विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.24
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/१३६
104
5306
237857
15049
2026-10-13T12:04:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237857
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''१०९'''|'''वृत्तविचार'''}}</noinclude>आहे. परन्तु ही अुणीव नाहीशी करितांच येणार नाही असें मात्र नाही. समचरणांतील दुसऱ्या गणांत मात्र (‿ _ ‿ _ _) हाच गण लागतो.
{{gap}}मराठीत गीतीला आर्या म्हणण्याचा प्रघात आहे. वस्तुतः आर्या ही गीतीच्या समचरणांत अन्त्य दोन गणांच्या ठिकाणी (‿ _ _ +) हा गण घातल्यानें होते.
{{Block center|<poem>"प्राकृत भाषेमध्ये
आर्या म्हणती जिला जुनाट कवी
गीति असून खरी ती
संस्कृत छन्दोविदां जनां ठकवी." (पार २९)
"आर्या आर्यासि रुचे
अीच्या ठायीं जसी असे गोडी
आहे अितरां छन्दीं
गोडी, परि यापरीस ती थोडी." (मोभीभ १०)</poem>}}
{{gap}}'''आर्यागीति''' ही गीतीच्या समचरणान्तीं अेक अेक गुरु वाढविल्याने सिद्ध होते.
{{Block center|<poem>"वृत्ती आधी आर्या
श्राव्या सेव्याचि फार साधी आर्या,
युक्ता सद्ययमकांनी
प्यावी रसिकीं करूनि अुद्यम कानीं." (मोकृवि १।५)</poem>}}
{{gap}}मोरोपन्तकृत कृष्णविजय पूर्वार्ध आणि अुत्तरार्धातील पहिले पाच अध्याय, आणि प्रल्हादविजय हीं काव्यें आर्यागीतीमध्ये आहेत.
{{gap}}आर्यागीति समयक रचण्याची वहिवाट संस्कृतांत रविकीर्तींच्या काळापासून दिसते. पहा
{{Block center|<poem>"येनायोजि न वेश्म
स्थिरमर्थविधौ विवेकिना जिनवेश्म
स विजयतां रविकीर्तिः
कविताश्रितकालिदासभारविकीर्तिः" (अैहोळे शिलालेख)</poem>}}

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
6o5y2n8q0iy8oaaokc8xn4jqz4alvmc
पान:छन्दोरचना.djvu/137
104
5853
237858
15640
2026-10-13T12:24:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237858
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}</noinclude>{{center|{{x-larger|'''वृत्तविस्तार'''}}}}
{{center|'''परिच्छेद १ ला'''}}
{{center|{{x-larger|'''अनावर्तनी वृत्तें'''}}}}
{{center|'''१ श्री - वर्ग'''}}
{{gap}}पुढील ऱ्हस्वतम वृत्तांचा नामनिर्देश करून ठेवण्यापलीकडे त्यांचे काही
प्रयोजन नाही.

| १ || श्री || [ _ ] || ६ || स्त्री || [ _ _ ]

| २ || मद|| [ ‿ ‿ ]|| ७ || रजनी || [ ‿ ‿ _ ]

| ३ || सुख || [ ‿ _ ]|| ८ || मन्दर || [ _ ‿ ‿ ]

| ४ || दुक्ख || [ _ ‿ ] || ९ || मृगेन्द्र || [ ‿ _ ‿ ]

| ५ || कमल || [ ‿ ‿ ‿ ]|| १० || सुरतरु | [ ‿ ‿ ‿ ‿ ]

{{center|{{x-larger|टीपा}}}}
[ज्या नावापुढे कंसांत हे हें अक्षर आहे पण पुढे आकडा नाही तें नाव हेमचन्द्राने दिलेले नसून हेमचन्द्राने दुसऱ्याचें टिपून ठेविलेलें आहे असें समजावें]
{{gap}}'''१ श्री''' (हे २/१), ह्री (भ ३२/४६), गौ (विवृ ५/१). '''२ मद''' (हे २/३), पुष्प (हे), मधु (प्रापै २/५), गिरिधर (ना). '''३ सुख''' (हे २/५), मही (प्रापै २/७), दिगन्त (ना). '''४ दुक्ख''' (हे २/४), सारु (प्रापै २/९). '''५ कमल''' (प्रापै २/२५), परम (ना).
{{gap}}'''६ स्त्री''' (हे २/२), पद्म (हे), नौ (विवृ ५/२), काम (प्रापै २/३), गर्व (ना ). '''७ रजनी''' (भ ३२/५४, हे), मदन (हे २/९), रमण (प्रापै २/१७), प्रवर (ना). '''८ मन्दर''' (प्रापै २/२३). '''९ मृगेन्द्र''' (प्रापै २/२१). '''१० सुरतरु''' (ना).{{nop}}<noinclude></noinclude>
hrc597ztwo9prcs6ml2jn0rsipg8mxs
237859
237858
2026-10-13T12:25:39Z
कल्पनाशक्ती
3813
237859
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}</noinclude>{{center|{{x-larger|'''वृत्तविस्तार'''}}}}
{{center|'''परिच्छेद १ ला'''}}
{{center|{{x-larger|'''अनावर्तनी वृत्तें'''}}}}
{{center|'''१ श्री - वर्ग'''}}
{{gap}}पुढील ऱ्हस्वतम वृत्तांचा नामनिर्देश करून ठेवण्यापलीकडे त्यांचे काही
प्रयोजन नाही.

| १ || श्री || [ _ ] || ६ || स्त्री || [ _ _ ]

| २ || मद|| [ ‿ ‿ ]|| ७ || रजनी || [ ‿ ‿ _ ]

| ३ || सुख || [ ‿ _ ]|| ८ || मन्दर || [ _ ‿ ‿ ]

| ४ || दुक्ख || [ _ ‿ ] || ९ || मृगेन्द्र || [ ‿ _ ‿ ]

| ५ || कमल || [ ‿ ‿ ‿ ]{{gap}}{{gap}}|| १० || सुरतरु || [ ‿ ‿ ‿ ‿ ]

{{center|{{x-larger|टीपा}}}}
[ज्या नावापुढे कंसांत हे हें अक्षर आहे पण पुढे आकडा नाही तें नाव हेमचन्द्राने दिलेले नसून हेमचन्द्राने दुसऱ्याचें टिपून ठेविलेलें आहे असें समजावें]
{{gap}}'''१ श्री''' (हे २/१), ह्री (भ ३२/४६), गौ (विवृ ५/१). '''२ मद''' (हे २/३), पुष्प (हे), मधु (प्रापै २/५), गिरिधर (ना). '''३ सुख''' (हे २/५), मही (प्रापै २/७), दिगन्त (ना). '''४ दुक्ख''' (हे २/४), सारु (प्रापै २/९). '''५ कमल''' (प्रापै २/२५), परम (ना).
{{gap}}'''६ स्त्री''' (हे २/२), पद्म (हे), नौ (विवृ ५/२), काम (प्रापै २/३), गर्व (ना ). '''७ रजनी''' (भ ३२/५४, हे), मदन (हे २/९), रमण (प्रापै २/१७), प्रवर (ना). '''८ मन्दर''' (प्रापै २/२३). '''९ मृगेन्द्र''' (प्रापै २/२१). '''१० सुरतरु''' (ना).{{nop}}<noinclude></noinclude>
bv3sj7peuterfortblwxm9oewqydy9y
अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf
106
74682
237876
236729
2026-10-13T14:54:57Z
कल्पनाशक्ती
3813
237876
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार" 156="वि.स. खांडेकर आणि सांगली" 164="नटवर्य मामा पेंडसे" 176="श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )" 191 ="राजमतीबाई पाटील"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

qymkj165zxzojqjtxt8yigc6i8upw2d
237883
237876
2026-10-13T15:35:39Z
कल्पनाशक्ती
3813
237883
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार" 156="वि.स. खांडेकर आणि सांगली" 164="नटवर्य मामा पेंडसे" 176="श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )" 191 ="राजमतीबाई पाटील" 197="श्री. दा. पानवलकर"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

iie2gn95l6un4uslhxbb23wjkfw7p80
237891
237883
2026-10-13T16:24:30Z
कल्पनाशक्ती
3813
237891
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार" 156="वि.स. खांडेकर आणि सांगली" 164="नटवर्य मामा पेंडसे" 176="श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )" 191 ="राजमतीबाई पाटील" 197="श्री. दा. पानवलकर" 204 ="सय्यद अमीन"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

21js8cfz9ejed9lgoefslweilf73yz5
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७६
104
77710
237860
203207
2026-10-13T13:45:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237860
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{x-larger|रंगभूमीच्या सुवर्णकाळातील निष्ठावंत मानकरी}}}}
{{center|{{xx-larger|'''श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}सांगलीच्या एस.टी. स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याला डॉ. बापट बालशिक्षण मंदिरासमोर एक छोटीशी गल्ली काटकोनात फुटते. त्या गल्लीचं नाव फौजदार गल्ली. वाढत चाललेल्या शहराच्या अवाढव्य पसाऱ्यात, कोणाच्या खिजगणतीतही नसलेली ती गल्ली. त्या गल्लीत राहणाऱ्या माणसांना आपल्यापलीकडे काही मोठे 'विश्व' आहे याची कल्पना नाही आणि त्या विश्वाचा धागादोरा आपल्यापर्यंत पोचलेला आहे ह्याची तर तिळमात्र कल्पना नाही !

{{gap}}आणि अचानक एक दिवस या गोष्टीचा साक्षात्कार झाला !

{{gap}}१३६७, फौजदार गल्लीच्या छोट्याशा, जुन्या वळणाच्या दगडी घरात एके दिवशी प्रत्यक्ष गानसम्राज्ञी लता मंगेशकरच अवतरली! किती गुपचूप आली तरी चाफ्याचा सुगंध लपणार कसा? रस्त्याने येतानाच कुणा रसिका पुकारा केला “लता बाई आल्यात.” बघता बघता गर्दी जमली. आपल्या गणूमामाना, त्यांच्या कुटुंबियांना, भेटायला म्हणून लताबाई आल्या खऱ्या, पण त्या छोट्या घराला गर्दीने वेढले. काही अुत्साही लोक लताबाईंना पहायला म्हणून घरातच शिरले. काही अतिअुत्साही मंडळी घराच्या तुळ्यांवर चढली. स्वरसम्राज्ञीला बघण्यासाठी एकच झुंबड अुडाली. आता परिस्थिती हाताबाहेर जाणार असे दिसल्यावर लताबाईंनी आपली भेट आवरती घेतली.

{{gap}}तेव्हा अनेकाना प्रथमच समजलं. आपल्याच गल्लीत राहणारे मोहिते म्हणजेच गणूमामा, जुन्या काळातील प्रख्यात नटश्रेष्ठ गणपतराव मोहिते अुर्फ "कुलवधू" वाले मा. अविनाश!

{{gap}}आजच्या पिढीला, प्रत्यक्ष लतादीदी अितकं मानतात ते गणपतराव मोहिते आहेत तरी कोण असा प्रश्न स्वाभाविकच पडेल तेव्हा त्यांचा जीवनपटच अुलगडून बघायला हवा.

{{gap}}आज नव्वदीच्या घरात असलेले मा. अविनाश म्हणजे जुन्या किर्लोस्करी पद्धतीच्या संगीत नाटकांतून आणि नंतरच्या काळात, 'कुलवधू' धर्तीच्या सुगम<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर............................१५२</noinclude>
0h2izo2kju41p3dcbdnavu4ktr7p27z
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७७
104
77711
237861
203209
2026-10-13T14:06:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237861
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>संगीताच्या अंगाने जाणाऱ्या, नव्या संगीत नाटकांतून सारख्याच ताकदीने गाणारे एकमेव हयात नटश्रेष्ठ आहेत. या दोन्ही नाट्यपरंपरेत पारंगत असणे हे सकृतदर्शनी दिसतं तेवढं सोपं नाही. शास्त्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या तंत्रशुद्ध कसोटी फलंदाजाला, एकदम आडवे तिडवे फटके मारण्याची गरज असणाऱ्या अेक दिवसीय क्रिकेट सामन्यात खेळवण्यासारखे आहे.

{{gap}}पण मा. अविनाशानी दोन्ही प्रकारांमध्ये सुयश मिळवले हे महत्त्वाचे. दोन्ही प्रकारच्या संगीत परंपरांचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे, मा. अविनाश म्हणजे गेल्या ८०-९० वर्षाचा, नाट्यकलेचा चालता-बोलता अितिहासच आहे.

{{gap}}अशा या अविनाशांचा, गणपतराव मोहिते, यांचा जन्म १ जानेवारी १९०९चा. त्यांचं बालपण सांगली-मिरजेत गेलं. खरं म्हणजे बालवयातच, म्हणजे अगदी वयाच्या ६ व्या- ७ व्या वर्षापासूनच, त्यांची रंगभूमी - कारकीर्द सुरू झाली. घरातच गाण्याचं बाळकडू मिळालं. त्यांचे वडील लक्ष्मणराव मोहिते हे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर या प्रख्यात संगीतशार्दुलाचे शिष्य. त्यामुळे घरातल्या घरातच, येता- जाता गाणं कानांवर पडायचं. वडिलांमुळेच अविनाशना, विष्णु दिगंबर पलुस्कर, चाफेकरबुवा, नीलकंठबुवा जंगम यांचं गायन ऐकायला मिळालं. गाण्याची ओळख वडिलांमुळे, तर अभिनयाची ओळख बंधु शंकरराव मोहिते यांच्यामुळे झाली. घरची थोडीशी शेती होती. गणपतरावांसह घरात आठ भावंडं. चुलत भावंडांसह मोठा बारदाना. नुसत्या शेतीवर कुटुंबाची गुजराण होणे कठीण. त्यामुळे गणपतरावांचे थोरले बंधू नाटक कंपनीत शिरले. 'स्वदेशी हितचिंतक,' 'नाट्यविनोद' अशा नाटकमंडळीत ते काम करत. ते काही काळ 'ललितकले' मध्ये होते. नंतर ते 'बलवंत संगीत' मंडळीत स्थिरावले. गणपतरावाना पण नाट्यव्यवसायाची थोडीशी ओळख व्हावी म्हणून ललितकलेत काही काळ ठेवण्यात आलं होतं. तेथे संगीतसूर्य केशवराव भोसले याना जवळून पहायला मिळालं. अितकंच काय, पण छोट्या गणूचा गोड गळा ऐकून केशवरावानी 'शापसंभ्रम' नाटकात त्याला छोटीशी भूमिकाही दिली. त्या भूमिकेतील एका गाण्याच्या दोन-दोन ओळी, मा. अविनाशना आज ९२ व्या वर्षीसुध्दा आठवतात. "द्राक्ष, जांब, डाळिंब फळे मी खायाला जाते...... कादंबरीची कुसुम कंचुकी गुंफाया जाते.”

{{gap}}ज्या रंगभूमीवर आयुष्याची ६०-७० वर्षे, मा. अविनाश घालवणार होते, त्याचे पदार्पण असे केशवरावांच्या आशीर्वादाने झाले ही मोठी भाग्याचीच गोष्ट. थोरल्या बंधूंमुळे अभिनयाची जाण त्याना खूप लहान वयातच आली.

{{gap}}अिकडे सांगलीच्या दोन नंबर शाळेत शिक्षण चालू होते. वर्गशिक्षक पटवर्धन<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर................................. १५३</noinclude>
lfiqalqegs7cz301bykklkuf2x8e7gu
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७८
104
77712
237862
203210
2026-10-13T14:10:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237862
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>गाण्याचे मोठे शौकीन. ते छोट्या गणूकडून रोज एक तरी गाणं म्हणवून घेत. "नापास झालास तर मी पास करेन पण गाणं सोडू नकोस" असा त्यांचा आग्रह असायचा. तसं गणपतरावांचं गंडाबद्ध असं संगीत-शिक्षण, कोणाकडं झालं नाही. मात्र गणपतीबुवा भिलवडीकर यांजकडे थोडं शिक्षण झालं. गळा आणि अभिनय अुपजतच अंगी असावा.

{{gap}}घरच्या परिस्थितीच्या रेट्यामुळे शाळा अर्धवटच सोडून थोरल्या बंधुंमुळे अवघ्या ७ व्या वर्षीच, गणपतराव 'बलवंत' चे पगारी नोकर बनले. त्यांचा पगार रु.५/- तर बंधुंचा पगार रु. २५/- दोघांचेहि पगार त्यांच्या हातात मिळत नसत. कंपनीच्या मुक्कामाहून ते पैसे सांगलीला परस्पर वडिलांकडे पाठवले जात. (मा. अविनाश आता गंमतीने सांगतात की स्वतःच्या हातात पैसा असा त्यानी वयाच्या तिशीनंतरच बघितला!) नाटक कंपनीत बालनटांना थोडे शिक्षण दिले जाई. ही ‘बलवंत' संगीत मंडळी, प्रख्यात 'किर्लोस्कर' नाटक मंडळी फुटल्यानंतर स्थापन झाली. बालगंधर्वानी 'गंधर्व' नाटक मंडळी काढली, तर मा. दीनानाथ, चिंतामणराव कोल्हटकर आदी मंडळीनी 'बलवंत संगीत मंडळी' स्थापन केली. नटश्रेष्ठ चिंतामणराव स्वतः छोट्या गणूचा चौथीचा अभ्यास घेत. खासगी रीत्या गणपतरावांचे एक दोन वर्षे शिक्षण झालं. थोडी झटापट इंग्रजी भाषेबरोबरही झाली. रंगभूमीवरचं शिक्षण मात्र जोरात सुरू झालं.

{{gap}}सुरुवातीच्या काळात, गणपतरावाना त्यांच्या बालवयाला शोभतील अशाच भूमिका दिल्या जात. त्या बालवयातील या छोट्या गणूच्या अतिशय गाजलेल्या भूमिका म्हणजे ‘भक्त प्रल्हाद' नाटकातील प्रल्हादाची आणि 'भक्त ध्रुव' नाटकातील ध्रुवाची. गोड गळा आणि धिटाईनं केलेला अभिनय, यामुळे त्यांच्या दोन्ही भूमिका गाजल्या. अितक्या गाजल्या की जवळजवळ तीन वर्षे 'बलवंत' ही नाट्यसंस्था या 'बाल' कलाकाराच्या छोट्याशा खांद्यावर अभी होती! याची साक्ष खुद्द चिंतामणराव कोल्हटकर यांच्या 'बहुरुपी' या आत्मचरित्रात मिळते. त्यानी मुळी दोन्ही नाटकांच्या अुत्पन्नाचा आलेखच काढून दाखवला आहे. भक्त प्रल्हाद हे नाटक, बिगर मराठी प्रेक्षकांसाठी, हिंदी भाषेत 'धरम का चाँद' या नावाने सादर केले जाई. या दोन्ही नाटकांमुळे गणपतरावाना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पैसा मिळायचा प्रश्नच नव्हता. कारण तो त्यांच्या हाती येतच नसे! कंपनीचा मुक्काम ज्या गावी असे, त्या गावची भाविक मंडळी या ध्रुवाला, या प्रल्हादाला घरी घेऊन जात. त्याची पूजा करत. गोड-धोड खाऊ घालत. नवे नवे कपडे देत आणि घोड्याच्या गाडीतून (त्या काळातील मोठी चैन!) कंपनीच्या बिऱ्हाडी आणून पोचवत. निरागस बाल्य, सहजसुंदर अभिनय आणि भावानुकूल गाणे यामुळे या छोट्या गणूला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..........................१५४</noinclude>
7nr54y36fukmj0kkgr8j60drp2vdq5k
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१७९
104
77713
237863
203211
2026-10-13T14:13:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237863
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}बाल कलाकार म्हणून गणपतरावांची कारकीर्द सुरू झाली तेव्हा दोन महान विभूतींचे त्याना आशीर्वाद मिळाले. त्यातील पहिले म्हणजे बॅ. मुकुंदराव जयकर. १९१८ च्या सुमारास, किर्लोस्कर मंडळीमधील फाटाफुटीनंतर, स्थापन झालेल्या बलवंत संगीत मंडळींच्या 'पहिल्या' नाटकाचा पडदा वर गेला तो बॅ. जयकरांच्या हस्ते. 'शाकुंतल' नाटकाचा प्रयोग लावलेला होता. त्या नाटकातील कण्वशिष्य ऋषिकुमाराचे काम गणपतरावाना होते. त्यावेळच्या लहान वयातील गोड आवाजात म्हटलेलं गाणं अितकं रंगलं की प्रयोग झाल्यावर छोट्या गणूला "तुझं साभिनय गाणं मोठं छान झालं हं” असे प्रशंसोद्गार काढत बॅ. जयकरानी आपल्या हातातील सोन्याचं घड्याळ त्याला बक्षीस दिलं. जयकर भारावून गेले, ते पद खरोखरच रंगत असे. तिसऱ्या अंकातील, पहिल्या प्रवेशातील त्या पदाला गणपतराव टाळी घेत. किती तरी दिवस ती 'बलवंतची पहिली टाळी' म्हणून ओळखली जाई!

{{gap}}अर्थात् त्या वयात छोट्या गणूला जयकर कोण, त्यांची योग्यता काय याविषयी काहीच माहीत नव्हते.

{{gap}}त्यानंतरची दुसरी महान व्यक्ति होती म्हणजे खुद्द लो. टिळक. ते मात्र छोट्या गणूला निदान ऐकून तरी नक्कीच माहीत होते!

{{gap}}‘बलवंत' ने एकदा होमरूल चळवळीच्या मदतीसाठी गडकऱ्यांचं 'पुण्यप्रभाव' नाटक लावलं होतं. त्यातील युवराजाची भूमिका व त्याच्या तोंडची गाणी गणपतरावानी एवढ्या समरसतेने म्हटली की प्रयोग पहावयास आलेले लोकमान्य टिळक प्रभावित झाले. गणपतरावाना बघून शाबासकी देत, ते अिकडे तिकडे बघू लागले. त्यांच्या मनात काहीतरी द्यायचे असावे. तेव्हा त्यांच्याजवळच्या एका माणसाने हातातील अंगठी पुढे केली. ती लोकमान्यानी गणपतरावांच्या बोटात घातली. तो प्रसंग आठवला की आज ८० वर्षानंतरसुध्दा त्यांच्या अंगावर रोमांच अभे राहतात. त्या थोर पुरुषाच्या सुवर्णमयी आशीर्वादामुळेच आपली नाट्यकारकीर्द सुवर्णमय झाली आणि म्हणूनच अनेक सुवर्णपदकांचा सन्मान प्राप्त झाला अशीच त्यांची श्रध्दा आहे.

{{gap}}लोकमान्यांमुळेच त्याना मोठ्या समारंभात 'वंदे मातरम्' म्हणण्याची संधी मिळाली. होमरूल चळवळीच्या मार्गदर्शनासाठी, त्यावेळी पुण्यातील 'किर्लोस्कर' थिअटरमध्ये (नंतरचे वसंत टॉकीज) मोठी सभा भरली होती. खुद्द लोकमान्य, ॲनी बेझंट, बॅ. जीना, गांधी, दोन्ही शौकत अली, शि. म. परांजपे, न. चि. केळकर, खापर्डे, असे दिग्गज जमले होते. त्यांच्या अुपस्थितीमध्ये 'वंदे मातरम्' चे संपूर्ण गीत गणपतरावानी असे काही भावपूर्ण स्वरात म्हटले की सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

{{gap}}'बलवंत' मध्ये असताना कंपनीच्या बहुतेक सर्व नाटकांतून गणपतरावानी<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर............................. १५५</noinclude>
7ubhkoivua7dzn0dop9evtys25kb77p
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८०
104
77714
237864
203213
2026-10-13T14:16:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237864
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>स्त्री-पुरूष भूमिका केल्या. वर अुल्लेखलेल्या ध्रुव, प्रल्हाद, शाकुंतलशिवाय, पुण्यप्रभाव, मूकनायक, चौदावे रत्न, अग्रमंडल, देशकंटक, भावबंधन, रामराज्यवियोग, वेड्यांचा बाजार, राजसंन्यास, मानापमान, 'संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी अशा अनेक नाटकांतून त्यानी वेगवेगळ्या भूमिका केल्या. यशस्वी केल्या. गाजविल्या.

{{gap}}अिथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी. ती अशी की त्याकाळचा नटवर्ग हा काही फारसा सुशिक्षित नसे किंबहुना बरेचजण शिक्षण अर्धवट टाकून, घरातून पळून आलेले असत. तेव्हा श्री. कृ. कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर, वीर वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा एकाहून एक सरस अशा भाषाप्रभूंची भाषा ही मंडळी कशी पेलत असावीत, याचे कधी कधी आश्चर्य वाटते. पण वस्तुस्थिती अशी की ही मंडळी अशा दिग्गजांची भाषा नुसतीच पेलत नसत तर नाटककाराची शब्दकळां, प्रेक्षकांच्या अंतःकरणात समर्थपणे पोचवून, हलकल्लोळ माजवून देत असत. गणपतराव तर जेमतेम दुसरी-तिसरीतच शाळेला रामराम ठोकून नाटकात आलेले. अशा माणसाने राजसंन्यास, संन्यस्त खड्ग अशा नाटकांच्या भाषा समजून मुखोद्गत करणे हे म्हणून कौतुकास्पदच होते.

{{gap}}स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'संन्यस्त खड्ग' हे एक विलक्षण नाटक आहे. हिंसा आणि अहिंसा यांची तात्त्विक चर्चा करणारे हे एक ओजस्वी नाटक. मार्मिक तर्कमीमांसा असली तरी नाटकाची भाषा पांडित्यपूर्ण आणि त्यामुळेच क्वचित् प्रसंगी बोजड आहे. एक प्रसंग असा आहे. आत्यंतिक अहिंसेच्या आहारी गेलेल्या शाक्य मंडळींवर, कौसल्येश्वर विद्युत्गर्भाने अचानक हल्ला केलेला आहे. रणधुमाळीत, शाक्यांचा शूर सेनापती वल्लभसिंह हा शत्रूच्या हाती सापडला आहे. त्याची पत्नी सुलोचना (मा. दीनानाथ) आपली सखी नलिनी (गणपतराव मोहिते) हिला म्हणते की अशा प्रसंगी कर्तव्य काय म्हणते ते सांग. तेव्हा नलिनी म्हणते.

{{gap}}"सारी शाक्य जमात विद्युतगर्भाच्या तलवारीने भोसकली जात असता, आम्ही क्षत्रिय कन्यांनी, अंतःपुरात मुळुमुळु रडत न बसता, तू म्हणतेस तसे सैनिक वेष घेऊन, शत्रूचा सूड अगवीत, खड्गा खड्गीतून अठलेल्या ज्वालांवर चढून, प्रिय स्मृतींसह सती जावे. कारण,

{{Block center|<poem>“मृत काष्ट तृणातीत ना, सती
{{gap}}{{gap}}जातात वीरांगना ।
शस्त्र संघर्षि घे चेतना, तथा
{{gap}}{{gap}}रणाग्रीत दारुणा,
सूडाच्या जातात वीरांगना ।".............</poem>}}{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर............................१५६</noinclude>
f1ictm0e2aigibif6kwdaiu96553ka7
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८१
104
77715
237865
203216
2026-10-13T14:19:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237865
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}नलिनीच्या भूमिकेत काम करणारे गणपतराव असे संवाद आणि हे गाणे अशा काही ताकदीने व त्वेषाने म्हणत की प्रेक्षक थरारून जात. 'स्वातंत्र्यासाठी संगर' या सावरकरांच्या तेजस्वी विचारधारेचा, प्रत्येकाच्या अंतःकरणात संचार होत असे. त्यानंतर "शरण नाही, रण मारीत मारीत मरण" या घोषवाक्याच्या संदर्भातील, 'स्वकुलनाशा.... हे देसकार रागातील पद सुरू होई. गणपतराव, अर्थातच दीनानाथी तडफदारीने ते पद गात असत.

{{gap}}दोन्ही पदाना गणपतराव दोन दोनदा, तीन तीनदा टाळ्या घेत. विंगेत असलेले वझेबुवा कौतुकाने म्हणत "वा, तुझा देसकार छानच जमलाय." सर्वजण कौतुक करतच पण खुद्द सावरकरही नलिनीचे काम बघून स्तिमित झाले होते. वास्तविक 'नलिनी' ही नायिकेची- सुलोचनेची सखी. त्यामुळे तशी ती छोटीशी व्यक्तिरेखा. पण गणपतराव अशा काही विलक्षण अदाकारीने त्यात रंग भरत की ही 'नलिनी' प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राही. खुद्द सावरकर 'बलवंत' च्या बिऱ्हाडी, चालकमंडळीना पत्र लिहिताना ‘माझ्या नलिनीस आशीर्वाद' असा गणपतरावांचा अुल्लेख करीत.

{{gap}}सावरकरांची पल्लेदार भाषा समर्थपणे पेलवायची आणि खुद्द त्यांचीच शाबासकी मिळवायची. गणपतरावांच्या अभिनयाला आणि गानकौशल्याला वेगळी पावती ती कोणती ?

{{gap}}मा. दीनानाथांचं स्त्री-भूमिका करण्याचं वय मागं पडत चाललं तेव्हा त्यांच्या सर्व स्त्री-भूमिका आपसूकच गणपतरावांकडे आल्या. दीनानाथांच्या प्रमुख भूमिका त्याना झेपतील का? प्रेक्षक स्वीकारतील का? असा प्रश्नच मुळी कुणाच्या मनात आला नाही. एवढी गुणवत्ता गणपतरावानी तोवर सिद्ध केली होती.

{{gap}}आणि मग दीनानाथ नायक आणि गणपतराव नायिका असा सुंदर योग रंगभूमीवर जुळून आला.

{{gap}}दीनानाथांचे पाणीदार डोळ्यांचे भव्य रसरशीत व्यक्तिमत्व आणि त्याची साथ करणारं, गणपतरावांचं कोरीव, सुहास्य रूप! आज ९२ व्या वर्षीसुद्धा त्यांचं वृद्धत्व अितकं 'देखणं' वाटतं तर ऐन तरुण वयात त्यांचं 'रुपडं' काय असेल याची रसिकाला सहज कल्पना करता येते आणि स्त्री-भूमिकेतील त्यांचे फोटो बघितल्यावर खात्रीच पटते. ‘बलवंत' चे 'मानापमान' रूढ प्रयोगांपेक्षा खूपच वेगळे होते. दीनानाथांच्या तडफदार गाण्याने, जोरकस अभिनयाने, त्यांचा धैर्यधर, खराखुरा क्षात्रतेजसंपन्न धैर्यधर वाटे. त्यांच्या चौफेर फिरणाऱ्या, भरदार आवाजाचे गाणे, सबंध नाटकभर छाप पाडून जायचे तर त्याच अंगाने फिरणारे, गणपतरावांचे गाणे, त्याच्याशी सुंदर संवाद साधायचे, भरभरून प्रतिसाद द्यायचे!{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.........................१५७</noinclude>
q1bv4mxgoi634dl5kh63csj01acwyay
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८२
104
77716
237866
203217
2026-10-13T14:21:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237866
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}तीच गोष्ट 'ब्रह्मकुमारी' नाटकाची. तपोधन गौतम, मा. दीनानाथ, तरतरीत लाडीक अहिल्या गणपतराव प्रेक्षकांचे डोळे, कान तृप्त करीत. गणपतराव अशाच ताकदीने दीनानाथांच्या अन्य स्त्री- भूमिका लतिका (भावबंधन) शिवांगी (राजसंन्यास) करीत असत.

{{gap}}पण बोलपटांचा जमाना सुरू झाला आणि रंगभूमीच्या वैभवाला दृष्ट लागली.

{{gap}}अर्थात् जाणकारांच्या मते रंगभूमीचे वैभव लयाला जाण्यास तेवढे एकच कारण नव्हते. प्रेक्षकांची अभिरूची बदलत चालली होती. संगीताचा थोडासा अतिरेक झाला असावा. ऐतिहासिक पौराणिक नाटकांचा 'ओव्हरडोस' झाला असावा. बोलपटांचे नाविन्य वाटले असावे. परिणामी, अनेक नामवंत कंपन्या बुडत चालल्या. अनेक ज्येष्ठ रथी-महारथी रंगभूमीचे वैभव सावरता सावरता त्रस्त झाले होते. बलवंतची चालक मंडळी पण या धामधुमीत मेटाकुटीला आली होती.

{{gap}}अखेरची धडपड म्हणून कंपनीने विश्राम बेडेकरांचे 'ब्रह्मकुमारी' नाटक रंगभूमीवर आणले.

{{gap}}या नाटकाचा पहिला प्रयोग १९३१ साली, सांगलीतच झाला. सांगलीचे राजेसाहेब श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांच्या शुभहस्ते. या नाटकात चिंतामणराव कोल्हटकर इंद्राची, दीनानाथ गौतमाची भूमिका करीत तर गणपतराव अहिल्येची. कृ.प्र. खाडिलकरांनंतर इतकं सुंदर पौराणिक नाटकं दुसरं नाही, यावर सर्वांचं एकमत होतं. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरानी तर 'केसरी' त म्हटलं होतं की “हे नाटक बघताना तोंडात खडीसाखरेचा खडा घेऊन, गुलाबांच्या ताटव्यानी फुललेल्या अुद्यानात फेरफटका केल्याचा आनंद प्रेक्षकाना मिळतो.” बेडेकरांच्या लेखणीचं सामर्थ्य आणि सर्वांचं अभिनय कौशल्य, यामुळे रंगभूमीच्या पडत्या काळातही या नाटकानं चांगलंच यश मिळवलं. “विलोपले मधु मीलनात या" हे गाणं तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

{{gap}}पण दुर्दैवाने हे नाटकही बलवंत नाटक मंडळीला फार सावरूं शकलं नाही. प्रेक्षकांसाठी बदल म्हणून काही सामाजिक नाटकं कंपनीनं करुन बघितली. पण प्रतिसाद शून्य. कंपनीची अवस्था दिवसेंदिवस खालावू लागली.

{{gap}}शेवटी विषानेच विष अुतरवण्याचा प्रयत्न झाला! म्हणजे असं की बोलपटांचं नाटकांवर आक्रमण होतय तर मग बोलपटच का नाही काढायचा? पैसा मिळवायचा आणि तो नाटकासाठी खर्च करायचा, असा विचार पुढं आला. या विचारातूनच १९३३साली 'बलवंत' पिक्चर्स अभी राहिली. स्थापना मुंबईत झाली पण कंपनीचा अद्यावत स्टुडिओ सांगलीत अभा राहिला. गणपती मंदिराच्या पिछाडीस, अत्याधुनिक<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..............................१५८</noinclude>
ddsh3hymwehe11kjoee4tv5whpu2tpd
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८३
104
77717
237867
203219
2026-10-13T14:24:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237867
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सामुग्रीने सज्ज असे पस्तीस ते चाळीस विभाग या स्टुडिओत होते. कंपनीतर्फे पहिला चित्रपट तयार झाला तो 'कृष्णार्जुन युद्ध.' त्या चित्रपटात गणपतरावांची नारदाची मध्यवर्ती भूमिका होती. 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटानंतर मराठीत निर्माण झालेला हा पाचवा चित्रपट मात्र अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्यानंतर निर्माण झालेल्या ‘सत्याचे प्रयोग' या चित्रपटात गणपतरावानी नायकाचे (मनोहर) काम केले. योगायोगाने नायिकेच्या भूमिकेत सांगलीच्याच बाळाबाई पोतदार होत्या. नंतरच्या 'भक्त पुंडलिक' मध्ये त्यानी पुंडलिकाची मुख्य भूमिका केली. त्यानंतर 'ठकीचे लग्न' 'अंधेरी दुनिया' (हिंदी), 'लक्ष्मीचे खेळ' असे चित्रपट बनवण्यात आले. पण तांत्रिक बाबतीतील अनुभव, एकूण सिने-धंद्याविषयीचे अज्ञान, यामुळे हा चित्रपट अुद्योग चांगलाच महागात पडला. शेवटच्या अपुऱ्या राहिलेल्या 'कंगाल' चित्रपटाने तर कंपनीला पुरे कंगाल बनवून टाकले आणि कंपनी शेवटच्या घटका मोजू लागली.

{{gap}}या सर्व चित्रपटांतून गणपतरावानी कामे तर केलीच पण कौतुकाची गोष्ट म्हणजे या ६-७ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यानी स्वतःच केले होते. चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे त्यांच्या या वेगळ्या पैलूचे, व्हावे तसे कौतुक झाले नाही. एरवी त्यांच्या चित्रपट कारकीर्दीतील हा खरोखरी मानाचा शिरपेच होता.

{{gap}}एकंदरीत दीनानाथ आणि चिंतामणराव कोल्हटकर या 'बलवंत' च्या मालकाना चित्रपटाचा धंदा मानवला नाही. नाटकाचा धंदा यशस्वी करायचा म्हणून चित्रपट बनवले तो अुलटे शूटींगला पैसे कमी पडले की नाटके लावायला लागायची! परिणामी, दोन्ही आघाड्यावर सपाटून मार बसला. वाईट वेळ आली की एकमेकांवर दोषारोप सुरू होतात. दीनानाथांचे, चिंतामणरावांचे लहान-सहान कारणांवरून बिनसू लागले. विश्राम बेडेकर आधीच शिष्यवृत्ती मिळाल्याने अिंग्लंडला निघून गेले होते. कंपनीची देणी वाढू लागली. दीनानाथांचे व्यसन वाढले. एक शेवटचा अुपाय म्हणून बलवंत नाटक कंपनीचे चालकत्व गणपतरावांकडे देण्यात आले. वयाच्या सातव्या वर्षी ५ रु. पगारावर काम करणारा साधा मुलगा, कंपनीचा मालक बनला. ही घटना निश्चितच भूषणास्पद होती. पण हातात आलेले राज्य 'ओसाडवाडी' चे होते! नाटक आणि चित्रपटसंस्था मिळून दीड लाखाचा आर्थिक बोजा होता. गणपतरावानी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 'बलवंत' ला आणि दीनानाथांना सावरण्याची अहोरात्र धडपड केली. स्वतःसाठी, बालगंधर्व आणि शांतारामबापू यासारखी अुत्तुंग व्यक्तिमत्वे पुकारीत होती, तरी वैयक्तिक लाभाच्या संधी विनयपूर्वक नाकारल्या. पण अितके करुनहि गणपतराव आपल्या 'बलवंत' ला वाचवू शकले नाहीत. अखेरीस १९४१ च्या सुमारास सहा हजार रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन, गणपतरावानी 'बलवंत' संगीत मंडळींवर मोठ्या दुःखद अंतःकरणाने अखेरचा पडदा टाकला!{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर........................................ १५९</noinclude>
m7w6i82hbrlvjjv37jpwve79t7ymbom
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८४
104
77718
237868
203220
2026-10-13T14:27:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237868
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}त्याच सुमारास आचार्य अत्रे यानी आपल्या 'अत्रे पिक्चर्स'साठी, गणपतरावांबरोबर दहा पिक्चर्सचा 'तोंडी' करार केला. त्यानी गणपतरावांची नाट्य-अभिनय-संगीत क्षेत्रातील गुणवत्ता जाणली होती. त्यांचे ५-६ पिक्चर्स अयशस्वी झाले होते ते तर अनेक कारणांमुळे. सिनेमाच्या पडद्यावरसुद्धा गणपतराव किती मोहक आणि आकर्षक दिसतात याची गुणग्राही अत्र्यांना यथार्थ कल्पना होती. म्हणूनच त्यानी आपल्या चित्रपटांसाठी, ‘गणपतराव मोहिते' या लांबलचक नावाला सुट्टी देऊन 'मा. अविनाश' हे सुटसुटीत नांव दिले. अत्रे पिक्चर्सचा 'पायाची दासी' हा चित्रपट खूप गाजला. अविनाशबरोबर त्यावेळी नायिका होत्या वनमालाबाई. हाच चित्रपट 'चरनोंकी दासी' या नावाने हिंदीत पण निघाला. 'घरजावई' चित्रपटात 'अविनाश' बरोबर शोभना समर्थ होती. शिवाय वनमालाबाई होत्याच.

{{gap}}अविनाशांची वाढती लोकप्रियता पाहून 'प्रकाश' पिक्चर्सच्या विजय भट्ट या नामवंत निर्माता-दिग्दर्शकाने त्या काळी भरघोस वाटणाऱ्या रु१४००/- पगारावर आपल्या 'भरतभेट' साठी अविनाशना पाचारण केले होते. पण अत्र्याना 'तोंडी का होईना पण 'शब्द' दिला असल्यामुळे मा. अविनाशना ती संधी नाकारावी लागली!

{{gap}}अुलट अिकडे अत्र्यानी आपल्या 'वसंतसेना' या महत्वाकांक्षी चित्रपटात सपाटून मार खाल्ला. त्याना अनेक कर्जे झाली. त्यामुळे अविनाशांचा शोभना समर्थबरोबरचा 'राजा-रानी' हा चित्रपट अर्धवटच राहिला!

{{gap}}अशा तऱ्हेने हा सिनेमा पर्वाचा दुसरा कालखंड अचानक संपुष्टात आला. अत्रे पिक्चर्सचे सर्व चित्रपट पूर्ण झाले असते तर सर्व हिंदुस्थानभर अविनाशांचे नाव झाले असते! अनेक सिनेमांची कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या दारी आली असती. तथापि असे म्हणणे म्हणजे अविनाशांच्या अुदात्त प्रतिमेला अुणेपणा आणण्यासारखे आहे. कारण पैशाचा हव्यास त्यानी आयुष्यात कधीच धरला नव्हता. त्याना ओळखणाऱ्या सर्वानाच ही गोष्ट पुरतेपणी माहीत आहे.

{{gap}}अत्रे पिक्चर्समुळे आणि विशेषतः खास गाजलेल्या 'पायाची दासी' या चित्रपटामुळे अविनाशना चांगलीच प्रतिष्ठा मिळाली.

{{gap}}त्यामुळेच अविनाशना कामासाठी कधी कुणाच्या दाराशी जावे लागले नाही. अत्रे पिक्चर्समधून मोकळे होता होताच, त्याना प्रख्यात नाटककार, निर्माते-दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यानी आपल्या 'नाट्यनिकेतन' संस्थेत 'कुलवधू' साठी आमंत्रण दिले.

{{gap}}आता त्यांच्या आयुष्यातील तिसरे मोठे पर्व सुरू झाले.

{{gap}}१९४२ ते १९७५ अशी तब्बल ३३ वर्षे त्यानी 'नाट्यनिकेतन' मध्ये घालवली.<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.....................................१६०</noinclude>
i58tfycet5p7271wma7znvbh2vgbi97
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८५
104
77719
237869
203222
2026-10-13T14:29:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237869
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>१९१८ ते १९४१ या ‘बलवंत' मधील, जवळजवळ २२-२३ वर्षाच्या कालखंडापेक्षाहि हा कालखंड मोठा होता.

{{gap}}अशाप्रकारे पुन्हा ते आपल्या आवडत्या रंगभूमीकडे वळले. मात्र आता रंगभूमीवर बराच बदल घडून आला होता. 'बलवंत' मधील किर्लोस्करी नाट्यपरंपरा मागे पडून, २॥-३ तासांची, माफक संगीत असलेली नवी चटपटीत नाटके रंगभूमीवर येऊ लागली होती.

{{gap}}मा.अविनाशांचं कौतुकास्पद वैशिष्ट्य असं की या नव्या रंगभूमीवरसुध्दा ते चपखलपणे वावरले. शास्त्रोक्त संगीताऐवजी सुगम संगीताच्या अंगाने जाणाऱ्या नव्या नाट्यसंगीतातहि ते अगदी सहजपणे चांगले रुळले आणि गाजले.

{{gap}}'कुलवधू' हे त्यांच्या आयुष्यातील वैशिष्ट्यपूर्ण मानाचे शिखर ठरले. मो. ग. रांगणेकरांचे, अगदी घरगुती वातावरणातील हे नाटक, त्यातील चुरचुरीत आणि चटपटीत संवादामुळे, कथानकाच्या ओघातच आलेल्या गाण्यांमुळे आणि भावगीतांच्या अंगाने सजलेल्या स्वरसाजामुळे अत्यंत लोकप्रिय ठरले. तशी या नाटकात अवघी ६ गाणीच आहेत. पण कथानक आणि नाटकातील प्रसंग यामध्ये समन्वय साधणारी आहेत. मा.कृष्णानी दिलेल्या सुमधुर चालींचा त्या गाण्यांच्या लोकप्रियतेत जेवढा वाटा आहे तेवढाच ज्योत्स्ना भोळे आणि अविनाश यांच्या सहजसुंदर गायनाचा आहे. "मनरमणा मधुसूदना" "मुखी राहो" किंवा "अमृत बोला" ही भैरवी (ज्योत्स्नाबाईंच्या तोंडची) जेवढी गाजली तेवढेच अविनाशांच्या तोंडचे, पहिल्याच अंकातील "किती तरी आतुर प्रेम आपुले” हे वातावरण भारून टाकणारे गीत गाजले आणि त्याहून अितिहास निर्माण केला तो अविनाश-ज्योत्स्ना भोळे यांच्या तोंडी असलेल्या द्वंद्वगीताने. वास्तविक मूळ नाटकात हे द्वंद्वगीत नव्हते पण अविनाशना सारखे असे वाटे की नाटकात नायक-नायिकेचा (देवदत्त आणि भानुमती) जो संघर्ष आहे, त्याला अशा द्वंद्वगीताने रंगत येईल. मात्र मो. ग. रांगणेकराना तसं वाटत नव्हतं. “तुम्ही म्हणता तशा पदासाठी नाटकात जागाच नाही. मग कसं टाकणार पद?” असे ते म्हणत. पण अविनाश अस्वस्थ होते. त्यानी नाटकाच्या संहितेचे पुनः पुन्हा मनन केले आणि पहिल्या अंकात 'योग्य' जागा त्याना सापडली. मग रांगणेकरानी एक पद लिहिले. इतके होईपर्यंत नाटकाच्या प्रयोगाची तारीख जवळ येऊन ठेपली. दुसरे दिवशी प्रयोग सकाळी ८॥ वाजताच होता. मा. कृष्णानी आदले दिवशी रात्री नऊपर्यंत पदाला चाल लावली. अविनाशनी आणि ज्योत्स्नाबाईंनी, नोटेशन पध्दतीने ते पद पाठ केले. आणि दुसऱ्याच दिवशी दोघानी, ते द्वंद्वगीत विलक्षण सुंदर रंगवले. त्याची सुरुवात अशी होती:{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.................................. १६१</noinclude>
8k392edsh0lem4xu5b6alt2hot61lnu
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८६
104
77720
237870
203225
2026-10-13T14:32:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237870
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Block center|<poem>भानुमती (ज्योत्स्नाबाई)- " भाग्यवती मी त्रिभुवनी झाले ।
{{gap}}{{gap}}{{gap}}कुबेर माझा धनी
देवदत्त (अविनाश){{gap}} "तुझेच सारे वैभव येथे ।
{{gap}}{{gap}}{{gap}}मी, नांवाचा धनी"</poem>}}
{{gap}}पहिल्याच प्रयोगात, पहिल्याच अंकातील या गाण्याला प्रेक्षकांनी अशी काही कडाडून टाळी दिली, की बस्! आपण नाटक जिंकले, असा आत्मविश्वास रांगणेकर, मा. कृष्णा अशा सर्वानाच आला. त्यानंतर त्या नाटकाची प्रचंड यशस्वी घोडदौडच सुरू झाली. १९४२ ते १९७५ या ३३ वर्षांच्या काळात या नाटकाचे अडीच ते तीन हजार प्रयोग झाले. या सर्व प्रयोगांतून अविनाश - ज्योत्स्ना भोळे ही जोडी अजरामर झाली. या नाटकाच्या लोकप्रियतेचे अनेक किस्से चवीने सांगितले जात असत. ज्योत्स्ना भोळेंच्या भानुमतीमुळे हे नाटक जितकं गाजलं तितकंच ते अविनाशांच्या देवदत्तमुळे गाजलं. 'कुलवधू' म्हणजे मा. अविनाश असं समीकरणच त्यामुळे रूढ झाले.

{{gap}}अलीकडे नव्या पिढीच्या रसिकाना पण या समीकरणाचा प्रत्यय आला. १९४२ साली या नाटकाचा रंगभूमीवर प्रथम प्रयोग झाला या घटनेला ५० वर्षे झाली म्हणून १९९२ साली या नाटकाचा पुण्यात, जुन्या संचात पुन्हा प्रयोग झाला. ज्योत्स्ना भोळे आणि मा. अविनाश या जुन्या जोडीने पुन्हा एकदा तोंडाला रंग फासला. त्यावेळी ८३ व्या वर्षाच्या अविनाशनी स्टेजवर एन्ट्री घेताच प्रेक्षकानी कडाडून टाळ्या दिल्या.

{{gap}}त्या लोकप्रियतेची ही लोकविलक्षण पावती !

{{gap}}कुलवधूच्या यशानंतर, अविनाशनी, 'माझे घर' (सरस्वतीबाई राणे) 'राणीचा बाग' (नायिका- स्नेहप्रभा प्रधान) 'तुझं माझं जमेना' (नायिका- ज्योत्स्ना भोळे) अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या. रांगणेकरांच्या 'आशिर्वाद' नाटकाच्या २०० प्रयोगात त्यानी कामे केली. नाट्यनिकेतनच्या 'अपूर्व बंगाल,' 'कन्यादान,' अशा बहुतेक सर्वच नाटकांतून त्यानी नायकाची भूमिका केली. त्यापैकी 'तुझं नि माझं जमेना' हे नाटक अविनाश- ज्योत्स्ना भोळे यांच्या द्वंद्वगीतामुळे खूप गाजले होते. त्या दोघांच्या भूमिका असलेला, मो. ग. रांगणेकरांचा, 'कुबेर' हा चित्रपटसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण होता. त्या चित्रपटाचा नायक हा १९४२ च्या लढ्यातील सुप्रसिध्द क्रांतिकारक अच्युतराव पटवर्धन यांजवरून बेतलेला होता.

{{gap}}'नाट्यनिकेतन' मध्ये ३३ वर्षे राहून रंगभूमीची भरपूर सेवा करून १९७५ साली मा. अविनाशनी, रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातून निवृत्ती पत्करली.<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................१६२</noinclude>
jymorezpazklbsqf7r6t6p2dgrt9ool
237871
237870
2026-10-13T14:33:31Z
कल्पनाशक्ती
3813
237871
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Block center|<poem>भानुमती (ज्योत्स्नाबाई)- " भाग्यवती मी त्रिभुवनी झाले ।
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}कुबेर माझा धनी
देवदत्त (अविनाश){{gap}} "तुझेच सारे वैभव येथे ।
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}मी, नांवाचा धनी"</poem>}}
{{gap}}पहिल्याच प्रयोगात, पहिल्याच अंकातील या गाण्याला प्रेक्षकांनी अशी काही कडाडून टाळी दिली, की बस्! आपण नाटक जिंकले, असा आत्मविश्वास रांगणेकर, मा. कृष्णा अशा सर्वानाच आला. त्यानंतर त्या नाटकाची प्रचंड यशस्वी घोडदौडच सुरू झाली. १९४२ ते १९७५ या ३३ वर्षांच्या काळात या नाटकाचे अडीच ते तीन हजार प्रयोग झाले. या सर्व प्रयोगांतून अविनाश - ज्योत्स्ना भोळे ही जोडी अजरामर झाली. या नाटकाच्या लोकप्रियतेचे अनेक किस्से चवीने सांगितले जात असत. ज्योत्स्ना भोळेंच्या भानुमतीमुळे हे नाटक जितकं गाजलं तितकंच ते अविनाशांच्या देवदत्तमुळे गाजलं. 'कुलवधू' म्हणजे मा. अविनाश असं समीकरणच त्यामुळे रूढ झाले.

{{gap}}अलीकडे नव्या पिढीच्या रसिकाना पण या समीकरणाचा प्रत्यय आला. १९४२ साली या नाटकाचा रंगभूमीवर प्रथम प्रयोग झाला या घटनेला ५० वर्षे झाली म्हणून १९९२ साली या नाटकाचा पुण्यात, जुन्या संचात पुन्हा प्रयोग झाला. ज्योत्स्ना भोळे आणि मा. अविनाश या जुन्या जोडीने पुन्हा एकदा तोंडाला रंग फासला. त्यावेळी ८३ व्या वर्षाच्या अविनाशनी स्टेजवर एन्ट्री घेताच प्रेक्षकानी कडाडून टाळ्या दिल्या.

{{gap}}त्या लोकप्रियतेची ही लोकविलक्षण पावती !

{{gap}}कुलवधूच्या यशानंतर, अविनाशनी, 'माझे घर' (सरस्वतीबाई राणे) 'राणीचा बाग' (नायिका- स्नेहप्रभा प्रधान) 'तुझं माझं जमेना' (नायिका- ज्योत्स्ना भोळे) अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या. रांगणेकरांच्या 'आशिर्वाद' नाटकाच्या २०० प्रयोगात त्यानी कामे केली. नाट्यनिकेतनच्या 'अपूर्व बंगाल,' 'कन्यादान,' अशा बहुतेक सर्वच नाटकांतून त्यानी नायकाची भूमिका केली. त्यापैकी 'तुझं नि माझं जमेना' हे नाटक अविनाश- ज्योत्स्ना भोळे यांच्या द्वंद्वगीतामुळे खूप गाजले होते. त्या दोघांच्या भूमिका असलेला, मो. ग. रांगणेकरांचा, 'कुबेर' हा चित्रपटसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण होता. त्या चित्रपटाचा नायक हा १९४२ च्या लढ्यातील सुप्रसिध्द क्रांतिकारक अच्युतराव पटवर्धन यांजवरून बेतलेला होता.

{{gap}}'नाट्यनिकेतन' मध्ये ३३ वर्षे राहून रंगभूमीची भरपूर सेवा करून १९७५ साली मा. अविनाशनी, रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातून निवृत्ती पत्करली.<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................१६२</noinclude>
jmucegr7ztw020vukucjtt2wcpssfvp
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८७
104
77721
237872
203227
2026-10-13T14:35:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237872
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>एक प्रकारची स्वेच्छानिवृत्तीच. कारण निवृत्त होतानासुध्दा त्यांची लोकप्रियता अखंड होती. कामे मिळण्याचा प्रश्नच नव्हता.

{{gap}}कदाचित् हाडाचे क्रिकेटर असल्यामुळेच, विजय मर्चंटप्रमाणे त्यानी रिटायर होण्यात अचूक ‘टायमिंग' साधलं, असंच म्हणायला हवं!

{{gap}}पण थोडा विचार केला तर मा. अविनाशासारख्या रंगभूमीशी अव्यभिचारी निष्ठा असणाऱ्या, श्रध्दावान नटानं निवृत्त होणं, अपरिहार्यच होतं. ते निवृत्त झाले त्यावेळी घरंदाज गायकीचा लोप होत चालला होता. 'हिट अँड हॉट' नाटकांचा जमाना आला. डिस्को आला. ठेकेदारी पध्दत आली. नाईट्स कितीहि 'अर्थ'पूर्ण असल्या, तरी ज्या माणसाला नाटककंपनीत, एखाद्या घरंदाज कुटुंबियासारखी राहण्याची सवय होती त्याला असल्या 'नाईट्स' क्षोभकारक वाटत होत्या. अविनाशना 'बलवंत'मध्ये राहून फार मोठे जग बघायला मिळाले होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा मुलगा दिवाकर, अविनाशांचा समवयस्क होता. त्यामुळे त्यांचा अविनाशांवर लोभ होता. गडकरी आजारी असताना ५-६ महिने 'बलवंत' च्या बिऱ्हाडी होते. अविनाशना त्यांचा भरपूर सहवास मिळाला. त्यांच्या विलक्षण भाषाप्रभुत्वाची जवळून ओळख झाली. त्यांच्यावरील लोभामुळे, गडकऱ्यानी 'पुण्यप्रभाव' मधील अविनाशांची भूमिका थोडी वाढवून दिली होती. सावरकरांचे प्रेम त्याना मिळाले होते. वीर वामनराव जोशींबरोबर गप्पागोष्टी करायला मिळाल्या होत्या. खुद्द चिंतामणराव कोल्हटकरानी त्याना गद्य भूमिकांची तालीम दिली होती. अभिनयातील बारकावे समजावून सांगितले होते, वझेबुवांची संगीताची तालीम मिळाली होती. आणि दीनानाथ? तो तर त्यांच्या आयुष्यातील फार मोठा अध्याय होता. त्यांच्याशिवाय अविनाशांचं जीवन तृणवत् होतं.

{{gap}}असं फार मोठं वैभव बघितलेल्या अविनाशना, रंगभूमीचं पावित्र्यच नष्ट व्हायला लागलं, असं त्यांच्या मतानं वाटायला लागलं, तेव्हा मोठ्या कष्टी मनानं दूर होणंच अपरिहार्य ठरलं असेल. त्यानीच आपल्या रंगभूमीवरील निवृत्तीच्या संदर्भात एके ठिकाणी मोठ्या मार्मिकपणे म्हटलयं की, "हिमालयाची एकेक अुत्तुंग शिखरं मी आयुष्यात बघितली,आता लहान-सहान टेकड्या नाही मला खुणावू शकत.”

{{gap}}त्यांच्या नाट्यसेवेबद्दल काही पुरस्कार त्याना मिळाले. मराठी संगीत नाटक शताब्दि महोत्सव समिती (मुंबई) आणि मुख्यमंत्री श्री. अंतुले याजकडून १९८४ मध्ये त्यांचा सत्कार झाला. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे, माधवराव शिंदे, ग्वाल्हेर, 'गंधर्व' सुवर्णपदक त्याना मिळालं. १९९२ सालचा, सांगलीचा प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कार, त्याना गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला. माहेरचा पुरस्कार म्हणून मा. अविनाशना त्याचं अधिक कौतुक वाटलं. संगीत रंगभूमीच्या<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.................................. १६३</noinclude>
e4gjqygfh81x6atc7s5bjjp1ft8rirx
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८८
104
77722
237873
203262
2026-10-13T14:37:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237873
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>प्रदीर्घ सेवेबद्दल १९९५ साली दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे 'मा. दीनानाथ मंगेशकर पारितोषिक रु. ५०,०००/- चे मिळाले. त्यावर तर त्यांचा सर्वार्थाने हक्कच होता. युनेस्कोप्रणीत प्रथम पुरस्कार मिळाला.

{{gap}}तथापि, आज जो पुरस्कारांचा महापूर लोटला आहे आणि फारसं 'कॉट्रिब्यूशन' (किंबहुना नगण्य) नसणारी मंडळी, छातीवर पुरस्कारांची अनेक मानचिन्हे लावून मिरवतात, तेव्हा अविनाशाना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या ६० वर्षाच्या प्रचंड नाट्य- चित्रसेवेच्या तुलनेत किती तोकडे आहेत याची प्रकर्षाने जाणीव होते!

{{gap}}नाट्यसृष्टीचा इतिहास लिहिणाऱ्याला, मोठमोठ्या दिग्गजांच्या रांगेत, अविनाशांसाठी, एक गौरवाचे पान निश्चितच राखून ठेवावे लागेल. आणि त्यांचा सहजसुंदर अभिनय, स्पष्ट शब्दोच्चार, गोड, मोहक रुपडं, स्वच्छ, निकोप गाणं, याविषयी त्यात भरभरून लिहावं लागेल. सव्यसाची अभिनेता म्हणून त्यांची योग्यता फार मोठी आहे. त्यानी बालभूमिका सुरेख केल्या. स्त्रीभूमिका तर हातखंडा होता. नाट्यनिकेतनच्या कालखंडात, नव्या मनूच्या सामाजिक पुरूषभूमिका केल्या. 'राणीचा बाग' मध्ये मनोहरच्या भूमिकेत एक खलनायक, अनेकांच्या कौतुकाच्या शब्दात, म्हणजे 'स्वीट व्हिलन' अुभा केला. कहर म्हणजे गरजेच्या प्रसंगी 'भावबंधन' मध्ये 'कामण्णा' ची विनोदी भूमिका केली. पडद्यावरच्या वा रंगभूमीवरच्या भूमिकांबरोबरच, प्रत्यक्ष जीवनाच्या रंगभूमीवर कधी शिकाऱ्याची भूमिका केली, कधी क्रिकेटरची. सांगलीच्या विजय हजारेंबरोबर बालपणी ते क्रिकेट खेळलेच पण तरूणपणी मोठमोठ्या मॅचेसमध्ये पण ते खेळले. त्यामुळेच कर्नल सी. के. नायडूंबरोबर त्यांची घनिष्ट मैत्री जुळली. त्यांच्या प्रेमाखातर ते नेहमी अविनाशच्या नाटकाना आवर्जून येऊन बसत. गंमत म्हणजे शेतीची आवड असणाऱ्या अविनाशनी, पुण्याजवळील तळेगाव-दाभाडे येथे पांचशे एकर जमिनीवर, स्वतःच्या अध्यक्षतेखाली 'अशोक सहकारी सामुदायिक शेतकी संघ' स्थापन करुन शेतीची हौस पण भागवून घेतली!

{{gap}}अशा अनेक भूमिकांच्या गदारोळात, त्यांच्या 'अिमानदारी' च्या भूमिकेकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. कुलवान स्त्री जसं आपलं शील जपते त्याच प्रखरतेने आणि निष्ठेने, मा. अविनाशनी आपलं अिमान जपलं. या संदर्भात दीनानाथ आणि एकूण मंगेशकर कुटुंबीय याजंबरोबर त्यांचा आलेला संबंध थोडा स्पष्ट करायला हवा.

{{gap}}मा. अविनाश 'बलवंत' मध्ये आले ते नोकर म्हणून. दीनानाथांचा त्यांचा पहिला संबंध नोकर-मालक असा आला. त्यांच्या भूमिका गाजू लागल्या, दीनानाथांबरोबर अुभे राहून त्यांच्या नायिकांच्या भूमिका समरसून करायला लागल्यावर, दोघांचे नाते समानधर्मियांचे बनले. दीनानाथांच्या विलक्षण गायकीमुळे अविनाश भारून गेले<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.......................................१६४</noinclude>
qd4y98q7mvbcmud2mlrry83xd2h9ixg
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१८९
104
77723
237874
203263
2026-10-13T14:40:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237874
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>होते. सुरूवातीला जरी त्याना, भास्करबुवा बखले, वझेबुवा यांची तालीम मिळाली, तरी त्यानी अनन्यभावाने दीनानाथांचे शिष्यत्व पत्करले होते. दीनानाथांची गायकी अप्रतिम होती. तालासुराला पक्की होती. त्यांच्या गाण्यात शोधकदृष्टी, नाविन्य आणि वैचित्र्य होते. गाताना ते नेहमी नवेनवे प्रयोग करीत. 'मानापमान' नाटकातील एका पदाची चाल, त्यानी आठ मात्रांऐवजी सात मात्रांवर घेऊन, त्या पदाचा स्वरविलास वाढविला होता आणि त्यापायी मा. कृष्णाची बोलणी खाल्ली होती. अशा या दीनानाथांचा फार मोठा प्रभाव, अविनाशवर होता. दीनानाथांच्या पुढ्यात बसून अनेक चिजा, नाट्यपदे अविनाशनी आत्मसात केली. लता, आशा ही लहान पोरं त्यावेळी जिवाचा कान करुन ऐकत बसत. दीनानाथांच्या सततच्या सहवासाने गुरू- शिष्याचे नाते, भावाचे बनले. दीनानाथ त्याना धाकटा भाऊ मानत. माई मंगेशकर पण भाऊ मानत. लता, आशा, अुषा, मीना, आणि बाळ (हृदयनाथ) ही भावंडे, त्याना गणूमामा म्हणत. (अजून म्हणतात.) १९१७ ते १९४२ या प्रदीर्घ काळात त्याना दीनानाथांचा सहवास लाभला. नोकर, सहकारी, शिष्य, कुटुंबीय अशा चढत्या श्रेणीने त्यांचे भावसंबंध गहिरे होत गेले. त्यामुळे 'बलवंत' ची स्थिती डबघाईला आली. दीनानाथांचं व्यसन बेसुमार वाढलं, तेव्हा मंगेशकर कुटुंबाला 'गणूमामा' हा मोठाच 'आधारवड' लाभला. नाटकं करायची, 'बलवंत' चा 'ताल' सांभाळायचा, दीनानाथांशी गोड बोलून त्याना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत, त्यांचा 'तोल' सांभाळायचा अशी अविनाशांची कसरत चालली होती आणि 'बलवंत' चे चालकत्व, त्यांच्याकडं आल्यापासून तर अविनाशांची जबाबदारी फारच वाढली. पंखातील बळ गेलेल्या गरूडाप्रमाणे, दीनानाथ हताश झाले. एकेकजण सोडून चालला, तेव्हा तर अविनाश, मंगेशकर कुटुंबियाना घट्ट चिकटून राहिले. जमेल ती मदत करीत राहिले.

{{gap}}आणि त्याचवेळी त्यांची 'सत्त्वपरीक्षा' चालू होती.

{{gap}}'बलवंत' मधील भूमिकांमुळे अविनाश कीर्तिशिखरावर होते. त्यामुळे 'प्रभात' या हिंदुस्थानात अग्रगण्य ठरलेल्या फिल्म कंपनीच्या खुद्द शांतारामबापूनी अविनाशना 'अमर ज्योती' चित्रपटासाठी शांता आपटे, या त्याकाळच्या टॉप हिराईनबरोबर, काम करण्यासाठी पाचारण केले. चंद्रमोहनसारखा नट, अविनाश, 'प्रभात' मधील ऑफर घ्यायला राजी होत नाहीत, म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः सांगलीला आले.सांगलीच्या माई घाटावर बसून दोघांच्या गप्पा झाल्या. अविनाशांचे मन वळवण्याचा त्यानी खूप प्रयत्न केला, पण अविनाश अचल राहिले.

{{gap}}दीनानाथना सोडून जाणं शक्यच नव्हतं.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर................................... १६५</noinclude>
7mxvtkyomlwesslwy8bx2hx1p64yfj9
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९०
104
77724
237875
203264
2026-10-13T14:42:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237875
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}त्यानंतर 'हंस' पिक्चर्सच्या मा. विनायकानी बोलावणे पाठवले. खुद्द बालगंधर्वानी आपल्याकडे बोलावले, "स्त्री भूमिका आणि पुरूषभूमिका तुमच्यासारख्या, सारख्याच ताकदीनं मलासुध्दा करता येणार नाहीत' अशी खुद्द बालगंधर्वानीच पूर्वी अविनाशांची भलावण केली होती.

{{gap}}तरीसुध्दा अविनाश गेले नाहीत.

{{gap}}नैतिक जबाबदारीचं ओझे हे मनाने मानले तरच असते. एरवी कुठेहि जायला अविनाश मुक्त होते. पण ते गेले नाहीत. 'बलवंत' ची हरणारी लढाई ते एकहाती लढत राहिले.

{{gap}}म्हणून तर दीनानाथानी शेवटचा श्वास घेताना हाक मारली ती आपल्या जिवाभावाच्या 'गणू'लाच!

{{gap}}पुढे 'अत्रे पिक्चर्स' साठी आचार्य अत्रेनी अविनाशबरोबर दहा पिक्चर्स करण्याचा 'तोंडी' करार केला. त्यांचा 'पायाची दासी' त्यावेळी तुफान चाललेला होता. 'प्रकाश' पिक्चर्सचे सुप्रसिध्द निर्माते-दिग्दर्शक श्री. विजय भट्ट, अविनाशकडे, 'भरतभेट' चित्रपटासाठी ऑफर घेऊन आले. १४००/- रु.द.म. अशा त्या काळात घसघशीत वाटणारा पगार त्यानी देऊ केला होता. अत्रे सोडायला राजी नव्हतेच; पण त्याना ‘तोंडी' का होईना, आपण 'वचन' दिलय, तेव्हा त्यांचे दहा पिक्चर्स झाल्याशिवाय जायचं कसं? अशा धर्मसंकटात अविनाश पडले होते!

{{gap}}आजच्या काळात 'अिमानदारी' ही सप्तपाताळात गाडली गेलेली चीज आहे. तेव्हा अविनाशांच्या 'अिमान-धर्माची' आपण कल्पनाच करू शकत नाही.

{{gap}}यासंदर्भात ‘फुलवंती’ ही अलिकडे दूरदर्शनवर गाजलेली मालिका जाणकारांच्या लक्षात येईल. त्यातील एका प्रसंगात, फुलवंती, वचनभंग करण्याच्या मनःस्थितीत असते, तेव्हा तिचा सारंगिया कळवळून म्हणतो “बेटी, कलाकारकी जुबान ही असकी जान होती है।"

{{gap}}छोट्याशा भूमिकेतील हा सारंगिया रसिकांच्या स्मरणात राहिला. कारण तो साकार केला होता मा. अविनाशनी! तो सुध्दा वयाच्या ८४ व्या वर्षी निवृत्ती पत्करलेली असतानाहि त्याना हे काम करावचं लागलं. कारण ते 'घरचं काम होतं ना? मंगेशकर मंडळींची ती मालिका होती. आलोकनाथ, ए. के. हनगल अशा मंडळींची 'टेस्ट' झाली होती; पण अुषा मंगेशकरांना जो 'सारंगिया' अभिप्रेत होता, तो त्यांच्यामध्ये मिळेना, म्हणून मग 'घरच्या' गणूमामाना आपल्या भाचीचा हट्ट पुरवावा लागला!

{{gap}}नव्वदीतून शंभरीकडे ताठ कण्याने वाटचाल करत असलेल्या मा. अविनाशना आणखी एका सांगलीकर अविनाशची ही वाङ्मयीन वंदना !

{{right|●●●}}{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर......................................१६६</noinclude>
ph1296svuejklpxd7f0yo1i5pdlavqa
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९१
104
77725
237877
203439
2026-10-13T15:06:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237877
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|दान चिंतामणी राजमतीबाई पाटील}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}सुमारे ७०-८० वर्षांपूर्वीच्या काळात एकूण शिक्षणाचाच प्रसार कमी होता. आज शिक्षणसंस्था अुदंड झाल्या आहेत. सर्व थरातील मुलींना विनासायास, अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण विनामूल्य मिळत आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील समाजमनाची नीटशी कल्पना आपल्याला येत नाही. मुलींनी शाळेत जाऊन मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेणे ही कल्पनाच त्याकाळी क्रांतिकारक वाटंत होती! अशा काळात जैन समाजातील एखाद्या स्त्रीने शाळेत जावे; शिकून आपल्या समाजातील स्त्रियांना शिकवण्यासाठी स्वतःला वाहून घ्यावे, इतकेच काय, आपली सारी संपत्ती धार्मिक आणि शैक्षणिक कार्यासाठी दान करावी ही विलक्षणच गोष्ट म्हणावी लागेल.

{{gap}}अशी लोकविलक्षण स्त्री म्हणजे १९९८साली ज्या महिलेचा 'सांगली-भूषण' म्हणून जाहीरपणे गौरव करण्यात आला त्या 'दान-चिंतामणी' श्रीमती राजमतीबाई पाटील.

{{gap}}आज सांगलीच्या नेमिनाथनगरमध्ये कुणी सहज फेरफटका मारला आणि तेथील नेमिनाथमंदिर, राजमतीभवन आणि राजमती कॉम्प्लेक्स या अत्तुंग, वास्तुशास्त्रदृष्ट्या अत्यंत देखण्या इमारती बघितल्या, तिथे चालणारे कार्य बघितले की या राजमतीबाईंच्या कार्यकर्तृत्वाची कल्पना येईल. पाच-पन्नास लाखांच्या या भव्य वास्तू जैन समाजातील एका महिलेने बांधवून घेतल्या आहेत या वस्तुस्थितीवर कोणाचा सहजासहजी विश्वासच बसणार नाही. सांगली मोठी करण्यासाठी अनेकानी अनेक कामे अुभी केली आहेत; अनेक प्रसंगी त्यासाठी शासन वा समाजाकडून पैसा अुभा केला गेला असेल पण राजमतीबाईंनी मात्र जे काही वैभव अभे केले ते मात्र स्वतःच्या पैशातून. म्हणून त्याचे आगळे कौतुक आहे.

{{gap}}अशा या राजमतीबाईंचा जन्म, १७ मे १९१४ रोजी सांगलीजवळील समडोळी या गावी झाला. त्यांचे बालपण त्यांच्या जनकगृही म्हणजे जैनापूर येथेच गेले. पंचवीस-तीस जणांच्या एकत्र कुटुंबात त्या वाढल्या. केरवारा, धुणी, जनावरांना चारा वैरण, पूजेची तयारी अशा नैमित्तिक कामात त्या तरबेज झाल्या. त्यांच्या मावशीचे यजमान जैन समाजातील सुधारक आणि स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मुली शाळेला जात. ते पाहून आपणही शाळेत जावं असे छोट्या राजमतीच्या<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर........................................१६७</noinclude>
20ljmihnu9qu8a2eb9p9mnk2eqyl3mb
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९२
104
77726
237878
203440
2026-10-13T15:16:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237878
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मनाने घेतलं. त्यांचा हट्ट म्हणून त्याना जैनापूरच्या मुलांच्या शाळेत घालण्यात आले. त्यांची शिक्षणातील एकूण प्रगती बघून शाळेतील शिक्षक मंडळीनी त्याना आणखी शिकवा अशी शिफारस केली.

{{gap}}पण घरच्या लोकांसमोर यक्षप्रश्न होता. तो असा की मुलांच्या शाळेत मुलीला जास्ती दिवस कसे ठेवायचे?

{{gap}}छोट्या राजमतीच्या सुदैवाने म्हणा वा शिक्षण घेण्याची तिची तीव्र अिच्छाशक्ती म्हणून म्हणा पण तिची अिच्छा फलद्रूप झाली.

{{gap}}त्यांचे मामा श्री. बाबगौंडा पाटील यानी त्यावेळी सांगलीत नुकतीच वकिली चालू केली होती. त्यानी राजमतीची शिक्षणाची अिच्छा बघून तिला सांगलीला आपल्या घरी आणलं. त्यावेळच्या सांगलीच्या वखारभागात श्रीमती कळंत्रेबाई यांनी नुकताच जैन महिलाश्रम सुरू केला होता. त्या आश्रमात राजमतीबाईंचे शिक्षण पुढे चालू झाले.

{{gap}}या मामांच्या घरी शिक्षणाचाच योग नव्हता तर विवाहयोगही होता!

{{gap}}पाटील वकिलांचे धाकटे बंधू श्री. नेमगोंडदादा यांच्याबरोबर राजमतीबाईंचा विवाह झाला. राज-नेमीचा संसार सुरू झाला.

{{gap}}१९३१च्या एप्रिलमध्ये राजमतीबाई सातारा केंद्रातून व्हर्न्याक्लुर फायनल परीक्षेत पहिल्या क्रमांकाने अत्तीर्ण झाल्या. त्यावेळी सांगली-मिरजेच्या मुलींना या परिक्षेसाठी सातारा येथे जावे लागे.

{{gap}}जैन समाजात शिकणाऱ्या मुलींची संख्या कमी आणि त्यात एक मुलगी चक्क पहिली येते ही गोष्ट मोठी नवलाईची होती. त्यामुळे पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये जाऊन राजमतीने पुढील शिक्षण घ्यावे असे जैन समाजातील धुरिणाना वाटत होते. पण लग्न होऊन पुरा एक महिनापण झाला नव्हता, अशावेळी राजमतीबाईंच्या यजमानानी म्हणजे नेमगोंडदादांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यामुळेच राजमतीबाई पुण्याच्या गव्हर्मेट ट्रेनिंग कॉलेज फॉर लेडीजमध्ये रीतसर प्रवेश घेऊ शकल्या. मिस् वाडिया या कडक शिस्तीच्या पार्शी महिला त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल होत्या. प्रशासन कसं हाताळावं याचा जणू वस्तुपाठच राजमतीबाईंना तेथे मिळाला. त्या कॉलेजच्या वातावरणात त्यांची अुपजत पण सुप्त असलेली हस्तकलापण बहरून आली. बौद्धिक विषयांचा त्यानी झटून अभ्यास केला. परिणामी तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेत त्यांचा पहिला नंबर आला.

{{gap}}सांगलीला परत आल्यावर काही काळ त्यानी जैन महिलाश्रमात अध्यापनास<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.........................................१६८</noinclude>
jyjc5mlkt7yozaazj5pimthew6m95lo
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९३
104
77727
237879
203441
2026-10-13T15:18:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237879
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच एक विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. खरं म्हणजे त्या महिलाश्रमातच त्यांची कारकीर्द घडावयाची.

{{gap}}पण तसा योग नव्हता. सांगलीच्या राणीसाहेब, सरस्वतीदेवी स्त्री-शिक्षणाच्या मोठ्या पुरस्कर्त्या होत्या. सांगलीत स्थापन झालेल्या मुलींच्या दोन शाळा आणि महिला विद्यालय याकडे त्या जातीने लक्ष देत. राजमतीबाईंच्या अध्यापन कौशल्याची कीर्ती त्यांच्या कानावर जाताच, त्यानी राजमतीबाईना आमच्या शाळेत काम करा अशी गळ घातली. घरातील सर्वांनी चर्चा केली. संस्थानी शाळेचा आणि मुलींची शाळा नं १ ही नावाजलेली शाळा, हुशार विद्यार्थिनींची शाळा, तिथे काम करण्यातील आव्हान या सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा आणि फावल्या वेळात त्या अनुभवाचा फायदा जैन महिलाश्रमास करुन द्यावा असा सर्वांचा निर्णय झाला. त्यानुसार राजमतीबाई १९३८ साली या मुलींच्या सरकारी शाळेत रुजू झाल्या आणि तिथं अितक्या रुळल्या की अखेरीस त्या शाळेतूनच मुख्याध्यापिका म्हणून राजमतीबाई निवृत्त झाल्या. या दीर्घ काळात त्यानी अक्षरशः तन मन आणि प्रसंगी धन वेचून त्या शाळेचे एखाद्या खाजगी आदर्श शाळेप्रमाणे संचालन केले. योगायोगाने त्यांची बालमैत्रिण सौ. इंदुमती टिळक या त्याना त्याच शाळेत सहाध्यायी म्हणून मिळाल्या. दोघीनी अपार कष्ट घेऊन, एकतानतेने काम करुन ही शाळा चांगलीच नावारुपाला आणली. शाळेचे परीक्षांचे निकाल अुत्तम लागतच; पण वक्तृत्व, चित्रकला, संगीत, नाट्य अशा सर्व सांस्कृतिक बाबतीत ही शाळा सांगलीत अग्रेसर राहिली. राजमतीबाईंची या शाळेच्या एकूण कामकाजावर एवढी जबरदस्त छाप पडली होती की मुलींची शाळा नं १ म्हणण्याऐवजी 'राजमतीबाईंची शाळा' असाच अुल्लेख सर्वाच्या तोंडी येऊ लागला !

{{gap}}सेवानिवृत्तीनंतर त्यानी पुन्हा जैन महिलाश्रमाच्या कामाला सुरुवात केली. आठ वर्षे त्यानी सेक्रेटरी म्हणून काम केले. हिंदमाता कन्झ्युमर्स सोसायटी या सरकारमान्य महिला धान्य (सहकारी) दुकानाच्या सतरा वर्षे त्या ऑनररी सेक्रेटरी होत्या. आश्रमात त्यानी महिलांचे भजनी मंडळ, धार्मिक परिक्षांचे वर्ग, महिलांसाठी पोथी वाचन असे अनेक उपक्रम राबवले. बाल मंदिरापासून महाविद्यालयापर्यंत महिलांसाठी शाळा-कॉलेज विशिष्ट परंपरेने चालवणाऱ्या वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीवर त्यानी आठ वर्षे काम केले. दक्षिण भारत जैन सभेच्या महिला विभागाशी त्यांचा निकटचा संबंध होता. दक्षिण भारत जैन महिला समाजाच्या बेळगाव अधिवेशनाच्या वेळी त्या स्वागताध्यक्षा होत्या तर रुकडीच्या अधिवेशनाच्या वेळी त्यानी अध्यक्षपदाची सूत्रे समर्थपणे सांभाळली होती.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.........................................१६९</noinclude>
7dm55nxuxc2bhyf8ir19qjf3cac57l3
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९४
104
77728
237880
203442
2026-10-13T15:27:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237880
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}दरम्यानच्या काळात त्यांचे पती श्री. नेमगौंडदादानी शैक्षणिक क्षेत्रात बरीच कामगिरी बजावली होती. त्यांचे थोरले बंधू बाबगोंडा पाटील जैन समाजाचे धुरीणत्व करत होतेच; खेरीज तत्कालीन सांगली संस्थानात ते ओक लोकनियुक्त मंत्री होते. जैन समाजाला बँकिंगचा आणि शिक्षणप्रसाराचा जणू मूलमंत्रच बाबगोंडा पाटील यानी दिला होता. म्हणून तर त्यानी रत्नाकर बँक आणि 'लठ्ठे एज्युकेशन सोसायटी' स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनानंतर नेमगौंडदादानी लठ्ठे एज्युकेशनच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतले. १९५६साली ते ऑनररी सेक्रेटरी झाले. कै. वसंतदादा पाटील आणि बॅ. जी. डी. पाटील यांच्या सहकार्याने त्यानी संस्थेची सर्वांगीण प्रगती केली. आर्ट्स, कॉमर्स आणि लॉ कॉलेज काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. धडाक्याने बांधकाम सुरु करुन, टी. के. पाटील या कर्तृत्ववान अिंजिनीयर मित्राच्या सहाय्याने थोडक्या खर्चात पूर्ण केले. या सर्व कामांमध्ये नेमगौंडदादाना राजमतीबाईंची पूर्ण मदत असे. कामाच्या ताणामुळे म्हणा वा अन्य सदस्यांच्या विरोधामुळे नेमगौंडांना मनस्ताप होई, त्यांचा क्षोभ होई तेव्हा राजमतीबाई त्याना सांभाळून घेत; प्रसंगी पदरमोड करुन संस्थेला आर्थिक मदत करीत. ती अुभयता संस्थेच्या कार्याशी एवढी एकरूप झाली होती की त्या अुभयतानी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

{{gap}}त्यानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीलाच आपले दत्तक अपत्य मानायचे ठरविले. नाहीतरी त्या अुभयताना स्वतःचे अपत्य नव्हते.

{{gap}}जैन समाजातील परमपूज्य देशभूषण महाराज यांच्या अुपस्थितीतच नेमगोंडादादा आणि राजमतीबाईंनी आपली सर्व मालमत्ता लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आणि बस्ती वगैरे धार्मिक गोष्टींसाठी देण्याचे व्रत घेतले.

{{gap}}केवढे हे विलक्षण औदार्य! महाराजानी नेमगोंडदादाना 'भाभाषा' ही सन्माननीय पदवी दिली.

{{gap}}पण दुर्दैवाने सततच्या कष्टांमुळे, शारीरिक, मानसिक त्रासामुळे नेमगौंडदादांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने त्याना पूर्णपणे ग्रासले. मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये फेऱ्या सुरू झाल्या. राजमतीबाईनी अपार कष्ट अपसले. अनेक अुपास- तपास केले; पण काही अुपयोग झाला नाही. २८ फेब्रुवारी १९७३ रोजी कॅन्सरने नेमगौंडदादांचा अंत झाला.

{{gap}}विशिष्ट ध्येयवादाने सामाजिक कार्य करण्यात परस्पराना पूरक असलेली जोडपी समाजात असणे दुरापास्तच. त्यामुळेच नेमदौंडा- राजमती यासारख्या<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..................................१७०</noinclude>
3ili9fmg8qcru767dat20pogmk3ldmd
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९५
104
77729
237881
203443
2026-10-13T15:30:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237881
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जोडप्याचे अप्रूप.

{{gap}}माणसाला स्वतःसाठी किती जमिनीची जरुरी आहे? टॉलस्टॉयच्या 'त्या' सुप्रसिध्द कथेवरून राजमतीबाईनी स्वतःलाच हा प्रश्न विचारला असावा म्हणून तर त्यानी आपल्या पतीच्या अिच्छेनुरूप, थोडी थोडकी नव्हे तर पावणे दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळाची जिराईत - बागाईत जमीन, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीस दिली. यातून जे तीन प्लॉटस् बाजूला ठेवलेले होते त्यावर नेमिनाथमंदिर, राजमतिभवन आणि राजमती कॉम्प्लेक्स अशा सांगली शहराच्या देखणेपणात भर टाकणाऱ्या भव्य वास्तू बांधल्या गेल्या. या नेमिनाथमंदिरामुळे विश्रामबागच्या बाजूला जी जैन वस्ती वाढली होती त्यांची सोय झाली एरवी बस्तीसाठी त्याना गावात यावे लागे. राजमती भवन हे तर आता मोठे सांस्कृतिक केंद्र झाले आहे.

{{gap}}राजमतीबाईंचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यानी स्थापन केलेला 'श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट' या ट्रस्टच्या माध्यमातून, बौद्धिक, तांत्रिक, कलात्मक शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करुन देणे किंवा अशा संस्थांना अर्थ सहाय्य करणे, विधवा, परित्यक्ता अशा गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यवसाय केंद्र सुरू करणे, धार्मिक परीक्षांचे अभ्यासवर्ग, वाचनालय, योगासनवर्ग, संस्कार केंद्र, साहित्यिक, गुणवंत, कलावंत याना प्रोत्साहन देणे, गरजू विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी परदेश प्रवासासाठी सहाय्य करणे असे या ट्रस्टचे बहुविध अद्देश आहेत. सामाजिक कार्यासाठी समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या पुरुषांसाठी 'श्री.नेमगोंडा पाटील गौरव पुरस्कार' आणि महिलांसाठी (प्रत्येकी पाच हजारांचा) 'श्रीमती राजमती पाटील' पुरस्कार या ट्रस्टकडून दिले जातात.

{{gap}}ही सर्वंकष अद्दिष्टे पाहून समाजाच्या सर्व स्तरांच्या विकासाचा हेतू यातून दिसून येतो. जैन समाजाच्या दृष्टीने शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक अुन्नतीसाठी या ट्रस्टमुळे एक व्यासपीठच अुपलब्ध झाले आहे. या ट्रस्टच्या पुढाकाराने पहिला 'कल्पद्रुम विधान समारंभ' संपन्न झाला. त्यावेळी सुमारे सातशे श्रावक- श्राविकांनी पूजाविधीमध्ये भाग घेतला होता. या ट्रस्टच्या पुढाकारानेच जैन मराठी साहित्य संमेलनाचे पाचवे अधिवेशन १९९० च्या डिसेंबरमध्ये सांगलीत प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमती राजमतीबाईंची निवड करण्यात आली होती. त्याप्रसंगी समयोचित भाषण करताना त्यानी सांगलीच्या आर्थिक राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासात 'जैन समाजाचे केवढे मोठे योगदान आहे' हे विविध अुदाहरणांद्वारे दाखवून दिले; त्याचबरोबर मराठी भाषेत जैन साहित्याचा प्रसार कमी आहे या वस्तुस्थितीवर नेमके<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...................................१७१</noinclude>
fewqk8sk572boyive7imhnp95nge6jf
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९६
104
77730
237882
203444
2026-10-13T15:33:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237882
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>बोट ठेवून, जैन समाजाचे, जैन संस्कृतीचे दर्शन घडविणारे साहित्य निर्माण करण्याचे आवाहन त्यावेळी राजमतीबाईंनी आपल्या भाषणातून केले होते.

{{gap}}वयाची ७५ वी अुलटल्यावर मात्र राजमतीबाईंची प्रकृती साथ देईनाशी झाली. रक्तदाब, गुडघेदुखी या व्याधी त्याना त्रास देऊ लागल्या. त्यातच राजमतीबाईंचे धार्मिक आचरण अत्यंत कडक. अंगात ताप असताना सुध्दा त्यांचे अुपास-तापास चालूच असत. या बाबतीत आपल्या जवळच्या नातेवाईकांचेच काय पण डॉक्टर मंडळींचेहि त्या ऐकत नाहीत. या अति कष्टांमुळेच कदाचित त्याना ऑक्टोबर ८९ मध्ये ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस अुपचार घ्यावे लागले. अखेरीस पेस मेकर बसविल्यावर त्यांच्या प्रकृतीस थोडा आराम पडला. पण त्यानंतर त्यांच्या नैमित्तिक कार्यात मात्र खंड पडला. आपल्या कामाचे बहुतेक सर्व व्याप त्यानी आता कमी केले आहेत.

{{gap}}राजमतीबाईंचा एकच एक गुणविशेष सांगा असा कोणी प्रश्न केला तर त्याचे एकमेव अुत्तर म्हणजे त्यांच्या मनाचा कनवाळूपणा. मिरज मिशनमध्ये स्वतः दुखण्याने जर्जर झालेल्या असतानासुध्दा एका गरीब रुग्णाची पीडा पाहून त्यांचा जीव कळवळला. त्याला पेस-मेकर बसवण्यासाठी १६,००० रुपयांची आवश्यकता आहे तरच त्याचा प्राण वाचेल हे कळल्यावर, स्वतःच्या शुश्रूषेला असलेल्या माणसाला, ताबडतोबीने सांगलीला पाठवून त्यानी त्या अनोळखी तरुणासाठी पैशाची व्यवस्था केली.

{{gap}}बघा म्हणजे तो तरुण अनोळखी पण त्याची पीडा मात्र बाईंच्या कनवाळू मनाला 'ओळखीची' वाटली!

{{gap}}याच करुणेपोटी जैन समाजामधील तीस-पस्तीस गरीब बंधू-भगिनींना त्यानी स्वतःच्या खर्चाने श्री सम्मेतशिखरजीची यात्रा घडवून आणली. या दानशूरतेमुळेच श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ येथील पूज्य श्रीचारुकीर्ती महाराजानी, त्याना 'दान चिंतामणी' ही श्रेष्ठ पदवी आणि मानपत्र दिले.

{{gap}}त्यांच्या या दातृत्वाचा आणि एकूणच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सुप्रसिध्द वक्ते आणि लेखक श्री. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते १९९८ मध्ये जाहीर सभेत त्याना मानपत्र अर्पण करण्यात आले आणि त्याना 'सांगली - भूषण' हा किताब देण्यात आला.

{{center|(नुकतेच ३१ डिसेंबर २००१ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. )}}
{{center|●●●}}{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.........................१७२</noinclude>
o3yr9zbpvo2ban45pc1jfejq7ec6aaz
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९७
104
77731
237884
203446
2026-10-13T15:39:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237884
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''कथाकार श्री. दा. पानवलकर'''}}}}
{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}‘हंस' व ‘मोहिनी' मासिकांचे संपादक श्री. आनंद अंतरकर यानी केलेले एका व्यक्तीचे वर्णन पहा.

{{gap}}"सावळा ग्रॅनाईट वर्ण. सहा फुटांच्या आसपास अुंची. भव्य भालप्रदेश. कृष्णाकाठची कमावलेली कणखर शरीरयष्टी. तांबूस पिवळी झाक असलेले डोळे. पिंगट पारदर्शी बाहुल्या, खोलवर ठाव घेणारी भेदक नजर. गरूडतीक्ष्ण धार त्या नजरेत अुतरलेली 'आठा'च्या आकड्यासारखं नाक. त्याखाली गालांत टोकं रुतणारी तलवार कट् मिशी. इंग्रजी 'डब्ल्यू' सारखी खड्डा पडलेली हनुवटी. ही दुबेळकी हनुवटीही पहाणाऱ्याकडे टवकारून बघायची. जरबेच्या भाषेत बोलायची. चेहेऱ्यांच्या स्नायूंवर, जीवनानंद दिलेल्या कष्टदानाच्या जागोजागी दृढ गाठी बांधलेल्या. हसणंही मेटॅलिक. नजर बांधून टाकणारं बेछूट, मर्दानी व्यक्तिमत्व."

{{gap}}या वर्णनावरून हे एखाद्या लेखकाचं, त्यातही, सांगलीकडील लेखकाचं वर्णन असेल, असं वाटतं तरी का? पण तो खरोखरीच एक लेखक होता; तो सुध्दा सांगलीचा.

{{gap}}त्याचं नाव श्री. दा. पानवलकर.

{{gap}}१९६० ते १९८५ या पाव शतकातले एक जबरदस्त सामर्थ्याचे कथाकार म्हणून, ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं ते पानवलकर.

{{gap}}सांगलीसारख्या गावात, आणि मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला हा माणूस, वृत्तीने एवढा कलंदर, बेछूट आणि बेदरकार होता की अर्नेस्ट हेमिंग्वेसारख्या एखाद्या पाश्चात्य लेखकाचीच आठवण व्हावी!

{{gap}}पण ही वृत्ती कदाचित् त्यांच्या नोकरीच्या स्वरुपावरून आलेली असावी. पानवलकर कस्टम ऑफिसर होते. काळे धंदे करणाऱ्या स्मगलर्सना, वेळप्रसंगी कंबरड्यात लाथ घालून, ड्युटी चुकवून लपवलेला माल ओकावयाला लावणारे, ते एक करडे कस्टम ऑफिसर होते. एक लेखक म्हणून त्यांचे कथावाङ्मयसुद्धा एखाद्या अस्सल कस्टम ऑफिसरसारखेच होते. मानवी जीवनात, मानवी वर्तनात जे<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...............................................१७३</noinclude>
95kq53s5rq4esz05fbdj0faos9nwptw
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९८
104
77732
237885
203447
2026-10-13T15:47:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237885
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जे 'लपते' आहे त्याचा कसून 'शोध' घेणारे !

{{gap}}अशा या पानवलकरांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२६ रोजी सांगलीत झाला. फार श्रीमंत नाही पण खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या, पानवलकर कुटुंबात या श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांचं बालपण व्यतीत झालं. पाच-सहा भावंडांच्या कुटुंबामधील श्री. दा. हे नंबर दोनचे. त्यांचे वडील सांगली संस्थानामध्ये मुलकी अधिकारी होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण सांगलीच्या शाळा क्र. २ मध्ये झालं तर माध्यमिक शिक्षण सिटी हायस्कूलमध्ये झालं. जवळच असणाऱ्या कृष्णा नदीचं, त्याकाळी वारंवार येणाऱ्या महापुराचं आकर्षण श्री. दा. ना. होतं. तसंच तिथं असणाऱ्या तालमीचं पण होतं. सिटी हायस्कूलमधील हुशार विद्यार्थ्यांमध्ये त्यांची गणना होत असे. मात्र त्यांच्यावर खरा प्रभाव होता तो केशवराव दीक्षित या नामवंत संस्कृत शिक्षकाचा.त्यानी 'जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती' मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्याची परंपराच सांगलीत निर्माण केली होती. पानवलकर हे दीक्षितांच्या आवडत्या विद्यार्थ्यापैकी एक होते. अितके की पानवलकर मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी आजारी असताना, ते स्वतः घरी येऊन त्यांचा संस्कृतचा अभ्यास घेत. त्यानी श्री.दांची या शिष्यवृत्तीसाठी खूप तयारी करुन घेतली होती. थोड्या फरकाने ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती श्री. दा. मिळवू शकले नाहीत पण दुसऱ्या क्रमांकाची अकबरनवीस ही शिष्यवृत्ती त्याना मिळाली. या निमित्ताने केलेला संस्कृतचा अभ्यास मात्र त्याना लेखक म्हणून अत्यंत अपयुक्त ठरला. संस्कृत वाङ्मयातील अनेक विलक्षण कल्पनांचा परिपोष पानवलकरानी आपल्या अनेक कथांमधून केलेला आहे.

{{gap}}पण शालेय जीवनातील पानवलकरांची सुखकारी मार्गक्रमणा अचानकपणे संपुष्टात आली. ते शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हा एकूण कुटुंबावर आणि व्यक्तिशः पानवलकरांवर मोठाच घाला होता. कारण पाठोपाठच त्यांचा थोरला भाऊ, ऐन तारुण्यात वयाच्या २१ व्या वर्षीच गेला. त्यामुळे मॅट्रिक झाल्यावर, कुटुंबाची मोठी जबाबदारी त्यांच्या शिरावर पडली. धाकटी चार भावंडे आणि विधवा आई यांची अुपजीविका करण्यासाठी कुठं तरी नोकरी करणं त्याना क्रमप्राप्त होतं. एरवी कॉलेजात जाऊन ते संस्कृतचे प्राध्यापक झाले असते.

{{gap}}त्या दरम्यानच, सांगली संस्थानात तंबाखूसाठी अबकारी खाते अुघडण्यात आले होते. पुण्यात गाजलेल्या 'रविकिरण मंडळा' चे एक सदस्य श्री. द. ल. गोखले हे या खात्यात अधिकारी होते. त्यांना पानवलकरांची हुशारी आणि कौटुंबिक जबाबदारी याची जाणीव होती. त्यानी या अबकारी खात्यात पानवलकरांची नेमणूक केली. त्यामुळे घरची जबाबदारी ते यथासांग पेलू शकले. जयसिंगपूर, कोल्हापूर,<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर........................... १७४</noinclude>
hmphwktbxgqnz8rv2ql5pjwsw37t4xl
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९९
104
77733
237886
203448
2026-10-13T15:52:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
237886
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सातारा अशा ठिकाणी त्याना नोकरीनिमित्त जावे लागले. पुढे या अबकारी खात्याची काही नोकरमंडळी कस्टमखात्याकडे पाठवण्यात आली. त्यामुळे पानवलकर १९४९ मध्ये मुंबईला गेले.

{{gap}}कस्टममध्ये गेल्यापासून पानवलकरांचा जीवनक्रमच बदलून गेला. घरच्या जबाबदाऱ्यांच्या जाणीवेमुळे त्यानी लग्न केले नाही. जेमतेम १५ वर्षाचे असताना पितृछत्र हरपले आणि ऐन पंचवीशीतच ते मातृछत्राला पारखे झाले. त्यामुळे अधिकारवाणीने त्यांच्यामागे लग्नाचा तगादा लावणारे कोणी नव्हते. कस्टममधील नोकरीचे स्वरूप असे होते की वेळच्या वेळी घरी परतणे, जेवणे वगैरे गोष्टी अशक्य होत्या. सुरुवातीला माधवाश्रम, नंतर नॅशनल हॉस्टेल, अशा ठिकाणी पानवलकर खोली घेऊन रहात. खानावळीचं जेवण किंवा डबा असा प्रकार असायचा. त्यामुळे मुक्त, स्वच्छंदी जीवनाची त्याना सवय लागली. सवयीने तेच जीवन आवडू लागले! आयुष्यभर कमी-अधिक फरकानं असाच जीवनक्रम राहिला. तरुण वयात शरीर साथ देत होतं. पन्नाशी अुलटल्यावर मात्र अनेक तक्रारी सुरु झाल्या. एकटेच रहात असल्याने प्रकृतीत होणारे बारीक-सारीक चढउतार कुणाच्या लक्षात येणे शक्य नव्हते. आजारी पडल्यावर एकटेच हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होत. सांगलीच्या भावंडांना कधी कधी या प्रकारांची कल्पनाही नसे. प्रकृतीच्या कारणामुळेच पानवलकरानी मुदतीपूर्वी नोकरीतून निवृत्ती घेतली. कावीळ झाली होती. मुंबईत सरकारी हॉस्पिटलमध्ये अुपचार घेतले. पानवलकरांचा, मित्रमंडळींचा फार मोठा गोतावळा नव्हताच. त्यांच्यावर निस्सीम प्रेम असणाऱ्या काही मित्रांनी, त्याना सरकारी हॉस्पिटल मधून दादरच्या 'शुश्रुषा' या प्रख्यात खाजगी रुग्णालयात ठेवलं. तेथील अुपचारांमुळे प्रकृती पुष्कळशी सुधारली. पायावरची सूज अुतरली. जखम भरत आली. धूसर झालेली स्मरणशक्ती पूर्ववत् झाली. आपल्या पायांनी ते हॉस्पिटलमधून फिरू लागले. विश्रांतीसाठी त्यांचे बंधू-भावजय त्याना सांगलीत घेऊन आले. पण त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावतच गेली. दादरच्या 'शुश्रुषा' मध्ये झालेली सुधारणा म्हणजे दिवा विझण्यापूर्वी मोठा व्हावा, अशातला प्रकार होता.

{{gap}}अखेर १९ ऑगस्ट १९८५ रोजी सांगलीत, आपल्या घरी, आपल्या जन्मगावीच, वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

{{gap}}ही झाली त्यांची छोटीशी लौकिक जीवनकथा. त्यांची वाङ्मयीन जीवनकथा मात्र फार मोठी आहे, विलक्षण आहे. त्यांच्या लेखनात इतका वेगळेपणा, इतकी अुंची कशी आली होती हा एक अभ्यासाचाच विषय व्हावा इतकं त्यांचं लेखन आशयघन आहे. वाङ्मयाच्या अभ्यासकालाच असा शोध घेणे शक्य आहे. मात्र<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.....................१७५</noinclude>
p7isjd1ijzth6xu4nptczdpdoqquq9f
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२००
104
77734
237887
169764
2026-10-13T16:00:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237887
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वाङ्मयात साधारण रुचि असणाऱ्या वाचकाने ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर यानी संपादित केलेलं "श्री. दा. पानवलकर यांची कथा" हे पुस्तक आणि त्यानीच श्री.जया दडकर यांजबरोबर संपादित केलेलं "श्रीदा पानवलकर" अशी दोन पुस्तके वाचली तरी 'श्रीदा' ही काय विलक्षण 'चीज' होती याची कल्पना येईल.
{{gap}}एरवी सर्वसामान्य माणसाला, पानवलकर म्हणजे ज्यांच्या कथेवर 'अर्धसत्य' हा गाजलेला चित्रपट निघाला ते पानवलकर एवढीच त्यांची ओळख असते.
{{gap}}पानवलकरांची वाङमयीन जीवनकथा साधारणपणे १९५०च्या आसपास सुरु झाली; म्हणजे नोकरीनिमित्ताने सांगली सोडून मुंबईत आल्यानंतर. वास्तविक लेखनाकडे वळावं अशी पार्श्वभूमी घरात नव्हती. कदाचित संस्कृत भाषेच्या अध्ययनाने लिहिण्याची अुर्मी त्यांच्यात निर्माण झाली असावी. जातिवंत कथाकार त्यांच्यात अुपजतच असावा. साधीसुधी घटना सांगतानासुद्धा, पानवलकर अशी काही रंगवून सांगत की ऐकणाऱ्याला आपण एखादी कथा ऐकतोय असाच भास व्हावा. मुंबईहून सांगलीला ते नोकरीच्या कालखंडात, भावंडाना भेटावयास आणि घरगुती कामासंबंधात येत. वाटेत कधी अुशीर झाला तर एस. टी, घाटाच्या ट्रॅफिकमध्ये कशी अडकली किंवा ड्रायव्हर कसा रड्या होता, यासारख्या क्षुल्लक गोष्टीसुद्धा, एखादी चटकदार कथा सांगावी अशा थाटात पानवलकर रंगवून सांगत. विलक्षण अनुभवाना सामोरं जाताना, त्या त्या घटनेतील थरार, नाट्य त्याना लोभवून जाई. सांगली सोडून मुंबईत नोकरीनिमित्तानं वास्तव्य करावं लागलं, तरी त्यांची सांगलीशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. सांगलीत आल्यावर, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटीबरोबरच, ते हौसेने आमराईत जात, तात्यासाहेबांच्या मळ्यात जात आणि तिथल्या नीरव शांततेचा अनुभव घेत. त्यांच्या लहानपणी सांगलीत फूटबाल, क्रिकेटचे वेड मोठ्या प्रमाणावर होते. पानवलकर स्वतः या दोन्ही खेळांचे भोक्ते होते. फूटबॉलचे सामने राजवाड्यातील पटांगणात होत. त्या दंगली पाहूनच आणि त्या खेळातील एक विलक्षण खेळाडू पाहूनच पुढे पानवलकरानी 'बक् अप रावण' ही कथा लिहिली. त्यांच्या लहानपणी, त्यानी सांगलीत अनेक कलंदर व्यक्तिमत्त्वे बघितली. त्या काळच्या सनातनी वातावरणात परजातीतील स्त्री बरोबर लग्न करणारा, हॉटेल काढून, त्यामध्ये मांसाहारी पदार्थ बेधडकपणे ठेवणारा, धाडसी, बेदरकार वृत्ती असणारा, एक बेछूट वृत्तीचा ब्राह्मण, पानवलकरानी बघितला होता. त्या व्यक्तिमत्त्वाला त्यांनी त्यांच्या कथेत चपलखपणे आणलं आहे. सांगलीच्या संस्थानी वातावरणाच्या संदर्भातील, त्यांची 'श्रीमंतांचा वस्तरा' ही कथा गाजली होती. ज्या त्यांच्या 'सूर्य' कथेवरून 'अर्धसत्य' हा हिंदी चित्रपट गाजला, त्यातील करडा पोलिस इन्स्पेक्टर, सांगलीच्या संस्थानी काळात, त्याना जवळून बघायला मिळाला होता. सांगली - हरिपूरच्या देवळातील पूजा-अर्चा,<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||१७६}}</noinclude>
82mu3qudg5ec2aqv5ygcl8u0614dh2i
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०१
104
77735
237888
169765
2026-10-13T16:06:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237888
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>धीरगंभीर वातावरण, नदीकाठ, घाटाच्या पायऱ्या, असं बालपणात बघितलेलं जीवन, त्यांच्या 'हुंकार' सारख्या कथांमधून प्रत्ययकारीपणानं प्रकटलेलं आहे.
{{gap}}एवंच काय, पानवलकरांच्या वाङमयीन जीवनकथेचा प्रारंभ, जरी ते मुंबईला गेल्यावर झाला असला, तरी त्यांची मानसिक जडण-घडण सांगलीतच झाली होती. सांगलीच्या शालेय जीवनात, केशवराव दीक्षित यांजसारख्या मातब्बर संस्कृत पंडितांकडे केलेलं संस्कृतचं अध्ययन त्याना आयुष्यभर पुरलं. नोकरीत सुस्थिर होण्यापूर्वी काही काळ ते संस्कृतच्या शिकवण्या करुन अुदरनिर्वाह करीत.
{{gap}}पानवलकरांना जसा सांगलीचा वारसा, वाङमयीन जीवनात अुपयोगी पडला तसं मोठं 'घबाड' त्याना कस्टमच्या नोकरीत मिळालं! त्यांच्या कथांची अनेक पात्रे आपसूक त्यांच्याकडे चालत आली. या नोकरीत आडमाप आयुष्य जगणारी, अनेक राकट, रासवट, दणकट तशीच खबरदार चलाख माणसं, त्याना जवळून अनुभवायला मिळाली. नोकरीत त्याना मिळालेलं हे घबाड कथालेखनासाठी फार अुपकारक ठरलं. अर्थात कस्टममध्ये अनेक लोक असतात; पण अशा अनुभवांना शब्दबद्ध करुन वाङ्मयात चिरंतन करण्याचं सामर्थ्य असणारा एखादाच म्हणून तर पानवलकरांचं कौतुक.
{{gap}}याबरोबरच पानवलकरांना त्यांची स्वतःची कलासक्त वृत्ती, लेखक म्हणून सुप्रतिष्ठित करायला अत्यंत अुपकारक झाली. त्याना अभिजात संगीताची आवड होती. अनेक मैफली ऐकून, त्यानी नुसतीच आपली श्रवणभक्ती जोपासली नाही तर शास्त्रीय संगीतातील बारकावे जाणून ते शब्दबध्द करण्याचे सामर्थ्य अंगी बाणवलं; त्यामुळेच त्यांच्या आवडत्या कुमार गंधर्वावर ते 'शंकरा' सारखा लेख, अधिकारवाणीनं लिहू शकले. इंद्राणी रहमानच्या नृत्याचा कार्यक्रम बघून, त्या बेहोशीतच, 'एका नृत्याचा जन्म’यासारख्या विलक्षण कल्पना-विलास असणाऱ्या त्यांच्या कथेचा जन्म झाला. पानवलकराना क्रिकेटचं फुटबॉलचं पण वेड होतं. ब्रॅडमनसारखा विश्वविख्यात खेळाडू त्याच्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड अशा प्रवासकाळात काही तासच मुंबईच्या विमानतळावर थांबणार होता. तेव्हा त्याला नुसतं काचेतून बघण्यासाठी, पानवलकरानी जिवाचा केवढा आटापिटा केला होता! अशा विविध प्रकारच्या आवडींमुळे, पानवलकरांमधील ललित लेखक चांगला जोपासला जात होता.
{{gap}}पानवलकरांची पहिली कथा 'कवी आणि बादशहा,' १९५० च्या सप्टेंबरमध्ये 'महाराष्ट्र' मध्ये प्रसिध्द झाली होती. कदाचित् त्याच्या पूर्वी लिहिलेल्या, पण अप्रकाशित राहिलेल्या अशा काही कथा असतीलही.
{{gap}}पानवलकरांचे कथासंग्रह १९६३नंतर प्रकाशित झाले. 'गजगा,' औदुंबर,' 'सूर्य,'<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||१७७}}</noinclude>
46qs1hhevkv1i3yqhw5j3ac44aih9ys
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०२
104
77736
237889
169766
2026-10-13T16:09:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237889
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>‘एका नृत्याचा जन्म’, ‘चिनाब' आणि 'जांभूळ' असे त्यांचे सहा कथासंग्रह १९६३ ते १९८१ च्या दरम्यान प्रसिद्ध झाले. त्यांमध्ये त्यांच्या एकूण ७७ कथा आल्या आहेत. औदुंबर, सूर्य आणि चिनाब या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र राज्य पारितोषिके मिळाली होती. 'अभिरूचि ने १९६६ मध्ये आयोजित केलेल्या कथास्पर्धेत, त्यांच्या 'सूर्य' या कथेला दुसरे बक्षिस मिळाले होते. त्याच कथेवर 'अर्धसत्य' हा हिंदीमध्ये गाजलेला चित्रपट निघाला. कथेचा चित्रपट होईपर्यंत जे जे म्हणून पानवलकरांच्या अनुभवास आले त्यावर आधारित ललित लेखन त्यानी 'शूटिंग' या पुस्तकात केले आहे. हे त्यांच्या जीवनातील प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक. याखेरीज लेख, चर्चा, एकांकिका अशा स्वरूपाचे स्फुट लेखन पानवलकरानी महाराष्ट्र टाइम्स, किर्लोस्कर, ललित, सत्यकथा, लोकसत्ता आदि नियतकालिकांमधून केलं होतं. नाटक, एकांकिका, कादंबरी, काव्य या अितर साहित्य प्रकारांमध्ये त्यानी फारशी मुशाफिरी केली नाही. त्यांची एक एकांकिका (खबर) सत्यकथेत प्रसिद्ध झाली होती. नाना फडणीस यांच्या जीवनावर नाटक लिहण्याचे त्यांच्या मनात होते. पण तो मनसुबा कागदावरच राहिला. मात्र त्यांच्या एकूण लेखनशैलीला, कादंबरीचा फॉर्म चांगला हाताळता येईल असे अनेकाना वाटे. सुप्रसिध्द नाटककार विजय तेंडूलकर, ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर, प्रा. श्री. पु. भागवत यासारख्या त्यांच्या चाहत्या मित्रांनी, पानवलकराना वेळोवेळी कादंबरी लेखनाचा आग्रह केला होता. खुद्द पानवलकरानी एका कादंबरीचा आराखडा मनाशी निश्चित केला होताच. सांगली संस्थानच्या राजघराण्यातील अंतर्गत घडामोडींची त्याना चांगली माहिती होती. त्या विषयावर ते लिहिणार होते. ही कादंबरी पुरी झाली असती तर त्यांच्या सर्व लेखनगुणांचे सम्यक दर्शन त्यामध्ये झाले असते.
{{gap}}शिक्षकी वा प्राध्यापकी पेशामध्ये नसतानाही, पानवलकरानी आपलं साहित्यप्रेम जागृत ठेवलं. स्वतःमधील लेखक सजग ठेवला हा त्यांच्या गौरवाचा भाग आहे. वाङ्मयाशी अर्थाअर्थी काही संबंध नसलेल्या कस्टम खात्यात नोकरी करुन त्यानी दर्जेदार कथा लिहिल्या ही गोष्ट विलक्षण आहे. संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळे, त्या भाषेतील खजिना त्यानी धुंडाळला असेलच, पण साध्या एस. टी. च्या प्रवासातसुद्धा त्यांच्यामधील लेखक जागा असे. अशा एका प्रवासात दोन खेडुतांचा चाललेला संवाद ते लक्षपूर्वक ऐकत होते. एकजण दुसऱ्याला आपल्या कर्मकटकटी सांगताना म्हणाला, "गेल्या महिन्यात कुणाचं पैसं येळेवर आलं न्हाई. आपली देणी तर चुकत न्हाईत. इचार करुन करुन पार कल्हई झाली डोस्क्याची." पानवलकरानी मनाशी लागलीच नोंद केली की चिंतातूर परिस्थितीला नाव 'डोक्याची कल्हई'!. मुंबईतील माथाडी कामगार एकमेकांत शिवीगाळ करत भांडत असत, तेव्हा पानवलकर लक्षपूर्वक<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||१७८}}</noinclude>
gxs3ga5wx2r38ftwpvekqay5v554zjl
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०३
104
77737
237890
169767
2026-10-13T16:19:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237890
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्या 'शिव्या' ऐकून ठेवत. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासंदर्भात ते एकदा म्हणाले होते की "शरीरासारखी भाषा कमवावी लागते, गोटीबंद करावी लागते. कथा लिहायची म्हणजे शब्दांची ताकद फार हवी. नेमक्या शब्दात तुम्हाला वजन पकडायला लागतं. डोक्याचं भुस्कट पडतं."
{{gap}}त्यांच्या कथावैशिष्ट्यांचा अुहापोह करण्याची ही जागा नव्हे मात्र अधिक जिज्ञासा असणाऱ्यानी वर अुल्लेख आलेली दोन पुस्तके अवश्य वाचून पहावीत. पानवलकरांविषयी प्रा. म. वा. धोंड यानी असं म्हटलयं की "त्यांचा डोळा म्हणजे सिनेकॅमेराची लेन्सच. एखाद्या घटनेचे ते कथन करत नाहीत तर चित्रण करतात." त्यांच्या कथेवरून 'अर्धसत्य' हा चित्रपट निर्माण झाला. पानवलकराना तेव्हा १९८४ चे अुत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. प्रसिद्धिच्या झोतात असतानाच, दुदैवाने प्रकृती खालावत जाऊन त्यांचे १९८५ मध्येच दुःखद निधन झाले. त्यांच्या काही अप्रकाशित कथा, ललित लेख, अलिकडेच 'मौज' प्रकाशनाने 'कांचन' आणि 'संजारी' या पुस्तकांद्वारे प्रकाशित केले आहेत. त्यांची स्मृती कायमस्वरूपी जतन करण्याच्या हेतूने, त्यांच्या चाहत्यांनी 'श्री. दा. पानवलकर स्मृति-कथा पुरस्कार' ठेवलेला आहे. गेली १३-१४ वर्षे मराठी कथाकारास हा पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेचे नियोजन सुरुवातीला साहित्य परिषद्, सांगली करत असे; नंतर हे काम सांगली (जिल्हा) नगरवाचनालयातर्फे केले जात आहे.
{{gap}}एका महान कथाकाराची ही छोटीशी कथा !

{{center|●●●}}{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||१७९}}</noinclude>
fkwhsnvmt5aqmo439dmfwelgs0sqipp
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/५६
104
112467
237892
237810
2026-10-14T11:43:57Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237892
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>अहंकारी मानसिकतेची परिसीमा आहे. त्याची खरे तर शरम वाटली पाहिजे; पण अनेकदा आंदोलनकर्त्या स्त्रियांनाच पोलिसांच्या रोषाचा प्रसाद मिळतो आणि तरीही जागोजागी बायका दारूविरोधी आंदोलने छेडत आहेत.

{{gap}}व्यसनाधीन होणे हे खरे तर जीवनातल्या खऱ्या समस्येपासून दूर जाणाऱ्या भ्याड, दुबळ्या आणि पलायनवादी मानसिकतेचे लक्षण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होणारा पुरुषसमाज या दुबळेपणाचा बळी आहे आणि अशा दुबळ्या मानसिकतेच्या समाजाने स्त्रियांना 'अबला' म्हणावे हा सर्वात भीषण विनोद आहे. जन्मापासूनच ग्रामीण स्त्रीवर्ग नकाराला आणि अन्यायाला सामोरा जात असतो. कष्ट तर अपरंपार असतात. या वेदनेतून सुटण्यासाठी त्या नाही कोणत्या नशेच्या आहारी जात? त्या उलट मूळ समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात.

{{gap}}स्त्रीला केवळ शाब्दिक गौरवाचे आणि 'देवी'त्वाचे मोहजाल आता मोहवू शकत नाही. ग्रामीण स्त्रीही अनेक अंगांनी जागी होते आहे. तिच्या मार्गातले अडथळे खूप मोठे आहेत; पण ते दूर करण्याची तिची जिद्द त्याहीपेक्षा मोठी आहे.

{{gap}}आम्हाला खरोखर ग्रामकेंद्री विकासाचे स्वप्न सत्यात आणायचे असेल, तर या सुकलेल्या हरळीला अनुकूल वातावरणाचे खत-पाणी द्यायला हवे. तिला मोकळ्या मनाने कुटुंबाने, समाजाने, सरकारने आणि मुख्य म्हणजे तिच्या आसपास अनेक नात्यांनी वावरणाऱ्या पुरुषवर्गाने साथ द्यायला हवी. त्यात त्याचे आणि त्याच्या भावी पिढ्यांचेही कल्याण आहे. "एक स्त्री शहाणी झाली की कुटुंबाला शहाणी करते." असे म्हणणाऱ्या म. ज्योतिबा फुलेंची वाणी सत्य ठरण्याचा अनुभव पदोपदी येतच असतो.<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ५५}}</noinclude>
pvoqsnzxym8k02ra27zoo4z853wz7nn
237893
237892
2026-10-14T11:44:21Z
JayashreeVI
4058
237893
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>अहंकारी मानसिकतेची परिसीमा आहे. त्याची खरे तर शरम वाटली पाहिजे; पण अनेकदा आंदोलनकर्त्या स्त्रियांनाच पोलिसांच्या रोषाचा प्रसाद मिळतो आणि तरीही जागोजागी बायका दारूविरोधी आंदोलने छेडत आहेत.

{{gap}}व्यसनाधीन होणे हे खरे तर जीवनातल्या खऱ्या समस्येपासून दूर जाणाऱ्या भ्याड, दुबळ्या आणि पलायनवादी मानसिकतेचे लक्षण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होणारा पुरुषसमाज या दुबळेपणाचा बळी आहे आणि अशा दुबळ्या मानसिकतेच्या समाजाने स्त्रियांना 'अबला' म्हणावे हा सर्वात भीषण विनोद आहे. जन्मापासूनच ग्रामीण स्त्रीवर्ग नकाराला आणि अन्यायाला सामोरा जात असतो. कष्ट तर अपरंपार असतात. या वेदनेतून सुटण्यासाठी त्या नाही कोणत्या नशेच्या आहारी जात? त्या उलट मूळ समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात.

{{gap}}स्त्रीला केवळ शाब्दिक गौरवाचे आणि 'देवी'त्वाचे मोहजाल आता मोहवू शकत नाही. ग्रामीण स्त्रीही अनेक अंगांनी जागी होते आहे. तिच्या मार्गातले अडथळे खूप मोठे आहेत; पण ते दूर करण्याची तिची जिद्द त्याहीपेक्षा मोठी आहे.
{{gap}}आम्हाला खरोखर ग्रामकेंद्री विकासाचे स्वप्न सत्यात आणायचे असेल, तर या सुकलेल्या हरळीला अनुकूल वातावरणाचे खत-पाणी द्यायला हवे. तिला मोकळ्या मनाने कुटुंबाने, समाजाने, सरकारने आणि मुख्य म्हणजे तिच्या आसपास अनेक नात्यांनी वावरणाऱ्या पुरुषवर्गाने साथ द्यायला हवी. त्यात त्याचे आणि त्याच्या भावी पिढ्यांचेही कल्याण आहे. "एक स्त्री शहाणी झाली की कुटुंबाला शहाणी करते." असे म्हणणाऱ्या म. ज्योतिबा फुलेंची वाणी सत्य ठरण्याचा अनुभव पदोपदी येतच असतो.<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ५५}}</noinclude>
gu8xvy384nz5yzphx9ffr1gfsjqmgj4
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/५७
104
112484
237894
2026-10-14T11:44:59Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नवसहस्त्रक : परंपरा आणि परिवर्तन ! एकविसावे शतक असो की पहिले शतक असो किंवा माणसाला आपल्या माणुसपणाचे भान येण्याचा प्रारंभकाळ असो; आनंद, उत्सव आणि त्यापोटीचा उत्साह हा जणु..."
237894
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
नवसहस्त्रक : परंपरा आणि परिवर्तन !
एकविसावे शतक असो की पहिले शतक असो किंवा माणसाला आपल्या माणुसपणाचे भान येण्याचा प्रारंभकाळ असो; आनंद, उत्सव आणि त्यापोटीचा उत्साह हा जणु समाज म्हणून माणसाचा स्थायीभाव आहे.
ज्या क्षणी दोन व्यक्तींनी एकमेकांकडे पाहून प्रथम हास्य केले असेल, निर्हेतुकपणे स्पर्श केला असेल त्याक्षणीच उत्सवाचा प्रारंभ झाला असेल. त्याची रूपे बदलत आली हे स्वतंत्रपणे सांगायला नको; कारण सतत बदलणे हे व्यक्तीच्या आणि समाजाच्याही जिवंतपणाचे लक्षण असते. जोवर समाज जिवंत राहणार आहे, तोवर माणूस उत्सव साजरे करणारच आहे.
उत्सव म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन आनंद निर्माण करणे. मग त्यानुसार ते उत्सव कुटुंबापुरते असतील किंवा घराणे, जात, जमात, गाव, राष्ट्र, जग अशी व्याप्ती वाढवीत नेणारे असतील. सध्याच नाही का नवसहस्त्रकाच्या उंबरठ्यावरचा उत्सव साजरा करण्यासाठी सगळे जग सज्ज झाले आहे. जात- पात, पक्ष-पंथ हे भेद ओलांडून, धर्म-भाषा आणि राष्ट्र यांच्या सीमांचे उल्लंघन करून हा महोत्सव साजरा करण्यासाठी जग कटिबद्ध झाले आहे. यात व्यापारीकरणाचा भाग राजकारण कितपत आहे याच्याशी उत्सव साजरा करणाऱ्यांना काही देणे-घेणे नाही. तो काथ्याकूट समाजचिंतकांनी करावा हे का होते? साधे उत्तर आहे, माणूस समाजशील प्राणी आहे, याचाच अर्थ तो उत्सवप्रिय प्राणी आहे.

जगभर आदिमकाळापासून साजरे होणारे काही उत्सव पिढ्यान्पिढ्या आपोआप साजरे होत आहेत. त्यासाठी खरे तर कोणत्या पंचांगांचीही गरज नसते. पाऊस पडला, नवे धान्य, फुले, फळे आली, नद्यांना पाणी आले, सुखद ऊन पडले, कोणतेही कारण उत्सवासाठी पुरते आणि यातले काही ना काही सतत घडतच आले आहे ना! समाजबांधणीच्या ओघात मग कुणी त्या प्रदेशांच्या पंचांगांतही त्यांची नोंद केली आणि त्यांना सांस्कृतिक संस्थात्मकता दिली इतकेच! पण
५६<noinclude></noinclude>
6vvwpr7c4czhmh59hpex4xk8ui3111i
237895
237894
2026-10-14T11:50:32Z
JayashreeVI
4058
237895
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''नवसहस्त्रक : परंपरा आणि परिवर्तन!'''}}}}
{{gap}}एकविसावे शतक असो की पहिले शतक असो किंवा माणसाला आपल्या माणुसपणाचे भान येण्याचा प्रारंभकाळ असो; आनंद, उत्सव आणि त्यापोटीचा उत्साह हा जणु समाज म्हणून माणसाचा स्थायीभाव आहे.

{{gap}}ज्या क्षणी दोन व्यक्तींनी एकमेकांकडे पाहून प्रथम हास्य केले असेल, निर्हेतुकपणे स्पर्श केला असेल त्याक्षणीच उत्सवाचा प्रारंभ झाला असेल. त्याची रूपे बदलत आली हे स्वतंत्रपणे सांगायला नको; कारण सतत बदलणे हे व्यक्तीच्या आणि समाजाच्याही जिवंतपणाचे लक्षण असते. जोवर समाज जिवंत राहणार आहे, तोवर माणूस उत्सव साजरे करणारच आहे.

{{gap}}उत्सव म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन आनंद निर्माण करणे. मग त्यानुसार ते उत्सव कुटुंबापुरते असतील किंवा घराणे, जात, जमात, गाव, राष्ट्र, जग अशी व्याप्ती वाढवीत नेणारे असतील. सध्याच नाही का नवसहस्त्रकाच्या उंबरठ्यावरचा उत्सव साजरा करण्यासाठी सगळे जग सज्ज झाले आहे. जात-पात, पक्ष-पंथ हे भेद ओलांडून, धर्म-भाषा आणि राष्ट्र यांच्या सीमांचे उल्लंघन करून हा महोत्सव साजरा करण्यासाठी जग कटिबद्ध झाले आहे. यात व्यापारीकरणाचा भाग राजकारण कितपत आहे याच्याशी उत्सव साजरा करणाऱ्यांना काही देणे-घेणे नाही. तो काथ्याकूट समाजचिंतकांनी करावा हे का होते? साधे उत्तर आहे, माणूस समाजशील प्राणी आहे, याचाच अर्थ तो उत्सवप्रिय प्राणी आहे.
{{gap}}जगभर आदिमकाळापासून साजरे होणारे काही उत्सव पिढ्यान्पिढ्या आपोआप साजरे होत आहेत. त्यासाठी खरे तर कोणत्या पंचांगांचीही गरज नसते. पाऊस पडला, नवे धान्य, फुले, फळे आली, नद्यांना पाणी आले, सुखद ऊन पडले, कोणतेही कारण उत्सवासाठी पुरते आणि यातले काही ना काही सतत घडतच आले आहे ना! समाजबांधणीच्या ओघात मग कुणी त्या प्रदेशांच्या पंचांगांतही त्यांची नोंद केली आणि त्यांना सांस्कृतिक संस्थात्मकता दिली इतकेच! पण<noinclude>{{center|५६}}</noinclude>
dkmqow7nrrf7wxl6cqamqkf2vtl3i2l
237896
237895
2026-10-14T11:51:08Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237896
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''नवसहस्त्रक : परंपरा आणि परिवर्तन!'''}}}}
{{gap}}एकविसावे शतक असो की पहिले शतक असो किंवा माणसाला आपल्या माणुसपणाचे भान येण्याचा प्रारंभकाळ असो; आनंद, उत्सव आणि त्यापोटीचा उत्साह हा जणु समाज म्हणून माणसाचा स्थायीभाव आहे.

{{gap}}ज्या क्षणी दोन व्यक्तींनी एकमेकांकडे पाहून प्रथम हास्य केले असेल, निर्हेतुकपणे स्पर्श केला असेल त्याक्षणीच उत्सवाचा प्रारंभ झाला असेल. त्याची रूपे बदलत आली हे स्वतंत्रपणे सांगायला नको; कारण सतत बदलणे हे व्यक्तीच्या आणि समाजाच्याही जिवंतपणाचे लक्षण असते. जोवर समाज जिवंत राहणार आहे, तोवर माणूस उत्सव साजरे करणारच आहे.

{{gap}}उत्सव म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन आनंद निर्माण करणे. मग त्यानुसार ते उत्सव कुटुंबापुरते असतील किंवा घराणे, जात, जमात, गाव, राष्ट्र, जग अशी व्याप्ती वाढवीत नेणारे असतील. सध्याच नाही का नवसहस्त्रकाच्या उंबरठ्यावरचा उत्सव साजरा करण्यासाठी सगळे जग सज्ज झाले आहे. जात-पात, पक्ष-पंथ हे भेद ओलांडून, धर्म-भाषा आणि राष्ट्र यांच्या सीमांचे उल्लंघन करून हा महोत्सव साजरा करण्यासाठी जग कटिबद्ध झाले आहे. यात व्यापारीकरणाचा भाग राजकारण कितपत आहे याच्याशी उत्सव साजरा करणाऱ्यांना काही देणे-घेणे नाही. तो काथ्याकूट समाजचिंतकांनी करावा हे का होते? साधे उत्तर आहे, माणूस समाजशील प्राणी आहे, याचाच अर्थ तो उत्सवप्रिय प्राणी आहे.
{{gap}}जगभर आदिमकाळापासून साजरे होणारे काही उत्सव पिढ्यान्पिढ्या आपोआप साजरे होत आहेत. त्यासाठी खरे तर कोणत्या पंचांगांचीही गरज नसते. पाऊस पडला, नवे धान्य, फुले, फळे आली, नद्यांना पाणी आले, सुखद ऊन पडले, कोणतेही कारण उत्सवासाठी पुरते आणि यातले काही ना काही सतत घडतच आले आहे ना! समाजबांधणीच्या ओघात मग कुणी त्या प्रदेशांच्या पंचांगांतही त्यांची नोंद केली आणि त्यांना सांस्कृतिक संस्थात्मकता दिली इतकेच! पण<noinclude>{{center|५६}}</noinclude>
0txfvh8w85gsnbwgq6f1d5zsciw45nq
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/५८
104
112485
237897
2026-10-14T11:51:36Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ आधी उत्सव, मग पंचांग हे पक्के ! आणखीही महत्त्वाच्या गोष्टी जगभर सतत घडत असतात आणि त्यांचेही उत्सव होत असतात. एका बाईच्या देहातून हुबेहूब माणसाचे इवलेसे रूप जन्म घेते, तो क..."
237897
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
आधी उत्सव, मग पंचांग हे पक्के !
आणखीही महत्त्वाच्या गोष्टी जगभर सतत घडत असतात आणि त्यांचेही उत्सव होत असतात. एका बाईच्या देहातून हुबेहूब माणसाचे इवलेसे रूप जन्म घेते, तो क्षण किती विस्मयचकित करणारा! तो 'क्षण' हाच 'सण'! आनंददायी क्षण म्हणजे सण! त्यापोटी होणाऱ्या हर्षाचा आविष्कार हा उत्सवच! म्हणून मग गाणे, नाचणे (वाद्ये), वाजवणे, खाणे-पिणे, सुंदर वस्तू (रांगोळ्या, मूर्ती, वस्त्रे इ. ) घडवणे, अनेक अंगांनी उत्सवाचा उत्साह सर्व समाजात व्यक्त होत असतो.
बाळ जन्माची पूर्व अट म्हणजे विवाह, म्हणून तोही उत्सव ! विवाहाची पूर्व अट म्हणून स्त्रीची पहिली रजस्वलावस्था म्हणून तोही उत्सव, बालपणीच्या नाजूक अवस्थेतून बाळ तगले, म्हणून पाचवी, षष्ठी, बारसे... सगळी उत्सवांची मालिका ! शुद्ध माणसाची शुद्ध प्राकृतिक निर्मिती म्हणजे अपत्यजन्म! ते सृजन हे उत्सवाचे निमित्त !
म्हणून जमीन, पाणी, सूर्य यातून झालेले सृष्टीचे सृजन असो की नर-मादी एकत्र येऊन झालेले अपत्य सृजन असो दोन्हीही शुद्ध प्राकृतिक, सनातन सृजनोत्सव झाले असले तर आश्चर्य नाही. हे अनुभव एकूणच सार्वत्रिक माणसाच्या जातीचे असल्याने या घटनांशी निगडित उत्सवही सार्वत्रिक असणार. अगदी आदिम काळापासून नवसहस्त्रकापर्यंत आणि आदिम जातींपासून प्रगततम समुदायांपर्यंत! नावे फक्त भिन्न!
या उत्सवी उत्साहाच्या पोटात अगदी खोलवर एक भावना असते ती भय! भयभावना ही अगदी जन्मजात ! आईच्या सुरक्षित गर्भकोशातून बाहेर फेकले जाण्याचा क्षण हा भयाचा प्रारंभ क्षण! भोवतालच्या जगात आपली सुरक्षितता जपणे हा भयापोटीचा उद्योग माणूस जन्मभर या ना त्या प्रकारे करीत असतो. एकाकी, एकान्त, अनामिक भयमुक्ततेसाठी स्वेतर जगाशी संबंध जोडीत ऐहिक जीवन सुरक्षित करणे ही गरजच असते. त्यापोटी अनेक बाबींबरोबरच सण- उत्सवांचा पसारा माणसाने वाढवीत नेला आहे. आदिम अवस्थेत नृत्य-गीतातून तो स्वेतर जगाशी नाते जोडीत राहिला. दुसरीकडे प्रतिकूल निसर्ग अनुकूल व्हावा म्हणून प्रकृतीशी संवाद साधित राहिला पाणी, झाडे, पशु-पक्षी, सूर्य, आकाश या प्रकृती घटकातच माणसाला एकाच वेळी रक्षक आणि भक्षक शक्तींचा प्रत्यय आला आणि त्यातूनच माणसाच्या मनात 'देव' जन्माला आला. सण-उत्सवाला आणखी एक निमित्त !
बायकांचे जीवन तर दर क्षणी असुरक्षिततेला सामोरे जाण्यास भाग पाडणारे. बाळाने पोटात आकार घ्यायला सुरवात केल्यापासून दोघेही असुरक्षित. मग ती निरगाठ सुरगाठ / ५७<noinclude></noinclude>
248xyl5vle8fw5fnvm6q55m79pu9gkl
237898
237897
2026-10-14T11:58:10Z
JayashreeVI
4058
237898
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>आधी उत्सव, मग पंचांग हे पक्के!

{{gap}}आणखीही महत्त्वाच्या गोष्टी जगभर सतत घडत असतात आणि त्यांचेही उत्सव होत असतात. एका बाईच्या देहातून हुबेहूब माणसाचे इवलेसे रूप जन्म घेते, तो क्षण किती विस्मयचकित करणारा! तो 'क्षण' हाच 'सण'! आनंददायी क्षण म्हणजे सण! त्यापोटी होणाऱ्या हर्षाचा आविष्कार हा उत्सवच! म्हणून मग गाणे, नाचणे (वाद्ये), वाजवणे, खाणे-पिणे, सुंदर वस्तू (रांगोळ्या, मूर्ती, वस्त्रे इ. ) घडवणे, अनेक अंगांनी उत्सवाचा उत्साह सर्व समाजात व्यक्त होत असतो.

{{gap}}बाळ जन्माची पूर्व अट म्हणजे विवाह, म्हणून तोही उत्सव! विवाहाची पूर्व अट म्हणून स्त्रीची पहिली रजस्वलावस्था म्हणून तोही उत्सव, बालपणीच्या नाजूक अवस्थेतून बाळ तगले, म्हणून पाचवी, षष्ठी, बारसे... सगळी उत्सवांची मालिका! शुद्ध माणसाची शुद्ध प्राकृतिक निर्मिती म्हणजे अपत्यजन्म! ते सृजन हे उत्सवाचे निमित्त!

{{gap}}म्हणून जमीन, पाणी, सूर्य यातून झालेले सृष्टीचे सृजन असो की नर-मादी एकत्र येऊन झालेले अपत्य सृजन असो दोन्हीही शुद्ध प्राकृतिक, सनातन सृजनोत्सव झाले असले तर आश्चर्य नाही. हे अनुभव एकूणच सार्वत्रिक माणसाच्या जातीचे असल्याने या घटनांशी निगडित उत्सवही सार्वत्रिक असणार. अगदी आदिम काळापासून नवसहस्त्रकापर्यंत आणि आदिम जातींपासून प्रगततम समुदायांपर्यंत! नावे फक्त भिन्न!

{{gap}}या उत्सवी उत्साहाच्या पोटात अगदी खोलवर एक भावना असते ती भय! भयभावना ही अगदी जन्मजात! आईच्या सुरक्षित गर्भकोशातून बाहेर फेकले जाण्याचा क्षण हा भयाचा प्रारंभ क्षण! भोवतालच्या जगात आपली सुरक्षितता जपणे हा भयापोटीचा उद्योग माणूस जन्मभर या ना त्या प्रकारे करीत असतो. एकाकी, एकान्त, अनामिक भयमुक्ततेसाठी स्वेतर जगाशी संबंध जोडीत ऐहिक जीवन सुरक्षित करणे ही गरजच असते. त्यापोटी अनेक बाबींबरोबरच सण-उत्सवांचा पसारा माणसाने वाढवीत नेला आहे. आदिम अवस्थेत नृत्य-गीतातून तो स्वेतर जगाशी नाते जोडीत राहिला. दुसरीकडे प्रतिकूल निसर्ग अनुकूल व्हावा म्हणून प्रकृतीशी संवाद साधित राहिला - पाणी, झाडे, पशु-पक्षी, सूर्य, आकाश या प्रकृती घटकातच माणसाला एकाच वेळी रक्षक आणि भक्षक शक्तींचा प्रत्यय आला आणि त्यातूनच माणसाच्या मनात 'देव' जन्माला आला. सण-उत्सवाला आणखी एक निमित्त!
{{gap}}बायकांचे जीवन तर दर क्षणी असुरक्षिततेला सामोरे जाण्यास भाग पाडणारे. बाळाने पोटात आकार घ्यायला सुरवात केल्यापासून दोघेही असुरक्षित. मग ती<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ५७}}</noinclude>
794f4vly5ysahdu1bx3uv3h590h6jc6
237899
237898
2026-10-14T11:58:42Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237899
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>आधी उत्सव, मग पंचांग हे पक्के!

{{gap}}आणखीही महत्त्वाच्या गोष्टी जगभर सतत घडत असतात आणि त्यांचेही उत्सव होत असतात. एका बाईच्या देहातून हुबेहूब माणसाचे इवलेसे रूप जन्म घेते, तो क्षण किती विस्मयचकित करणारा! तो 'क्षण' हाच 'सण'! आनंददायी क्षण म्हणजे सण! त्यापोटी होणाऱ्या हर्षाचा आविष्कार हा उत्सवच! म्हणून मग गाणे, नाचणे (वाद्ये), वाजवणे, खाणे-पिणे, सुंदर वस्तू (रांगोळ्या, मूर्ती, वस्त्रे इ. ) घडवणे, अनेक अंगांनी उत्सवाचा उत्साह सर्व समाजात व्यक्त होत असतो.

{{gap}}बाळ जन्माची पूर्व अट म्हणजे विवाह, म्हणून तोही उत्सव! विवाहाची पूर्व अट म्हणून स्त्रीची पहिली रजस्वलावस्था म्हणून तोही उत्सव, बालपणीच्या नाजूक अवस्थेतून बाळ तगले, म्हणून पाचवी, षष्ठी, बारसे... सगळी उत्सवांची मालिका! शुद्ध माणसाची शुद्ध प्राकृतिक निर्मिती म्हणजे अपत्यजन्म! ते सृजन हे उत्सवाचे निमित्त!

{{gap}}म्हणून जमीन, पाणी, सूर्य यातून झालेले सृष्टीचे सृजन असो की नर-मादी एकत्र येऊन झालेले अपत्य सृजन असो दोन्हीही शुद्ध प्राकृतिक, सनातन सृजनोत्सव झाले असले तर आश्चर्य नाही. हे अनुभव एकूणच सार्वत्रिक माणसाच्या जातीचे असल्याने या घटनांशी निगडित उत्सवही सार्वत्रिक असणार. अगदी आदिम काळापासून नवसहस्त्रकापर्यंत आणि आदिम जातींपासून प्रगततम समुदायांपर्यंत! नावे फक्त भिन्न!

{{gap}}या उत्सवी उत्साहाच्या पोटात अगदी खोलवर एक भावना असते ती भय! भयभावना ही अगदी जन्मजात! आईच्या सुरक्षित गर्भकोशातून बाहेर फेकले जाण्याचा क्षण हा भयाचा प्रारंभ क्षण! भोवतालच्या जगात आपली सुरक्षितता जपणे हा भयापोटीचा उद्योग माणूस जन्मभर या ना त्या प्रकारे करीत असतो. एकाकी, एकान्त, अनामिक भयमुक्ततेसाठी स्वेतर जगाशी संबंध जोडीत ऐहिक जीवन सुरक्षित करणे ही गरजच असते. त्यापोटी अनेक बाबींबरोबरच सण-उत्सवांचा पसारा माणसाने वाढवीत नेला आहे. आदिम अवस्थेत नृत्य-गीतातून तो स्वेतर जगाशी नाते जोडीत राहिला. दुसरीकडे प्रतिकूल निसर्ग अनुकूल व्हावा म्हणून प्रकृतीशी संवाद साधित राहिला - पाणी, झाडे, पशु-पक्षी, सूर्य, आकाश या प्रकृती घटकातच माणसाला एकाच वेळी रक्षक आणि भक्षक शक्तींचा प्रत्यय आला आणि त्यातूनच माणसाच्या मनात 'देव' जन्माला आला. सण-उत्सवाला आणखी एक निमित्त!
{{gap}}बायकांचे जीवन तर दर क्षणी असुरक्षिततेला सामोरे जाण्यास भाग पाडणारे. बाळाने पोटात आकार घ्यायला सुरवात केल्यापासून दोघेही असुरक्षित. मग ती<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ५७}}</noinclude>
1mkqf9z64mwpc63sh6tstjemvxso86k