विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:निरगाठ सुरगाठ.pdf/४६ 104 112445 237779 237749 2026-10-08T12:04:38Z JayashreeVI 4058 237779 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>अनेक पिढ्या एखाद्या गावात मुलगी वाढूच शकली नाही याचा अभिमान बाळगला जाई, हा पुरुषी दहशतवादाचा विकृत आविष्कार आहे.
{{gap}}सामान्यतः निसर्गात नर-मादी यांचे जन्मप्रमाण समसमान असते. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या माणसाने त्यात इतका असमतोल निर्माण केला आहे की, काही समाजात तरुण मुलांना योग्य वधू मिळून लग्न होणे आजच कठीण होत आहे.
{{gap}}समाजशास्त्रज्ञांच्या मते ही विषमता अशीच वाढत राहिली तर नजीकच्या भविष्यकाळात तरुणींचे अपहरण, स्त्रियांवरील बलात्कार वाढत जातील.
{{gap}}समाजाच्या सर्वच स्तरात बाईच्या-मुलीच्या मनावर एक अखंड दडपण असते. दहशत असते, दहशत असते बलात्काराची! अगदी तथाकथित कुटुंबातही बाई सुरक्षित नसते. बायका नटून-थटून घराबाहेर जातात म्हणून पुरुषी वासना चाळवल्या जाऊन बलात्कार, छेडछाड असे प्रकार होतात, असा एक साळसूद युक्तिवाद नेहमी केला जातो; पण ज्या ज्या वेळी स्त्रियांच्या संघटनांनी समाजाच्या विविध स्तरातल्या आणि विविध वयातल्या स्त्रियांची पाहणी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. आपल्या संस्कृतीच्या उच्चतेचे आणि उदात्तेचे गोडवे गाणाऱ्यांनी एकदा स्त्रियांच्या अंतःस्तरातील ही वास्तविकता सहानुभूतीने समजून घ्यावी. प्राचीन साहित्यातूनही या दडपणाची अनेक उदाहरणे सापडतात.
{{gap}}साठ टक्क्यांहून अधिक स्त्रियांना आपल्या बालपणात आणि वाढत्या वयात कुटुंबातील अगदी जवळच्या नातेवाईक पुरुषांकडून लैंगिक सतावणुकीचे अत्यंत विपरित आणि लज्जास्पद अनुभव आलेले असतात. या नातेसंबंधातील पुरुषांत आजोबा, चुलता, मामा, आते मामे, मावसभाऊ आणि क्वचित जन्मदाता बापही असतो. पुरुषाविषयीची ही दहशतीची टांगती तलवार बाईच्या डोक्यावर जन्मभर असते.
{{gap}}नुकतीच घडलेली कोठेवाडीतील सामूहिक बलात्काराची घटना सगळ्या सुसंस्कृतेतला काळिमा फासणारी आहे. नातवाच्या वयाच्या पुरुषाने नराने आपल्या आजीच्या वयाच्या स्त्रीवर बलात्कार करणे तेही बंदिस्त वाड्यात असताना जबरदस्तीने आत घुसून करणे ही घटना आम्ही पशूहून नीच असल्याची निदर्शक नाही का? अशा पुरुषी वृत्तीचा निषेध सामूहिक सार्वत्रिक स्तरावर सुसंस्कृत पुरुषांनी केल्याची एकही घटना नाही. हे तरी कोणत्या सामाजिक मानसिकतेचे लक्षण आहे? {{gap}}जाती जातीतील वैमनस्यावरून पुरुष मंडळी परस्परांच्या स्त्रियांना छळतात,<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ४५}}</noinclude> 392uzbku8oqw1r1ud852rhv0ti6c9ez 237780 237779 2026-10-08T12:05:03Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 237780 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>अनेक पिढ्या एखाद्या गावात मुलगी वाढूच शकली नाही याचा अभिमान बाळगला जाई, हा पुरुषी दहशतवादाचा विकृत आविष्कार आहे.
{{gap}}सामान्यतः निसर्गात नर-मादी यांचे जन्मप्रमाण समसमान असते. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या माणसाने त्यात इतका असमतोल निर्माण केला आहे की, काही समाजात तरुण मुलांना योग्य वधू मिळून लग्न होणे आजच कठीण होत आहे.
{{gap}}समाजशास्त्रज्ञांच्या मते ही विषमता अशीच वाढत राहिली तर नजीकच्या भविष्यकाळात तरुणींचे अपहरण, स्त्रियांवरील बलात्कार वाढत जातील.
{{gap}}समाजाच्या सर्वच स्तरात बाईच्या-मुलीच्या मनावर एक अखंड दडपण असते. दहशत असते, दहशत असते बलात्काराची! अगदी तथाकथित कुटुंबातही बाई सुरक्षित नसते. बायका नटून-थटून घराबाहेर जातात म्हणून पुरुषी वासना चाळवल्या जाऊन बलात्कार, छेडछाड असे प्रकार होतात, असा एक साळसूद युक्तिवाद नेहमी केला जातो; पण ज्या ज्या वेळी स्त्रियांच्या संघटनांनी समाजाच्या विविध स्तरातल्या आणि विविध वयातल्या स्त्रियांची पाहणी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. आपल्या संस्कृतीच्या उच्चतेचे आणि उदात्तेचे गोडवे गाणाऱ्यांनी एकदा स्त्रियांच्या अंतःस्तरातील ही वास्तविकता सहानुभूतीने समजून घ्यावी. प्राचीन साहित्यातूनही या दडपणाची अनेक उदाहरणे सापडतात.
{{gap}}साठ टक्क्यांहून अधिक स्त्रियांना आपल्या बालपणात आणि वाढत्या वयात कुटुंबातील अगदी जवळच्या नातेवाईक पुरुषांकडून लैंगिक सतावणुकीचे अत्यंत विपरित आणि लज्जास्पद अनुभव आलेले असतात. या नातेसंबंधातील पुरुषांत आजोबा, चुलता, मामा, आते मामे, मावसभाऊ आणि क्वचित जन्मदाता बापही असतो. पुरुषाविषयीची ही दहशतीची टांगती तलवार बाईच्या डोक्यावर जन्मभर असते.
{{gap}}नुकतीच घडलेली कोठेवाडीतील सामूहिक बलात्काराची घटना सगळ्या सुसंस्कृतेतला काळिमा फासणारी आहे. नातवाच्या वयाच्या पुरुषाने नराने आपल्या आजीच्या वयाच्या स्त्रीवर बलात्कार करणे तेही बंदिस्त वाड्यात असताना जबरदस्तीने आत घुसून करणे ही घटना आम्ही पशूहून नीच असल्याची निदर्शक नाही का? अशा पुरुषी वृत्तीचा निषेध सामूहिक सार्वत्रिक स्तरावर सुसंस्कृत पुरुषांनी केल्याची एकही घटना नाही. हे तरी कोणत्या सामाजिक मानसिकतेचे लक्षण आहे? {{gap}}जाती जातीतील वैमनस्यावरून पुरुष मंडळी परस्परांच्या स्त्रियांना छळतात,<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ४५}}</noinclude> mzr1tp9tmlvamaefjc8uchv0xfl8kho पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५१ 104 112457 237777 2026-10-08T11:59:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237777 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''३८ '''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>आहे. कसेंहि शब्दचित्र काढलें व छायाचित्र दिलें तरी त्याची स्पष्ट कल्पना येणें दुरापास्त आहे.
{{gap}}पॅरिस शहरांतील प्रेक्षणीय स्थळांचें- निदान माझ्या दशवड्याच्या निवासांत मी पाहू शकलों त्यांचें- माझें वर्णन संपलें. पॅरिस शहराच्या आसपास आणखी कितीतरी प्रेक्षणीय स्थळें आहेत. त्यांपैकीं मी तीनच पाहिलीं. त्यांपैकीं एक ललितकला सौंदर्याचें आगर आहे; दुसरं निसर्ग-रमणीय आहे व तिसरें गेल्या महायुद्धसमाप्तीचें स्मारक आहे. तेव्हां आतां यथाक्रम त्यांच्या वर्णनास लागतों.
{{gap}}'''व्हरसाय''' हे गांव पॅरिसपासून बारा मैल दूर आहे. ट्रॅम, ट्रेन व बस अशा तिन्ही साधनांनीं तेथें जातां येतें. आम्हीं एका दोनप्रहरीं ट्रॅमनें व्हरसायला गेलों व एका तासांत व्हरसायच्या राजवाड्यासमोरच उतरलों. ट्रॅम सेननदीच्या उत्तर बाजूनें जाते व पुलानें नदी ओलांडून दक्षिणेस जावें लागतें. ट्रेन दक्षिणबाजूनें जात असल्यामुळें नदी ओलांडावी लागत नाहीं. आम्ही सायंकाळी सात वाजतां ट्रेननें परतलों.
{{gap}}व्हरसाय हा प्रचंड राजवाडा तीन सोपी असून राजवाड्यापुढे विस्तीर्ण अंगण आहे व लोखंडी उंच कठडा व मधोमध फारच सुंदर लोखंडी फाटक आहे. मी या फाटकाशीं आलों तेव्हां त्या राजवाड्याचा तो विलक्षण विस्तीर्णपणा पाहून मी तोंडांत बोटच घातलें. हा राजवाडा तांबूस-पांढऱ्या दगडाचा बांधलेला आहे. आंतला सर्व भाग पांढऱ्या संगमरवरी दगडाचा आहे. अंगणामध्यें पुष्कळ पांढरे संगमरवरी पुतळे आहेत; त्यांत घोड्यावर बसलेला चवदाव्या लुई राजाचा पुतळा फारच भव्य आहे. लूव्ह्र राजवाड्याप्रमाणें व्हरसायचा राजवाडा हें आतां प्रचंड पदार्थसंग्रहालय व चित्रसंग्रहालयच बनलें आहे म्हणाना! येथें उंची नक्षीकाम व चित्रकलाकाम यांनीं सुशोभित केलेले किती तरी विस्तीर्ण दिवाणखाने एका पाठीमागून एक असे दृष्टीस पडतात. त्यांमध्ये दोन दिवाणखाने तर मनुष्याचें मन थक्क करून सोडणारे आहेत. एका<noinclude></noinclude> 1en3qci5fi51r014m695zzcpakz4d8b पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५२ 104 112458 237778 2026-10-08T12:01:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237778 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''फ्रान्सची राजधानी पॅरिस'''|'''३९'''}}</noinclude>दिवाणखान्यांत सन ४०० पासून सन १८१० पर्यंतचीं फ्रेंच लढायांची मोठमोठीं चित्रं भिंतीवर काढलेलीं आहेत; तर दुसऱ्यामध्यें फ्रान्स देशांतील प्रख्यात पुरुषांचीं व राजाराण्यांचीं चित्रे काढलेलीं आहेत. पुष्कळ दिवाणखान्यांत लोकरीच्या सुंदर वीणकामाचे पडदे भिंतीवर टांगलेले आहेत! निरनिराळ्या दिवाणखान्यांतून फ्रेंच राजाराण्यांचे पुतळेहि ठेवलेले आहेत. सारांश, या राजवाड्यामध्यें काय काय पहावें असें होऊन मनुष्याचें मन गोंधळून जातें; इतका हा राजवाडा प्रेक्षणीय वस्तूंनीं भरगच्च भरलेला आहे.
{{gap}}राजवाड्याच्या मागें आलें म्हणजे सपाट व खुलें अंगण लागतें. व जरा खोलगट जागेंत राजवाड्याची विस्तीर्ण बाग लागते. या अंगणाच्या टोंकावर सुंदर पांढऱ्या पायऱ्यांच्या चबुतऱ्याशीं उभे राहिलें व एकीकडे तो तांबूस पांढऱ्या रंगाचा अजस्र राजवाडा व समोरच तें सुंदर सरोवर व त्याच्या सभोंवार हिरवीगार बाग व मध्येमध्यें केलेलीं तीं कारंजी हा देखावा विलक्षण चित्ताकर्षक आहे असें वाटतें. पायऱ्या उतरून खालीं बागेत प्रवेश केला म्हणजे त्या बागेच्या विस्तृतपणाचें आश्चर्य वाटतें. नेपचून या ग्रीक देवाचा पुतळा असलेळें प्रचंड कारंजें अजब वाटतें. या सभोवार एक लाख लोक सामावतील एवढी खुली हिरवीगार हिरवळीची जागा आहे. या ठिकाणी दर वर्षी मेच्या पहिल्या रविवारी मोठी रोषणाई होते व बागेंतील कारंजांतून पाण्याचे हजारों फवारे हवेंत उंच उंच उडतात. तो देखावा अद्वितीय आहे असें आम्हांला समजलें. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणें मला अशक्य होतें. तेव्हां त्या देखाव्याचें चित्र कल्पनाशक्तीनें मनापुढें आणून समाधान मानावें लागलें. य बागेत ग्रीष्म लताकुंज म्हणून एक मुसलमानी शिल्पपद्धतीची इमारत- इमारत कसची पिवळसर तांबड्या दगडाच्या दुहेरी खांबांवरील कमानी- कमानींचें वर्तुळाकार बिनछपरी आवार आहे. या खांबांवर व कमानीवर वेलीचवेली चढवून दिलेल्या आहेत. मध्यें हिरव्यागार गालिच्यासारखी खुली गवताळ जागा होती. उन्हाळ्यांत बसण्याकरितां हें लता-<noinclude></noinclude> sy7rlv5pj4lxpj6ztjhpjz5hlwuzwgr पान:निरगाठ सुरगाठ.pdf/४८ 104 112459 237781 2026-10-08T12:05:45Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ मेहरबानी करीत आहोत. त्या बदल्यात वरपक्षाच्या सर्व मागण्या वधूपक्षाने पूर्ण केल्याच पाहिजेत अशी धारणा 'हुंडाबळी' प्रकरणातून स्पष्ट दिसते. स्त्री जन्म ही पापाची खाण, स्त्..." 237781 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ मेहरबानी करीत आहोत. त्या बदल्यात वरपक्षाच्या सर्व मागण्या वधूपक्षाने पूर्ण केल्याच पाहिजेत अशी धारणा 'हुंडाबळी' प्रकरणातून स्पष्ट दिसते. स्त्री जन्म ही पापाची खाण, स्त्री जन्म हा दुय्यम, कष्ट आणि अवहेलना मुकाट्याने सहन करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे पुरुषाच्या लैंगिक व अन्य सुखांसाठीच असतो ही धारणा कळत-नकळत समाजाच्या (स्त्री-पुरुष दोघांच्याही) हाडीमाशी खिळलेली असते. त्यामागे या समाजात स्त्रीविषयीचा पिढ्यान्- पिढ्यांचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. त्यामुळे स्त्रीने केवळ पुरुषाचीच नव्हे तर पुरुष कुळाचीही (सासरची) सेवाचाकरी विनातक्रार करण्यातच स्त्रीत्वाचा गौरव आहे, हेही घट्ट रुजले आहे. त्यातूनच पातिव्रत्य आणि सतीत्व यांच्या अगदी अतिरेकी टोकाच्या संकल्पना पिढ्यान्पिढ्या समाजमनात रूजल्या आहेत. (म्हणूनच देवराला सतीचे उदात्तीकरण होते.) त्यांचा गौरव करताना अनेक कथा-कहाण्या व्रते, रूढी यांचा जन्म झाला आहे. त्यांचे उदात्तीकरण होता होता बायकाच उत्साहाने त्याचे पालन करतात. दहशत ही दहशत न वाटता गौरव वाटावा अशी मतलबी मानसिकता दृढ झाली आहे. एक परीने बळी (व्हिक्टिम) जाणाऱ्या बाईलाच 'बळी' प्रथेची 'वाहक' (एजंट) बनवले गेले आहे. त्यामुळे आपलं बाई असणं म्हणजे गौण असणं, हीच आपली नियती आहे, अशी बाईच्या मनाची घडण या संस्कृतीने केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कुटुंबात स्त्रियांवर विविध प्रकारच्या दडपणांचा, अत्याचारांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष मारा होत असतो. वधूपक्षाने हुंडा दिलाच पाहिजे, वरपक्षाचे मानपान केलेच पाहिजेत, त्यात काही कमी झाले तर होणारा छळ सोसलाच पाहिजे अशी मानसिकता या समाजातल्या बायकांचीही असल्याने त्या फारसा प्रतिरोधच करू शकत नाहीत. सासरघरच्या सर्वांची सेवाचाकरीही तिने केलीच पाहिजे हीही धारणा घट्ट आहे. त्यात काहीही कमी झाले तरी आपलीच चूक म्हणून छळ सहन केला पाहिजे. (उदा. आजच्या सर्व हिंदी मालिका) मुख्य म्हणजे तिला स्वतःचा मान असताच उपयोगी नाही. अपमान झाल्याची तिला जाणीव झाली तरच ती उलटून प्रतिवाद करेल ना! तिने निमूटपणे ऐकून घ्यावे. प्रतिवाद केला तर परिणामी होणाऱ्या छळाला सामोरे गेलेच पाहिजे. तो स्त्रीजातीचा मर्यादाभंग ठरतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरुषाच्या सर्व लैंगिक इच्छा निमूटपणे पूर्ण केल्या पाहिजेत. त्यात कमतरता झाली तर तो देईल ती शिक्षा भोगलीच पाहिजे. या सर्व धारणांतून स्त्रियांना सासरघरी आणि पतीकडून होणारी मारहाण ही निरगाठ सुरगाठ / ४७<noinclude></noinclude> bfxi4ig57nepzubp790497288jp6hni