विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/117
104
5833
237811
15620
2026-10-10T12:10:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237811
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}</noinclude>{{x-larger|{{center|'''अध्याय ३ रा'''}}}}
{{x-larger|{{center|'''वृत्तविचार आणि वृत्तविस्तार'''}}}}

{{gap}}शिखा<ref>शिखा नि खञ्जा हे प्रकार वृत्तरत्नाकर आणि प्राकृत पैङ्गल या दोनच ग्रन्थांत पादद्वयघटित आहेत.</ref>, खञ्जा नि चूलिका हे प्रकार वगळल्यास संस्कृतांत पद्याचें परिमाण चतुष्पदी हें आहे. शिखा, खञ्जा नि चूलिका या प्रकारांत चरण दोन दोनच असले तरी ते दीर्घ असल्याने म्हणतांना त्यांचे स्वाभाविकपणेंच चारचार चरण होतात. संस्कृतांत बहुशः अनुष्टुप् छन्दांतील चतुष्पदीसच श्लोक म्हणतात; तथापि शङ्कराचार्यकृत 'प्रातःस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम्' या 'प्रातःस्मरण' स्तोत्रांत वसन्ततिलकावृत्ताच्या तीन चतुष्पद्या असून त्यांना अुद्देशून
नन्तर
{{Block center|<poem>"इलोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणम् ।
प्रातःकाले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम् ॥"</poem>}}
असा श्लोक आहे. मराठींत कोणत्याहि वृत्तांतील चतुष्पदीस '''श्लोक''' म्हणतात.
{{gap}}ज्या पद्यांतील चरण विशिष्ट अक्षरसङ्ख्या, लगक्रम आणि मोडणी वा गणविभागणी यांनी नियमित असतात तें वृत्त होय. मोडणी म्हणजे पिङ्गलोक्त गणांचा क्रम नव्हे तर अन्तर्गत आन्दोलनानुसार होणारी गणविभागणी होय. अक्षरसङ्ख्या आणि लगक्रम हीं अभिन्न असलीं म्हणजे आरम्भापासून गणना करून चरणाचे जे त्र्यक्षरी तुकडे वा गण पडतात ते पिङ्गलोक्त गण अेका ठराविक क्रमानेच येतात. पण पिङ्गलोक्त गणांचा क्रम अभिन्न असूनहि अन्तर्गत आन्दोलनानुसार होणारी गण-विभागणी भिन्न भिन्न होअू शकते. या गणविभागणीस मोडणी म्हटलें आहे.

| मणिगुणनिकर || [।‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ !‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ _]|| (पि ७/१३)

| शशिकला|| [।‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ !‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ ।_] || (हे २/२४४)

| स्रक्|| [।‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ !‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ !‿ ‿ _]|| (हे २/२४५)

{{nop}}<noinclude>
{{reflist}}</noinclude>
mg2zrkrcrlz9kwy8kp7y3a7g6eyhnqn
पान:छन्दोरचना.djvu/118
104
5834
237812
15621
2026-10-10T12:21:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237812
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''९१'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>{{gap}}हीं तीन वृत्तें अक्षरसङ्ख्येने आणि लगक्रमाने अेकसारखी असल्याने न, न, न, न, स, याच क्रमाने तिन्ही वृत्तांचे पिङ्गलोक्त गण पडतात; पण या तीन वृत्तांत अनुक्रमें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षण्मात्रक आवर्तनें असल्याकारणाने त्यांची गणविभागणी निरनिराळी होते. आवर्तन किती मात्रांचें आहे, आवर्तनारम्भ कितव्या अक्षरावर होतो, आणि गण-विभागणी कशी होते यांचा निर्णय करायला प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी साङ्गितलेल्या यतिस्थानांचा फार अुपयोग होतो. म्हणून लक्षण सांगतांना यति कोठे आहे हें साङ्गण्यांत येतें; आणि यतिभेदाने म्हणजेच मोडणी-भेदाने वृत्तभेद मानण्यांत येतो. वर दिलेल्या वृत्तांत यतिस्थानें खाली टिम्ब असलेल्या अुभ्यारेघांनी दाखविण्यांत आली आहेत. यति अनुक्रमें ८ व्या, ७ व्या आणि ६ व्या अक्षरानन्तर साङ्गितले आहेत त्यावरून आवर्तनें हीं अनुक्रमें अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षण्मात्रक आहेत ही गोष्ट कळते. परन्तु पुष्कळदा यति साङ्गितलेलेच नसतात वा भलत्याच म्हणजे अस्वाभाविक ठिकाणीं साङ्गितलेले असतात. अुदाहरणावरून वृत्ताची मोडणी निर्णीत करूं म्हटलें तर अेखादेंच अुदाहरण असायचें आणि तेंहि छन्दःशास्त्रकाराने रचून घातलेलें असायचें. वृत्तव्याख्या सुधारायला त्या अुदाहरणाचा फारसा अपयोग होत नाही. म्हणून अेखाद्या वृत्ताच्या जर अनेक मोडण्या सम्भवत असतील तर त्या साऱ्या देण्याचा प्रयत्न मी या ग्रन्थांत केला आहे. तथापि जेथे चरणांत अेखाद्या विशिष्ट गणाची आवृत्ति आहे तेथे, जेणें करून ती आवृत्ति भङ्गेल अशी मोडणी घेणें अुचित नाही.
{{gap}}चारी चरण भिन्न भिन्न लक्षणांनी युक्त असल्यास त्या वृत्तास विषम वृत्त म्हणतात. संस्कृतांत अनेक विषम वृत्तें साङ्गितलीं आहेत. त्यांपैकी अेकाच विषम वृत्ताचा अुपयोग सलग दीर्घ रचनेंत केलेला आढळतो. सौन्दरनन्द ३ रा, किरात १२ वा आणि शिशु १५ वा हे सर्ग अुद्गता नामक विषमवृत्तांत आहेत. या वृत्ताचें लक्षण अुत्पल (वबृ १०३/४८) या श्लोकावरील टीकेंत
{{Block center|<poem>"प्रथमे सजौ यदि सलौच
नसजगुरुकाण्यनन्तरम्
यद्यथ भनजलगाः स्युरथो
सजसा जगौच भवतीयमुद्रता"</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude>
l25y5i76qn7d0oso6cuzkyvvnia9iza
पान:छन्दोरचना.djvu/119
104
5835
237813
15622
2026-10-10T12:32:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''९२'''|}}</noinclude>असें देतो. अुद्गताचें पुढील अुदाहरण मराठीत अपवादरूपच असेल.
{{Block center|<poem>"बहु भागला दितिसुतांसि
अतुल समरा करूनिया
राम तृषित बहु होअुनिया
रमला प्रियाननसुधानिषेवणी". (साव ९/५६)</poem>}}
{{gap}}सौन्दरनन्द काव्यांत (२/६४-६५) हे दोन श्लोक अुपस्थितप्रचुपित नामक विषमवृत्ताचे आढळतात.
{{Block center|<poem>"हुडकिती सगर ते चहूकडे
हय त्यांसी परि कुठे न सापडे;
हुडकुनी हरितां मग चारही
करिती साठ हजार विचारही". (नग ७३)</poem>}}
{{gap}}या चतुष्पदींत चारी चरण लगक्रमदृष्ट्या भिन्न भिन्न आहेत; पण अेवढ्याने हें विषमवृत्त होत नाही. लगक्रमदृष्ट्या भिन्न असणारे चारी चरण जेव्हा अनेक श्लोकांत अनुक्रमें सारखे येतात; तेव्हा ते श्लोक अेका विशिष्ट विषमवृत्ताच्या साच्याचे ठरतात.
{{gap}}चूलिका (पि ४/५२) [ २७ ल । १ ग ॥ २९ ल । १ ग ] ही द्विपदी आहे. पहिल्या चरणांत सत्तावीस २७ लघू आणि मग अेक १ गुरु अशीं अक्षरें असतात; दुसऱ्या चरणांत अेकोणतीस २९ लघू आणि मग १ गुरु अशीं अक्षरें असतात. चूलिकेची मोडणी जर पद्मावर्तनी असली तर सोळा लघु अक्षरांनन्तर यति येतोच. पण हा यति साङ्गितलेला मात्र नाही. तेथेच चरण तोडून द्विपदीची चतुष्पदी केल्यास या प्रकारास विषम वृत्तांत ढकलितां येअील. पहिला नि तिसरा चरण हे मात्र सोळा सोळा लघु अक्षरांचे असल्याने अेकसारखे होतात. हीच स्थिति शिखा (के २/३९), आणि खञ्जा (के २/४०) या दोन प्रकारांची आहे. शिखा [ २८ ल । १ ग ॥ ३० ल । १ ग ] या प्रकाराचा व्यत्यय म्हणजे खञ्जा [ ३० ल । १ ग ॥ २८ ल । १ ग ] हा प्रकार होय. परन्तु पिङ्गल, स्वयम्भू आणि हेमचन्द्र यांच्या मतें शिखा आणि खञ्जा हे प्रकार पादचतुष्टयघटित आहेत. प्राकृत पैङ्गलाच्या मतें शिखाच्या १ ल्या चरणांत पञ्चवीस २५ लघू असून मग (_ ‿) हा गण असतो; आणि दुसऱ्या<noinclude></noinclude>
qptgp18zr27skjp1zk58ai7hxrz4u2d
पान:छन्दोरचना.djvu/120
104
5836
237814
15623
2026-10-10T12:45:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237814
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''९३'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>चरणांत अेकोणतीस २९ लघू असून मग (_ ‿) हा गण असतो. खञ्जामध्ये दोन्ही चरणांत छत्तीस ३६ लघू असून मग रगण असतो. (प्रापै १/१६१,१५८).
{{gap}}चूलिकेचा जो दुसरा प्रकार हलायुध साङ्गतो त्यालाच केदारभट्ट '''अतिरुचिरा''' (के २/४२) म्हणतो. या प्रकारांत [ २७ ल । १ ग ] दोन्ही चरण सारखे असून ते सत्तावीस लघु आणि अेक गुरु मिळून झालेले असतात. सोळा लघूनन्तर चरण तोडून या द्विपदीची जर चतुष्पदी केली तर तें अर्धसम वृत्त होअील.
{{gap}}ज्या पद्यांत विषम वा ओज वा अयुक् म्हणजे पहिला नि तिसरा हे चरण सारखे असतात; आणि सम वा अनोज वा युक् म्हणजे दुसरा नि चौथा हे चरण सारखे असतात तें '''अर्धसम वृत्त''' होय. समवृत्तांच्या सङ्ख्येच्या मानाने अर्धसम वृत्तें अगदीच अल्पसङ्ख्य आहेत.
{{gap}}अर्धसम वृत्ताचा आणखी अेक प्रकार आढळतो; पण त्या प्रकाराचें पृथक् विवेचन कोणी केलेलें नाही. या प्रकारांत चतुष्पदीचे पहिले दोन चरण सारखे अेका लगावलीचे असतात; आणि शेवटील दोन चरण सारखे, पण भिन्न लगावलीचे असतात. या प्रकारच्या मिश्रणाचे स्फुट श्लोक आढळतात, ते पुढे वृत्तविहारांत दिले आहेत. परन्तु अेकासारखे अनेक श्लोक आढळल्याविना त्या प्रकाराला पृथक् स्थान प्राप्त होअू शकत नाही. अचलधृति आणि विद्युन्माला यांच्या अशा मिश्रणाने होणाऱ्या प्रकारांचा (पि ४/५०-५१, मागे पृष्ठ २३ पहा) पिङ्गल अल्लेख करितो; परन्तु हलायुधाने दिलेल्या अुदाहरणाव्यक्तिरिक्त अितरत्र तशी रचना संस्कृतांत मला आढळली नाही. मराठींत मात्र मोरोपन्ताने आपलें सौम्य रामायण (मोसग्र ८/१३८) हें सौम्या नामक अर्धसम वृत्तांत रचिलें आहे. चतुष्पदीचा पूर्वार्ध विद्युन्माला आणि अुत्तरार्ध अचलधृति असल्यास त्या अर्धसम वृत्ताला '''सौम्या''' (पि ४/५१) वा '''अनङ्गक्रीडा''' (के २/४१) म्हणतात.
{{gap}}चारी चरण अेकसारखे असले म्हणजे त्या वृत्ताला '''समवृत्त''' म्हणतात.
{{gap}}समवृत्तांचें वर्गीकरण चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे करण्याचा आम्नाय आहे. अेका चरणांत जितकीं अक्षरें असतात तितक्या अक्षरांचें तें वृत्त मानण्यांत येतें.<noinclude></noinclude>
3mvzty5zeudwu5vmib5rachov7c6tmb
अनुक्रमणिका:आमची युरोपची यात्रा.pdf
106
104088
237815
237507
2026-10-11T10:50:27Z
कल्पनाशक्ती
3813
237815
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=आमची युरोपची यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 6="प्रस्तावना" 7="अनुक्रमणिका" 8="चित्रांची अनुक्रमणिका" 10="यात्रेत यात्रा" 16 ="फ्रान्सची राजधानी पॅरिस" 60 ="स्वित्झरलंडांतील जिनीव्हा शहर"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
737485n2ilkz9du3g3plht74wjua9p6
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/५४
104
112465
237808
237803
2026-10-10T12:03:25Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237808
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>प्रमाण निश्चित वाढले आहे. प्रसार माध्यमांनीही वैज्ञानिक सत्य लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही गर्भजल परीक्षेसारख्या नव्या शोधांचा उपयोग केवळ स्त्रीगर्भाची हत्या करण्यासाठीच केला जात आहे. वस्तुतः हा कायद्याने गुन्हा असूनही समाजातले सर्व घटक त्यात सहभागी आहेत. परिणामत: स्त्री-पुरुषांची समाजातली संख्या झपाट्याने विषम होत आहे. एक हजार मुले जन्माला आले तर मुलींचे प्रमाण फक्त ९३३ असल्याची ताजी आकडेवारी आहे. म्हणजे दिवसेंदिवस स्त्रियांची संख्या कमी होत जाणार शिवाय हुंडाबळी, बालमृत्यू, मुलींची अधिक हेळसांड झाल्याने होणारे मृत्यू, बाळंतपणात तरुण स्त्रियांचे होणारे मृत्यू यामुळे स्त्रियांची संख्या आणखीनच उणावते आहे.

{{gap}}म. फुले, आगरकर, धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी अशा स्त्रियांविषयी पुरोगामी विचार आचार असलेल्या लोकोत्तर महामानवांच्या महाराष्ट्रात स्त्रियांविषयी इतकी तुच्छता असावी हा या सुधारकांच्या भूमीचा करंटेपणा म्हणायचा!

{{gap}}स्त्रियांच्या बाबतीत विषमतेची वागणूक ही या देशाला नवी नाही; पण कालमानानुसार हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढते आहे ही चिंतेची बाब आहे.
{{gap}} पण तरीही आशेला जागा आहे.

{{gap}}'बाईची जात हरळीसारखी चिवट आणि जिवट असते.' अशी जुनी लोकोक्ती आहे. ती भारतातल्या ग्रामीण स्त्रीच्या बाबतीत अनुभवाला येते आहे. बदलत्या वातावरणाचे भान तिलाही आले आहे. ग्रामीण भागात झालेल्या शिक्षणसंस्थांमुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे. वाचन, प्रसिद्धीमाध्यमे यातून तिच्या विचारांची कवाडे मोकळी होत आहेत. ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची आणि मुलींची संख्याही लक्षणीयरित्या वाढते आहे. शिक्षकी पेशात नगरपालिकांच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळातून ग्रामीण स्त्रियांची संख्या डोळ्यांत भरेल अशी आहे. एखाद दुसरी प्राध्यापक पेशाही स्वीकारते आहे. संगणक शिक्षणाकडे मुलींचा ओढा वाढतो आहे. पालकांची प्रतिकूल परिस्थिती असेल तर लहानमोठे कामे (शिकवण्या, शिवणकाम, अर्धवेळ नोक-या) करीत जिद्दीने शिक्षण पूर्ण करून अर्थार्जन करण्याची उमेद वाढते आहे.
{{gap}}सरकारी धोरणांमुळे ग्रामपंचायतीत स्त्रियांसाठी राखीव जागा आल्यानंतर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या पुरुषप्रधान मानसिकतेला प्रथम थोडे कठीण गेले तरी उपजत जिद्द असलेल्या अनेकींनी घरात आणि बाहेर संघर्ष करीत आपली पात्रता सिद्ध केली आहे. अनेक सत्ताकांक्षी पुरुष बायकांच्या नथीतून तीर मारीत बायकोच्या पदाचा कारभार आपल्याच हाती घेत आहेत. काही जण आपल्याच घरातल्या<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ५३}}</noinclude>
sf0drmtf4hrj14wz1p19k94adk9f6fj
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/५५
104
112466
237809
237804
2026-10-10T12:08:26Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237809
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>बायकांना स्थानापन्न करण्याची 'राजकारणे' करीत आहेत. अनेक सरपंच स्त्रियांवर अविश्वासाचे ठराव आणून त्यांना पदच्युत केले जात आहे. स्त्री वरचढ होणे अजून पुरुषप्रधान व्यवस्थेला सहन होत नाही. ती एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता देणे जड जात आहे, अशी सगळी प्रतिकूलतेची काटेरी वाट तुडवीत अनेकजणी जिद्दीने कर्तृत्व गाजवीत आहेत. जिथे त्यांना गावकऱ्यांचा, सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळतो तिथे पुरुष सहकाऱ्यांपेक्षाही त्या सरस कामे करीत आहेत. विशेषतः गावाचे पाण्याचे प्रश्न, स्वच्छतागृहाचे प्रश्न अग्रक्रमाने हाती घेत आहेत. म्हणून त्यांचा पाठिंबाही वाढत आहे.

{{gap}}नुकत्याच सुरू झालेल्या ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कारविजेत्या गावातील स्त्रियांचा वाटा सर्वाधिक आहे. याचा पुन्हा पुन्हा उल्लेख केला जात आहे. स्त्रियांना एखादी गोष्ट मनापासून पटली की त्या जिद्दीने तिचा पिच्छा पुरवतात. ग्रामस्वच्छतेमुळे पाणीप्रश्न, रोगराई दूर होणे, पर्यावरण रक्षण अशा चिरस्थायी वृत्तींची रुजवण ग्रामीण भागात होत आहे. महात्मा गांधींनी खेडे हे केंद्र मानून विकासाची जी कल्पना मांडली होती ती स्त्रियांच्या पुढाकारानेच यशस्वी होऊ शकेल अशी प्रसादचिन्हे दिसत आहेत.

{{gap}}स्त्रियांना थोडे अनुकूल वातावरण मिळाले, थोडे आर्थिक सहकार्य मिळाले, योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागात शेतीशी संबंधित असे अनेक व्यवसाय समर्थपणे करून त्या आपल्या कुटुंबाची पर्यायाने अभावग्रस्त ग्रामजीवनाची नव्याने पुनर्उभारणी करू शकतात असेही अनुभव वारंवार येत आहेत. स्त्रियांना प्रपंच चालविण्याचा पिढ्यान् पिढ्यांचा अनुभव असल्याने जीवनातल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यास त्या प्रामाणिकपणे झटतात असा अनुभव येतो. समाजाने आपली जुनी पुरुषकेंद्री पुरुषसत्ताक मानसिकता बदलण्याची मात्र गरज आहे.
{{gap}}ग्रामीण स्त्रियांना भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे कुटुंबातील पुरुषांची वाढती व्यसनाधीनता! विशेषत: दारू! पौरुषाचे अत्यंत सोपे आणि पलायनवादी साधन म्हणजे दारू. अशा पुरुषी वृत्तीचा सर्वाधिक त्रास निरनिराळ्या नात्यांनी स्त्रियांना होतो. पुरुषवर्गाचा आळशीपणा, स्त्रियांनी कष्टाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर व्यसनात बुडणे, स्त्रियांनाच मारहाण करणे, छळ करणे ही सार्वत्रिक बाब दिसते. त्यामुळे गावातून दारू हद्दपार करण्यासाठी स्त्रियांनाच संघटितपणे चळवळी कराव्या लागतात. जेथे त्या करतात तेथे त्यांना यशही येते. मात्र गुत्तेवाले, पोलीस आणि सरकारी कायदे यांचा फार मोठा अडथळा येतो. पुरुषांची व्यसने ही स्त्रियांची समस्या बनणे ही पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या रोगट<noinclude>{{right|महाराष्ट्रातील ग्रामीण स्त्रीची वाटचाल! / ५४}}</noinclude>
pmf9fpy3ne19cj14yj0iyxvyz052u4b
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/५६
104
112467
237810
2026-10-10T12:09:03Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ अहंकारी मानसिकतेची परिसीमा आहे. त्याची खरे तर शरम वाटली पाहिजे; पण अनेकदा आंदोलनकर्त्या स्त्रियांनाच पोलिसांच्या रोषाचा प्रसाद मिळतो आणि तरीही जागोजागी बायका दारूविर..."
237810
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
अहंकारी मानसिकतेची परिसीमा आहे. त्याची खरे तर शरम वाटली पाहिजे; पण अनेकदा आंदोलनकर्त्या स्त्रियांनाच पोलिसांच्या रोषाचा प्रसाद मिळतो आणि तरीही जागोजागी बायका दारूविरोधी आंदोलने छेडत आहेत.
व्यसनाधीन होणे हे खरे तर जीवनातल्या खऱ्या समस्येपासून दूर जाणाऱ्या भ्याड, दुबळ्या आणि पलायनवादी मानसिकतेचे लक्षण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होणारा पुरुषसमाज या दुबळेपणाचा बळी आहे आणि अशा दुबळ्या मानसिकतेच्या समाजाने स्त्रियांना 'अबला' म्हणावे हा सर्वात भीषण विनोद आहे. जन्मापासूनच ग्रामीण स्त्रीवर्ग नकाराला आणि अन्यायाला सामोरा जात असतो. कष्ट तर अपरंपार असतात. या वेदनेतून सुटण्यासाठी त्या नाही कोणत्या नशेच्या आहारी जात ? त्या उलट मूळ समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात.
स्त्रीला केवळ शाब्दिक गौरवाचे आणि 'देवी'त्वाचे मोहजाल आता मोहवू शकत नाही. ग्रामीण स्त्रीही अनेक अंगांनी जागी होते आहे. तिच्या मार्गातले अडथळे खूप मोठे आहेत; पण ते दूर करण्याची तिची जिद्द त्याहीपेक्षा मोठी आहे.
आम्हाला खरोखर ग्रामकेंद्री विकासाचे स्वप्न सत्यात आणायचे असेल, तर या सुकलेल्या हरळीला अनुकूल वातावरणाचे खत-पाणी द्यायला हवे. तिला मोकळ्या मनाने कुटुंबाने, समाजाने, सरकारने आणि मुख्य म्हणजे तिच्या आसपास अनेक नात्यांनी वावरणाऱ्या पुरुषवर्गाने साथ द्यायला हवी. त्यात त्याचे आणि त्याच्या भावी पिढ्यांचेही कल्याण आहे. "एक स्त्री शहाणी झाली की कुटुंबाला शहाणी करते." असे म्हणणाऱ्या म. ज्योतिबा फुलेंची वाणी सत्य ठरण्याचा अनुभव पदोपदी येतच असतो.
निरगाठ सुरगाठ / ५५<noinclude></noinclude>
th2epgpdrlzzsxewl15aunuc2wd1j5x
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५३
104
112468
237816
2026-10-11T10:57:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237816
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४०'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>कुंज तयार केलेलें होतें. याच्या नांवाचा अर्थ कामविहार असा होतो असें मला सांगण्यांत आलें. सायंकाळपर्यंत फिरतां आलें तितकें या बागेंत आम्ही फिरलों व बागेतील नानाविध वृक्षलता, फुलझाडें व ठायीं ठायीं ठेवलेले पुतळे पहात पहात आम्ही परतलों व मग ट्रेननें बिऱ्हाडीं आलों.
{{gap}}पॅरिसच्या आसपासचें मीं पाहिलेलें दुसरें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे '''सेंट जरमेन''' येथील '''शातो''' (भुईकोट किल्ला) व प्रख्यात सेंट जरमेन अरण्याचा प्रारंभ हे होय. आम्हीं '''सेंट लाझार''' (पश्चिम रेल्वे कंपनीचें स्टेशन) स्टेशनहून रेलवेनें सेंट जरमेन स्टेशनला गेलो. लाझार सेननदीच्या उत्तरेस असून तेथून सेंट जरमेन स्टेशन १३ मैल आहे. पण सेननदीचीं दोन नागमोडी वळणें या बारा मैलांत आल्यामुळे सेननदीचे तीन पूल ओलांडावे लागतात. तिसरा पूल ओलांडला कीं लगेच एक लहानसा बोगदा लागतो व मग सेंट जरमेन स्टेशन येते. स्टेशनजवळच सेंट जरमेन शातो आहे. ज्याप्रमाणें लंडन टॉवरच्या खंदकामध्यें आतां बाग केली आहे, त्याप्रमाणे या किल्ल्याच्या सभोंवार पूर्वकाळीं असलेल्या खंदकाच्या खोलगट जागेंत सुंदर बाग केली आहे.
{{gap}}हा किल्ला पांढऱ्या तांबूस दगडाचा बांधला असून कांहींसा आग्र्याच्या किल्ल्यासारखा दिसतो. पूर्वीचे फ्रेंच राजे येथे रहात असत. चवदाव्या लुईचा जन्म या किल्यांतच झाला. पण चवदाव्या लुईनें व्हरसायचा राजवाडा बांधल्यापासून हा राहता राजवाडा राहिला नाहीं. इंग्लंडचा राजा दुसरा जेम्स पदच्युत झाल्यावर या वाड्यांत येऊन राहिला व त्याचा मृत्युहि येथेंच झाला. हल्लीं हा किल्ला जुन्या वस्तूंचे संग्रहालय म्हणून सार्वजनिक स्थान करण्यांत आलेलें आहे. राजवाड्यासमोर लहानशी बाग आहे. पण सेंट जरमेन येथील अत्यंत आल्हाददायक स्थळ म्हणजे सेंट जरमेन येथला, दीड मैल लांबीचा, नदीपासून १०० फुटांच्या वर उंच व सपाट असा किनारा (किंवा टेरेस) होय यांत शंका नाहीं. मुंबईच्या फेरोजशहा मेथा बागेच्या<noinclude></noinclude>
4lm34fkoc1ig34hy2moqx6giax4hz4y
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५४
104
112469
237817
2026-10-11T11:02:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237817
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''फ्रान्सची राजधानी पॅरिस'''|'''४१'''}}</noinclude>पश्चिम बाजूस जशी खालच्या पाण्याच्या सांठ्याची भिंत आहे व वर कठडा व बाग केली आहे तसा हा टेरेस आहे. पण हा टेरेस दीड मैलाच्या वर लांबच लांब असून स्वाभाविक उंचवट्यानें झाला आहे. या टेरेसवरून दिसणारा देखावा अवर्णनीय आहे. तो लांबच लांब -सपाट सरळ टेरेस, त्याचे खालीं खोलच खोल भूमिभाग व सेननदीचें वांकण व त्यावरील उंच व सुंदर कमानीचा पूल व पलीकडे धनुष्याकार सेननदी, तिच्या दोन्ही तीरांवरील तें शहर व दूरवर दिसणारी ती '''मोंत मार्त्र''' टेंकडी व त्यावरील प्रार्थनामंदिर, शहरांतील प्रार्थना मंदिरांचे व सार्वजनिक इमारतींचे उंच मनोरे व घुमट, मध्यें मध्यें दृग्गोचर होणाऱ्या शहराच्या बागा वगैरे नानाविध प्रेक्षणीय गोष्टींचा एकसमयावच्छेदे करून देखावा या टेरेसवरून दिसतो व त्या देखाव्याकडे पहात पहात टेरेसच्या सरळ व सुंदर रस्त्यानें चालतांना आपण कविकल्पनानिर्मित नंदनवनांतून चाललों आहोंत कीं काय, असा प्रवाशास भास होतो. हा टेरेस, सेंट जरमेन नांवाचें ११०२२ एकरांचें प्रचंड, घनदाट, उंच उंच, नानाविध वृक्षांनी गजबजलेलें जे प्रख्यात अरण्य आहे त्याचें प्रवेशद्वारच होय. या अरण्यांत सर्वत्र प्रशस्त रस्ते केलेले आहेत. पायगाडीनें या अरण्यांत हिंडण्याची मोठी मौज आहे असें आम्हांस सांगण्यांत आलें. या ठिकाणाहून आम्हीं परत ट्रॅमनें म्हणजे नदीचें दक्षिणतीरानें आलों. '''नेपोलियन बोनापार्टचें''' कांहीं काळचें व राणी '''जोसेफाईन''' हिचे शेवटचें वसतिस्थान '''मालमेसन''' हें या वाटेवरच आहे तेहि आम्हीं पाहिलें. नेपोलियन व जोसेफाईन यांच्या किती तरी स्मारकवस्तू या छोट्या राजवाड्यांत आहेत. या राजवाड्याची बाग बरीच मोठी असून तिचा विशेष म्हणजे त्यांत गुलाबाच्या ५०० जाती आहेत! बागेची रचना फार रमणीय आहे.
{{gap}}पॅरिसच्या आसपासचें मीं पाहिलेले शेवटचें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे '''कँपीएन''' अरण्य- महायुद्धाच्या तहकुबीच्या तहनाम्याचें स्थान- होय. आम्ही '''पॅरिस नार्डला''' (उत्तर रेलवेचें स्टेशन) टॅक्सीनें गेलों व तेथन<noinclude></noinclude>
hajnpbcnxhu3n3qlcyj9geabdsezggr
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५५
104
112470
237818
2026-10-11T11:08:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237818
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४२ '''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>रेलवेनें कँपीएन स्टेशनला गेलों. तें पॅरीसनॉर्डपासून सुमारें पन्नास मैल आहे. सुमारें दीडतास पोहोंचावयास लागला. स्टेशनच्या जवळूनच तीस हजार एकरांचें दाट अरण्य लागतें. आम्ही सुमारें सहासात किलोमीटर्स (साडेचार पांच मैल) चालत गेलों. हा रस्ता अगदीं सरळ आहे. दोन्ही बाजूस दाट व उंच असें अरण्य सारखे लागलेलें आहे. त्यांतील पुष्कळ वृक्ष सदापानी आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस पायवाट अगदीं साधी व बिनबांधलेली आहे. तिचे पलीकडे फर्न, सरपटणाऱ्या वेली व जमिनीसरशीं वाढणारीं झुडपें यांनी सर्व भूमिभाग भरून गेला होता. मध्यें तो पांढऱ्या वाळूचा सपाट सरळ रस्ता, दोन्ही अंगांस हिरवीगार जमीन व उंच उंच गर्दछाया वृक्ष असा हा अद्वितीय देखावा सारखा मैलच्या मैल पसरलेला दिसत होता. सिनेमामध्यें मोटारी धांवतांना ज्या प्रकारचा अरण्याचा देखावा दाखविण्यांत येतो, त्या कृत्रिम देखाव्याच्या मूळ स्थानांतून जणूं कांहीं आम्ही चालत आहों कीं काय असें क्षणोक्षणी वाटत होतें. सुमारें दोन पावणेदोन तास सारखे चालल्यावर आम्हीं ज्या ठिकाणीं महायुद्धाच्या तहकुबीच्या तहनाम्यावर युध्यमान राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी ११ नवंबर सन १९१८ या दिवशीं सह्या केल्या त्या ठिकाण येऊन पोहोंचलों. प्रारंभींच येथें तांबड्या दगडाच्या उभ्या शिळेवर तहनाम्याचें मूर्तिमंत स्मारक दृष्टीस पडतें. जर्मन राष्ट्राचा सांकेतिक पक्षी गरुड हा पाय वर आकाशाकडे व चोंच जमिनीवर खालीं असा रक्तबंबाळ झालेला काढलेला आहे. जर्मन राष्ट्राचा सहकारी राष्ट्रांनी पूर्ण पराजय केला आहे असे दर्शविणारा हा देखावा आहे. हा देखावा दुःखदायक आहे यांत शंका नाहीं. एवढें बलाढ्य जर्मन राष्ट्र, पण शेवटीं त्याची त्या गरुडासारखी दशा झाली हें पाहिलें म्हणजे वाईट वाटल्याखेरीज रहात नाहीं. हे स्मारक ११ नवंबर सन १९२२ या सालीं उभारण्यांत आलें आहे. याचेपुढे गेलें कीं उत्तरेच्या बाजूस जर्मन लष्करापुरत्या केलेल्या रेलवे रस्त्याचा भाग (लढाईचे काळीं जेथपर्यंत जर्मन लोक रेलवे टाकून चाल करून आले तो भाग) जशाचा तसा ठेवला<noinclude></noinclude>
tmqn1y10pcpbc7bvliix4yig02s91ap
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५६
104
112471
237819
2026-10-11T11:16:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237819
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''फ्रान्सची राजधानी पॅरिस'''|'''४३'''}}</noinclude>आहे. दक्षिणेकडे फ्रेंच रेलवे रस्त्याचा भाग ठेवला आहे. या दोन समांतर आलेल्या रेलवे रस्त्याचे मध्यें भला मोठा तांबूस दगडाचा स्मारक प्लॅटफॉर्म नवा तयार केला आहे व त्याच्यावर मोठमोठ्या अक्षरांनी महायुद्धाच्या व त्याच्या तहकुबीच्या तारखा खोदल्या आहेत. ज्या ठिकाणीं दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी (एकंदर दहाजण) बसले त्या ठिकाणीं लहानशी इमारत बांधण्यांत आली आहे व त्या इमारतींत ज्या रेलवेच्या डब्यांत समोरासमोर बसून दहा प्रतिनिधींनीं तहकुबीच्या तहनाम्यावर प्रत्यक्ष सह्या केल्या तो सबंध डबा स्मारक म्हणून ठेवला आहे. याप्रमाणें हें ठिकाण म्हणजे महायुद्धाचें जिवंत स्मारक झालें आहे व एखाद्या यात्रेच्या ठिकाणाप्रमाणें फ्रेंच लोक व जगांतील इतर प्रवाशी हे ठिकाण पहाण्यास नेहमीं येत असतात! इतकें या निर्जन अरण्याला ऐतिहासिक महत्त्व आलेलें आहे. हें सर्व पाहून आम्ही तेथन परत चालत आलों व कँपीएन गांवांतला जुना शातो पाहिला. सेंट जरमेन शातो इतका तो प्रेक्षणीय वाटला नाहीं. पण या वाड्यांत जुने जुने भिंतीवर टांगावयाचे गालीचे (टॅपेस्ट्री) व मृगयेचीं दर्शक अशीं सुंदर चित्रे पुष्कळच आहेत; तसेंच येथें घोड्यांच्या गाड्यांची आजतागाईत उत्क्रांति कशी झाली व हल्लीं निरनिराळया गाड्यांचे प्रकार किती आहेत हे दर्शविणारे नमुने ठेविलेले आहेत. अर्थात् हें सर्व पाहून होईपर्यंत सायंकाळ झाली व मग आम्ही आगगाडीने परत बिऱ्हाडीं आलों.
{{gap}}पॅरिस शहर काय किंवा त्याच्या आसपासचा प्रदेश काय यांमध्ये इतक्या प्रेक्षणीय गोष्टी आहेत कीं प्रवाशानें महिना दोन महिने या ठिकाणीं घालविले तरी त्याला नव्या नव्या गोष्टी दररोज पहातां येतील. पण पॅरिसमध्यें येतांजातांचा दिवस धरून मी एक दशवडा (दहा दिवस) च राहिलों. त्या दहा दिवसांत न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत मीं सामान्य दृश्यदर्शनांतच वेळ घालविला व दहा दिवसांत घडलेल्या दृश्यदर्शनाचें यथामति आतांपर्यंत वर्णन केलें. मला पॅरिस शहर लंडनप्रमाणें बरेंच विस्तरतः पहातां आलें याचें कारण प्रो. दिवेकर हे पॅरिसमध्यें आधीं<noinclude></noinclude>
batosial2msloooi5rveoi47s5foi8o
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५७
104
112472
237820
2026-10-11T11:20:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237820
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४४'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>दोन वर्षे राहिलेले होते व माझ्या पॅरिसच्या निवासाचे काळांत ते बहुतेक मोकळे असल्यामुळे त्यांना माझ्याबरोबर बहुतेक ठिकाणी येतां आलें व फ्रेंच भाषेच्या माझ्या अज्ञानाची मला मुळींच अडचण वाटली नाहीं. पण युरोपांत प्रवास करण्याचा असला तर इंग्रजीबरोबर थोडेफार फ्रेंच भाषेचें ज्ञान आवश्यक आहे यांत शंका नाहीं. कारण या अज्ञानामुळे प्रवाशाला लोकांशी बोलण्याची पंचाईत पडते व लोकस्थितीचें खरें ज्ञान होण्यास मोठी अडचण पडते. पण प्रो. दिवेकरांच्या सान्निध्याने मला पॅरिसमध्यें तरी फारशी नड भासली नाहीं हें खास व म्हणून प्रो. दिवेकर पॅरिसमध्यें असतांना मला पॅरिसला जातां आलें हा एक चांगला योगायोग घडला असें मला वाटलें. आतां त्यांच्यामुळे ज्या एका फ्रेंच सुशिक्षित बाईशीं माझा थोडा सहवास घडला त्याची थोडीशी हकीकत देऊन हें पॅरिसपुराण मी पुरें करतों.
{{gap}}प्रो. दिवेकर हे मॅडम मोरे या फ्रेंच बाईला संस्कृत शिकवीत असल्यामुळे ती त्यांना शिष्यिणीसारखी होती. प्रो. दिवेकरांनीं माझी तिच्याशी ओळख करून दिली होती. या बाईचा नवरा महायुद्धांत कामास आला होता; तिला दहाबारा वर्षांचा एक मुलगा होता. या बाईची सामान्य स्थिति सुखवस्तु होती. महायुद्धानंतर तिला हिंदुस्थानाबद्दल आस्था वाटूं लागली. तिला हिंदी तत्त्वज्ञानाबद्दल औत्सुक्य वाटून तिनें संस्कृतचा अभ्यास सुरू केला होता. या बाईला इंग्रजीहि चांगलें येत असे. तिला हिंदी लोकांच्या राजकीय चळवळीबद्दल सहानुभूति वाटत असे. महात्मा गांधींबद्दल तिचें फार अनुकूल मत असून गांधींच्या असहकारितेच्या त्यावेळीं सुरू होणाऱ्या चळवळीबद्दल साश्चर्य कौतुक वाटत असे. ता. १० एप्रिल सन १९३० हा दिवस माझ्या पॅरिसच्या निवासाचा शेवटचा दिवस होता. म्हणून मॅडम मोरे या बाईंनीं प्रो. दिवेकर, कुमारी केतकर, श्रीमती कमलाबाई देशपांडे, मी व एक मद्रासी हिंदी गृहस्थ अशा सर्वांना रात्रीच्या भोजनास आपल्या घरीं बोलाविलें होतें. बाईंनी त्या दिवशीं शाकाहारी व<noinclude></noinclude>
3cid6st0g3ko425bup46m0wq96aat10
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५८
104
112473
237821
2026-10-11T11:25:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237821
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''फ्रान्सची राजधानी पॅरिस'''|'''४५'''}}</noinclude>हिंदी चालीचें जेवण स्वतः तयार केलें होतें. तिचेकडे नोकर चाकर कोणी नव्हते. तेव्हां बाईनें व मुलानें सर्व ताटें वाढून आणून ठेवली व केलेल्या जिनसांचीं भांडींहि मेजावर आणून ठेविलीं व मग आम्हीं सर्व एकदम भोजनास बसलों व बोलत बोलत सावकाश भोजन झालें. पुष्कळ विषयांवर संभाषण निघालें त्यांत फ्रेंच लोकांची फॅशनप्रियता व विलासप्रियता यासंबंधानें बोलणें निघालें. तेव्हां ती बाई म्हणाली, "आम्हां फ्रेंच लोकांच्या राहणीची बरोबर कल्पना पॅरिसच्या राहणीवरून करणें योग्य नाहीं. पॅरिस हे शहर खरें फ्रेंच राहिलें नाहीं. त्या ठिकाणीं जगांतील हौशी व विलासी लोक जमतात. विशेषतः श्रीमंत अमेरिकन व इंग्रज या लोकांनीं पॅरिसच्या फ्रेंच लोकांना बिघडविलें आहे. फ्रेंच लोकांची खरी रहाणी व त्यांची वागणूक ही खेड्या-पाड्यांत पाहण्यास सांपडते व आमचे तेथील फ्रेंच लोक साध्या रहाणीचे, काटकसरी व मितव्यवहारी लोक आहेत. तुम्हांला वेळ असता तर दक्षिण फ्रान्समध्यें माझे वडील शेतकरी आहेत त्यांच्या गांवाला मी तुम्हांस पाठविलें असतें. माझे वडील मोठे शेतकरी असून त्यांची कुळें फार चांगलीं आहेत. त्यांच्या मनोनिग्रहाची गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. त्यांना पूर्ववयांत दारूचा व तंबाखू ओढण्याचा नाद होता; पण हा नाद वाईट असें ते आपल्या कुळांना सांगत. एकदां एका तरुण शेतकऱ्यानें तुम्ही स्वतः दारू पिऊन व तंबाखू ओढून हा नाद वाईट म्हणतां यांत काय अर्थ आहे? असा रोखठोक जबाब विचारला. तेव्हां माझ्या वडिलांनीं "मी आजपासून दोन्ही सोडून देतों, तुम्हीं देतां का सोडून?" म्हणून त्या तरुण शेतकऱ्याला पुसलें तोहि कबूल झाला. याप्रमाणें त्या दोघांनीं तीं दोन्ही व्यसनें अजिबात टाकलीं व आतां त्या सर्व गांवांत दारू व तंबाखू यांचा खप अजिबात नाहींसा झाला आहे." ही हकीकत ऐकून मॅडम मोरे यांच्या वडिलांच्या मनोनिग्रहाचें मला कौतुक वाटलें.{{nop}}<noinclude></noinclude>
nosct3w2qkjvid6hs9l28lk6rmcp4fj
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/५९
104
112474
237822
2026-10-11T11:27:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237822
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४६'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>{{gap}}जेवण संपल्यावर ताटें स्वयंपाक घरांत नेऊन ठेवण्यांत आली व आम्ही पुनः गप्पा मारीत बसलों. प्रो. दिवेकर यांनीं मॅडम मोरे यांस विचारलें, "आज तुम्हीं हिंदी पोषाख केला नाहीं?" मॅडम मोरे या उत्तरल्या "कांहीं हिंदी लोकांना आम्ही हिंदी पोषाख केलेला आवडत नाहीं. तुमच्या या प्रोफेसरना आवडत असेल तर मी पांच मिनिटांत हिंदी पोषाख करून येतें." मी म्हणालों "मला तुम्हांला हिंदी पोषाखांत पाहण्यानें आनंदच होईल." त्याबरोबर त्या बाई खरोखरीच आंत जाऊन थोडयाच वेळांत हिंदी साडी नेसून आल्या. परत आल्यावर त्या आपल्या इकडील सारस्वत जातीच्या गोऱ्या व सुंदर बाईसारख्या दिसूं लागल्या, हें पाहून मला साश्चर्य आनंद वाटला. शेवटीं बरीच रात्र झाली म्हणून आम्हीं जावयास निघालों तों मोरेबाईंनीं प्रो. दिवेकरांना आग्रह केला कीं आतां तुम्ही गीतेचा एक अध्याय वाचल्याखेरीज मी तुम्हांला येथून जाऊन देणार नाहीं. (त्या बाईंना गीतेबद्दल फार आदर असून त्या रोज बायबलप्रमाणें गीता वाचतात असें मला मागाहून कळलें) व लागलीच त्यांनीं गीतेचें पुस्तक प्रो. दिवेकरांच्या हातीं दिलेंच. मग प्रो. दिवेकरांनीं आपल्या खड्या सुरेल आवाजानें गीतेचा एक अध्याय वाचला. बराच उशीर झाला म्हणून मॅडम मोरे यांचे त्यांच्या पाहुणचाराबद्दल आभार मानून व त्यांना शिवरात्र करून आम्ही बिऱ्हाडीं आलों.{{nop}}<noinclude></noinclude>
kt6tb811q9e4b5vslbfegydjvm83vs4
237823
237822
2026-10-11T11:29:34Z
कल्पनाशक्ती
3813
237823
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४६'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>{{gap}}जेवण संपल्यावर ताटें स्वयंपाक घरांत नेऊन ठेवण्यांत आली व आम्ही पुनः गप्पा मारीत बसलों. प्रो. दिवेकर यांनीं मॅडम मोरे यांस विचारलें, "आज तुम्हीं हिंदी पोषाख केला नाहीं?" मॅडम मोरे या उत्तरल्या "कांहीं हिंदी लोकांना आम्ही हिंदी पोषाख केलेला आवडत नाहीं. तुमच्या या प्रोफेसरना आवडत असेल तर मी पांच मिनिटांत हिंदी पोषाख करून येतें." मी म्हणालों "मला तुम्हांला हिंदी पोषाखांत पाहण्यानें आनंदच होईल." त्याबरोबर त्या बाई खरोखरीच आंत जाऊन थोडयाच वेळांत हिंदी साडी नेसून आल्या. परत आल्यावर त्या आपल्या इकडील सारस्वत जातीच्या गोऱ्या व सुंदर बाईसारख्या दिसूं लागल्या, हें पाहून मला साश्चर्य आनंद वाटला. शेवटीं बरीच रात्र झाली म्हणून आम्हीं जावयास निघालों तों मोरेबाईंनीं प्रो. दिवेकरांना आग्रह केला कीं आतां तुम्ही गीतेचा एक अध्याय वाचल्याखेरीज मी तुम्हांला येथून जाऊन देणार नाहीं. (त्या बाईंना गीतेबद्दल फार आदर असून त्या रोज बायबलप्रमाणें गीता वाचतात असें मला मागाहून कळलें) व लागलीच त्यांनीं गीतेचें पुस्तक प्रो. दिवेकरांच्या हातीं दिलेंच. मग प्रो. दिवेकरांनीं आपल्या खड्या सुरेल आवाजानें गीतेचा एक अध्याय वाचला. बराच उशीर झाला म्हणून मॅडम मोरे यांचे त्यांच्या पाहुणचाराबद्दल आभार मानून व त्यांना शिवरात्र करून आम्ही बिऱ्हाडीं आलों.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
2gmhv8rwui839wmgbe7iwc76g7tdwdu
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/६०
104
112475
237824
2026-10-11T11:34:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237824
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''प्रकरण ३ रे'''}}}}
{{rule|5em}}
{{center|'''स्वित्झरलंडांतील जिनीव्हा शहर'''}}
{{center|{{bar|2}}●●●{{bar|2}}}}
{{gap}}{{x-larger|'''को'''}}'''ठे'''स्वित्झरलंड देश व कोठें काश्मीर प्रांत! एक युरोप खंडांत तर दुसरा आशिया खंडांत; एक शेहेचाळीस सत्तेचाळीस अक्षांशावर तर दुसरा पसतीस छत्तीस अक्षांशावर; एक प्रवासाच्या सुखसोयींनी संपन्न तर दुसरा कष्टतर प्रवासाकरितां प्रसिद्ध; एक लोकसत्तात्मक राज्यपद्धतीचा तर दुसरा राजसत्तात्मक राज्यपद्धतीचा. एक दाट वस्तीचा तर दुसरा विरळ वस्तीचा; एक सुधारणेच्या उच्च पदावर विराजमान झालेला तर दुसरा अन्तःकलहानें पोखरलेला. याप्रमाणें स्वित्झरलंड व काश्मीर यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे! तरी पण सृष्टिसौंदर्याच्या बाबतींत त्यांमध्यें विलक्षण साम्य आहे! दोन्ही हिमधवल पर्वतराजींनीं वेष्टिलेले असून सदापानी व हिरव्यागार वनराजीनें नटलेले असल्यामुळे रुपेरी कोंदणांत बसविलेल्या अष्टपैलू पाचूच्या खड्याप्रमाणें हे देश फार शोभिवंत दिसतात; तसेंच लहानमोठ्या नद्यांनीं बनलेल्या सुंदर सुंदर सरोवरांनीं संपन्न असे हे देश असल्यामुळे उत्तम हवापाण्याकरितां ते प्रसिद्ध आहेत. येथलें एकंदर सृष्टिसौंदर्य इतकें नयनमनोहर आहे कीं, या दोन देशांना पृथ्वीवरील नंदनवन असें अन्वर्थक नांव मिळालेलें आहे. मात्र नामनिर्देश करतांना काश्मीरला हिंदुस्थानचें नंदनवन, तर स्वित्झरलंडला युरोपचें नंदनवन म्हणण्याचा प्रघात पडला आहे. या दुसऱ्या नंदनवनाचें सविस्तर वर्णन करण्यास स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल. पण मीं जो कांहीं थोडासा भाग पाहिला त्याचें वर्णन या व पुढील एक दोन प्रकरणांत करण्याचा बेत आहे.
{{gap}}स्वित्झरलंड हा युरोपांतील एक छोटा स्वतंत्र देश आहे. याचे क्षेत्रफळ अवघें १६००० चौरस मैल असून त्याचा आकार वांकड्या<noinclude></noinclude>
nr2572chwrcgsxv2oz59m87x4i844g4
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/६१
104
112476
237825
2026-10-11T11:40:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237825
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४८'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>तिकड्या लांबट चौकोनासारखा आहे. या देशांतील एकंदर भूमीचा उंचसखलपणा विलक्षण आहे; जवळ जवळ समुद्रसपाटीच्या पातळीवर असलेल्या सखल दऱ्यांपासून तो पंधरासोळा हजार फूट उंच पर्वत शिखरांवरील पठारापर्यंत उंचसखल स्थळे या देशांत आहेत. स्वित्झरलंडचा निम्नोन्नतिदर्शक नकाशा पाहिला म्हणजे या देशाची विलक्षण भौगोलिक घडण चटकन लक्षांत येऊन अतोनात आश्चर्य वाटतें. स्वित्झरलंड देश हा इटलीच्या वायव्येस असून त्या दोन देशांमध्यें हिमधवल आल्प्स पर्वतांची प्रचंड रांग आहे असें दिसून येतें. शिवाय खुद्द स्वित्झरलंड प्रांताच्या मधोमध त्याच पर्वताच्या उपरांगा पसरलेल्या असून त्यांच्यामध्यें उंचउंच हिमयुक्त शिखरें जणं कांहीं आकाश भेदीत आहेत असें वाटतें. पण स्वित्झरलंड देशाचा उत्तरभाग उत्तरेकडेस उतरता झाला आहे. म्हणून स्वित्झरलंडमधील बहुतेक नद्या उत्तर- वाहिन्या आहेत. सर्वात मोठी नदी '''ऱ्हाइन''' ही स्वित्झरलंडच्या दक्षिणेस असलेल्या '''आल्प्स''' पर्वताच्या मुख्य रांगेत उगम पावून या प्रांताच्या पूर्वभागाकडे प्रथम वहात जाऊन मग पश्चिमेकडे वळते. म्हणजे स्वित्झरलंडच्या तीन बाजूंना वळसा घालून ती थेट उत्तर वाहिनी होऊन उत्तर समुद्राला मिळते. दुसरी मोठी नदी '''ऱ्होन''' ही आल्प्सच्या
रांगेत व ऱ्हाइन नदीच्या नजीकच पण उलट पाणलोटामध्ये उगम पावून स्वित्झरलंडच्या दक्षिण भागांतून पश्चिमभागाकडे वहात जाते व स्वित्झरलंड सोडल्यावर थेट दक्षिणवाहिनी होऊन मध्यसमुद्राला जाऊन मिळते. दुसऱ्या दोन लहान नद्या '''आर''' व '''रुस''' या स्वित्झरलंड देशाच्या मधोमध असलेल्या आल्प्स पर्वताच्या रांगांमधून निघून उत्तरेकडे वहात जाऊन शेवटी ऱ्हाईन या मोठ्या नदीस मिळतात. या नद्यांना विपुल पाणी पुरविण्याचे काम स्वित्झरलंडमधील हिमनद (Glaciers) करतात व या नद्यांमुळे स्वित्झरलंडमध्यें लहानमोठीं कितीतरी सरोवरें बनलीं आहेत. यामधली सर्वात मोठीं सरोवरें '''जिनीव्हा''' व '''कॉन्स्टन्स''' हीं दोन होत. जिनीव्हा सरोवर हे स्वित्झरलंड देशाच्या वायव्य सरहद्दीवर असून ऱ्होननदी<noinclude></noinclude>
n0bi0nh7rcino9mp330z4l2up5lpes9
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/६२
104
112477
237826
2026-10-11T11:45:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237826
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''स्वित्झरलंडांतील जिनीव्हा शहर'''|'''४९'''}}</noinclude>त्या सरोवरामधून पुढें वाहात जाते. '''कॉन्स्टन्स''' हें सरोवर त्या देशाच्या ईशान्य सरहद्दीवर असून ऱ्हाइन नदी सरोवरामधून पुढें वहात जाते. स्वित्झरलंडचें सामान्य स्वरूप वरील वर्णनावरून ध्यानांत येईल.
{{gap}}पॅरिसहून मी ता. ११ एप्रिल १९३० रोजी सकाळी निघालों. फ्रान्स हा देश अगदीं सपाट असून फार सुपीक आहे. कोठेंहि ओसाड डोंगराळ उंचसखल माळ दृष्टीस पडत नाहीं. '''लुझान''' स्विझरलंडमधलें सर्वात मोठे शहर पॅरिसच्या आग्नेय दिशेस आहे. वाटेनें '''डियां''' म्हणून एक मोठें फ्रेंच शहर लागलें. पुढें सरहद्दीच्या जरा अलीकडे '''फ्रेन''' या नांवाचें एक गांव लागलें. येथून मात्र डोंगराळ प्रांत लागून '''झूरा''' नांवाची पर्वताची रांगच रांग दिसली. ही पर्वतराजी फ्रान्स व स्वित्झरलंड यांच्या सरहद्दीवर आहे. हा समुद्रसपाटीपासून सामान्यतः तीन हजार फूट उंच आहे. आगगाडीच्या रस्त्याला लहानमोठे बोगदे लागले व जिकडे तिकडे हिरवेंगार अरण्य लागलें. पर्वत ओलांडून खाली आल्यावर '''बालार्ब''' हें स्वित्झरलंडमधील सरहद्दीवरचें शहर लागलें. हें बरेंच उंचावर आहे. येथे आमच्या सामानाची व परवान्याची तपासणी झाली. येथून स्वित्झरलंडच्या सृष्टिसौंदर्ययुक्त देखाव्यास सुरवात होते. जिकडे तिकडे उंच उंच पर्वत व डोंगर दिसूं लागतात व पाण्यानें तुडुंब भरलेल्या नद्या नाले लागतात. सुमारें पांच वाजतां मी लुझान या जिनीव्हा सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या मोठ्या शहरीं आलों. येथून जिनीव्हा शहर सुमारें तीस मैल आहे. मला येथें गाडी बदलावी लागली व नवें तिकीट काढून जिनीव्हाच्या गाडीत बसावें लागलें. हा आगगाडीचा रस्ता जिनीव्हा सरोवराच्या अगदीं कडेनें गेला आहे. यामुळे डाव्या हाताला त्या सरोवराचें तें निळसर पाणी, त्याच्या कांठाला असलेली सुंदर घरें व बागा व उजव्या हाताला द्राक्षाच्या वेलींचे ताटवेच ताटवे हा देखावा मोठा रमणीय दिसतो. मे महिन्यांतील महाबळेश्वरच्या वेण्या तलावाच्या आसपासच्या बागांच्या देखाव्यावरून या लुझान ते जिनीव्हा यांमधील<noinclude></noinclude>
scn1go0vctjrsvrfhpdacwi4pxbxp09