जननी या सर्वांचा व्यवहारात एकच अर्थ केला जातो, तो म्हणजे आई आणि आई म्हणजे जी मुलाला जन्म देते ती ! पण हे पूर्णपणे खरे नाही. भाषाशास्त्रज्ञांच्या मते भाषेत खऱ्या अर्थाने समानार्थी शब्द नसतातच. वरवर अनेक शब्दांचा एकच अर्थ असला तरी व्युत्पत्तीच्या दृष्टीने दोन शब्दात अर्थच्छटांचा सूक्ष्म फरक असतो. अम्ब म्हणजे जल, पाणी! निर्मितीचे आदिकारण सर्व निर्मिती जलातून होते. त्या अम्ब शब्दाचा अर्थ ध्वनी माँ, अम्मामध्ये आहे. निर्मिती आणि पोषण यांचे मूळ आई ! पाणी आणि माती ही सृष्टीतल्या सर्व प्राणीमात्रांच्या निर्मितीची मुळे आणि पोषणाचीही मुळे! म्हणून रक्षणाचीही सर्जन म्हणजे निर्मिती, पोषण आणि रक्षण ही जीव सृष्टीच्या अस्तित्वाची शाश्वत कार्ये आहेत आणि पाणी आणि माती यांवर ती अवलंबून आहेत. नर-मादीच्या मीलनातून अपत्याचे जनन (जन्म) होणे हा निसर्गाचा क्रम आहे. त्यातून मादी जननी होते ती 'जन्म-दा' म्हणजे जन्म देणारी होते. तिने ममता करणारी, मातीसारखा आधार देणारी, शरीर-मनाचे पोषण करणारी माताही असावे ही माणसाच्या जगाची अपेक्षा असते. जन्मल्या जीवाचे पोषण करण्याची काही अंशी तरतूद निसर्गत: माणसासह सर्व सस्तन प्राण्यांमध्ये केली आहे. ती जीवनदायी दुग्धपान करणारी, जीवनजलदायी म्हणून अम्बा, माँ होते. पण हे अगदी नेहमी होतेच असे नाही. निसर्गक्रमानुसारही एखादी स्त्री निरगाठ - सुरगाठ / ४१ +<noinclude></noinclude> tgv5tl6j9v0wm1tqapg3cbss4vokmnk पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३४ 104 112435 237722 2026-10-07T10:58:25Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "होते. एखाद्याचे अश्रू पुसायला मदत झाली असली, तरी असंख्यांच्या अश्रूंना बांध घालणे आवाक्याबाहेरचे होते. हॉस्पिटल म्हणजे यमाचा दरबार. इथे आनंदाहून दुःखाचे प्रमाण अधिक. बरे झालेल्..." 237722 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>होते. एखाद्याचे अश्रू पुसायला मदत झाली असली, तरी असंख्यांच्या अश्रूंना बांध घालणे आवाक्याबाहेरचे होते. हॉस्पिटल म्हणजे यमाचा दरबार. इथे आनंदाहून दुःखाचे प्रमाण अधिक. बरे झालेल्या रुग्णांची जाताना चाहूल लागायची नाही; पण देवाघरी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचा हंबरडा रात्रीची शांतता भंगून टाकी. डॉक्टर हादेखील एक माणूस असतो. नव्हे, प्रथम तो माणूस असतो, मग त्याच्यात डॉक्टर शिरतो. आम्ही हे सर्व पाहून, ऐकून हलले जात होतो. हळूहळू दुःख पचविण्याची सवय होत गेली; रोज अफू खाण्यासारखी. मग आम्ही निर्ढावलो. परदुःख शीतल म्हणून नव्हे; हे दुःख पाहण्याचे टाळता येत नाही म्हणून. 'एम.बी.बी.एस.' परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली, तरी आता मला माझ्याच एका प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. पायाच्या नखापासून डोक्यावरील केसापर्यंत पूर्णावस्थेत बनविलेले माणूस नावाचे यंत्र बनविणारा निसर्ग व या निसर्गाच्या किमयेची प्रत्येक पाकळी उकलू पाहणाऱ्या मानवाच्या बुद्धीची झेप कुठवर असेल याचा अंदाज आमच्या मनाला लागत नव्हता. जीवसृष्टीच्या लघुत्तम घटकातील- प्रोटोप्लाझम्मधील किमया ओळखणारा मानव व ती किमया घडवून आणणारा मानवाहून श्रेष्ठ असा निसर्ग या दोघांपुढेही नतमस्तक व्हावे, हेच खरे! ज्या मातीतून हे प्रोटोप्लाझम् निर्माण झाले, ज्या प्रोटोप्लाझम्पासून माणसाची निर्मिती झाली, त्या मातीशी इमान राखणे हेच आमचे कर्तव्य, असे वाटू लागले. हाऊसमन डॉक्टरच्या आयुष्यातील सोनेरी क्षण असतात 'हाऊसमन' म्हणून मिरविताना. कारण अभ्यासाचा ताण नसतो, की परीक्षेचे भूत मानगुटीवर नसते. दरमहा रुपये एकशे पंधरा नगद हातावर पडायचे. त्यातून जेवणखाण, प्रवास, सिनेमा व इतर मामुली खर्च भागत असे. धोब्याच्या बिलासाठी तीर्थरूपांकडून पैसे मागावे लागत. पांढरा एप्रन घालून गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून जाताना गावच्या पाटलाची मिजास अंगात होती. पुढे घणाचे घाव खाताना आमची स्थिती मऊ मेणाहूनि होणार याची कल्पना त्या वेळी कुठून यायला ? नव्या हाऊसमनला वॉर्डबॉय ते सफाई कामगार यांच्याकडून ज्यादा प्रमाणात सलामी मिळायची, कारण त्यांच्या नातेवाइकांची तपासणी असा हाऊसमन अधिक काळजीपूर्वक करायचा. रुग्ण व त्याचे नातेवाईक ३० १ गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> ji5drqpesrtf1or8wtjx4xwfa9wpnqm पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३५ 104 112436 237723 2026-10-07T10:58:39Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आमच्याकडे मोठ्या अदबीने व कौतुकाने पाहत. हॉस्पिटलात रोज हजेरी लावणारी रुग्ण - वारकरी मंडळी असते. नवा हाऊसमन दिसला, की आपल्या 'केसपेपरचे बाड त्याच्या गळ्यात अडकवतात. आपण या बाईला र..." 237723 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>आमच्याकडे मोठ्या अदबीने व कौतुकाने पाहत. हॉस्पिटलात रोज हजेरी लावणारी रुग्ण - वारकरी मंडळी असते. नवा हाऊसमन दिसला, की आपल्या 'केसपेपरचे बाड त्याच्या गळ्यात अडकवतात. आपण या बाईला रोगमुक्त करणारच या आविर्भावाने तोही केसपेपरच्या एक एक कागदाचे काळजीपूर्वक चर्वण करतो. त्यात त्याला तीच तीच तपासणी व तीच तीच औषधे लिहिलेली आढळतात. हा त्यात आणखी दोन-चार औषधांची भर घालतो. केसपेपरच्या बाडात चार कागदांची भर पडते. बाईची वारी पुढे चालू राहते. 1 'डॉक्टरला भलताच भाव देणारी एक व्यक्ती असते, ती म्हणजे वधू- पिता. आऊटडोअरच्या दारात उभे राहून आमच्याकडे बोट दाखवून कुजबुजणारी मंडळी दिसली की, वधू पिता समजावे. ही माणसे आता वारंवार भेटू लागली तेव्हा 'यंदा कर्तव्य ऊ असे मनात ठरवले. बायको डॉक्टर असावी की नसावी, यासंबंधी आमच्या मित्रमंडळीत चर्चा व्हायची. पत्नी डॉक्टर असली तर आपल्या सुखदुःखात ती सहभागी होऊ शकते, असे काहींचे म्हणणे; तर ती गृहिणीच्या जबाबदारीला योग्य न्याय देऊ शकत नाही, असे काहींचे म्हणणे असे. डॉक्टर नसली तर संसार अधिक सुखाचा करील. नुसतीच सुंदर पण बिनडोक असली; तर बौद्धिक समाधान मिळणार नाही, अशीही काहींची विचारसरणी. मला तर हा व्हेजिटेरियन व नॉन व्हेजिटेरियन वादासारखा वाद वाटला. कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. कुणाला काय आवडेल, ते खावे. मला वाटते, लग्न म्हणजे एक मोठा जुगार. यात बहुतेक जिंकतात; एखादा हरतो. हाऊसमनशिप संपल्यावर माझी एन्गेजमेंट एका डॉक्टर मुलीशी झाली व तेव्हापासून संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या कंपूतून आम्ही फुटलो. मला हाऊसमनशिप मिळालेल्या हॉस्पिटलमध्ये मानद डॉक्टरऐवजी पूर्ण वेळ काम करणारे डॉक्टर असत. एक फिजिशियन, एक सर्जन व एक गाय्नेकॉलॉजिस्ट. तेव्हा बालरोगतज्ज्ञ नव्हते. मुलांची तपासणी फिजिशियन करायचे. आमचे फिजिशियन व सर्जन यात जमीन-अस्मानाचे अंतर होते. सर्जन गोरेपान, उंच, रुबाबदार, तर फिजिशियन बुटके, काळे व गबाळे; पण प्रामाणिक पेशंटशी बोलणेही लाघवी. माई, बहेन, दादा, बाबा शिवाय बोलणे नाही. प्रत्येकाच्या पाठीवरून हात फिरवायचे, रुग्णाला धीर द्यायचे. कामाचा व्यापदेखील फार. प्रत्येक रुग्णाची रोज भेट घेतल्याशिवाय ते दुपारी जेवायला जात नसत. याउलट सर्जनचा स्वभाव मितभाषी, करडी नजर, पण दिलाचे मुलायम. हॉस्पिटलात त्यांची जरब भारी. सुपरिटेंडेंटपेक्षा सर्व मी डॉक्टर झालो । ३१<noinclude></noinclude> ed25als3dr60nook7pl58ch7eppij2x पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३६ 104 112437 237724 2026-10-07T10:58:51Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "हाऊसमन त्यांना अधिक घाबरत. त्यांची एक जुनी 'ऑस्टिन' गाडी होती. कोंबडीमागून पिल्लांचा थवा जावा, तसा ऑपरेशन संपवून सर्जनना गाडीपर्यंत पोचवायला हाऊसमनांचा थवा जात असे. गाडी सुरू होऊ..." 237724 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>हाऊसमन त्यांना अधिक घाबरत. त्यांची एक जुनी 'ऑस्टिन' गाडी होती. कोंबडीमागून पिल्लांचा थवा जावा, तसा ऑपरेशन संपवून सर्जनना गाडीपर्यंत पोचवायला हाऊसमनांचा थवा जात असे. गाडी सुरू होऊन दृष्टिआड होईपर्यंत हाऊसमन मौजूद असत. पावसाळ्यात गाडी सुरू झाली नाही, की ती ढकलण्यासाठी या हाऊसमनांची फार मदत व्हायची. पुढे या दोघांतही कायापालट झाला. तोदेखील वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या तऱ्हेने रिटायर व्हायला थोडाच अवधी असताना या सर्जनना एकदम श्रीमंत होण्याची दुर्बुद्धी सुचली. खाजगीत पैसे घेऊन ते धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करू लागले. हे हॉस्पिटलच्या नियमाविरुद्ध असल्यामुळे त्यांना लवकरच डच्चू मिळाला. फिजिशियनच्या बाबतीत तसे काही घडले नाही. त्यांच्यात फरक पडला तो निराळा. ते एकदा रस्त्यात भेटले, तेव्हा आमच्यात संवाद घडला तो असा. "आपली आठवण आम्हाला नेहमी येते सर." मी म्हटले. "का?" "मेडिसिनच्या पुस्तकात नमूद न केलेल्या गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो. " "म्हणजे?" " आपले रुग्णाविषयीचे प्रेम, आपली कर्तव्यनिष्ठा, आपली तळमळ व आपले संभाषणचातुर्य, आपले बेड साइड मॅनर्स..." "हे सर्व आता इतिहासजमा झाले आहे. एका हाताने टाळी वाजत नसते, डॉ. प्रभू!" "म्हणजे?" "माझ्या सचोटीपणाचे काय चीज झाले? माझ्या वरिष्ठांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या मित्रांनी जोपर्यंत माझ्याकडून घेण्यासारखे होते, तोपर्यंत सर्व काही घेतले. जेव्हा त्यांची द्यायची पाळी आली, तेव्हा ते मात्र मागे सरले. जीवनात देवघेव असते, असे फक्त तोंडाने सांगायचे. रुग्णांकडूनही मला असाच प्रतिसाद मिळाला. रात्री-अपरात्री फोनची घंटा वाजली, की माझ्या अंगात १०२ डिग्री ताप असतानादेखील रुग्णाच्या घरी धाव घेतली. फीसाठी नव्हे; कर्तव्य म्हणून. पण दुसऱ्या दिवशी कळायचे की, माझी गरज त्याला फक्त रात्रीच होती. त्याचा नेहमीचा डॉक्टर आला नाही म्हणून मी जीवावर का उदार व्हावे? मी आता माझ्या कामाला व्यवसाय म्हणत नाही; धंदा म्हणतो, कारण आता समाजाची डॉक्टरकडे पाहण्याची दृष्टीच व्यापाऱ्याकडे ३२ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> hb3g9ox1p7vc05jern3ot40f9936eys पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३७ 104 112438 237725 2026-10-07T10:59:05Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पाहण्यासारखी झाली आहे. मी आता प्रामाणिकपणे धंदा करतो. इतर व्यापाऱ्यांसारखा रात्री ९ वाजले की दुकान बंद. 'कन्सल्टिंगरूम'च्या बाहेर बोर्ड लावला आहे, फी रु. ५० फक्त. परवडले तर या.” (ही..." 237725 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पाहण्यासारखी झाली आहे. मी आता प्रामाणिकपणे धंदा करतो. इतर व्यापाऱ्यांसारखा रात्री ९ वाजले की दुकान बंद. 'कन्सल्टिंगरूम'च्या बाहेर बोर्ड लावला आहे, फी रु. ५० फक्त. परवडले तर या.” (ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट) बॉस निघून गेले होते. मी आश्चर्याने त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. या फिजिशियनच्या अनेक आठवणी आहेत. नियमितपणा, दीर्घोद्योगी, संशोधक वृत्ती, वक्तशीरपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती इत्यादींसाठी ते हॉस्पिटलमध्ये आदर्श मानले जात. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबरोबर रक्त, लघवी, शौच यांची तपासणी व छातीचे स्क्रिनिंग करायलाच हवे असा त्यांचा कटाक्ष. या तपासणीसाठी रोज तीस-चाळीस रुग्णांचे सुमारे दीडशे फॉर्म भरण्याच्या खर्डेघाशीतच आम्हा हाऊसमनांचा बराच वेळ जायचा. संशोधनाबाबतीतही अगदी अति व्हायचे. दुपारी जेवणानंतर तासभर वामकुक्षी घेणे म्हणजे त्यांना वेळेचा अपव्यय वाटायचा. ही वेळ ते प्रयोगशाळेत घालवीत. माणसाच्या आतड्यात प्राणवायूचा प्रवाह सोडल्यास जंतांचा नाश होतो, असे त्यांनी संशोधन केले. प्राणवायूचा जंतावर होणारा परिणाम पाहण्यासाठी प्रयोग सुरू झाले. जंत बाटलीत भरणे, त्यावर प्राणवायू सोडणे. जंत किती वेळात मरण पावतात याची नोंद ठेवणे, ही कामे हाऊसाला करावी लागत. अखेर या विषयावर एक प्रबंध तयार झाला. आपण संशोधनात मोलाची भर घातली आहे या ऐटीत त्यांनी तो एका वैद्यकीय परिषदेत वाचून दाखवला. प्रश्नोत्तराच्या वेळेला त्यांना एका डॉक्टरने प्रश्न विचारला, "दोन आण्याच्या सँटोनिनच्या पुडीने जे कार्य होते, त्यासाठी प्राणवायूचा सिलेंडर आणणे म्हणजे ढेकूण मारण्यासाठी बंदूक आणण्यासारखे आहे असे नाही का आपल्याला वाटत?" आमचे बॉस निरुत्तर झाले. सर्वजण गालातल्या गालात हसले. तेव्हापासून त्यांनी संशोधन सोडून दिले व दुपारचा तास वामकुक्षीसाठी राखून ठेवला. कोणत्याही विषयाची व्यवहार्य बाजू पाहिली नाही, की असा विचका होतो, हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो. हॉस्पिटलात सामाजिक कार्यकर्ते भेटायचे. जिन्याखाली तापाने किंवा अतिसाराने आजारी असलेल्या रुग्णाला भूतदया दाखवायचे व स्वखर्चाने हॉस्पिटलात आणायचे, अॅडमिट करायचे. पुढे रुग्ण बरा झाल्यावर त्याला परत घेऊन जायला कुणी यायचे नाही. मी डॉक्टर झालो । ३३<noinclude></noinclude> np5f1in8uwbzdmkdea2lw1yigvaaeor पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३८ 104 112439 237726 2026-10-07T10:59:18Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पॅथॉलॉजी विभागात काम करीत असताना रक्तदानाचे कामही पाहावे लागे. रक्तदानासाठी येणाऱ्या इसमाचे रक्त तपासणे, त्याचे रक्त बाटलीत जमा करणे व त्याला पंचवीस रुपये देणे, हे कामाचे स्वरू..." 237726 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पॅथॉलॉजी विभागात काम करीत असताना रक्तदानाचे कामही पाहावे लागे. रक्तदानासाठी येणाऱ्या इसमाचे रक्त तपासणे, त्याचे रक्त बाटलीत जमा करणे व त्याला पंचवीस रुपये देणे, हे कामाचे स्वरूप असे. पैशाच्या आशेने अनेक माणसे रक्तदानासाठी सकाळी हॉस्पिटलबाहेर जमत. परंतु एका धटिंगण दादाच्या मेहेरबानीशिवाय कुणालाही आत जायला मिळत नसे. मिळालेल्या पैशातून त्या दादाला काही कमिशन द्यावे लागे. या गोष्टींची आम्हाला प्रथम माहिती नव्हती. एकदा असे झाले, नुकतीच मिसरूड फुटलेला एक मुलगा रक्तदानासाठी आला. रक्त घेत असताना मी त्याचे अभिनंदन करून म्हटले, "कुणाचे तरी प्राण वाचवावेत या जाणिवेने तू रक्तदानाला तयार झालास याचे कौतुक वाटते. " "छे डॉक्टर; मला पैशांची गरज आहे. मी कॉलेजात शिकतो; फीसाठी पैसे कमी पडले म्हणून आलो.” हे ऐकल्याबरोबर मला काही बोलवेना. त्याचे रक्त घेतले. त्याला पैसे दिले. मी पुढील कामाला लागलो. पाच-दहा मिनिटांनी तो मुलगा घाबरलेल्या अवस्थेत परत आला. आपला फाटलेला शर्ट सावरीत डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, "त्या दादाला आवरा हो! माझ्या हातातून त्याने पंधरा रुपये हिसकावून घेतले. वर म्हणतो, 'मला न विचारता आत पुन्हा गेलास तर तंगडे मोडून ठेवू.' त्याला माझा इलाज नव्हता. वरिष्ठांना कळविणे व शाब्दिक सहानुभूती दाखवणे, यापलीकडे त्याला देण्यासारखे माझ्याजवळ काही नव्हते. पण आजही या प्रसंगाच्या आठवणीने काळजात कसेसेच होते. " असो. आमची हाऊसमनशिप संपली. एक वर्ष भरकन कसे निघून गेले, ते कळले नाही. आमच्या बॉसच्या कडक धोरणामुळे 'सिटी ऑल' (मागील औषधे पुढे चालू) या पलीकडे काहीदेखील शिकलो नाही. म्हणजे ज्ञानात भर शून्य. 'एम.बी.बी.एस. पर्यंत बरेचसे जे निरुपयोगी शिकलो ते विसरत चाललो होतो. त्यामुळे डोके बरेच हलके झाल्यासारखे वाटत होते; म्हणजे बरे वाटत होते. मग एका वर्षात आम्ही काय केले? रोज ब्रेड आमलेटचा समाचार घेतला; नान, चिकन बिर्याणीवर ताव मारला. डॉ. बक्षींच्या घरून येणारे ताजे दही, तूप त्यांच्या नकळत फस्त केले. रोज भारंभर फॉर्म भरले, नॉसबरोबर राऊंड घेतला; रोज सकाळी वेळेवर प्रत्येकाच्या केसपेपरवर 'सिटी ऑल' केले; बरणीतील जंतांना मरेपर्यंत डिवचित राहिलो, नवीन नर्सेसवर व वॉर्डबॉइजवर हुकूमत गाजवली, रोज पंचवीस-तीस सलाइनच्या बाटल्या चढविल्या, अधूनमधून मृत्यूचा दाखला भरला आणि ही सर्व गधामेहनत केल्याबद्दल एक प्रशस्तिपत्रक मिळवले. " ३४ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> cvj0yafjcedl3ie4rf4f5pz3c6cw6dd पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३९ 104 112440 237727 2026-10-07T10:59:38Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दवाखान्याचा शोध दवाखान्याचा शोध हा जावईशोधाइतकाच कटकटीचा विषय असतो याची कल्पना तोवर मला आलेली नव्हती. दर वेळी व्हायचे असे की, एखादी जागा नक्की ठरवली म्हणजे मग त्या जागेचे क्षेत..." 237727 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>दवाखान्याचा शोध दवाखान्याचा शोध हा जावईशोधाइतकाच कटकटीचा विषय असतो याची कल्पना तोवर मला आलेली नव्हती. दर वेळी व्हायचे असे की, एखादी जागा नक्की ठरवली म्हणजे मग त्या जागेचे क्षेत्रफळ, भाडे, दिवाबत्ती, पाणी, मालक, पागडी, शेजारची वस्ती, इतर दवाखाने याविषयी चौकशी सुरू व्हायची! हे करीत असताना मी दवाखान्यात कसा बसेन, कशी गर्दी असेल, कसा नावलौकिक होईल याची शेखमहंमदी सुरू व्हायची. इतक्यात कोठे तरी घोडे अडायचे व शोधलेल्या जागेचा विचार सोडून द्यावा लागे. पुन्हा नव्या शोधाला सुरुवात. शहरात डॉक्टरांची गर्दी फार म्हणून उपनगरात जागा शोधायचे ठरले. श्रीमंत वस्तीत आजार कमी व फॅड अधिक म्हणून गरीब वस्तीत जायचे ठरवलेले. मग चेंबूर, मानखुर्द, मरोळ, कालिना, धारावी, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर, खार; अधूनमधून रे रोड, घोडपदेव, शिवडी ही सर्व स्थळे (त्या काळी गरीब वस्तीची) पालथी घातली. कुठे भाडे अधिक; तर कुठे जागा लहान. कुठे वस्ती कमी तर कुठे अगदीच आडरस्त्याची जागा; तर कुठे जागा फ्रीहोल्ड नाही. असे करता करता दिवसांमागून दिवस गेले. महिन्यांमागून महिने गेले. डॉक्टर बाहेरगावी जायचे झाल्यास तात्पुरता बदली डॉक्टर ठेवतात, त्याला 'लोकम' अशी संज्ञा वापरली जाते. दवाखान्याचा शोध चालला असताना 'लोकम'साठी मागणी आली. गोल देऊळ भागातील एक डॉक्टर रजेवर जायचे होते. त्यांचा दवाखाना सांभाळण्याचे काम मी पत्करले. त्याबद्दल रोज दहा रुपये मिळणार होते. इतका मोठा पगार मिळणार म्हणून भी खूश होतो. पण मी नवीन डॉक्टर असल्यामुळे कुणी पेशंट येतच नव्हते. रजेवर गेलेले डॉक्टर परत आले, तेव्हा मी जमवलेल्या कॅशची बेरीज पाहून त्यांनी कपाळाला हात लावला असणार! कारण त्यातून माझा पगारदेखील सुटणार नव्हता. पण डॉक्टर तसे दिलदार माणूस. ते म्हणाले, "आजपासून तू माझ्याकडे येत जा. आजवर यू हॅव लर्न्ट सायन्स ऑफ मेडिकल प्रॅक्टिस; नाऊ यू यू नीड टू लर्न दी आर्ट ऑफ मेडिकल प्रॅक्टिस. ' " 23 मी रोज त्यांच्या दवाखान्यात जाऊ लागलो. बहुतेक रुग्ण डॉक्टरांना सांगायचे, "डॉक्टर, आज वाफेचे इंजेक्शन द्या, उष्णतेवर इंजेक्शन द्या.' डॉक्टर त्यानुसार इंजेक्शन द्यायचे. कुणाला कॅल्शियम ग्लुकोनेट, कुणाला पेनिसिलिन तर कुणाला बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन द्यायचे! मला वाटले, डॉक्टर पैसे उकळण्यासाठी असे सारखे इंजेक्शन देत आहेत. मी डॉक्टर झालो । ३५<noinclude></noinclude> 877ul7qrq3yqhlih1y1e25x2ve4s6xm पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४० 104 112441 237728 2026-10-07T10:59:52Z Shurpalimedha 5041 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पन्नास वर्षांपूर्वी माणूस आजच्यासारखा पैशासाठी हावरटपणा करीत नव्हता. मी त्यांना सरळ विचारले, "डॉक्टर, तुम्ही कोणतेही 'इण्डिकेशन' नसतानादेखील अशी इन्जेक्शने देता, हे वैद्यकीय नी..." 237728 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पन्नास वर्षांपूर्वी माणूस आजच्यासारखा पैशासाठी हावरटपणा करीत नव्हता. मी त्यांना सरळ विचारले, "डॉक्टर, तुम्ही कोणतेही 'इण्डिकेशन' नसतानादेखील अशी इन्जेक्शने देता, हे वैद्यकीय नीतिशास्त्राच्या विरुद्ध आहे असे आपल्याला वाटत नाही का?" तेव्हा ते म्हणाले, "तुला दिसतं तसं नाही, माझा प्रत्येक पेशंट हा माझा अतिथी आहे, असं मी मानतो. याला खूश करणं हे माझं पहिलं कर्तव्य. धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनची एकसारखी मागणी करणाऱ्या रुग्णाला 'आर सोल्यूशन' या नावाखाली आपण इंजेक्शन देतोच ना? हेतू असा की, त्याच्या मनाचं समाधान झालं म्हणजे मानसिक उगमाचा आजार दूर होऊ शकतो. 'आर सोल्यूशन' टोचताना वैद्यकीय नीतिशास्त्र आड येतं का? इथेही तेच तत्त्व लागू व्हावं. प्रथम मी पेशन्टना इंजेक्शनची आवश्यकता नाही, हे समजावून सांगतो. पण माणूस आपली मतं सहसा बदलत नाही. तो दुसऱ्या डॉक्टरकडून इंजेक्शन घ्यायचा. बरं, सर्वच जण इंजेक्शनचे पैसे देतातच, असं नाही. जे देतात त्यांच्याकडून घेतो. नाही दिले पैसे तरी काही बिघडत नाही, असं मी त्यांना सांगतो. कारण पैशाची उणीव मला केव्हाच भासलेली नाही. एक तुला सांगतो, पेशंट आपलं दुःख घेऊन डॉक्टरकडे येतो. त्याला तुम्ही तुमच्या वागण्याने अधिक दुःखी बनवू नका. हे आपलं नीतिशास्त्र !" मी दोन्ही हात जोडले व म्हटले, "गुरू, तुम्ही आज मला पहिला धडा दिलात. कोणत्याही पुस्तकात नसलेला, परंतु फार महत्त्वाचा असलेला. " मला त्यांनी म्हटलेले कळत होते, पण वळेल की नाही ही शंका होती. मनात विचार आला, घडलेले पाप गंगेत आंघोळ करून धुऊन काढण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोच ना! तसे पाप काही आपल्या अंगाला चिकटलेले नसते. नदीचे पाणी व घरच्या नळाचे पाणी यात तसा फरक नसतो. तरीदेखील तथाकथित तार्किक, शास्त्रीय बैठक असलेली अनेक माणसे च्याच पाण्यात बुडी मारण्यात सार्थक मानतात ना? नीतिशास्त्र हे माणसाने बनविले आहे. रणांगणावर शत्रुपक्षाच्या निष्पाप शिपायाला मारण्यात शौर्य दिसते, घरात शिरलेल्या उलट्या काळजाच्या दरोडेखोराला मारणे म्हणजे खून ठरतो! मी ज्यांच्याकडे लोकम करीत होतो, त्या डॉक्टरांकडून खूपसे शिकलो. घरच्या नातेवाइकांची आस्थापूर्वक चौकशी कराल तरच तुम्ही खरे 'फॅमिली डॉक्टर', असे त्यांचे म्हणणे होते. “योग्य वैद्यकीय सल्ला द्या, पण तो रुचेल, पचेल की नाही हेदेखील पाहा. उदाहरणार्थ, हर्निया या विकारासाठी ३६ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> o6knkyzn0ktl05b3yys6j3pwtqbxgze