विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:छन्दोरचना.djvu/121 104 5837 237827 15624 2026-10-11T16:22:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237827 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''९४'''|}}</noinclude>अेकाक्षरी वृत्तापासून सव्वीस-अक्षरी वृत्तापर्यन्त अनुक्रमें '''(१) अुक्ता, (२) अत्युक्ता, (३) मध्या, (४) प्रतिष्ठा, (५) सुप्रतिष्ठा, (६) गायत्री, (७) अुष्णिह्, (८) अनुष्टुभ्, (९) बृहती, (१०) पङ्क्ति, (११) त्रिष्टुभ्, (१२) जगती, (१३) अतिजगती, (१४) शक्करी, (१५) अतिशक्करी, (१६) अष्टि, (१७) अत्यष्टि, (१८) धृति, (१९) अतिधृति, (२०) कृति, (२१) प्रकृति, (२२) आकृति, (२३) विकृति, (२४) सङ्कृति, (२५) अभिकृति<ref>भरत आणि केदारभट्ट हे अभिकृतीच्या ठिकाणी अतिकृति म्हणतात.</ref>, आणि (२६) अुत्कृति''' या नावाचे वर्ग कल्पिण्यांत आले आहेत. ज्या वृत्तांच्या चरणांत सव्वीसाहून अधिक अक्षरें आहेत त्यांना '''दण्डक''' वा '''मालावृत्त'''<ref>मालावृत्त (भ १५/४७).</ref> म्हणतात. दण्डकांत अेका विशिष्ट गणाची सारखी आवृत्ति असते तशी माला वृत्तांत नसते.
{{gap}}वृत्त फारच आखूड असल्यास अर्थप्रतिपादनाची अडचण होते; आणि म्हणूनच प्रीति, विदग्धक, हारीत, तनुमध्या, कुमारललिता, आनन्द, हंसमाला जित्यादि वृत्तांच्या द्विरावृत्तीने अनुक्रमें पद्मिनी, मरालिका, स्वानन्दसम्राट्, मणिमाला, राजरमणीय, आनन्दकन्द, दया अित्यादि नवीन वृत्तें साधण्यांत आलीं असतील. सहासात-अक्षरी वृत्तांविषयी क्षेमेन्द्र मार्मिकपणाने म्हणतो, {{Block center|<poem>"न षट्सप्ताक्षरे वृत्ते विश्राम्यति सरस्वती भृङ्गीव मल्लिकाबालकलिकाकोटिसङ्कटे" (क्षेसु २।२)</poem>}} {{gap}}वृत्त अतिशय दीर्घ असल्यास कवि आणि वाचक दोघांचाहि अूर भरून यावयाचा! पद्यपाटव दाखवून वाचकांना चकित करून टाकण्यासाठी अतिऱ्हस्व वा अतिदीर्घ वृत्तांत जरी रचना करून दाखविण्यांत आली असली तरी अशीं क्लिष्टवृत्तें हीं रमणीयार्थाच्या स्वाभाविक प्रतिपादनाला निरुपयोगीच होत. भास, वराहमिहिर, वाग्भट, भवभूति अित्यादिकांच्या कृतींत दण्डकरचना आढळते यावरून दण्डकाचें प्राचीन महत्त्व दिसून येतें. वराहमिहिराच्या अेका दण्डकाच्या (वबृ १०३।६१) प्रत्येक चरणांत १०२ अक्षरें आहेत. सिद्धर्षिकृत अुपमितिभवप्रपञ्चाकथामध्ये दण्डकाच्या चतुष्पद्या नाहीत; तर अेकअेक दोनदोन स्फुट चरण आहेत. या ग्रन्थाच्या ५ व्या प्रस्तावांतील (पृ. ८४१<noinclude>
{{reflist}}</noinclude> 0kiqnfom5jnri3f4xvzgl2vj8x44uuf पान:छन्दोरचना.djvu/122 104 5838 237828 15625 2026-10-11T16:33:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237828 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''९५'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>xरील) 'विलसतभटकोटि' या दण्डकचरणांत अेकशे अठ्ठयाण्णव अक्षरें आहेत! तथापि येथूनहि सीमा फारच दूर आहे. वृत्तरत्नाचा टीकाकार नारायण xट्ट पुढील पद्य अद्धृत करितो, {{Block center|<poem>"अेकोनसहस्राक्षरपर्यन्ता दण्डकाङ्घ्रयः प्रोक्ताः वर्णत्रिकगणवृद्धया नद्वितयाद्या महामतिभिः" (के. पृ. १०६)</poem>}} {{gap}}या ग्रन्थांत वृत्तविस्तार देतांना वृत्तें चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे साङ्गण्याची xचीन पद्धति स्वीकारलेली नाही. अर्थातच दण्डकाच्या विवेचनासाठी पृथक् xकरण दिलेले नाही. अेका वृत्ताचा दुसऱ्या वृत्ताशी सम्बन्ध काय तो ध्यानांत xवा म्हणून वृत्तानुक्रम हा लगक्रमसाम्य आणि मोडणीचें साम्य यांच्या अनुरोधाने ठरविला आहे. छन्दःसाम्य हैं चरणान्तापासून<ref>रणपिङ्गलांत प्राचीन वर्गपद्धति आहे; पण अेका वर्गातील वृत्तांचा अनुक्रम ठरवितांना त्रिकगणसाम्य हे चरणान्ताकडून चरणारम्भाकडे पहाण्यांत आले आहे</ref> चरणारम्भाकडे पहात अनुक्रम ठरविला आहे.
{{gap}}सङ्ख्याक्रमभेदाने वृत्तप्रकार किती होअू शकतील हा वस्तुतः गणिताचा xश्न आहे; परन्तुः या प्रस्तारप्रकरणाने छन्दःशास्त्राच्या क्षेत्रांत निष्कारण पाय xसरले आहेत. अेकाक्षरी रचनेपासून सव्वीसअक्षरी रचनेपर्यंतच शक्य वृत्तxकारांची अेकन्दर सङ्ख्या गणिताने २२५ - २ म्हणजे ३३,५४,४३० अितकी होते! परन्तु अेकन्दर अुपलब्ध वृत्तांची सङ्ख्या सहस्रावर जात नाही. वृत्तांत ते वृत्त व्हायला काहीतरी आन्दोलनमाधुरी पाहिजे. छन्द म्हणजे काही लघु- गुरूंचा प्रस्तारखेळ नव्हे.
{{gap}}ज्या वृत्तांतील आन्दोलन अक्षररचनेकरून सहज प्रतीत होत नाही, ज्यांना तालांत बसवायला थोडे फार परिश्रम पडतात, परन्तु ज्यांपैकी अनेक वृत्तांच्या चाली परम्परया चालत आल्याकारणाने सुकर वाटतात अशा वृत्तांना '''अनावर्तनी''' म्हटले आहे. त्यांचें विवेचन आवर्तनी वृत्तांच्या आधी केलें आहे. कित्येक- वृत्तें अशीं आहेत कीं तीं सहज (क्वचित् अेखादें दुसरें अक्षर प्लुत अुच्चारून) आवर्तनी होअू शकतात; परन्तु त्यांच्या परम्पराप्राप्त चाली पहातां तीं अनावर्तनी वाटतात त्यांचें विवेचन आधी अनावर्तनी वृत्तांच्या वर्गात केलें असून पुढे आवर्तनी वृत्तांच्या वर्गात त्यांचा पुन्हा अुल्लेख केला आहे. अदाहरणार्थ, रथोद्धता<noinclude>
{{reflist}}</noinclude> 7u8716p9c1buhi9ez4g8afwychb4ome पान:छन्दोरचना.djvu/123 104 5839 237829 15626 2026-10-11T16:46:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237829 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''९६'''|}}</noinclude>नि स्वागता यांची रूढ मोडणी अनुक्रमें [_ ‿ _ ‿ ‿ ‿ _।‿ _ ‿ _] आणि [_ ‿ _ ‿ ‿ ‿ _।‿ ‿ _ _] अशी आहे, म्हणून त्यांचें विवेचन अनावर्तनी वृत्तांत केलें आहे. परन्तु त्यांची मोडणी अनुक्रमें [_ ‿ _ ‿ ‿ ‿।_ ‿ _ ‿ _] आणि [_ ‿ _ ‿ ‿ ‿।_ ‿ ‿ _ _] अशी घेतल्यास तीं पद्मावर्तनी होतात म्हणून त्यांचा अुल्लेख विद्युन्माला वर्गातहि पुन्हा केला आहे. मोडणी भिन्न झाली की तें वृत्त वस्तुतः भिन्न झालें, त्याला भिन्नच नाव पाहिजे. अुदाहरणार्थ, पृथ्वीवृत्तांतील लगावलीची मोडणी जर [।‿ _ ‿ ‿ ‿ _!‿ _ ‿ ‿ ‿ _।‿ _ _ ‿ _] अशी धरिली तर तें वृत्त निराळेंच होअील. सुदैवाने पृथ्वीवृत्ताला विलम्बितगति असें दुसरें नाव असल्याने तें या दुसऱ्या मोडणीच्या वृत्ताला निश्चित करितां येतें. पण जेथे वृत्ताचें नाव अेकच आहे पण त्या लगावलीची मोडणी विविध होअू शकते तेथे निरनिराळी नावें असणे अिष्ट असले तरी त्या भिन्न भिन्न मोडणीच्या वृत्तांत यापुढे सहेतुकपणें रचना होण्याचा सम्भव अत्यल्प असल्याने सध्या तरी नवीन नावें निर्माण करून वृत्तनाममाला लाम्बविण्याचे काही प्रयोजन नाही.
{{gap}}पद्मावर्तनी, अग्न्यावर्तनी, भृङ्गावर्तनी आणि हरावर्तनी वृत्तांचा विचार अनुक्रमें अनावर्तनी वृत्तांच्या नन्तर केला आहे. चतुर्मात्रक आवर्तनांची वृत्तें असूच शकत नाहीत असें नाही; परन्तु चतुर्मात्रक आवर्तनांचीं वृत्तें सारींच अष्टमात्रक आवर्तनांत बसतात. अुलटपक्षी आवर्तनान्तीं पदसमाप्ति झाली नाही तरी अक्षरसमाप्ति तरी झालीच पाहिजे असें असल्याने अष्टमात्रक आवर्तनाचें वृत्त चतुर्मात्रक आवर्तनांत बसेलच असे नाही. अदाहरणार्थ, (‿ _ _ ‿ _) (_ ‿ _ ‿ _)या अष्टमात्रक गणांचे चारचार मात्रांचे दोन दोन तुकडे पडूं शकत नाहीत. यासाठी चतुर्मात्रक आवर्तनांच्या वृत्तांचा समावेश पद्मावर्तनी वृत्तांत करणेंच सोयीचें आहे.
{{gap}}आवर्तनी वृत्तांत पद्मावर्तनी वृत्तांची सङ्ख्या सर्वात मोठी आणि अग्न्यावर्तनी वृत्तांची सङ्ख्या सर्वात लहान आहे. अनावर्तनी वृत्तांच्या मानाने आवर्तनी वृत्तांची सङ्ख्या जवळ जवळ औटपट आहे. परन्तु आवर्तनी वृत्तांची सङ्ख्या कितीहि मोठी असली तरी ती बहुतेक जातिरचनेंत लय पावलीं आहेत. अेकट्या पादाकुलकजातींत पाअूणशेंहून अधिक वृत्तें लय पावतात. जातिरचना ही सुकर असून तिच्यांत स्वाभाविकपणेच विविधतेला पुष्कळ वाव मिळतो.{{nop}}<noinclude></noinclude> kaxm5crcd41ovowecovxjq3r9tvmez8 पान:छन्दोरचना.djvu/124 104 5840 237830 15627 2026-10-11T17:03:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237830 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''९७'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>{{gap}}वृत्तें अनावर्तनी असोत वा आवर्तनी असोत, कवींना जीं वृत्तें सलग नि दीर्घ रचनेला अनुकूल अशी वाटली आणि जीं त्यामुळे रूढ झाली अशा वृत्तांची सङ्ख्या चाळीसाच्या वर जात नाही.
{{gap}}अनावर्तनी वृत्तांपैकी अिन्द्रवज्रा, अुपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, रुचिरा, प्रहर्षिणी, रथोद्धता, स्वागता, प्रमिताक्षरा, द्रुतविलम्बित, वसन्ततिलका, शालिनी, मालिनी, मन्दाक्रान्ता, स्त्रग्धरा, शार्दूलविक्रीडित, हरिणी, शिखरिणी, सुवदना आणि पृथ्वी हीं वृत्तें विशेष रूढ दिसतात. या वीस वृत्तांपैकी अिन्द्रवंशा हे वृत्त संस्कृतांत वैरल्यानें आढळते. रुचिरा, प्रहर्षिणी, प्रमिताक्षरा नि सुवदना हीं वृत्तें अुत्तरोत्तर दुर्मिळ होत आली आहेत.
{{gap}}पद्मावर्तनी वृत्तांपैकी तोटक, विद्युन्माला, दोधक, जलोद्धतगति, जलधरमाला, मत्तमयूर, मदिरा, हंसगति आणि हेमकला हीं नअू वृत्ते रूढ दिसतात. अग्न्यावर्तनी वृत्तांपैकी विबुधप्रिया आणि सुरनिम्नगा हीं रूढ दिसतात. भृङ्गावर्तनी वृत्तांत प्रमाणिका हें फार प्राचीन काळापासून रूढ दिसतें. कलिन्दनन्दिनी आणि देवराज हीं अुशीराने रूढ झाली आहेत; पण यांच्या मिश्रणामुळे होणारी शिथिल रचना ललितविस्तरांत आढळते. हरावर्तनी वृत्तांपैकी भुजङ्गप्रयात आणि स्त्रग्विणी हीं प्राचीन दिसतात; मन्दारमाला आणि अमृतध्वनि हीं अुशीराने रूढ झाली आहेत.
{{gap}}अर्धसमवृत्तांपैकी संस्कृतांत अपरवक्त्र, पुष्पिताग्रा, वियोगिनी आणि मालभारिणी हीं चारच रूढ दिसतात. मराठीत वियोगिनी आणि मालभारिणी हीं दोनच विशेष परिचित आहेत.
{{gap}}अश्वघोष आणि भास यांच्या काळींच ज्यांचें स्वरूप निश्चित झालें होतें अशीं हीं अनावर्तनी वृत्तें मूळ कशीं अुत्पन्न झालीं असतील? छन्दःशास्त्र अुत्पन्न होण्यापूर्वी कवींनी जी रचना मनोगत आन्दोलनानुसार केली असेल ती अपरिहार्यपणे शिथिल झाली असलीच पाहिजे. अशी शिथिल रचना ललितविस्तरांत विपुल पहायला मिळते. अशा शिथिल रचनेंतूनच पृथक्करण, तुलना नि वर्गीकरण यांच्या साह्याने निश्चित स्वरूपाची पद्यरचना निघते. पिङ्गलभरतादि प्राचीन छन्दःशास्त्रकारांनी ज्या सामग्रीवरून हे शास्त्र रचिलें ती सामग्री त्यांनी आपल्या ग्रन्थांत जतन करून न ठेविल्यामुळे वृत्तोत्पत्तीचा अत्यन्त कुतूहल-<noinclude>
{{gap}}छ. ७</noinclude> qs295xus91ck2qxqa7ezqnfhp7416vs पान:छन्दोरचना.djvu/125 104 5841 237831 15628 2026-10-11T17:10:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237831 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''९८'''|}}</noinclude>जनक प्रश्न हा तितकाच कूट होऊन बसला आहे. अिन्द्रवज्रा, अुपेन्द्रवज्रा शालिनी, वातोर्मि, वंशस्थ, रुचिरा अित्यादि वृत्तें प्राचीन त्रिष्टुभ्-जगतींपासून निघाली हे अुघड आहे. परन्तु वसन्ततिलका, मन्दाक्रान्ता, शार्दूलविक्रीडित, हरिणी, शिखरिणी, पृथ्वी हीं कशी कशीं परिणत होत आलीं याविषयी अटकळ करायलाहि आता काही मार्ग नाही.
{{gap}}आवर्तनी वृत्तें हीं प्राकृत गेय जातिरचनेपासून नियमित करण्यांत आली असावीत. गेय जातिरचना ही आन्दोलन मनांत मुरल्यावर जितकी सुकर असते तितकीच, तिचें नियमन ओळखून तें दृग्गोचरकरून द्यायला कठिण असते. जातिरचना करायला कवि थोडा श्रुतिसिद्ध असावा लागतो. अुलटपक्षीं वृत्त हे रचायला कठिण असले तरी अक्षरांची सङ्ख्या आणि लगक्रम यांनी बद्ध असलेलें त्याचें स्वरूप सहज आणि स्पष्टपणें ध्यानांत राहतें. अक्षरसङ्ख्या नि लगक्रम यांच्या दृष्टीने जातिरचनेकडे पाहिलें तर कोणतेच दोन चरण अेकसारखे दिसत नाहीत; त्यांतील साम्य सूक्ष्म असतें; चरणांचे काही विभाग मात्र अनिच्छया अेकसारखे येअू शकतात. हे पाहून, जातीचें मूळ स्वरूप ध्यानांत न आल्यामुळेच की काय, ज्यांत चरणाचा काही भाग अचल आणि काही भाग चल असतो असा पद्यप्रकार छन्दःशास्त्रकारांनी कल्पिला असावा. वैतालीय, औपच्छन्दसिक, गीति, आणि आर्यगीति ही रचना या प्रकारांतील आहे.
{{gap}}अशा गेय जातिरचनेंत जेथे अहेतुकपणें चारी चरण लगक्रमदृष्ट्या सारखे आले असतील तेथे छन्दःशास्त्रकारांनी स्वाभाविकपणेंच स्वतन्त्र वृत्त कल्पिलें असेल. परन्तु अेका चरणासारखे चार चरण लगक्रमदृष्ट्या असावेत या हेतूने केव्हा केव्हा कवींनी तर केव्हा केव्हा छन्दःशास्त्रकारांनी भिन्न भिन्न वृत्तें सिद्ध करण्याचा प्रयत्न बुद्धयाहि केला असेल. छन्दःशास्त्रकारांनी दिलेल्या अुदाहरणांव्यतिरिक्त स्वतन्त्र काव्यरचनेत फारच थोड्या आवर्तनी वृत्तांचीं अुदाहरणें आढळतात. अुलटपक्षीं वाङ्मयांत वृत्तस्वरूप चतुष्पद्या आढळतात त्यांची वार्ताहि छन्दःशास्त्रकारांना लागलेली दिसत नाही.
{{gap}}रूढ झालेल्या वृत्तांपासून नवीं वृत्तें पुढील प्रकारांनी निर्माण करण्यांत आलेली दिसतात.
{{gap}}(१) चरणारम्भींच्या गुरूच्या ठिकाणी दोन लघू घालून अिन्द्रवंशा, रथोद्धता, स्वागता, वसन्ततिलका, शार्दूलविक्रीडित आणि स्त्रग्धरा या वृत्तांपासून<noinclude></noinclude> 8mq3fgn4z2o9dc1rp75km7d93rb7n1e पान:छन्दोरचना.djvu/126 104 5842 237832 15629 2026-10-11T17:20:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237832 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''९९'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>अनुक्रमें केकिरव, सुदन्त, प्रियंवदा, द्रुतपदा, ऋषभ, मत्तेभविक्रीडित आणि महास्त्रग्धरा हीं वृत्तें सिद्ध झाली आहेत.
{{gap}}प्रथमाक्षराप्रमाणेच अितरत्रहि अेका गुरूच्या ठिकाणी दोन लघू घालून अुपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, शार्दूलविक्रीडित आणि स्वागता या वृत्तांपासून अनुक्रमें कोल, लक्ष्मी, सद्रत्नमाला आणि चन्द्रवर्त्म हीं वृत्तें सिद्ध झाली आहेत.
{{gap}}(२) अुलटपक्षी, प्रमिताक्षरा नि द्रुतविलम्बित यांच्या आरम्भींचे दोन लघू, आणि शिखरिणींतील अुपान्त्य दोन लघू, यांच्या ठिकाणीं अेकअेक गुरु घालून अनुक्रमें अुत्थापनी, अच्युत आणि प्रवरललिता हीं वृत्तें सिद्ध झालीं आहेत.
{{gap}}(३) अिन्द्रवज्रा, भुपेन्द्रवज्रा, स्वागता, कनकप्रभा, आणि वसन्ततिलका यांच्या अन्त्याक्षरापूर्वी अेक लघु वाढविल्याने अनुक्रमें अिन्द्रवंशा, वंशस्थ, यूथिका, कमलिनी आणि मृदङ्ग हीं वृत्तें सिद्ध होतात.
{{gap}}(४) रथोद्धता, स्वागता नि प्रमिताक्षरा यांच्या आरम्भी दोन लघु वाढविल्याने अनुक्रमें कनकप्रभा, कुटजा नि प्रमदा हीं वृत्तें सिद्ध होतात.
{{gap}}(५) रथोद्धता, शालिनी नि यूथिका यांच्या आरम्भी अेक गुरु वाढविल्याने अनुक्रमें ललिता, वैश्वदेवी नि अभ्रक हीं वृत्तें सिद्ध होतात.
{{gap}}(६) रुचिरा, पृथ्वी नि कुटिलगति यांच्या अन्तीं अेक गुरु वाढविल्याने अनुक्रमें रुक्मिणी, रतिलीला नि नन्दीमुखी हीं वृत्तें होतात.
{{gap}}(७) प्रियंवदा, द्रुतपदा, स्वागता, मङ्गला या वृत्तांत पाचवें अक्षर लघु आह तें गाळल्याने अनुक्रमें 'अभीष्ट' 'लङ्का,' मणिराग, "प्रगुणीकृता" हीं वृत्तें सिद्ध होतात.
{{gap}}(८) कित्येक वृत्तें अितर वृत्तांचे विभाग जोडून सिद्ध होतात. (_ _ _ _) वा (_ _ _ _ _) आणि (‿ ‿ ‿ ‿ ‿ _) वा (‿ ‿ _ ‿ ‿ _ ‿ ) यांच्या जोडणीने आणि केव्हा केव्हा या जोडणीला (_ ‿ _ _ ‿ _ _), (‿ _ ‿ ‿ _ ‿ _) आणि (_ _ ‿ _ _ ‿ _) यांच्यापैकी अेखादा गण शेवटीं जोडून कितीतरी वृत्तें झालीं आहेत!{{nop}}<noinclude></noinclude> ldqrr37s1i0c0bmc2d6l8kv4zimbsrb पान:छन्दोरचना.djvu/127 104 5843 237833 15630 2026-10-11T17:41:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237833 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh|'''छन्दोरचना'''|'''१००'''|}}</noinclude>{{gap}}(९) काही वृत्तें म्हणजे सुप्रसिद्ध वृत्तांचे विभागच होत. हंसी [_ _ _ _।‿ ‿ _ ‿ ‿ _] हें वृत्त मन्दाक्रान्ताचे पहिले दोन विभाग मिळून होतें. अिन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, पृथ्वी आणि सुवदना यांचे अन्त्य विभाग म्हणजे अनुक्रमें विमला (‿ ‿ _ ‿ _ _), "निर्मला" (‿ ‿ _ ‿ _ ‿ _), कुसुमिता (‿ ‿ ‿ _ ‿ _ _ ‿ _) आणि वसुमती (_ _ ‿ ‿ ‿ _) हीं वृत्तें होत. द्रुतविलम्बित, मालिनी आणि शिखरिणी यांचे आद्य विभाग म्हणजेच अनुक्रमें मधुमती (‿ ‿ ‿ _ ‿ ‿ _), रतिमाला (‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ _ _) आणि शिखण्डिनी (‿ _ _ _ _ _) हीं वृत्तें होत.
{{gap}}(१०) कित्येकदा अेखाद्या सुप्रसिद्ध वृत्ताला अेखाद्या गणाची जोड देअून नवीन वृत्त सिद्ध करण्यांत येतें. कनकप्रभा आणि विदग्धक यांच्या जोडणीने बुद्बुदवृत्त होतें. मत्ताक्रीडा वृत्ताला (‿ _ ‿ ‿ _ ‿ _) हा गण जोडून पिपीलिका वृत्त सिद्ध होतें. शार्दूलविक्रीडिताला (‿ ‿ _ ‿ _) हा गण जोडल्यानें विभ्रमगति हें वृत्त होतें. पृथ्वी वृत्ताला (_ ‿ _ _ ‿ _) हा गण जोडल्याने वृन्दारक वृत्त होतें; आणि (_ _ _ _ ‿ _ _) या गणाला मालती वृत्त जोडल्याने माधवीलता वृत्त होतें.
{{gap}}(११) मणिमाला, राजरमणीय, मरालिका अित्यादि वृत्तें अनुक्रमें तनुमध्या, कुमारललिता, विदग्धक अित्यादि ऱ्हस्व वृत्तांच्या द्विरावृत्तीने सिद्ध झाली आहेत.
{{gap}}(१२) काही ठिकाणीं प्राचीन वृत्तरचनेत झालेल्या चुका न अुमगल्यामुळेच नवीन वृत्तें कल्पिण्यांत येथून मग त्यांच्यासाठी सूत्रे रचण्यांत आली असावीत असें वाटतें. द्रुतपदा [‿ ‿ ‿ _ ‿ ‿ ‿ _।‿ ‿ _ _] या वृत्ताचें लक्षण "द्रुतपदं भवति नभनयाश्चेत्" [‿ ‿ ‿ _ ‿ ‿ ‿ ‿ ।‿ ‿ _ _] असेंहि आढळतें, वा महास्रग्धरा [‿ ‿ _ _ _ ‿ _ _।‿ ‿ ‿ ‿ ‿ ‿ _।_ _ _ ‿ _ _] या वृत्ताचें लक्षण "सजता नसौ ररौ गः फणितुरगहयैः स्यान्महास्त्रग्धराख्या" (गछ २।२१६) असेंहि आढळतें, वा वातोर्मीचें लक्षण [_ _ _ _ ‿ ‿ _ ‿ _ _] असेंहि हेमचन्द्र (२।१३७) साङ्गतो, वा पणवाचें लक्षण म्नौ य्गौ असें न साङ्गतां केदारभट्ट "म्नौ ज्गौचेति पणवनामकम्" (_ _ _ ‿ ‿ ।‿ ‿ _ ‿ _) असें साङ्गतो या मतभेदाच्या बुडाशी मूळची<noinclude></noinclude> kt5q3uam2ycucp8l2u97k7z4ewrb8fa पान:छन्दोरचना.djvu/128 104 5844 237834 15631 2026-10-11T17:48:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237834 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}} {{rh||'''१०१'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>चुकी अुमगली नाही हेंच कारण असावें. असले मतभेद पुढे वृत्तांवरील टीपांत अुल्लेखिले आहेत.
{{gap}}वृत्तनामाचा प्रश्न फारच घोटाळ्याचा आणि बिकट झाला आहे. छन्दस् आणि वृत्त हे शब्द नपुंसकलिङ्गी असले तरी त्यांची नावें बहुतेक स्त्रीलिङ्गी आहेत. प्रायः हीं नावें त्या वृत्ताच्या रचनेंत गोवितां येतील अशींच असतात. 'चन्द्रावर्ता' सारखें त्या वृत्ताच्या रचनेंत न बसण्याजोगें नाव क्वचितच आढळतें. णराच, मालत्ती अित्यादि प्राकृत नावें वृत्तांत बसली तरी त्यांची संस्कृत रूपें त्या वृत्तांत बसत नाहीत; आणि स्वयम्भूच्छन्द, कविदर्पण आणि प्राकृत पैङ्गल हे तीन ग्रन्थ वगळल्यास वृत्तांची नावें संस्कृत रूपांतच देण्याचा आम्नाय आहे. तेव्हा संस्कृत नाव जर वृत्तांत बसत नसलें तर त्यांत थोडा फार फेरफार करणें अवश्य होतें. प्रमाणी, समानी, श्येनी आणि हंसी यांची अनुक्रमें प्रमाणिका, समानिका, श्येनिका आणि हंसिका अशी रूपें करण्यांत येतात. याच कारणासाठी अुदाहरणांत 'यवमती'च्या ठिकाणीं 'यवान्विता' म्हणून 'छन्दोवशाच्च यवान्वितामित्युक्तम्' असें समर्थन हेमचन्द्र (हे ३।८) करितो. याच कारणासाठी चन्द्रावर्ता आणि माला या वृत्तांत न बसणाऱ्या नावांच्या ठिकाणीं शशिकला आणि स्रक् हीं नावें देण्यांत आली असावीत.
{{gap}}पुष्कळ नावें म्हणजे कान्तेचें वर्णन करणारी विशेषणे आहेत. काही पशु- पक्ष्यांच्या स्वरावरून, गतीवरून वा क्रीडितावरून पडली आहेत. काही सामासिक नामांच्या शेवटीं- आवली,- माला अशीं पदें आहेत.
{{gap}}हीं नावें अस्तित्वांत कशीं आलीं?
{{gap}}जो अेखादा श्लोक सुपरिचित असेल त्यांतीलच अखाद्या संस्मरणीय ललित शब्दाने (बहुशः आद्य वा अन्त्य शब्दाने) तो वृत्तप्रकार निर्देशिला जावा आणि सूचित व्हावा हें स्वाभाविक आहे. अेकाच वृत्ताला कित्येकदा अनेक नावे आढळतात याचें अेक कारण, त्या वृत्ताचे भिन्न भिन्न सुपरिचित श्लोक छन्दःशास्त्रकारांच्या डोळ्यापुढे असतील हें असूं शकेल. {{Block center|<poem>"कुटजानि वीक्ष्य शिखिभिः शिखरीन्द्रं समयावनौ घनमदभ्रमराणि गगनंच गीतनिनदस्य गिरोच्चैः समया वनौघनमदभ्रमराणि" (शिशु ६/७३)</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude> lvb2et65o8kewajjuzi7ndb3gonwgc0 पान:छन्दोरचना.djvu/622 104 6338 237835 16125 2026-10-11T17:49:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 237835 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm