विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/१३२
104
5091
237840
13801
2026-10-13T10:23:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237840
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''१०५'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>{{gap}}नावें अुच्चारसुलभ असावीत. कुसुमितलता-वेल्लिता, भुजङ्गविजृम्भित अित्यादि नावें फार दीर्घ आहेत. सुदैवाने अशीं नावें फार नाहीत. वंश-पत्र पतित हे नाव प्राचीन कालापासून रूढ असले तरी बोजड आहे म्हणून त्याच्या ठिकाणी स्वयम्भूचें वंशदल हे आखूड आणि सुटसुटीत नाव निश्चित केलें आहे.

{{center|'''अनुष्टुभ्'''}}
{{gap}}वृत्तविस्तार देण्यापूर्वी अेका सुपरिचित परन्तु वृत्तजातिच्छन्दांपैकी कोणत्याच वर्गांत बसू न शकणाऱ्या अशा अेका पद्यप्रकाराचा विचार केला पाहिजे. तो पद्यप्रकार म्हटला म्हणजे श्लोक वा अनुष्टुभ् होय. याला छन्द म्हणतात; पण यांत लगत्वभेद आहे. याला वृत्त म्हणावें तर लगक्रम निश्चित् नाही; आणि जाति म्हणावें तर काही भाग वृत्ताप्रमाणे अचल आहे, आणि अुर्वरित भाग निश्चित नाही; नि मात्रांची सङ्ख्याहि नियमित नाही. वराहमिहिर श्लोकलक्षण पुढीलप्रमाणे साङ्गतो.
{{Block center|<poem>"पञ्चमं लघु सर्वेषु
{{gap}}सप्तमं द्विचतुर्थयोः
यद्वच्छलोकाक्षरं तद्व-
{{gap}}ल्लघुतां याति दुःस्थितैः" (वबृ १०३।५७)</poem>}}
{{gap}}श्रुतबोधकार लक्षण साङ्गतांना सहावें अक्षर गुरु पाहिजे ही गोष्ट अधिक साङ्गतो,
{{Block center|<poem>"श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं
{{gap}}सर्वत्र लघु पञ्चमम्
द्विचतुष्पादयोर्हस्वं
{{gap}}सप्तमं दीर्घमन्ययोः" (श्रुबो १०)</poem>}}
{{gap}}चरणान्तीं यति असल्यामुळे आठवें अक्षर लघु असलें तरी तें म्हणतांना गुरुच होतें म्हणून आठवें अक्षर गुरु पाहिजे ही अट सागितलेली नाही. परन्तु या दोन श्लोकांचा अर्थ अवढाच होतो की विषमचरणान्तीं [‿ _ _ _] हा अक्षरक्रम असावा आणि समचरणान्तीं [‿ _ ‿ _] हा अक्षरक्रम असावा.<noinclude></noinclude>
tr67x8fexz5ocw3c6njd9fcnizs4d6z
पान:छन्दोरचना.djvu/129
104
5845
237837
15632
2026-10-13T09:43:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237837
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''१०२'''|}}</noinclude>{{gap}}या वृत्ताला हेमचन्द्र कुटज म्हणतो आणि पुढे 'भ्रमर अित्यन्यः' असें साङ्गतो; दोन्ही नावें या श्लोकाच्या आद्यन्तीं आहेत. याचप्रमाणे अतिशायिनीचें म्हणून दिलेल्या अुदाहरणांत (शिशु ८/७१) अतिशायिनी आणि यादवी या दोन्ही नावांचा अुगम आहे. हंसश्येनी हे नाव (किरात ५/३१) या श्लोकावरून घेतलें आहे हें अुघड आहे. विस्मिता आणि धृतश्री हीं नावें अनुक्रमे (शिशु २०/७१) आणि (शिशु ३/८२) या श्लोकावरून घेतलीं आहेत. ज्या वृत्ताला पिङ्गल वातोर्मि म्हणतो आणि वराहमिहिर अूर्मिमाला म्हणतो त्या वृत्ताचें अुदाहरण म्हणून जो श्लोक हलायुध अुद्धृत करितो त्याच्या शेवटल्या म्हणजे 'त्याज्या सा स्त्री द्रुतवातोर्मिमाला' या चरणाच्या अन्तीं दोन्हीं नावें आढळतात. हलायुधाने भद्रकाचें म्हणून जें अुदाहरण दिलें आहे त्याच्या आरम्भी 'मद्रकगीतिभिः' असें आहे; तेव्हा भरत आणि हेमचन्द्र या वृत्ताला मद्रक कां म्हणतात हें चटकन ध्यानांत येतें. तथापि वृत्तांचीं निर्विवादपणें प्राचीनतम अशीं अुदाहरणें अपलब्ध झाल्याविना या प्रकरणी निश्चित असे काही सांगतां येणार नाही. भरताने साङ्गितलेल्या शरभललिता वृत्ताचें अुदाहरण सौन्दरनन्दाबाहेर आढळत नाही; आणि सौन्दरनन्दांतील अुदाहरणांत शरभललित हा शब्द नाही त्याअर्थी सुप्रसिद्ध वृत्तांचीं नावें ज्या श्लोकांवरून आली असतील ते श्लोक अश्वघोषाच्याहि पूर्वी स्फुट स्वरूपांत सुपरिचित असले पाहिजेत. सुप्रसिद्ध वृत्तांत थोडी फिरवाफिरव करून जीं नवीन वृत्तें प्रयोग म्हणून कवींनी वा छन्दःशास्त्रकारांनी साधिलीं असतील त्यांना मात्र त्यांनी स्वतःचीं नावें दिली असण्याचा सम्भव आहे.
{{gap}}वृत्तांच्या नावांत अनन्वित गोन्धळ माजलेला आहे. काही वृत्तांना अेकाहून अधिक नावें आहेत; तर काही नावें अेकाहून अधिक वृत्तांना दिलेली आढळतात. शशिवदना या वृत्ताला सिद्धक, सिद्धि, सरसी, चित्रलता, रुचिरा, धृतश्री, पञ्चकावली अशीं आणखी सात नावें आहेत! कनकप्रभा वृत्ताला जया, नन्दिनी, प्रबोधिता, मञ्जुभाषिणी, मनोवती आणि सुमङ्गली अशीं आणखी सहा नावें आहेत. कुड्मलदन्ती या वृत्ताला श्री, रुचिरा, मौक्तिकमाला, अनुकूला आणि सान्द्रपद अशीं आणखी पाच नावें आहेत. अुलटपक्षी चन्द्रलेखा हे नाव सहा वृत्तांना दिलेले आढळतें. रुचिरा, पञ्चचामर हीं नावेंहि अशीं सहा भिन्न भिन्न वृत्तांना दिलेली दिसतील. चित्रलेखा हे नाव पांच वृत्तांना आहे. ललिता हें<noinclude></noinclude>
dzwvww1ez4qen7e39b6g9wtpfo5v01t
पान:छन्दोरचना.djvu/130
104
5846
237838
15633
2026-10-13T10:02:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237838
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''१०३'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>हें नाव चार वृत्तांना आहे; आणि अेकच नाव दोन तीन निरनिराळ्या वृत्तांना आहे अशी अुदाहरणे कितीतरी सापडतील! काही नावांत अन्तर अत्यल्प आहे. मत्ताक्रीडा- मत्तक्रीडा, सुभद्र- सुभद्रा, अुपस्थित- अुपस्थिता, कमल- कमला, ललित- ललिता, वृत्त- वृत्ता यांचा घोटाळा सहज होऊं शकेल.
{{gap}}ज्या नांवाचे दोन दोन पारिभाषिक अर्थ होअू शकतात तीं नावें योग्य नव्हेत. पण वृत्त हेंच नाव दोन वृत्तांना दिलेले आढळते; यमक हेंहि अेका वृत्ताचें नाव आहे! पङ्क्ति, बृहती, धृति हीं वर्गवाचक नावें वृत्तांनाहि दिलेली आहेत; आणि गीतिका हेंहि ओका वृत्ताचें नाव बनले आहे!
{{gap}}पूर्वी होअून गेलेल्या छन्दःशास्त्रकाराने जर अेखाद्या वृत्ताला अेक नाव दिलें तर त्या वृत्ताला दुसऱ्या छन्दःशास्त्रकाराने आपले स्वतःचें म्हणून दुसरें नाव देअू नये, सयुक्तिक कारणावाचून तरी देअू नये. परन्तु छन्दःशास्त्रांत अगदी विरुद्ध वहिवाट दिसते. ज्या वृत्ताला काश्यपाने सिंहोन्नता हें नाव दिलें, त्याला जर सैतवाने अुद्धर्षिणी म्हटलें तरी चालतें तर पिङ्गलाने आपलें वसन्ततिलका हे नाव द्यायला कां भ्यावें? आणि ही परम्परा येथे तरी काय म्हणून थाम्बावी? ती थाम्बली नाहीच. 'गार्गेण सैव गदिता मधुमाधवीति' असा चौथा चरण प्राकृत पैङ्गलाचा टीकाकार (पृ. ४७४) छन्दःसिद्धान्त- भास्करांतून अद्धृत करितोच!
{{gap}}प्रमाणिका, विद्युन्माला, द्रुतविलम्बित, भुजङ्गप्रयात, स्रग्विणी, मालिनी, हरिणी, मन्दाक्रान्ता, पृथ्वी आणि कुसुमितलतावेल्लिता या नावांनी जीं वृत्तें पिङ्गलाच्या छन्दःशास्त्रांत सुप्रसिद्ध आहेत त्यांना भरताच्या नाट्यशास्त्रांत अनुक्रमे मत्तचेष्टित, विद्युल्लेखा, हरिणीप्लुता, अप्रमेया, पद्मिनी, नान्दीमुखी, वृषभललिता, श्रीधरा, विलम्बितगति आणि चित्रलेखा अशीं नावें आहेत! नाट्यशास्त्र हें पिङ्गलाच्या, लौकिक वृत्तांचें विवेचन करणाऱ्या छन्दःशास्त्राहून प्राचीन असावें असें वाटतें; तथापि नाट्यशास्त्राची मूळ विश्वसनीय अशी शुद्ध प्राचीन प्रत अद्यापि अुपलब्ध नाही. पुन्हा, रूढ नावाचें सर्वथैव अुच्चाटन करणें शक्य नाही आणि अिष्टहि नाही. म्हणून नावें निश्चित करितांना होतां होअील तों प्राचीन ग्रन्थकारास मान दिला असला तरी भरताने दिलेलीं नावें स्वीकारण्यापेक्षा पिङ्गलाने दिलेलीं आणि रूढ झालेलीं नावेंच बहुतांशी स्वीकारिलीं आहेत.<noinclude></noinclude>
s7novodlbsdn4t70ddr0576p6j99h1a
पान:छन्दोरचना.djvu/131
104
5847
237839
15634
2026-10-13T10:13:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237839
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''१०४'''|}}</noinclude>परन्तु या प्रकरणी अमुक अेक पद्धत निरपवादपणे स्वीकारिली आहे असें म्हणतां येणार नाही; अेका वृत्ताला अनेक नावें वा अनेक वृत्तांना अेकच नाव ही दुरवस्था राहूं नये अेवढी काळजी घेतली आहे. वरतनु नावाचें जें वृत्त हेमचन्द्र साङ्गतो त्याला दुसरें नावच नाही; अुलट ज्या वृत्ताला पिङ्गल वरतनु म्हणतो त्याला वराहमिहिर मालती म्हणतो, तेव्हा त्या वृत्ताला मालती हे नाव निश्चित केल्याने हेमचन्द्राने सांगितलेल्या वृत्ताला वरतनु हे नाव निश्चित करितां आलें. तसेंच केदारभट्टाने ज्याला मञ्जुभाषिणी हे नाव देअून तें रूढ केलें त्याला पिङ्गलाचें कनकप्रभा हें नाव आहे; आणि हेमचन्द्र ज्या वृत्ताला मञ्जुभाषिणी म्हणतो त्याला दुसरें नाव नाही. तेव्हा त्या वृत्ताला मञ्जुभाषिणींच म्हणणे प्राप्त होते; मग केदारभट्टाच्या मञ्जुभाषिणीला कनकप्रभा हे पिङ्गलोक्त नाव द्यावें लागतें.
{{gap}}निरञ्जनमाधव, विद्याधर वा. भिडे, हिन्दी छन्दःप्रभाकराचा कर्ता रायबहादुर जगन्नाथप्रसाद, रणपिङ्गलकार रणछोडराय अुदयराम अित्यादि अनेक लेखक नवीं नवीं नावे देतात; पण आधार देत नाहीत. यांच्या काही नावांचा अुपयोग वैरल्याने आणि भीतभीतच केला आहे.
{{gap}}जेथे निराळे नाव अुपलब्ध नाही तेथे मूळ नावाच्या आरम्भी अेखादें पद जोडून नावास वेगळीक आणिली आहे. मूळ नावाच्या पूर्वी कोणता शब्द जोडायचा तो हेमचन्द्रादिकांनी दिलेल्या अुदाहरणांतूनच पुष्कळदा घेतला आहे. लक्ष्मी नावाची तीन वृत्तें आहेत, त्यांचीं नावें लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी अशीं ठेवून भेद व्यक्त केला आहे. केव्हा केव्हा हा भेद 'सु' वा 'अति' हा अुपसर्ग जोडून व्यक्त केला आहे. नावांचा घोटाळा टाळण्यासाठी जें नाव वा नावाचा जो भाग मी दिला आहे तो दुहेरी अवतरण चिन्हांत दिलेला आहे. अरबी, फार्सी छन्दःशास्त्रांतून जीं वृत्तें अिकडे येत आहेत त्यांना नावें मी दिली असून तीं दुहेरी अवतरण चिन्हांत छापली असून त्यांच्यापुढे * फुली दिलेली आहे.
{{gap}}ज्या वृत्तांचा पत्ता छन्दःशास्त्रकारांना लागलेला नाही पण ज्यांमध्ये केलेली रचना अुपलब्ध आहे अशा वृत्तांना नावें त्या अुदाहरणांतील शब्दांवरूनच दिलीं आहेत. हीं नावें अेकेरी अवतरण चिन्हांत आहेत; आणि मूळ आधारभूत अुदाहरणे पुढे वृत्तविहारांत दिलेली आहेत.{{nop}}<noinclude></noinclude>
jp4tzyfqnlbtoq57j1murg0bq3ne0a5
पान:छन्दोरचना.djvu/133
104
5849
237841
15636
2026-10-13T10:53:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237841
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''१०६'''|}}</noinclude>परन्तु चरणारम्भींचीं चार अक्षरें कशी असावीत याविषयी काहीच बोध होत नाही.
{{gap}}भगवद्गीतेतील अध्याय १, ५, ७, १०, १२, १४ नि १६ या सात अध्यायांतील मिळून २१९ श्लोकांचें पृथक्करण करून पहातां,
{{gap}}(१) समचरणान्ती (‿ _ ‿ _) हा गण निरपवादपणे आढळला.
{{gap}}(२) विषमचरणान्ती (‿ _ _ _) हा गण शेकडा नव्वदाहून अधिक वेळां आढळला. ४३८ विषमचरणांपैकी अन्तीं (‿ ‿ _ _) हा गण अेकाच चरणांत, (‿ ‿ ‿ _) हा १५ चरणांत, (_ _ _ _) हा १० चरणांत, (_ ‿ _ _) हा ७ चरणांत आणि (_ ‿ ‿ _) हा ९ चरणांत आढळला. म्हणजे काय, 'पञ्चमं लघु सर्वेषु' हा नियम सुद्धा विषम चरणांत निरपवाद नाही.
{{gap}}आरम्भींचे चतुरक्षरी गण पुढीलप्रमाणे आढळले.

| || || विषमचरणारम्भी || समचरणारम्भी

| १ || [_ _ _ _]{{gap}} || ७७ वेळां|| ७४ वेळां

| २ || [‿ _ _ _]|| ५० " || ५२ "

| ३ || [_ ‿ _ _]|| ६० " || ६६ "

| ४ || [_ _ ‿ _]|| ३९ " || शून्य "

| ५ || [_ _ _ ‿]|| ३७ " || ५० "

| ६ || [‿ ‿ _ _]|| ३० " || ३९ "

| ७ || [_ ‿ ‿ _]|| शून्य " || शून्य "

| ८ || [_ _ ‿ ‿]|| ३१ "|| ३७ "

| ९ || [‿ _ _ ‿]|| १९ "|| ३६ "

| १० || [‿ _ ‿ _]|| २६ "|| शून्य "

| ११ || [_ ‿ _ ‿]|| २७ "|| ४३ "

| १२ || [‿ _ ‿ ‿]|| १७ " || २४ "

| १३ || [‿ ‿ _ ‿]|| २५ " || १७ "

{{gap}}यावरून असें म्हणतां येओल की विषमचरणारम्भीं कोणताहि चार- अक्षरी गण चालेल; परन्तु त्याचें दुसरें नि तिसरें अक्षर हीं दोन्ही अकसमयावच्छेदें<noinclude></noinclude>
thpfegjtmpv3u1bbk37ugwyvw8376of
पान:छन्दोरचना.djvu/134
104
5850
237849
15637
2026-10-13T11:41:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237849
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''१०७'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>लघु नसावीत. म्हणजे विषमचरणारम्भी (_ ‿ ‿ _), (_ ‿ ‿ ‿), (‿ ‿ ‿ _) आणि (‿ ‿ ‿ ‿) हे चार गण वर्ज्य होत.
{{gap}}हे चार गण समचरणारम्भीहि वर्ज्यच आहेत. यांच्या भरीला (_ _ ‿ _) आणि (‿ _ ‿ _) हे दोन गण विषमचरणारम्भी वर्ज्य नसून समचरणारम्भी वर्ज्य दिसतात.
{{gap}}अनुष्टुभांतील समचरणाची त्रिपदी पुढील पद्यांत आहे.
{{Block center|<poem>"द्यावया नव चालना
पाअूल पहिलें पडो
हो तूं मला अनुव्रता" (पु. मं. लाड)</poem>}}
{{gap}}परन्तु तिसऱ्या चरणाची आवृत्ति प्रत्येक त्रिपदींत असल्याने त्याला ध्रुवपदाचें स्वरूप प्राप्त होतें आणि प्रत्येक कडव्यांत द्विपदीच अुरते.
{{Block center|<poem>"बल-तेजास वाढवीं
दुसऱ्या शुभ पावलीं"{{gap}}हो तू०</poem>}}
{{gap}}अनुष्टुभ् छन्दाप्रमाणेच दुसरे काही पद्यप्रकार असे आहेत की त्यांना वृत्त वा जाति यांपैकी कोणत्याच वर्गात समाविष्ट करितां येत नाही. चरणाचा काही भाग वृत्ताप्रमाणे अचल असतो; पण अुरलेला भाग पूर्णपणे जातिस्वरूप नसतो. अपरान्तिका, आपातलिका, अुदीत्यवृत्ति, अुपचित्रा, चारुहासिनी, चित्रा, प्रवृत्तक, प्राच्यवृत्ति, वानवासिका, विश्लोक अित्यादि पद्यप्रकारांपैकी काहींचीं अुदाहरणें वृत्तस्वरूप दिसल्यामुळे त्यांचा विचार वृत्तप्रकरणी केला आहे. या ठिकाणी वैतालीय, औपच्छन्दसिक, गीति आणि आर्यागीति यांचाच विचार कर्तव्य आहे.

{| {{brace table parameters}}
|||{{brace|l|t}}||{{gap}}[_ _ _ + । ‿ + ‿ + ]

|वैतालीय{{gap}}||{{brace|l|m}}||

|||{{brace|l|b}}||{{gap}}[_ _ + _ । + ‿ + ‿ +]

{{gap}}ज्या ठिकाणी शुद्ध गुरूच हवा असतो आणि दोन लघू चालत नाहीत तेथे ( + ) ही खूण योजिली आहे.
{{gap}}सूत्रकृताङ्गांत वैतालीयाचे बरेच श्लोक आहेत. त्यांतील चरणांचे पृथक्करण करितां असें दिसतें की विषम चरणांचे आठ मात्रांचा आणि सहा मात्रांचा<noinclude></noinclude>
hipfywb4cyl1op2c6ygxs557949n9r1
पान:छन्दोरचना.djvu/135
104
5851
237856
15638
2026-10-13T11:55:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237856
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''१०८'''|}}</noinclude>असे दोन भाग पाडतात. विषम चरणान्ती (‿ + ‿ +) हा गण आणि समचरणान्तीं (+ ‿ + ‿ +) हा गण हे निरपवादपणे येतात. विषमचरणांतील आद्य अष्टमात्रक गणांत (_ _ _ _) हा पहिलाच प्रकार आढळतो; (‿ _ ‿ _ _), (‿ _ _ ‿ _), (_ ‿ _ ‿ _) आणि (_ _ ‿ _ ‿) हे प्रकार आढळत नाहीत. ते तसे आढळत नाहीत म्हणूनच पहिला गण पूर्ण जातिस्वरूप होअू शकत नाही. विषमचरणांतील आद्यगणांत अन्त्याक्षर गुरूच पाहिजे असें दिसतें. अितरत्र अेका गुरूच्या ठिकाणीं दोन लघू घालतां येतात.
{{gap}}समचरणांतील आद्यगणांत (_ _ _ _) या प्रकाराव्यतिरिक्त वैरल्याने का होअीना पण (_ ‿ _ ‿ _) हा प्रकार आढळतो. मात्र या गणांत चौथी नि पाचवी नि सहावी मात्रा मिळून गुरुच अक्षर पाहिजे असा कटाक्ष दिसतो.
{{Block center|<poem>"पन्नसमत्ते सया जअे
समताधम्ममुदाहरे मुणी
सुहुमे अु सया अलूस अे
नो कुज्झेनो माणि माहणे" (सूकृ १।२।२।६)</poem>}}
{{gap}}वैतालीयांतील प्राचीन रचना केव्हा केव्हा स्वाभाविकपणेंच शिथिल आढळते.
{{Block center|<poem>"अुत्तर मणुयाण अहिया
गामधम्म अिअिमे अणुस्सुयं
जंसी विरया समुठ्ठिया
चासवस्स अणुधम्मचारिणो" (सूकृ १।२।२।२५)</poem>}}
{{gap}}'''औपच्छन्दसिक''' हे वैतालीयाच्या चरणान्तीं अेक अेक गुरु वाढविल्याने
सिद्ध होतें.

{| {{brace table parameters}}
|||{{brace|l|t}}||{{gap}}[ _ _ _ _ । _ _ ]

|गीति {{gap}}||{{brace|l|m}}||

|||{{brace|l|b}}||{{gap}}[ _ _ _ _ । ‿ _ ‿ _ _ । +]

{{gap}}गीति ही सुद्धा चतुष्पदीच आहे. ही पूर्णपणे जातिस्वरूप नाही. विषमचरणातील आद्यगणांत (‿ _ _ ‿ _ ) अथवा ( _ ‿ _ ‿ _ ) या गणाचा अुपयोग अद्यापि होअू लागला नाही. समचरणांतील आद्यगणांत हीच स्थिति<noinclude></noinclude>
qk5vagcihtv01ptjoeio3aoehnh520e
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३७
104
112438
237842
237725
2026-10-13T11:07:48Z
Shurpalimedha
5041
237842
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पाहण्यासारखी झाली आहे. मी आता प्रामाणिकपणे धंदा करतो. इतर
व्यापाऱ्यांसारखा रात्री ९ वाजले की दुकान बंद. 'कन्सल्टिंगरूम'च्या बाहेर
बोर्ड लावला आहे, फी रु. ५० फक्त. परवडले तर या.” (ही पन्नास
वर्षांपूर्वीची गोष्ट)

{{gap}}बॉस निघून गेले होते. मी आश्चर्याने त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत
राहिलो.
या फिजिशियनच्या अनेक आठवणी आहेत. नियमितपणा, दीर्घोद्योगी,
संशोधक वृत्ती, वक्तशीरपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती इत्यादींसाठी ते
हॉस्पिटलमध्ये आदर्श मानले जात. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल
केल्याबरोबर रक्त, लघवी, शौच यांची तपासणी व छातीचे स्क्रिनिंग करायलाच
हवे असा त्यांचा कटाक्ष. या तपासणीसाठी रोज तीस-चाळीस रुग्णांचे सुमारे
दीडशे फॉर्म भरण्याच्या खर्डेघाशीतच आम्हा हाऊसमनांचा बराच वेळ
जायचा.
संशोधनाबाबतीतही अगदी अति व्हायचे. दुपारी जेवणानंतर तासभर
वामकुक्षी घेणे म्हणजे त्यांना वेळेचा अपव्यय वाटायचा. ही वेळ ते
प्रयोगशाळेत घालवीत. माणसाच्या आतड्यात प्राणवायूचा प्रवाह सोडल्यास
जंतांचा नाश होतो, असे त्यांनी संशोधन केले. प्राणवायूचा जंतावर होणारा
परिणाम पाहण्यासाठी प्रयोग सुरू झाले. जंत बाटलीत भरणे, त्यावर प्राणवायू
सोडणे. जंत किती वेळात मरण पावतात याची नोंद ठेवणे, ही कामे
हाऊसाला करावी लागत. अखेर या विषयावर एक प्रबंध तयार झाला.
आपण संशोधनात मोलाची भर घातली आहे या ऐटीत त्यांनी तो एका वैद्यकीय
परिषदेत वाचून दाखवला. प्रश्नोत्तराच्या वेळेला त्यांना एका डॉक्टरने प्रश्न
विचारला, "दोन आण्याच्या सँटोनिनच्या पुडीने जे कार्य होते, त्यासाठी
प्राणवायूचा सिलेंडर आणणे म्हणजे ढेकूण मारण्यासाठी बंदूक आणण्यासारखे
आहे असे नाही का आपल्याला वाटत?" आमचे बॉस निरुत्तर झाले. सर्वजण
गालातल्या गालात हसले. तेव्हापासून त्यांनी संशोधन सोडून दिले व दुपारचा
तास वामकुक्षीसाठी राखून ठेवला. कोणत्याही विषयाची व्यवहार्य बाजू
पाहिली नाही, की असा विचका होतो, हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो.

{{gap}}हॉस्पिटलात सामाजिक कार्यकर्ते भेटायचे. जिन्याखाली तापाने किंवा
अतिसाराने आजारी असलेल्या रुग्णाला भूतदया दाखवायचे व स्वखर्चाने
हॉस्पिटलात आणायचे, अॅडमिट करायचे. पुढे रुग्ण बरा झाल्यावर त्याला
परत घेऊन जायला कुणी यायचे नाही.
{{right|मी डॉक्टर झालो । ३३}}<noinclude></noinclude>
byapdp5sxld9eg57tvu0j0gnrnfxsrx
237843
237842
2026-10-13T11:09:02Z
Shurpalimedha
5041
237843
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पाहण्यासारखी झाली आहे. मी आता प्रामाणिकपणे धंदा करतो. इतर
व्यापाऱ्यांसारखा रात्री ९ वाजले की दुकान बंद. 'कन्सल्टिंगरूम'च्या बाहेर
बोर्ड लावला आहे, फी रु. ५० फक्त. परवडले तर या.” (ही पन्नास
वर्षांपूर्वीची गोष्ट)

{{gap}}बॉस निघून गेले होते. मी आश्चर्याने त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत
राहिलो.
या फिजिशियनच्या अनेक आठवणी आहेत. नियमितपणा, दीर्घोद्योगी,
संशोधक वृत्ती, वक्तशीरपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती इत्यादींसाठी ते
हॉस्पिटलमध्ये आदर्श मानले जात. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल
केल्याबरोबर रक्त, लघवी, शौच यांची तपासणी व छातीचे स्क्रिनिंग करायलाच
हवे असा त्यांचा कटाक्ष. या तपासणीसाठी रोज तीस-चाळीस रुग्णांचे सुमारे
दीडशे फॉर्म भरण्याच्या खर्डेघाशीतच आम्हा हाऊसमनांचा बराच वेळ
जायचा.

{{gap}}संशोधनाबाबतीतही अगदी अति व्हायचे. दुपारी जेवणानंतर तासभर
वामकुक्षी घेणे म्हणजे त्यांना वेळेचा अपव्यय वाटायचा. ही वेळ ते
प्रयोगशाळेत घालवीत. माणसाच्या आतड्यात प्राणवायूचा प्रवाह सोडल्यास
जंतांचा नाश होतो, असे त्यांनी संशोधन केले. प्राणवायूचा जंतावर होणारा
परिणाम पाहण्यासाठी प्रयोग सुरू झाले. जंत बाटलीत भरणे, त्यावर प्राणवायू
सोडणे. जंत किती वेळात मरण पावतात याची नोंद ठेवणे, ही कामे
हाऊसाला करावी लागत. अखेर या विषयावर एक प्रबंध तयार झाला.
आपण संशोधनात मोलाची भर घातली आहे या ऐटीत त्यांनी तो एका वैद्यकीय
परिषदेत वाचून दाखवला. प्रश्नोत्तराच्या वेळेला त्यांना एका डॉक्टरने प्रश्न
विचारला, "दोन आण्याच्या सँटोनिनच्या पुडीने जे कार्य होते, त्यासाठी
प्राणवायूचा सिलेंडर आणणे म्हणजे ढेकूण मारण्यासाठी बंदूक आणण्यासारखे
आहे असे नाही का आपल्याला वाटत?" आमचे बॉस निरुत्तर झाले. सर्वजण
गालातल्या गालात हसले. तेव्हापासून त्यांनी संशोधन सोडून दिले व दुपारचा
तास वामकुक्षीसाठी राखून ठेवला. कोणत्याही विषयाची व्यवहार्य बाजू
पाहिली नाही, की असा विचका होतो, हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो.

{{gap}}हॉस्पिटलात सामाजिक कार्यकर्ते भेटायचे. जिन्याखाली तापाने किंवा
अतिसाराने आजारी असलेल्या रुग्णाला भूतदया दाखवायचे व स्वखर्चाने
हॉस्पिटलात आणायचे, अॅडमिट करायचे. पुढे रुग्ण बरा झाल्यावर त्याला
परत घेऊन जायला कुणी यायचे नाही.
{{right|मी डॉक्टर झालो । ३३}}<noinclude></noinclude>
t0s365fj2em4vmlgiq5fhb1xodw4dms
237848
237843
2026-10-13T11:33:55Z
Shurpalimedha
5041
237848
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>पाहण्यासारखी झाली आहे. मी आता प्रामाणिकपणे धंदा करतो. इतर व्यापाऱ्यांसारखा रात्री ९ वाजले की दुकान बंद. 'कन्सल्टिंगरूम'च्या बाहेर बोर्ड लावला आहे, फी रु. ५० फक्त. परवडले तर या.” (ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट)

{{gap}}बॉस निघून गेले होते. मी आश्चर्याने त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. या फिजिशियनच्या अनेक आठवणी आहेत. नियमितपणा, दीर्घोद्योगी, संशोधक वृत्ती, वक्तशीरपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती इत्यादींसाठी ते हॉस्पिटलमध्ये आदर्श मानले जात. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबरोबर रक्त, लघवी, शौच यांची तपासणी व छातीचे स्क्रिनिंग करायलाच हवे असा त्यांचा कटाक्ष. या तपासणीसाठी रोज तीस-चाळीस रुग्णांचे सुमारे दीडशे फॉर्म भरण्याच्या खर्डेघाशीतच आम्हा हाऊसमनांचा बराच वेळ जायचा.

{{gap}}संशोधनाबाबतीतही अगदी अति व्हायचे. दुपारी जेवणानंतर तासभर वामकुक्षी घेणे म्हणजे त्यांना वेळेचा अपव्यय वाटायचा. ही वेळ ते प्रयोगशाळेत घालवीत. माणसाच्या आतड्यात प्राणवायूचा प्रवाह सोडल्यास जंतांचा नाश होतो, असे त्यांनी संशोधन केले. प्राणवायूचा जंतावर होणारा परिणाम पाहण्यासाठी प्रयोग सुरू झाले. जंत बाटलीत भरणे, त्यावर प्राणवायू सोडणे. जंत किती वेळात मरण पावतात याची नोंद ठेवणे, ही कामे हाऊसाला करावी लागत. अखेर या विषयावर एक प्रबंध तयार झाला. आपण संशोधनात मोलाची भर घातली आहे या ऐटीत त्यांनी तो एका वैद्यकीय परिषदेत वाचून दाखवला. प्रश्नोत्तराच्या वेळेला त्यांना एका डॉक्टरने प्रश्न विचारला, "दोन आण्याच्या सँटोनिनच्या पुडीने जे कार्य होते, त्यासाठी प्राणवायूचा सिलेंडर आणणे म्हणजे ढेकूण मारण्यासाठी बंदूक आणण्यासारखे आहे असे नाही का आपल्याला वाटत?" आमचे बॉस निरुत्तर झाले. सर्वजण गालातल्या गालात हसले. तेव्हापासून त्यांनी संशोधन सोडून दिले व दुपारचा तास वामकुक्षीसाठी राखून ठेवला. कोणत्याही विषयाची व्यवहार्य बाजू पाहिली नाही, की असा विचका होतो, हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो.

{{gap}}हॉस्पिटलात सामाजिक कार्यकर्ते भेटायचे. जिन्याखाली तापाने किंवा अतिसाराने आजारी असलेल्या रुग्णाला भूतदया दाखवायचे व स्वखर्चाने हॉस्पिटलात आणायचे, अॅडमिट करायचे. पुढे रुग्ण बरा झाल्यावर त्याला परत घेऊन जायला कुणी यायचे नाही.
{{right|मी डॉक्टर झालो । ३३}}<noinclude></noinclude>
hb2wm7ujxzuwegfe93r16lb1jurkk1q
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३८
104
112439
237844
237726
2026-10-13T11:14:51Z
Shurpalimedha
5041
237844
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}पॅथॉलॉजी विभागात काम करीत असताना रक्तदानाचे कामही पाहावे
लागे. रक्तदानासाठी येणाऱ्या इसमाचे रक्त तपासणे, त्याचे रक्त बाटलीत जमा
करणे व त्याला पंचवीस रुपये देणे, हे कामाचे स्वरूप असे. पैशाच्या आशेने
अनेक माणसे रक्तदानासाठी सकाळी हॉस्पिटलबाहेर जमत. परंतु एका धटिंगण
दादाच्या मेहेरबानीशिवाय कुणालाही आत जायला मिळत नसे. मिळालेल्या
पैशातून त्या दादाला काही कमिशन द्यावे लागे. या गोष्टींची आम्हाला प्रथम
माहिती नव्हती. एकदा असे झाले, नुकतीच मिसरूड फुटलेला एक मुलगा
रक्तदानासाठी आला. रक्त घेत असताना मी त्याचे अभिनंदन करून म्हटले,
"कुणाचे तरी प्राण वाचवावेत या जाणिवेने तू रक्तदानाला तयार झालास याचे
कौतुक वाटते. "

{{gap}}"छे डॉक्टर; मला पैशांची गरज आहे. मी कॉलेजात शिकतो; फीसाठी पैसे
कमी पडले म्हणून आलो.” हे ऐकल्याबरोबर मला काही बोलवेना. त्याचे रक्त
घेतले. त्याला पैसे दिले. मी पुढील कामाला लागलो. पाच-दहा मिनिटांनी तो
मुलगा घाबरलेल्या अवस्थेत परत आला. आपला फाटलेला शर्ट सावरीत
डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, "त्या दादाला आवरा हो! माझ्या हातातून
त्याने पंधरा रुपये हिसकावून घेतले. वर म्हणतो, 'मला न विचारता आत पुन्हा
गेलास तर तंगडे मोडून ठेवू.'" त्याला माझा इलाज नव्हता. वरिष्ठांना कळविणे
व शाब्दिक सहानुभूती दाखवणे, यापलीकडे त्याला देण्यासारखे माझ्याजवळ
काही नव्हते. पण आजही या प्रसंगाच्या आठवणीने काळजात कसेसेच होते.

{{gap}}असो. आमची हाऊसमनशिप संपली. एक वर्ष भरकन कसे निघून गेले,
ते कळले नाही. आमच्या बॉसच्या कडक धोरणामुळे 'सिटी ऑल' (मागील
औषधे पुढे चालू) या पलीकडे काहीदेखील शिकलो नाही. म्हणजे ज्ञानात भर
शून्य. 'एम.बी.बी.एस. पर्यंत बरेचसे जे निरुपयोगी शिकलो ते विसरत
चाललो होतो. त्यामुळे डोके बरेच हलके झाल्यासारखे वाटत होते; म्हणजे बरे
वाटत होते. मग एका वर्षात आम्ही काय केले? रोज ब्रेड आमलेटचा समाचार
घेतला; नान, चिकन बिर्याणीवर ताव मारला. डॉ. बक्षींच्या घरून येणारे ताजे
दही, तूप त्यांच्या नकळत फस्त केले. रोज भारंभर फॉर्म भरले, नॉसबरोबर
राऊंड घेतला; रोज सकाळी वेळेवर प्रत्येकाच्या केसपेपरवर 'सिटी ऑल'
केले; बरणीतील जंतांना मरेपर्यंत डिवचित राहिलो, नवीन नर्सेसवर व
वॉर्डबॉइजवर हुकूमत गाजवली, रोज पंचवीस-तीस सलाइनच्या बाटल्या
चढविल्या, अधूनमधून मृत्यूचा दाखला भरला आणि ही सर्व गधामेहनत
केल्याबद्दल एक प्रशस्तिपत्रक मिळवले.

३४ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
5w0f32vmhf8w342qt2l9ujv44j4ia1u
237845
237844
2026-10-13T11:17:14Z
Shurpalimedha
5041
237845
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}पॅथॉलॉजी विभागात काम करीत असताना रक्तदानाचे कामही पाहावे
लागे. रक्तदानासाठी येणाऱ्या इसमाचे रक्त तपासणे, त्याचे रक्त बाटलीत जमा
करणे व त्याला पंचवीस रुपये देणे, हे कामाचे स्वरूप असे. पैशाच्या आशेने
अनेक माणसे रक्तदानासाठी सकाळी हॉस्पिटलबाहेर जमत. परंतु एका धटिंगण
दादाच्या मेहेरबानीशिवाय कुणालाही आत जायला मिळत नसे. मिळालेल्या
पैशातून त्या दादाला काही कमिशन द्यावे लागे. या गोष्टींची आम्हाला प्रथम
माहिती नव्हती. एकदा असे झाले, नुकतीच मिसरूड फुटलेला एक मुलगा
रक्तदानासाठी आला. रक्त घेत असताना मी त्याचे अभिनंदन करून म्हटले,
"कुणाचे तरी प्राण वाचवावेत या जाणिवेने तू रक्तदानाला तयार झालास याचे
कौतुक वाटते. "

{{gap}}"छे डॉक्टर; मला पैशांची गरज आहे. मी कॉलेजात शिकतो; फीसाठी पैसे
कमी पडले म्हणून आलो.” हे ऐकल्याबरोबर मला काही बोलवेना. त्याचे रक्त
घेतले. त्याला पैसे दिले. मी पुढील कामाला लागलो. पाच-दहा मिनिटांनी तो
मुलगा घाबरलेल्या अवस्थेत परत आला. आपला फाटलेला शर्ट सावरीत
डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, "त्या दादाला आवरा हो! माझ्या हातातून
त्याने पंधरा रुपये हिसकावून घेतले. वर म्हणतो, 'मला न विचारता आत पुन्हा
गेलास तर तंगडे मोडून ठेवू.'" त्याला माझा इलाज नव्हता. वरिष्ठांना कळविणे
व शाब्दिक सहानुभूती दाखवणे, यापलीकडे त्याला देण्यासारखे माझ्याजवळ
काही नव्हते. पण आजही या प्रसंगाच्या आठवणीने काळजात कसेसेच होते.

{{gap}}असो. आमची हाऊसमनशिप संपली. एक वर्ष भरकन कसे निघून गेले,
ते कळले नाही. आमच्या बॉसच्या कडक धोरणामुळे 'सिटी ऑल' (मागील
औषधे पुढे चालू) या पलीकडे काहीदेखील शिकलो नाही. म्हणजे ज्ञानात भर
शून्य. 'एम.बी.बी.एस. पर्यंत बरेचसे जे निरुपयोगी शिकलो ते विसरत
चाललो होतो. त्यामुळे डोके बरेच हलके झाल्यासारखे वाटत होते; म्हणजे बरे
वाटत होते. मग एका वर्षात आम्ही काय केले? रोज ब्रेड आमलेटचा समाचार
घेतला; नान, चिकन बिर्याणीवर ताव मारला. डॉ. बक्षींच्या घरून येणारे ताजे
दही, तूप त्यांच्या नकळत फस्त केले. रोज भारंभर फॉर्म भरले, नॉसबरोबर
राऊंड घेतला; रोज सकाळी वेळेवर प्रत्येकाच्या केसपेपरवर 'सिटी ऑल'
केले; बरणीतील जंतांना मरेपर्यंत डिवचित राहिलो, नवीन नर्सेसवर व
वॉर्डबॉइजवर हुकूमत गाजवली, रोज पंचवीस-तीस सलाइनच्या बाटल्या
चढविल्या, अधूनमधून मृत्यूचा दाखला भरला आणि ही सर्व गधामेहनत
केल्याबद्दल एक प्रशस्तिपत्रक मिळवले.

३४ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
lc4j4nyfk28ugurfd9yoi48x9f89e53
237847
237845
2026-10-13T11:30:57Z
Shurpalimedha
5041
237847
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}पॅथॉलॉजी विभागात काम करीत असताना रक्तदानाचे कामही पाहावे लागे. रक्तदानासाठी येणाऱ्या इसमाचे रक्त तपासणे, त्याचे रक्त बाटलीत जमा करणे व त्याला पंचवीस रुपये देणे, हे कामाचे स्वरूप असे. पैशाच्या आशेने अनेक माणसे रक्तदानासाठी सकाळी हॉस्पिटलबाहेर जमत. परंतु एका धटिंगण दादाच्या मेहेरबानीशिवाय कुणालाही आत जायला मिळत नसे. मिळालेल्या पैशातून त्या दादाला काही कमिशन द्यावे लागे. या गोष्टींची आम्हाला प्रथम माहिती नव्हती. एकदा असे झाले, नुकतीच मिसरूड फुटलेला एक मुलगा रक्तदानासाठी आला. रक्त घेत असताना मी त्याचे अभिनंदन करून म्हटले, "कुणाचे तरी प्राण वाचवावेत या जाणिवेने तू रक्तदानाला तयार झालास याचे कौतुक वाटते."

{{gap}}"छे डॉक्टर; मला पैशांची गरज आहे. मी कॉलेजात शिकतो; फीसाठी पैसे कमी पडले म्हणून आलो.” हे ऐकल्याबरोबर मला काही बोलवेना. त्याचे रक्त घेतले. त्याला पैसे दिले. मी पुढील कामाला लागलो. पाच-दहा मिनिटांनी तो मुलगा घाबरलेल्या अवस्थेत परत आला. आपला फाटलेला शर्ट सावरीत डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, "त्या दादाला आवरा हो! माझ्या हातातून त्याने पंधरा रुपये हिसकावून घेतले. वर म्हणतो, 'मला न विचारता आत पुन्हा गेलास तर तंगडे मोडून ठेवू.'" त्याला माझा इलाज नव्हता. वरिष्ठांना कळविणे व शाब्दिक सहानुभूती दाखवणे, यापलीकडे त्याला देण्यासारखे माझ्याजवळ काही नव्हते. पण आजही या प्रसंगाच्या आठवणीने काळजात कसेसेच होते.

{{gap}}असो. आमची हाऊसमनशिप संपली. एक वर्ष भरकन कसे निघून गेले, ते कळले नाही. आमच्या बॉसच्या कडक धोरणामुळे 'सिटी ऑल' (मागील औषधे पुढे चालू) या पलीकडे काहीदेखील शिकलो नाही. म्हणजे ज्ञानात भर शून्य. 'एम.बी.बी.एस. पर्यंत बरेचसे जे निरुपयोगी शिकलो ते विसरत चाललो होतो. त्यामुळे डोके बरेच हलके झाल्यासारखे वाटत होते; म्हणजे बरे वाटत होते. मग एका वर्षात आम्ही काय केले रोज ब्रेड आमलेटचा समाचार घेतला; नान, चिकन बिर्याणीवर ताव मारला. डॉ. बक्षींच्या घरून येणारे ताजे दही, तूप त्यांच्या नकळत फस्त केले. रोज भारंभर फॉर्म भरले, नॉसबरोबर राऊंड घेतला; रोज सकाळी वेळेवर प्रत्येकाच्या केसपेपरवर 'सिटी ऑल' केले; बरणीतील जंतांना मरेपर्यंत डिवचित राहिलो, नवीन नर्सेसवर व वॉर्डबॉइजवर हुकूमत गाजवली, रोज पंचवीस-तीस सलाइनच्या बाटल्या चढविल्या, अधूनमधून मृत्यूचा दाखला भरला आणि ही सर्व गधामेहनत केल्याबद्दल एक प्रशस्तिपत्रक मिळवले.

३४ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
m2kl6igq1hg7hjknejyg0f6o69rwv2v
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३९
104
112440
237846
237727
2026-10-13T11:25:59Z
Shurpalimedha
5041
237846
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>दवाखान्याचा शोध

{{gap}}दवाखान्याचा शोध हा जावईशोधाइतकाच कटकटीचा विषय असतो याची कल्पना तोवर मला आलेली नव्हती. दर वेळी व्हायचे असे की, एखादी जागा नक्की ठरवली म्हणजे मग त्या जागेचे क्षेत्रफळ, भाडे, दिवाबत्ती, पाणी, मालक, पागडी, शेजारची वस्ती, इतर दवाखाने याविषयी चौकशी सुरू व्हायची! हे करीत असताना मी दवाखान्यात कसा बसेन, कशी गर्दी असेल, कसा नावलौकिक होईल याची शेखमहंमदी सुरू व्हायची. इतक्यात कोठे तरी घोडे अडायचे व शोधलेल्या जागेचा विचार सोडून द्यावा लागे. पुन्हा नव्या शोधाला सुरुवात. शहरात डॉक्टरांची गर्दी फार म्हणून उपनगरात जागा शोधायचे ठरले. श्रीमंत वस्तीत आजार कमी व फॅड अधिक म्हणून गरीब वस्तीत जायचे ठरवलेले. मग चेंबूर, मानखुर्द, मरोळ, कालिना, धारावी, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर, खार; अधूनमधून रे रोड, घोडपदेव, शिवडी ही सर्व स्थळे (त्या काळी गरीब वस्तीची) पालथी घातली. कुठे भाडे अधिक; तर कुठे जागा लहान. कुठे वस्ती कमी तर कुठे अगदीच आडरस्त्याची जागा; तर कुठे जागा फ्रीहोल्ड नाही. असे करता करता दिवसांमागून दिवस गेले. महिन्यांमागून महिने गेले.

{{gap}}डॉक्टर बाहेरगावी जायचे झाल्यास तात्पुरता बदली डॉक्टर ठेवतात, त्याला 'लोकम' अशी संज्ञा वापरली जाते. दवाखान्याचा शोध चालला असताना 'लोकम'साठी मागणी आली. गोल देऊळ भागातील एक डॉक्टर रजेवर जायचे होते. त्यांचा दवाखाना सांभाळण्याचे काम मी पत्करले. त्याबद्दल रोज दहा रुपये मिळणार होते. इतका मोठा पगार मिळणार म्हणून मी खूश होतो. पण मी नवीन डॉक्टर असल्यामुळे कुणी पेशंट येतच नव्हते. रजेवर गेलेले डॉक्टर परत आले, तेव्हा मी जमवलेल्या कॅशची बेरीज पाहून त्यांनी कपाळाला हात लावला असणार! कारण त्यातून माझा पगारदेखील सुटणार नव्हता. पण डॉक्टर तसे दिलदार माणूस. ते म्हणाले, "आजपासून तू माझ्याकडे येत जा. आजवर यू हॅव लर्न्ट सायन्स ऑफ मेडिकल प्रॅक्टिस; नाऊ यू यू नीड टू लर्न दी आर्ट ऑफ मेडिकल प्रॅक्टिस.'"

{{gap}}मी रोज त्यांच्या दवाखान्यात जाऊ लागलो. बहुतेक रुग्ण डॉक्टरांना सांगायचे, "डॉक्टर, आज वाफेचे इंजेक्शन द्या, उष्णतेवर इंजेक्शन द्या.' डॉक्टर त्यानुसार इंजेक्शन द्यायचे. कुणाला कॅल्शियम ग्लुकोनेट, कुणाला पेनिसिलिन तर कुणाला बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन द्यायचे! मला वाटले, डॉक्टर पैसे उकळण्यासाठी असे सारखे इंजेक्शन देत आहेत.

{{right|मी डॉक्टर झालो । ३५}}<noinclude></noinclude>
a38zpe4dvnvli5gq14wga561p765y4u
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४०
104
112441
237850
237728
2026-10-13T11:41:32Z
Shurpalimedha
5041
237850
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>{{gap}}पन्नास वर्षांपूर्वी माणूस आजच्यासारखा पैशासाठी हावरटपणा करीत नव्हता. मी त्यांना सरळ विचारले, "डॉक्टर, तुम्ही कोणतेही 'इण्डिकेशन' नसतानादेखील अशी इन्जेक्शने देता, हे वैद्यकीय नीतिशास्त्राच्या विरुद्ध आहे असे आपल्याला वाटत नाही का?" तेव्हा ते म्हणाले, "तुला दिसतं तसं नाही, माझा प्रत्येक पेशंट हा माझा अतिथी आहे, असं मी मानतो. याला खूश करणं हे माझं पहिलं कर्तव्य. धर्मार्थ हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनची एकसारखी मागणी करणाऱ्या रुग्णाला 'आर सोल्यूशन' या नावाखाली आपण इंजेक्शन देतोच ना? हेतू असा की, त्याच्या मनाचं समाधान झालं म्हणजे मानसिक उगमाचा आजार दूर होऊ शकतो. 'आर सोल्यूशन' टोचताना वैद्यकीय नीतिशास्त्र आड येतं का इथेही तेच तत्त्व लागू व्हावं. प्रथम मी पेशन्टना इंजेक्शनची आवश्यकता नाही, हे समजावून सांगतो. पण माणूस आपली मतं सहसा बदलत नाही. तो दुसऱ्या डॉक्टरकडून इंजेक्शन घ्यायचा. बरं, सर्वच जण इंजेक्शनचे पैसे देतातच, असं नाही. जे देतात त्यांच्याकडून घेतो. नाही दिले पैसे तरी काही बिघडत नाही, असं मी त्यांना सांगतो. कारण पैशाची उणीव मला केव्हाच भासलेली नाही. एक तुला सांगतो, पेशंट आपलं दुःख घेऊन डॉक्टरकडे येतो. त्याला तुम्ही तुमच्या वागण्याने अधिक दुःखी बनवू नका. हे आपलं नीतिशास्त्र !"

{{gap}}मी दोन्ही हात जोडले व म्हटले, "गुरू, तुम्ही आज मला पहिला धडा दिलात. कोणत्याही पुस्तकात नसलेला, परंतु फार महत्त्वाचा असलेला. " मला त्यांनी म्हटलेले कळत होते, पण वळेल की नाही ही शंका होती. मनात विचार आला, घडलेले पाप गंगेत आंघोळ करून धुऊन काढण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोच ना! तसे पाप काही आपल्या अंगाला चिकटलेले नसते. नदीचे पाणी व घरच्या नळाचे पाणी यात तसा फरक नसतो. तरीदेखील तथाकथित तार्किक, शास्त्रीय बैठक असलेली अनेक माणसे च्याच पाण्यात बुडी मारण्यात सार्थक मानतात ना? नीतिशास्त्र हे माणसाने बनविले आहे. रणांगणावर शत्रुपक्षाच्या निष्पाप शिपायाला मारण्यात शौर्य दिसते, घरात शिरलेल्या उलट्या काळजाच्या दरोडेखोराला मारणे म्हणजे खून ठरतो!

{{gap}}मी ज्यांच्याकडे लोकम करीत होतो, त्या डॉक्टरांकडून खूपसे शिकलो. घरच्या नातेवाइकांची आस्थापूर्वक चौकशी कराल तरच तुम्ही खरे 'फॅमिली डॉक्टर', असे त्यांचे म्हणणे होते. “योग्य वैद्यकीय सल्ला द्या, पण तो रुचेल, पचेल की नाही हेदेखील पाहा. उदाहरणार्थ, हर्निया या विकारासाठी

३६ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
ozxk5rvij75b41qyarh1bnsek69uk31
पान:छत्रपति शिवाजीमहाराज यांचे चरित्र.pdf/१
104
112478
237836
2026-10-13T06:31:32Z
~2026-55065-33
6259
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
237836
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="103.131.186.116" /></noinclude><noinclude></noinclude>
f7486io8avja4myhhe27ofc7cmkyn7v
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४१
104
112479
237851
2026-10-13T11:42:42Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "'ऑपरेशन करा' असे पुस्तकात लिहिलेले असते. पण एक-दोन वर्षाच्या मुलाचे ऑपरेशन करण्यासाठी घाई करू नये, कारण भूल दिल्याचे उपद्रव होण्याचा संभव अधिक असतो. ऐंशी वर्षांचे वृद्ध असल्यास त..."
237851
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>'ऑपरेशन करा' असे पुस्तकात लिहिलेले असते. पण एक-दोन वर्षाच्या
मुलाचे ऑपरेशन करण्यासाठी घाई करू नये, कारण भूल दिल्याचे उपद्रव
होण्याचा संभव अधिक असतो. ऐंशी वर्षांचे वृद्ध असल्यास त्यांचेही ऑपरेशन
करण्याचा सल्ला देऊ नये. कारण ते जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर पोचलेले
असतात, ऐन जवानीत किंवा काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ
ऑपरेशनचा सल्ला द्यावा," असे ते म्हणाले. सर्जरीच्या पुस्तकात असे काही
लिहिलेले नव्हते.
यावरून आतापर्यंतचा पाच वर्षांचा अभ्यास व एक वर्षाची हाऊसमनशिप
यांचा फारसा उपयोग होत नाही याची जाणीव मला होऊ लागली, अनुभवाचे
महत्त्व कळू लागले. डोक्यातील फाजील हवा कमी होऊ लागली! पण
अनुभव काही बाजारात विकत मिळत नव्हता किंवा वाचूनही येत नव्हता.
आता स्वर्ग दिसण्यासाठी स्वतः मरावे लागणार होते; म्हणजे आता स्वतः
कार्यानुभव घेणे व भरपूर कार्यानुभव असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे
आवश्यक होते. शून्यापासून पुन्हा सुरुवात करायची. ख्यातनाम कर्करोगतज्ज्ञ
डॉ. बोर्जिस यांनी एका व्याख्यानात सांगितलेले शब्द आठवले, "माणूस
हा चुका करून शिकतो. तस्मात, इतरांच्या चुकांपासून शिकणे, हे
शहाणपणाचे. " पण तशा चुका कोण कबूल करणार? कबूल करायला धैर्य
लागते; मनाची विशालता लागते. हे धैर्य मी डॉ. बोर्जेस, डॉ. आर्थर डिसा,
डॉ. फडके, डॉ. बालिगा, डॉ. गिंडे यांसारख्या थोर पुरुषांजवळ असलेले
पाहिले आहे. पुढे मीदेखील माझ्या दवाखान्यात लोकम ठेवून बाहेरगावी
जात असे. परत आल्यावर त्यांना सांगत असे, "लेको, तुम्ही जनरल प्रॅक्टिस
करणार असाल, तर थोडे दिवस दवाखान्यात येऊन बसा." पण कुणीही
आले नाही! सर्वांची तऱ्हा एकच. "तुम्ही लोकमसाठी रोज मला तीस रुपये
देणार की चाळीस? मी सकाळी जरा उशिरा येईन, कारण एम. डी. ला रजिस्टर
केले आहे आणि मी व्हिजिटबिजिटला जाणार नाही हं!" असे ते सांगत.
मी परत येईपर्यंत एक-दोन इंजेक्शन सिरिंज फोडून टाकलेल्या, ब्लडप्रेशर
कफ तुटलेला, थर्मामीटर फुटलेले असे आढळे. 'कामगार विमा योजने'चे
रुग्ण तर लोकमच्या नावे शंख करीत, कारण त्यांनी दिलेल्या दाखल्यात अनंत
चुका झालेल्या असत! वर लोकम मला सुनावत असे, "जनरल प्रॅक्टिसमध्ये
आहे काय मोठे? एक सिरींज, एक बी कॉम्प्लेक्स व एक टेरामायसिनचा
बल्ब असला की झाले!” टिंक्चर ओपियमचा डोसदेखील माहीत नसलेला
हा लोकम मला हे शिकवतो, तेव्हा मी निमूटपणे सर्व ऐकून घेत असे. कारण
मी डॉक्टर झालो । ३७<noinclude></noinclude>
3qflnq62g0zyu60rddr42px0lzxnouc
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४२
104
112480
237852
2026-10-13T11:43:06Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तो मला पुन्हा भेटणार नसे. लोकमने पेशन्टला 'परलोकम्' दाखविला नाही, ही त्याची मेहेरबानी! मनात येई, हे असे का? आजच्या पिढीला देण्याचीही इच्छा नाही की घेण्याचीही ईर्ष्या नाही; याचेच ना..."
237852
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>तो मला पुन्हा भेटणार नसे. लोकमने पेशन्टला 'परलोकम्' दाखविला नाही,
ही त्याची मेहेरबानी!
मनात येई, हे असे का? आजच्या पिढीला देण्याचीही इच्छा नाही की
घेण्याचीही ईर्ष्या नाही; याचेच नाव असावे 'जनरेशन गॅप' !
दवाखान्यासाठी शोधाशोध करून थकलो, तेव्हा एका वर्तमानपत्रात
जाहिरात दिली. भराभर उत्तरे आली. त्यातील काही नमुने असे:
"आम्हाला आपण भेटून आपल्या गरजा कळवा. कमिशन फक्त दोन
टक्के. "
"भांडूप व मुलुंडच्या मध्यात रेल्वे लाइनपासून दोन फर्लांग पूर्वेला
(म्हणजे जंगलात) आमचा प्लॉट आहे. आपण स्वखर्चाने दवाखाना बांधावा.
रु. पाच हजार डिपॉझिट द्यावे लागतील. "
"सोनापूर लेन - कुर्ला येथील आमचा दवाखाना विकणे आहे. जागा १२५
स्क्वेअर फूट, गुडवुईलच्या किमतीसंबंधी समक्ष भेटीत बोलू!”
ही माहिती विनोदी असली तरी खरी आहे.
दादरला एकदा वसई-विरारच्या बाजूचे एक कार्यकर्ते भेटले. (पुढे ते मंत्री
झाले. ) ते मला आवर्जून म्हणाले, "वज्रेश्वरीच्या अलीकडे एक गाव आहे.
तेथे वस्ती भरपूर आहे, पण दवाखानाच नाही. तुमची प्रॅक्टिस छान चालेल!"
मी व माझा मित्र त्या गावी गेलो. गाव चारी बाजूला उजाड होते. रस्त्याच्या
कडेला आदिवासी लोकांच्या चार-सहा झोपड्या, बाकी सर्व सामसूम.
आम्हाला पाहून एक तरुण आपली लंगोटी सावरीत बाहेर आला.
"कोण पाहिजे?"
"आम्ही दोघे डॉक्टर आहोत. दवाखाना काढायच्या उद्देशाने येथे आलो
आहोत. साहेब सांगत होते ते दाट वस्तीचे गाव किती दूर आहे?"
" हेच ते गाव. वस्ती ही इतकीच. आजूबाजूच्या गावासाठी सरकारी
डॉक्टर नेमलेले आहेत. ते नुसते बसून असतात. कुणी आजारीच पडत नाही.
आणि कुणी आजारी पडलाच, तर सरकारी डॉक्टर येण्यापूर्वीच आम्ही त्याला
वसईला घेऊन जातो. सध्या आम्हाला गरज आहे ती गुरांच्या डॉक्टरची." हे
ऐकून आम्ही तिथून पळ काढला.
दवाखान्याच्या शोधाचे तीन महिने म्हणजे मला तीन वर्षांसमान वाटले.
अखेर एके रात्री रस्त्यावर आम्हा मित्रांच्या भोजनोत्तर गप्पा चालल्या असताना
शेजारून 'दीपक सिनेमा जवळ राहणारा एक शिंपी येताना दिसला. त्याला
३८ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
e0bteqx22tmamzd1magdhfa6h8qhkcw
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४३
104
112481
237853
2026-10-13T11:43:34Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आमच्या मित्राने हटकले, “सावंत, बाजार आळीत एखादी जागा विकणे आहे का हो?" तात्काळ त्याने उत्तर दिले, “हो, विरजी शेटच्या तीन गाळ्यांतील एक गाळा विकणे आहे असे म्हणत होते.” झाले, पुन्हा चक..."
237853
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>आमच्या मित्राने हटकले, “सावंत, बाजार आळीत एखादी जागा विकणे
आहे का हो?" तात्काळ त्याने उत्तर दिले, “हो, विरजी शेटच्या तीन
गाळ्यांतील एक गाळा विकणे आहे असे म्हणत होते.” झाले, पुन्हा चक्रे सुरू
झाली. या खेपेला मात्र चोवीस तासांत चौकशी आटोपून खरेदी विक्रीचे
कागदपत्रदेखील झाले. वेळ आली की झटपट कामे उरकतात ती अशी. जागा
एकदाची पदरात पडली. 'काखेत कळसा व गावाला वळसा' म्हणतात, ही
जागा आमच्या राहत्या घरापासून अर्ध्या फर्लांगावर. पण ती सापडण्यासाठी
सबंध मुंबईभर पायपीट करावी लागली!
आमचे चुलतकाका डॉक्टर होते. त्यांचा दवाखाना माझ्या जागेपासून
अगदी जवळ, दक्षिणेला फर्लांगभर अंतरावर माझ्या जिवाभावाच्या दोस्ताचा
दवाखाना, तर शेजारच्या आळीत आमच्या वर्गबंधूंचा दवाखाना. आता मात्र
माझी स्थिती अर्जुनासारखी झाली. मी संभ्रमात पडलो. चटकन 'गुरू'ची
आठवण झाली. फोन लावला, "गुरू, आता काय करू?"
गुरू तर महावस्ताद ! म्हणाले, "बेटा ऊठ, एव्हरीथिंग इज फेअर इन
लव्ह, वॉर, इलेक्शन अँड प्रोफेशन. हा स्टेथोस्कोप उचल. माम् अनुस्मर
आणि हो पुढे. " मला धीर आला. माझा तसा नशिबावर विश्वास नाही, पण
कधी कधी वाटे, कर्तृत्व + संधी = नशीब असे समीकरण असावे. एरवी
हुशार असणारे विद्यार्थी कधी कधी प्रॅक्टिसमध्ये साफ घसरतात, तर
यथावकाश उत्तीर्ण होणारा विद्यार्थी आपल्या प्रॅक्टिसचा जम झटपट बसवतो.
आमचे एक स्नेही सांगायचे, "नदीत पाणी खूप आहे. ज्याने जितके मोठे भांडे
आणले असेल तितके त्याला पाणी मिळणार. तुम्ही जर पळीपंचपात्री आणली,
तर त्यात नदीचा काय दोष?"
सुतार आले, प्लंबर कामाला लागला. इलेक्ट्रिशियनने वायरिंग चालू
केले. रंगवाल्याने रंग फासायला सुरुवात केली. झटपट काम चालू झाले.
दवाखाना तयार झाला. आमच्या वडिलांनी होते नव्हते ते सर्व पैसे
दवाखान्यासाठी दिले. तरीदेखील काही कारागिरांचे पैसे द्यायचे राहिले होते,
तेव्हा वडिलांनी ज्यांना उसनवार पैसे दिले होते, ते दोन-तीन हजार रुपये परत
मिळविण्याच्या प्रयत्नाला लागलो. पण कसचे काय! त्यातील एक पैसादेखील
परत मिळाला नाही. वडिलांना याची कल्पना होतीच. ते म्हणाले, "हे बघ,
जग हे असं आहे. तेव्हा लक्षात ठेव. पैसे नसले तर गरिबांना मोफत औषध
दे, पण उधार देऊ नकोस. उधारीमुळे प्रामाणिक माणूसदेखील लबाड बनतो."
वडिलांचा सल्ला मी पाळला.
मी डॉक्टर झालो | ३९<noinclude></noinclude>
86fw7ujlpm0stcg5n1mykxdd8f7scpb
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४४
104
112482
237854
2026-10-13T11:43:52Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रॅक्टिसचे दिवस अखेर मी एकदाचा दवाखाना थाटला. डॉक्टर या नात्याने मार्गाला लागलो. वाटले, सुरवंटाचे फुलपाखरू झाले. मोकळ्या हवेत आलो; पण तो तर आभास होता. आता मोकळ्या हवेतून मी बंद खो..."
237854
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>प्रॅक्टिसचे दिवस
अखेर मी एकदाचा दवाखाना थाटला. डॉक्टर या नात्याने मार्गाला
लागलो. वाटले, सुरवंटाचे फुलपाखरू झाले. मोकळ्या हवेत आलो; पण तो
तर आभास होता. आता मोकळ्या हवेतून मी बंद खोलीत कोंडून घेतले होते!
संध्याकाळी लोक समुद्रावर सहकुटुंब फिरायला जात असताना,
पेन्शनर
शिवाजी पार्कच्या कठड्यावर बसून जगाच्या प्रश्नांचा ऊहापोह करीत
असताना, कॉलेजकुमार तरुणीमागून लाइन मारीत असताना मी दहा गुणिले
पंधराच्या दवाखान्यात स्टेथोस्कोपच्या नळ्या कानात कोंबून 'सकाळपासून
किती जुलाब झाले?' याची विचारपूस करणार होतो ! रक्तिम सूर्याचे डुंबणे,
लाटांचे ढंग, आकाशातील बदलते रंग, सर्वांगाला गुदगुल्या करणारा गार
वारा, समुद्राचा अर्धवर्तुळाकार किनारा यांची सोबत आता दुर्मिळ होणार
होतो. संध्याकाळी भेटणारे मित्र, वाचनालय, नाटक, व्याख्याने यांना पारखे
व्हावे लागणार होते.
तरीही एक सुखद कल्पना मनाला स्पर्शन जायची. समजा, मी दिलेल्या
औषधाने कुणाला गुण आला, तर एखादा रुग्ण 'दवा' घेऊन 'दुवा' देणार
होता. पण कुणी औषधाला आले तर ना! पहिल्या दिवशी खूप गर्दी झाली.
ती गर्दी होती शुभेच्छा व्यक्त करणाऱ्यांची व आइस्क्रीम खायला टपलेल्या
शेजारच्या पोराटोरांची. दुसऱ्या दिवशी सर्व सामसूम ! दवाखान्यात फक्त मी व
दवाखाना साफ करणारा नारायण. बसल्या बसल्या मी विचार करीत होतो.
'मन चिंती ते वैरी न चिंती' म्हणतात तसे. समजा माझी प्रॅक्टिस चालली
नाही तर कसे व्हायचे? खर्चाचे मीटर तर चालू झाले. दवाखान्याचे भाडे,
नारायणचा पगार, इलेक्ट्रिसिटीचे बिल, नवीन शिवलेल्या सुटाचा धुलाई खर्च,
वगैरे मिळून महिन्याचा खर्च रु. दोनशे होणार होता. रस्त्यावर जाणारी येणारी
माणसे दवाखान्यासमोर थांबत, तेव्हा मला वाटायचे, एखाददुसरा आत येईल.
पण रस्त्यावरचा माणूस क्षणभर थांबायचा, दवाखाना पाहायचा, मग माझ्या
केसापासून पायापर्यंत न्याहाळायचा व पुढे जायचा! मी मात्र भिंतीवर ओळीने
लावलेल्या सर्टिफिकेट्सवरून नजर फिरवायचा. पाच वर्षे मानेवर अभ्यासाचे
जू बाळगून मिळविलेले 'एम.बी.बी.एस.'चे सर्टिफिकेट, त्या शेजारी एक
वर्षाच्या हाऊसमनशिपचा दाखला, त्यानंतर सेंट जॉन अॅम्ब्युलन्सचे
प्रमाणपत्र, त्या जवळ कॉलेजातील डॉ. शिरवळकर गोल्ड मेडल व सिल्व्हर
मेडलचे सर्टिफिकेट, या सर्वांचा काही एक उपयोग नव्हता. ही सर्टिफिकेटे
पाहून रुग्ण माझ्या दवाखान्यात येणार नव्हता. ब्राँकायटिस, न्युमोनिया,
४० 1 गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude>
iw3m3wur8m0igos59fo8o666tsrtn9t
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४५
104
112483
237855
2026-10-13T11:44:08Z
Shurpalimedha
5041
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अल्सर, डिसेंट्री, टायफॉइड, मलेरिया व इतर शेकडो विकार मी सहज बरे करू शकतो, हे त्यांना कसे सांगणार? हातात बाटली घेतलेले रुग्ण 'डॉक्टर नवा आहे' असे पुटपुटत पुढे जायचे. खरे आहे. नव्या डॉक..."
237855
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Shurpalimedha" /></noinclude>अल्सर, डिसेंट्री, टायफॉइड, मलेरिया व इतर शेकडो विकार मी सहज बरे
करू शकतो, हे त्यांना कसे सांगणार? हातात बाटली घेतलेले रुग्ण 'डॉक्टर
नवा आहे' असे पुटपुटत पुढे जायचे. खरे आहे. नव्या डॉक्टरपेक्षा जुना रोगी
शहाणा !
माझ्या पहिल्या पेशंटचे नाव - सोगीबाई उमेदमल. समोरच्या गल्लीतील
मारवाड्याची बायको. तिने दवाखान्यात पाय ठेवला तेव्हा वाटले- चला,
धन्वंतरी पावला. तिचा कान दुखत होता. रात्रभर तिला झोप लागली नव्हती.
मी कान तपासला. तपासला म्हणण्यापेक्षा नुसता पाहिला. आत काही दिसले
नाही. पण काय पाह्यचे ते माहीत असेल तर ना? सर्जरीच्या प्रश्नपत्रिकेत
न्यूरोब्लास्टोमा, रिट्रोपेरिटोनियल सार्कोमा यांसारख्या मोठमोठ्या दुर्मिळ
आजारांवर प्रश्न विचारले जायचे; त्यामुळे कान, नाक, घसा यांसारख्या मामुली
अवयवांवर प्रश्न विचारायला प्रश्नपत्रिकेत जागा नसायची! परीक्षेत पास
होण्यासाठी कानाच्या आजारांचा अभ्यास करण्याची गरज नव्हती. कान
धुण्याची कोरी करकरीत सिरींज काढली व नळाचे पाणी भरून कानात भराभर
चार-दोन पिचकाऱ्या मारल्या. अर्धेअधिक पाणी माझ्याच अंगावर पडले.
कानात घालण्यासाठी ग्लिसरिन कॉर्बोलिक ड्रॉप्स दिले. पेशंट मारवाडी
असल्यामुळे; डॉक्टर महागडा वाटू नये म्हणून मी फक्त आठ आणे घेतले.
( तेदेखील तिच्या नवऱ्याने तोंड वाकडे करीत दिले.) त्यानंतर बरेच दिवस
सोगीबाई किंवा तिचा नवरा माझ्या दवाखान्याच्या बाजूला फिरकला नाही;
तेव्हा माझ्या ट्रीटमेंटचा काय परिणाम झाला असावा याचा अंदाज आला.
सांगायचे असे की, त्या दिवशीची सकाळची कमाई फक्त आठ आणे !
संध्याकाळी पेशंट आला. त्याचे नाव होते- तोलनखान. माझ्या
दवाखान्यासमोर तो फळे विकायला बसायचा. बाटली हातात घेऊन खोकत
खोकत आत शिरून म्हणाला, "नये डॉक्टर आये है, तो सोचा देखू आपके
हातका जस!” त्याच्या छातीचा पिंजरा तपासून पाहिला. त्याला जुना दमा
होता. मनात आले, त्याला स्ट्रॅमोनियम मिक्श्चर व एफेड्रीन गोळ्या द्याव्यात.
त्यावेळी मी दवाखान्यात कंपाऊंडर नेमलेला नव्हता, कारण कंपाऊंडर
परवडणार नव्हता. तेव्हा मीच स्ट्रॅमोनियम मिक्चर बनविण्यासाठी औषधाच्या
कॅबिनमध्ये शिरलो. एक मिक्श्चर बनविण्यासाठी सुमारे वीस मिनिटे लागली.
औषधे व गोळ्या तोलनखानाच्या हातावर ठेवून मी म्हटले, "एक एक खुराक
दिन में चार बार, एक एक गोली के साथ लेना.” तोलनखानने पुढचा प्रश्न
मी डॉक्टर झालो । ४१<noinclude></noinclude>
7lswnba73ll07glzbt3kd99eu8pn7qd