विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf 106 74682 237952 237938 2026-10-16T17:26:08Z कल्पनाशक्ती 3813 237952 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार" 156="वि.स. खांडेकर आणि सांगली" 164="नटवर्य मामा पेंडसे" 176="श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )" 191 ="राजमतीबाई पाटील" 197="श्री. दा. पानवलकर" 204 ="सय्यद अमीन" 207="क्रिकेटपटू विजय हजारे" 217 ="नंदू नाटेकर" 225="फोटो" 230="थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 236 ="वसंतदादा पाटील"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} d5fnlfluk0kav53gr8yy5vufceongp3 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३० 104 77768 237945 169796 2026-10-16T17:07:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237945 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''२०० वर्षांच्या सांगलीचा जन्मदाता'''}}
{{xx-larger|'''थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन'''}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}प्रत्येक गावाला स्वतःचा असा काही चेहरा-मोहरा असतो. स्वतःची अशी ओळख असते. सांगली गावाचं अस्तित्व इ.स. १८०० पूर्वी अगदी नगण्य होतं. आज कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. १७६८ च्या सुमारास हरिपूर हे गाव सांगलीच्या दुप्पट होतं. सांगलीची लोकवस्ती एक हजार तर त्यावेळी हरिपूरची वस्ती दोन हजार होती! आज तेच हरिपूर सांगलीचं अुपनगर शोभेल! संगीत, साहित्य, नाट्य, क्रीडा, वैद्यक, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात, सांगलीचं नाव सर्वत्र दुमदुमत आहे.
{{gap}}सांगली नगरीला असा 'नवा चेहरा' मिळवून देण्याचं ऐतिहासिक कार्य केले ते चिंतामणराव (थोरले) आप्पासाहेब पटवर्धन या सांगली संस्थानच्या पहिल्या अधिपतीनी. पेशवाई कालखंडात मिरज येथे पटवर्धन सरदारांची मूळ जहागीर होती. घरगुती कलह सुरू झाल्यावर, मिरज जहागिरीची वाटणी होऊन, अुपरोक्त चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन बाहेर पडले. कृष्णाकाठी असलेलं सांगली गाव त्यानी आपल्या संस्थानची राजधानी म्हणून निवडलं. योग्य ती बांधकामे वगैरे झाल्यावर, १८०१ मध्ये जरी सांगली अधिकृतपणे संस्थानची राजधानी झाली, तरी जानेवारी १८०० मध्येच सांगलीत येऊन आप्पासाहेबानी नवीन पेठा वसवून सांगली गावाचा चेहरा- मोहरा बदलण्यास सुरूवात केली. एका अर्थी आज दिसणाऱ्या आधुनिक सांगलीचा तो जन्मच म्हणायचा!
{{gap}}तेव्हा सांगलीच्या २०० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं, सांगलीच्या त्या भाग्यविधात्याचं, चिंतामणरावांचं चिंतन करणं समयोचित ठरेल.
{{gap}}या आप्पासाहेबांचा जन्म ५ जानेवारी १७७५ रोजी मिरज किल्ल्यात झाला. सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव पेशवे या दोन्ही पेशव्यांचा जन्म त्याच वर्षातील होता. सरदारकीची वस्त्रे आप्पासाहेबाना ६ फेब्रुवारी १७८३ रोजी मिळाली; मात्र त्यावेळी ते केवळ ८ वर्षांचे असल्याने, जहागिरीची सर्व व्यवस्था त्यांचे चुलते गंगाधरपंत पहात असत. गंगाधरपंतांच्या मनातून सरदारकीची वस्त्रे त्यानाच मिळावयास<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०३}}</noinclude> hc3hv3t1vjzvf8lcvm5ee0mlkkxer2u पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३१ 104 77776 237946 169804 2026-10-16T17:13:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237946 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>हवी होती. त्यामुळेच गृहकलह वाढत राहिला. अगदी पेशवाईतील राघोबादादा आणि माधवराव यांच्यामधील गृहकलहासारखाच. परिणामी, पेशवे दरबारच्या संमतीने मिरज जहागिरीचे विभाजन झाले. १८०० च्या जानेवारीत वाटणीची यादी झाली. (या यादीला 'वाटणीची यादी' असे न म्हणता 'घरसमजूत' असे म्हणत.) आप्पासाहेब हे पटवर्धन घराण्यातील वडील शाखेचे आणि पटवर्धन जहागिरीचे मुख्य सरदार. त्यामुळे मिरज ठाणे आणि मिरज किल्ला त्याना मिळावयास हवा होता. तसा त्यांचा आग्रहही होता. पण अखेरीस मध्यस्थांच्या विनंतीवरून त्यानी तो आग्रह सोडला. सहा लाखाचा मुलूख घेऊन ते बाहेर पडले. आपल्या मुलुखातील कृष्णानदीकाठचा सांगली गाव त्याना आवडला. म्हणून आपली संस्थानची राजधानी सांगली हीच त्यानी ठरवली. त्यावेळी सांगली गाव नदीकाठच्या भागापुरतेच सीमित होतं. म्हणून आप्पासाहेबानी पद्धतशीरपणे पेठा आखून गाव वसवण्यास सुरुवात केली. राहावयास सुरक्षित जागा हवी, म्हणून कृष्णा नदीपासून ४-५ फर्लांगावर अुत्तराभिमुख किल्ला आणि राजघराण्यातील मंडळीना राहण्यासाठी वाडा बांधण्याचे आप्पासाहेबानी ठरविले. तो किल्ला म्हणजेच आजचा गणेशदुर्ग. आप्पासाहेब सांगलीत नेमके कोणत्या वर्षी आले याचा अुल्लेख मिळत नाही. कारण वाटण्या झाल्याझाल्याच त्याना पेशव्यांचे सरदार म्हणून युद्धात अडकून पडावे लागले. त्यामुळे गणेशदुर्ग बांधकामास विलंब लागला.
{{gap}}करवीरकर छत्रपतींबरोबर पेशवे दरबारचे काही वैमनस्य आले होते. तेव्हा त्यांच्यावर चालून जाण्याची आज्ञा परशुरामभाऊ पटवर्धन याना झाली. त्यांच्याबरोबर आप्पासाहेब गेले. हरिपूर-समडोळीत, कृष्णा नदीच्या काठी, आप्पासाहेब आणि करवीरकर मंडळी यांच्यामध्ये चकमकी झाल्या; तेव्हा करवीरकर मंडळी माघारी गेली. दरम्यान निपाणीजवळ परशुरामभाऊ पटवर्धन आपला गोट घेऊन होते. ते बेसावध असताना करवीरकर मंडळीनी त्यांच्यावर हल्ला चढवून त्याना निर्दयपणे मारले; तेव्हा सर्व पटवर्धन मंडळी कोल्हापूरवर चाल करून गेली. करवीर शहरावर आप्पासाहेबानी मोर्चे लावले. मात्र याच सुमारास बाजीरावसाहेब पेशवे आणि दौलतराव शिदें या दोघांमध्ये मोहिमेविरुद्ध काही मसलत ठरत होती. त्यामुळे पटवर्धन मंडळीना वेढा अुठवावा लागला आणि आप्पासाहेब सांगलीस परतले. ह्या सर्व घडामोडी फेब्रुवारी १८०० च्या दरम्यान घडल्या.
{{gap}}यानंतरची आप्पासाहेबांच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे धोंडजी वाघाबरोबरची लढाई. त्याच वर्षाच्या अुत्तरार्धात, कर्नाटक भागात धोंडजी वाघ नावाच्या लुटारूने स्वतःजवळ फौजफाटा बाळगून इंग्रज, पेशवे, पटवर्धन, रास्ते वगैरेच्या कर्नाटक भागातील मुलुखात बरीच लुटालूट चालवली होती. त्याच्यावर इंग्रजातर्फे जनरल वेलस्ली, पेशव्यांतर्फे सरदार धोंडोपंत गोखले, (सेनापती बापू गोखले यांचे चुलते)<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०४}}</noinclude> dbnx1dpdhwbqqoek6vp2nqw726rfgyk पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३२ 104 77777 237947 169805 2026-10-16T17:16:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237947 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आणि पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे सांगलीकर आप्पासाहेब पटवर्धन चालून गेले. बऱ्याच चकमकी घडल्या. १० सप्टेंबर १८०० रोजी झालेल्या चकमकीत धोंडजी वाघाने, आप्पासाहेब, धोंडोपंत गोखले याना घेरले. कर्नाटकातील हल्याळ येथे मोठी लढाई झाली. धोंडोपंत गोखले आणि त्यांचा पुतण्या आप्पाजी गणेश, धोंडजी वाघाच्या तावडीत सापडले आणि त्या अुभयतांना निर्घृणपणे मारण्यात आले. खुद्द आप्पासाहेब पटवर्धन यांच्या नाकावर तलवारीचा वार बसून नाक लोंबू लागले! अुजव्या बरगडी आणि कुशीस तीन जखमा झाल्या. पण त्या स्थितीतही त्यानी युद्ध चालूच ठेवले. पुढे जनरल वेलस्लीने धोंडजी वाघाचा नाश केला. आप्पासाहेबांच्या शौर्याबद्दल पेशवे दरबाराने कौतुक केलेच पण वेलस्लीने त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली. या युद्धामुळे आप्पासाहेबांची प्रतिष्ठा वाढली. बापू गोखले यांच्यासारखा पुढे इतिहासात गाजलेला सेनापतीही त्यांना मानू लागला.
{{gap}}या दोन्ही युद्धांमधून सवड मिळताच १८०५ मध्ये आप्पासाहेबानी सांगलीत परतल्यावर गणेशदुर्गाचे काम सुरू केले आणि १८०७ पर्यत सर्व बांधकाम पूर्ण केले. चारी बाजूनी खंदक आणि एकूण सात बुरुज असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीच्या वैभवात भर टाकणारी वास्तू आहे. मिरज जहागिरीतून, आप्पासाहेब बाहेर पडले तेव्हा असं म्हणतात की त्यांच्याजवळ फक्त सिंहासनारूढ ताम्र धातूची श्रीगणेशाची मूर्ती होती. त्यावेळी मनोमन त्यानी त्या मूर्तीची आराधना करून म्हटलं की सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ देत, मग मी तुझी प्रतिष्ठापना एका मंदिरात करेन. सुदैवाने तसंच झालं. आज सांगलीचे भूषण असणारे गणपतीमंदिर त्यामुळेच बांधले गेले. १८११ मध्ये सुरू झालेलं मंदिराचं काम तब्बल ३० वर्षे चालू होतं. बांधकाम पूर्ण झाल्यावर १८४४ मध्ये 'अर्चा' समारंभ एखाद्या लग्न कार्यासारखा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. एका बाजूला हे चालू असताना दुसऱ्या बाजूला राजकीय क्षितिजावर मोठ्या घटना घडत होत्या. १८१८ मध्ये इंग्रजानी पेशवाई पूर्णपणे संपुष्टात आणली. सातारकर छत्रपती, जे मराठी राज्याचे मूळ मालक ते नामशेष झाले. तेव्हा त्यांच्या सर्व सरदारांनी आपल्या चाकरीत यावे म्हणून इंग्रजानी जवळजवळ सक्तीच चालवली हाती. तसे फर्मानच त्यानी काढले होते. प्रत्येकजण तह करून आपले स्थान कायम करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यामध्ये आप्पासाहेब अपवादात्मक संस्थानिक होते. इंग्रजांची चाकरी करण्यास त्यांचे मानी मन बिलकूल तयार नव्हते. त्यानी इंग्रजांबरोबर बरीच वर्षे हुज्जत घातली. १८१२ साली जो पंढरपूरचा करार झाला होता, त्याप्रमाणे पटवर्धन सरदारानी पेशवे सरकारची नोकरी अिमाने अितबारे करावी असा करार होता. त्याचबरोबर पेशव्यानी, पटवर्धन मंडळींचा मान राखावा, दर्जा राखावा आणि त्याबद्दलची जबाबदारी, कंपनी सरकारने<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०५}}</noinclude> q3ml0mja1st46ienk0wehyy9v3eeu19 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३३ 104 77778 237948 169806 2026-10-16T17:19:19Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237948 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>घ्यावयाची होती. ही गोष्ट आप्पासाहेब वारंवार कंपनी सरकारच्या नजरेस आणून देत होते. त्याच्या पुढे जाऊन त्यानी इंग्रजांना ठणकावले की याच कराराचा दुसरा अर्थ असा होतो की आम्ही फक्त पेशव्यांची चाकरी करण्यास बांधील आहोत; अितर कोणास नाही. हा सर्व पत्रव्यवहार मुळातून पाहाण्यासारखा आहे. त्यातून आप्पासाहेबांची स्वाभिमानी वृत्ती, सडेतोड बाणा प्रकट होतो. पोरस राजा, सिकंदर बादशहासमोर ज्या ठामपणे अभा राहिला, तसेच आप्पासाहेब इंग्रजांसमोर राहिलेले दिसतात. अर्थात् हा सामना, असमानांचा होता. पत्रापत्री करून आप्पासाहेब काही नमत नाहीत हे बघून इंग्रजानी, जनरल प्रिट्झलर याला फौज देऊन सांगलीकडे रवाना केले! मग मात्र सर्व आप्तेष्ट, हितचिंतक, कारभारी मंडळी यानी आप्पासाहेबांची समजूत घातली. तेव्हा कुठं ते इंग्रजांबरोबर तह करण्यास राजी झाले. नोकरी (इंग्रजांची) न करण्याचा त्यांचा हेका मात्र त्याना चांगलाच महागात पडला. त्याबद्दलची नुकसान- भरपाई म्हणून त्याना, आपल्या जहागिरीपैकी नवी हुबळी, तुरूम आणि बरडोल हे रु. १,३५,०००/- चे तालुके कायमचे इंग्रजांच्या घशात घालायला लागले!
{{gap}}इतके होऊनही आप्पासाहेबांचा इंग्रजांबरोबर वागण्यातील ताठा मात्र कमी झाला नाही. त्यांचा पहिला मुलगा गेल्यावर त्यानी एक मुलगा दत्तक घेतला होता, तो इंग्रजानी मान्य केला नाही. इंग्रजांच्या काही गुन्हेगारांस, (बाबाजी चिमणाजी गोखले प्रकरण) आप्पासाहेबानी आपल्या मुलुखात राजरोस आश्रय दिला; अशा कारणांवरून त्यांचे इंग्रजांबरोबर खटके अुडतच होते. कालांतराने, दोन्ही बाजूंचा विरोध मावळत गेला. गव्हर्नर माल्कम आल्यावर तर संबंधात बरीच सुधारणा झाली. विशेषतः कोल्हापूर संस्थानात १८४४ मध्ये जे बंड झाले होते, त्याप्रसंगी आप्पासाहेबानी इंग्रज सरकारला लष्करी मदत केली. त्याबद्दल इंग्रज सरकारने १५ नोव्हेंबर १८४६ रोजी बेळगाव येथे खास दरबार भरवून सर्व सन्माननीय अुपस्थितांच्या समक्ष आप्पासाहेबांचा खास सत्कार केला. ‘गार्ड ऑफ ऑनर'ने त्याना सलामी देण्यात आली. सोन्याच्या मुठीची इंग्लंडमधून आणवलेली मौल्यवान तलवार त्याना थाटामाटात देण्यात आली.
{{gap}}इंग्रजांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाल्यावर आणि गणपतीमंदिरात 'अर्चा' समारंभ झाल्यावर, सांगली संस्थानात नवीन नवीन सुधारणा करण्यास आप्पासाहेबाना मोठी अुमेद आली.
{{gap}}सांगली गावाच्या आधुनिकीकरणाकडे त्यानी स्वतः लक्ष पुरवले. मुंबईस बरेचदा आप्पासाहेबांचे जाणे होई. तेथील रस्त्यांप्रमाणे सांगलीत त्यानी चांगले, रुंद, सरळ रेषेत असलेले रस्ते आखून, रस्त्याकडेस झाडे लावण्यास सुरूवात केली. त्याना स्वतःला बागा, मळे, तलाव बांधण्याचा छंद होता. सांगलीत आणि सांगलीबाहेर<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०६}}</noinclude> dm1lwr72uv5z9cirazcvtoxm7qt0pip पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३४ 104 77779 237949 169807 2026-10-16T17:22:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237949 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मिळून त्यानी पंचवीस तरी मळे तयार केले. त्यात आंबराई व हिराबाग प्रथम तयार करण्यात आली. कुटुंबातील सर्व माणसांच्या नावे, आप्पासाहेबानी मळे तयार केले होते. अुदा. तात्यासाहेब मळा, रावसाहेब मळा, बापूसाहेब मळा, बाईसाहेब मळा वगैरे. अनेक बागांमधून ते स्वतः जात आणि जातीने थोडे काम करीत. चांगल्या तऱ्हेचे अंजीर, द्राक्षे, आंबे वगैरे फळे पंढरपूर वगैरे देवालयात पाठवून देत. गुलाबांची फुले तर दहा हजारांहून अधिक निघत असत असं तत्कालीन पत्रव्यवहारांमध्ये नमूद केलेले आहे. आप्पासाहेबांच्या या बागांच्या आवडीवरून एका तत्कालीन कवीने म्हटले आहे. {{Block center|<poem>"सांगलीला जा मनुजा श्रीगणपती पाह्याला । जे गजवक्त्रसुनेत्रचतुर्भुज तद्रुपाध्यायाला ॥ यत्पृष्ठभागी शोभे कृष्णा तत्सलिली नाह्याला । जागा जागा बागा त्यातील फळ पुष्पे वाह्याला ॥"</poem>}} {{gap}}बागबगींच्याबरोबरच अुत्तम जातीच्या गाईबैलांची पैदास वाढविण्याची त्यांची खटपट असे. बाहेरून चांगल्या जातीचे वळू मिळवून, त्यांची चांगली निपज करण्यात आप्पासाहेबानी चांगले यश मिळविले. त्या काळी लष्करातील तोफा ओढण्यास चांगले बैल म्हणजे बळकट बैल लागत. बेळगावच्या इंग्रज फलटणीना असे बैल पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून या कामामध्ये त्यानी रस घेतला असावा. इंग्रजांच्या सुधारणांनी जसे काही सुशिक्षितांना दिपवून टाकले होते तसे त्यांच्या छापखान्याच्या शोधामुळे आप्पासाहेब भारावून गेले होते. बाळशास्त्री जांभेकरांचे 'पंचोपाख्यान' इंग्रजानी छापले तेव्हा ते बघून आप्पासाहेब अितके हरकून गेले की ताबडतोब पुणे-मुंबईकडे माणसे पाठवून, आवश्यक ती अुपकरणे आणवून, तंत्रज्ञान शिकून घेऊन १८२१ मध्येच त्यानी सांगलीत छापखाना (शिळाप्रेस) सुरू केला. आणि त्या छापखान्यात, 'भागवत' पुराणाच्या प्रती छापवून, चातुर्मासात ब्राम्हणांना दक्षिणेसह दिल्या.
{{gap}}आप्पासाहेब विलक्षण कल्पक होते. जुनी माहिती मिळेल तेथून जमविण्याची त्यांची नेहमी धडपड असे. पेशवाईचा अस्त झाल्यावर घरी बसलेल्या लोकांकडून त्यानी दुर्मिळ माहिती मिळवून आपल्या संग्रही ठेवली होती. नाना फडणीस यांची पत्नी मेणवलीस राहात होती. त्यांच्याकडून त्यानी बरेच कागद मिळवले होते किंवा काही नकला करवून आणल्या होत्या. त्याचबरोबर पटवर्धन घराण्याचा एक मोठा वंशवृक्ष १८३५ च्या सुमारास त्यानी तयार करवून घेतला होता.
{{gap}}वास्तविक पटवर्धन जहागिरीचे मिरज हे मुख्य ठाणे. सांगली त्या तुलनेत<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०७}}</noinclude> lgjh1euf2iv5r2gwoivxv3n6or4cra7 237950 237949 2026-10-16T17:23:04Z कल्पनाशक्ती 3813 237950 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मिळून त्यानी पंचवीस तरी मळे तयार केले. त्यात आंबराई व हिराबाग प्रथम तयार करण्यात आली. कुटुंबातील सर्व माणसांच्या नावे, आप्पासाहेबानी मळे तयार केले होते. अुदा. तात्यासाहेब मळा, रावसाहेब मळा, बापूसाहेब मळा, बाईसाहेब मळा वगैरे. अनेक बागांमधून ते स्वतः जात आणि जातीने थोडे काम करीत. चांगल्या तऱ्हेचे अंजीर, द्राक्षे, आंबे वगैरे फळे पंढरपूर वगैरे देवालयात पाठवून देत. गुलाबांची फुले तर दहा हजारांहून अधिक निघत असत असं तत्कालीन पत्रव्यवहारांमध्ये नमूद केलेले आहे. आप्पासाहेबांच्या या बागांच्या आवडीवरून एका तत्कालीन कवीने म्हटले आहे. {{Block center|<poem>"सांगलीला जा मनुजा श्रीगणपती पाह्याला । जे गजवक्त्रसुनेत्रचतुर्भुज तद्रुपाध्यायाला ॥ यत्पृष्ठभागी शोभे कृष्णा तत्सलिली नाह्याला । जागा जागा बागा त्यातील फळ पुष्पे वाह्याला ॥"</poem>}} {{gap}}बागबगींच्याबरोबरच अुत्तम जातीच्या गाईबैलांची पैदास वाढविण्याची त्यांची खटपट असे. बाहेरून चांगल्या जातीचे वळू मिळवून, त्यांची चांगली निपज करण्यात आप्पासाहेबानी चांगले यश मिळविले. त्या काळी लष्करातील तोफा ओढण्यास चांगले बैल म्हणजे बळकट बैल लागत. बेळगावच्या इंग्रज फलटणीना असे बैल पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून या कामामध्ये त्यानी रस घेतला असावा.
{{gap}}इंग्रजांच्या सुधारणांनी जसे काही सुशिक्षितांना दिपवून टाकले होते तसे त्यांच्या छापखान्याच्या शोधामुळे आप्पासाहेब भारावून गेले होते. बाळशास्त्री जांभेकरांचे 'पंचोपाख्यान' इंग्रजानी छापले तेव्हा ते बघून आप्पासाहेब अितके हरकून गेले की ताबडतोब पुणे-मुंबईकडे माणसे पाठवून, आवश्यक ती अुपकरणे आणवून, तंत्रज्ञान शिकून घेऊन १८२१ मध्येच त्यानी सांगलीत छापखाना (शिळाप्रेस) सुरू केला. आणि त्या छापखान्यात, 'भागवत' पुराणाच्या प्रती छापवून, चातुर्मासात ब्राम्हणांना दक्षिणेसह दिल्या.
{{gap}}आप्पासाहेब विलक्षण कल्पक होते. जुनी माहिती मिळेल तेथून जमविण्याची त्यांची नेहमी धडपड असे. पेशवाईचा अस्त झाल्यावर घरी बसलेल्या लोकांकडून त्यानी दुर्मिळ माहिती मिळवून आपल्या संग्रही ठेवली होती. नाना फडणीस यांची पत्नी मेणवलीस राहात होती. त्यांच्याकडून त्यानी बरेच कागद मिळवले होते किंवा काही नकला करवून आणल्या होत्या. त्याचबरोबर पटवर्धन घराण्याचा एक मोठा वंशवृक्ष १८३५ च्या सुमारास त्यानी तयार करवून घेतला होता.
{{gap}}वास्तविक पटवर्धन जहागिरीचे मिरज हे मुख्य ठाणे. सांगली त्या तुलनेत<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०७}}</noinclude> 3lviwxozu8g05x015fub2ci1kecmoge पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३५ 104 77780 237951 169808 2026-10-16T17:25:26Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237951 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अत्यंत नगण्य गाव. पण आप्पासाहेबानी सांगली राजधानी केल्यावर, प्रयत्नपूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने तिची वाढ केली. शास्त्री, पंडित, हरहुन्नरी कारागीर, वैद्य, व्यापारी अशा सर्वांना सवलती देऊन त्यानी सांगलीत आणले. त्यामुळे सांगलीची मोठ्या प्रमाणावर भरभराट होत गेली. त्यांची गुणग्राहकता फार मोठी होती. त्यासाठी विष्णुदास भावे हे एकच अुदाहरण पुरेसे आहे. मराठी नाटकाचे जन्मदाते म्हणून त्याना आपण श्रेय देतो, त्यापैकी निम्मे श्रेय आप्पासाहेबाना दिले पाहिजे. मराठी नाटक लिहिण्याची आणि रंगभूमीवर आणण्याची संपूर्ण प्रेरणा, त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, नाटकात नटवर्ग मिळविण्यासाठी त्यानी सर्वसामान्यांना देऊ केलेली बक्षिसे हे सर्व पहाता, विष्णुदासांच्या बरोबरीने मराठी रंगभूमीच्या जनकत्वाचे रास्त श्रेय आप्पासाहेबानाच द्यायला हवे. या गुणग्राहकतेमुळेच त्यांच्या पदरी गोपिनाथदादा आगाशे यांचेसारखे मोठे शास्त्री, सखारामबुवा गोडसे यासारखे गवई, अशी मंडळी होतीच, पण त्याचबरोबर 'कुमारी', 'मोतापा' घाटाची भांडी बनवणारे कुशल तांबट, गणपतीची सुबक मूर्ती बनवणारे मुकुंदा पाथरवट अशी गुणी माणसं पण त्यांच्याकडे होती. १८३४ साली सांगलीत नाणी पाडण्यासाठी आप्पासाहेबानी टांकसाळ सुरु केली. त्याआधी १८२१ मध्ये पहिला छापखाना सुरू केला तो पदरी बाळगलेल्या अशा गुणी माणसांच्या बळावरच!
{{gap}}१५ जुलै १८५१ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी या स्वाभिमानी, गुणग्राही, कल्पक, दीर्घोद्योगी आणि पराक्रमी राजाचे निधन झाले. आज सांगली दोनशे वर्षाची होत आहे. अनेक क्षेत्रात सांगलीचं नाव दुमदुमत आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध स्तरांवर सांगलीचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहेच पण हळदीमुळे अभ्या देशात सांगलीचे नाव सर्वतोमुखी आहे.
{{gap}}या साऱ्या भरभराटीच्या मुळाशी श्रीमंत चिंतामणराव (थोरले) आप्पासाहेब पटवर्धन हा थोर राजा आहे. त्यामुळे आज सांगलीच्या २०० व्या वाढदिवस-वर्षात त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवणे समयोचित ठरेल; नव्हे, सांगलीकरांचे ते पवित्र कर्तव्यच आहे.
{{center|■ ■ ■}}{{nop}}<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०८}}</noinclude> q73nvl2so0a519xrn3ezsajskzkefds पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३६ 104 77781 237953 169809 2026-10-16T17:29:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237953 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''स्वातंत्र्योत्तर काळातील सांगलीचे भाग्यविधाते'''}}
{{xx-larger|'''वसंतदादा पाटील'''}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}"कैदी पळाले. कैदी पळाले. तुरुंग फोडला" सगळीकडे एकच कोलाहल माजला. पाठोपाठ संस्थानी शिपायांच्या शिट्टयांचे कर्णकर्कश आवाज आले. गोळीबारांच्या फैऱ्यांचे आवाज येऊ लागले. शनिवारचा दिवस म्हणजे सांगलीच्या बाजारचा दिवस. भाजीवाले, फळवाले, चार पैसे कमवायला आलेले खेडूत, गिऱ्हाइके सर्वांची पळापळ झाली. घाबरगुंडी अुडाली. भर बाजारातून काही कैदी आयर्विन पुलाकडे पळताना दिसले. पाठोपाठ पाठलागावर असलेले घोडेस्वार दौडत आले. कुणा कैद्यांनी ऐन जुलैमध्ये तुडुंब भरुन वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या विशाल पात्रात अुड्या मारल्या. काहीजण पुलावरुन भरधाव पळाले. पलीकडे असलेल्या सांगलीवाडी गावातून कृष्णा नदीच्या पैलतीरावरुन धावू लागले. मागून सटासट गोळ्यांचा वर्षाव होत होता. नदीच्या पात्रातून पोहणाऱ्या एका कैद्याला वर्मी गोळी बसली. लालसर रंगाचे कारंजे अडाले. पाच-सहा कैदी नदीकाठाने धावत होते. त्यांच्या पिछाडीशी शिपाई येऊन भिडले. प्रसंग बाका होता. तेव्हा त्यांच्या नायकाने इतराना ओरडून सांगितले "तुम्ही पळा. नदी पोहून हरीपूरच्या बाजूने सटका. तोवर मी या शिपायाना अडवतो." इतके बोलून नदीकाठच्या दाट झाडीच्या आश्रयाने, त्याने पाठीवरच्या पोलिसांवर बंदुकीतून बार काढायला सुरुवात केली. या अनपेक्षितपणे झालेल्या प्रतिहल्ल्याने पाठलागावरचे पोलिस भांबावले. त्या गडबडीचा फायदा घेऊन बाकीचे सहकारी पुढे पळाले; अिकडे त्या नायकाचा गोळीबार चालूच होता. फैरीवर फैरी काढता काढता ८५ बार काढून झाले. पण दुर्दैव आडवे आले. बंदुकीचा घोडा अडला. त्या शूराने झाडाचा आडोसा घेत बंदुकीचा घोडा ओढायला सुरुवात केली. त्या धावपळीत झाडाच्या बुंध्याबाहेर आलेला त्या वीराचा खांदा पोलिसांना दिसला. क्षणाचीहि असंत न देता गोळ्यांचा वर्षाव झाला. गोळी खांद्यातून आरपार गेली. डोळ्यासमोर अंधेरी आली. तो शूर नायक धाडकन् जामिनीवर कोसळला. बेशुद्ध पडला. लागलीच त्याला जेरबंद करण्यात आले.
{{gap}}हा निधड्या छातीचा शूरवीर म्हणजे वसंत बंडूजी पाटील. आपल्या कर्तृत्वाने<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२०९}}</noinclude> fmkupoma4h1ee6qy1zytp7tm2vnj6l4 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३७ 104 77782 237954 169810 2026-10-17T06:24:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237954 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नुसत्या 'दादा' या प्रेमळ संबोधनाने, अुभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आणि अभिमानाचा विषय झालेले वसंतदादा पाटील. ऐन स्वातंत्र्यसंग्रामात सांगलीच्या गणेशदुर्गात असलेल्या तुरुंगातून, त्यांनी धाडशी बेत आखून, आपल्या १४ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पलायन केले. तटाभोवतालच्या खंदकात असलेल्या पाण्यात अुड्या टाकून पळताना काहींची हाडे मोडली. पाय तुटले. नदीतून पळताना काही जखमी झाले. मृत्युमुखी पडले. केवळ वसंतदादांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून जबर जखमी होऊनसुद्धा, शरीरातील गोळ्या काढल्यावर ऑपरेशन यशस्वी होऊन ते वाचले.
{{gap}}अशा या वसंतदादांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१७ सालचा. पुढे आयुष्यात सांगली ही त्यांची कर्मभूमी झाली असली तरी त्यांची जन्मभूमी कोल्हापूरची. मूळ गाव सांगलीपासून ३ मैलावर असलेले, श्रीगुरुदत्त माऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले पद्माळे हे होते. आज कुणाला माहीतहि नसेल पण वसंतदादांचे पाळण्यातील नाव 'यशवंत' होते. काय योग पहा. आयुष्यात दुसऱ्या एका 'यशवंताच्या' सहवासातच त्यांचे कर्तृत्व फुलले; सर्वाथाने ते यशवंत झाले. अवघे दहा महिन्याचे असतानाच, छोट्या वसंताच्या मातोश्री रुक्मिणीबाई आणि वडील बंडुजी पाटील यांचे तापसरीने (एन्फ्लूएंझा) निधन झाले. अवघ्या दोन तासांच्या अंतराने नियतीने एकाच दिवशी दोघांचा बळी घेतला. वसंता आणि त्यांचे थोरले बंधू शामराव यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. वसंतदादांचे मामा दत्तोबा तातोबा पाटील हे आपल्या बहिणीच्या कुटुंबावर आलेल्या दुर्दैवी प्रसंगात धावून आले. त्यांनी सर्वांना आपल्या कागल गावी नेले. थोरला शामराव १३-१४ वर्षाचा आणि धाकटा वसंता १० वर्षांचा झाल्यावर, आजी त्याना पुन्हा पद्माळे गावी घेऊन आली. गावकऱ्यांच्या मदतीने तिने घरची शेती कसायला सुरुवात केली. योगायोगाने त्याच वेळी गावात नुकतीच प्राथमिक शाळा सुरु झाली होती आणि ती सुद्धा आजीनेच मोकळ्या करुन दिलेल्या घराच्या जागेत. त्यामुळे वसंतदादांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. पाचवीसाठी शेजारच्या कर्नाळ गावच्या शाळेत त्यांचे नाव घालण्यात आले. त्याच वर्षी सोलापूरच्या मल्लाप्पा धनशेट्टी वगैरे चार क्रांतिकारकांना तत्कालीन ब्रिटीश सरकारने फाशी दिले. त्या घटनेचे गंभीर पडसाद सर्वत्र अुमटले. आपल्या देशाच्या पारतंत्र्याची पहिली वास्तव आणि कठोर जाणीव या प्रसंगाने छोट्या वसंताच्या मनावर झाली. फाशी झाली तो दिवस मकर-संक्रांतीचा होता. वसंतदादानी स्वतः तो सण पाळला नाहीच पण इतरानाहि पाळू दिला नाही. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर फासावर लटकलेल्या हुतात्म्यांची स्मृती म्हणून त्यानी प्रतिज्ञापूर्वक चहा सोडला. त्यांनतर देश स्वतंत्र झाल्यावरच त्यानी पुन्हा चहाला तोंड लावले! ह्या घटनेने कळत न कळत त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागत गेले.{{nop}}<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१० }}</noinclude> diemrdl1d3g87bffu8vkh9ea7472lye पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३८ 104 77783 237955 169811 2026-10-17T06:27:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237955 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}वसंतदादांचे ६वी, ७ वी चे शिक्षण नंतर सांगलीच्या १ नंबर शाळेत झाले. १९३४ साली त्या काळी अस्तित्वात असलेली व्ह. फा. (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षा ते पास झाले. त्याच सुमारास त्यांची कोर्ट ऑफ वॉर्ड्सकडे असलेली वडिलोपार्जित जमीन मोकळी झाली. त्यामुळे वसंतदादानी घरच्या शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली. मन लावून ते शेतात राबू लागले. दहा दहा बैलांच्या नांगरांवर त्यानी नांगरट केली. कुळवणी केली. गवत कापून सांगलीच्या शनिवारच्या बाजारात विक्री केली. या अनुभवामुळे त्यांचे शेतीचे आणि शेतीमालाविषयाचे ज्ञान डोळस बनले. शेतकऱ्यांच्या कष्टाळू जीवनाची आणि त्यांच्या अडीअडचणींची त्याना यथार्थ कल्पना आली. या प्रत्यक्ष ज्ञानाचा त्यांना भावी आयुष्यात फार अुपयोग झाला. पारतंत्र्य असल्याने आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असत. त्यामुळे एकीकडे त्यांची शेती चालू असली तरी दुसरीकडे त्यांचे मन राजकीय घडामोडींचा वेध घेण्यात गुंतलेले असे. सांगली शहरातून येणारी माणसे, वर्तमानपत्रे, यांच्या सतत संपर्कात ते रहात असत. त्यांच्या नेतृत्वगुणाची चुणुकही याच दिवसात दिसून आली. कृष्णा नदीस दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे काठावर अतोनात चिखल होई. पाणी आणताना गावकऱ्यांना त्रास होई, कपडे धुताना स्त्रियांचे हाल होत. वसंतदादानी त्यावेळी पुढाकार घेऊन, समस्त गावकऱ्यांना श्रमदानासाठी एकत्र केले. नदीकाठी घाट बांधला. हे त्यांचे पहिले सामाजिक कार्य म्हणायला हरकत नाही.
{{gap}}१९३५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, पं.जवाहरलाल नेहरूंचा सातारा-कराड भागात दौरा झाला. त्यामुळे जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली. चैतन्याचे वारे वाहू लागले. वसंतदादांनी पद्माळे येथे काँग्रेस कमिटी स्थापन केली. त्यांचे तडफदार कार्य पाहून लौकरच त्याना तासगाव तालुका काँग्रेसचे सेक्रेटरी करण्यात आले. वसंतदादा आता तालुक्याच्या राजकारणात भाग घेऊ लागले. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याच्या कामामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला. त्या पारतंत्र्याच्या काळात काँग्रेसची कामे करणे जोखमीचे होते. सतत पोलिसांची नजर असे. घरच्या आघाडीवर मात्र दादाना, थोरल्या भावाचा, शामरावांचा भक्कम पाठिंबा होता. ते संतप्रवृत्तीचे होते. वेळोवेळी हाल सोसून त्यांनी आपल्या धाकट्या भावाला, वसंताला, स्वातंत्र्यलढ्याच्या कामात नेहमी प्रोत्साहनच दिले.
{{gap}}१९४० नंतर स्वातंत्र्यलढा निर्णायक स्वरुपात सुरु झाला. याच काळात म.गांधीनी वैयक्तिक सत्याग्रहाची हाक दिली. पहिले सत्याग्रही म्हणून विनोबाजी भावे यांची निवड झाली. तासगाव तालुक्यातून वसंतदादांची निवड झाली होती. त्यावेळी त्याना पहिल्यांदा तुरुंगवास घडला. सहा महिन्याची सक्त मजुरी झाली होती.<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२११ }}</noinclude> 8yfra175tmc2nz3atkxwbgewvpd8cd6 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२३९ 104 77784 237956 169812 2026-10-17T06:29:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237956 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>हा तुरुंगवास म्हणजे दादाना एक प्रकारचे वरदानच वाटले. काकासाहेब गाडगीळ, बाळासाहेब खेर, सरदार पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांच्या ते संपर्कात आले.
{{gap}}या तुरुगवासानंतर वसंतदादांचा आत्मविश्वास दुणावला. त्यात १९४२ चे 'चलेजाव' आंदोलन सुरु झाले. सुभाषबाबूंचा सशस्त्र क्रांतीचा लढा सुरु झाला. त्याचा त्यांच्या मनावर काहीसा प्रभाव असावा. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलाढ्य ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा द्यायचा म्हणजे निव्वळ सत्याग्रह- मोर्चे- आंदोलनानी काही साधत नाही. त्यापेक्षा थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊन, गनिमी काव्याने सरकारशी लढा द्यावा असा विचार वसंतदादा आणि त्यांचे सहकारी यांच्या मनात येऊ लागला. तारुण्यातील रग अंगात होतीच. ब्रिटीश सरकारची सत्ता खिळखिळी करायची, तर त्याना काही तरी त्रास पोचेल असे धक्कादायक करायला हवे असे सर्वाचे मत झाल्यामुळे पोस्टाच्या थैल्या पळवणे, रेल्वे लुटणे, असे प्रकार सुरु झाले. नांद्रे आणि कर्नाळ स्टेशनाच्या मध्ये रेल्वे पाडण्यात आली. सुरुवातीच्या काळात अशा सशस्त्र हल्लयांमध्ये भाले, कुऱ्हाडी, गोफणी, काठ्या अशी हत्यारे वापरली जात. पण अशा हत्यारांनी भागणारे नव्हते. बंदुकी, रिव्हॉल्वर्स सारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता होती. त्यासाठी पैशांची आवश्यकता पडली म्हणून गोरगरिबांना नाडणाऱ्या व्यापाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकण्यास सुरुवात झाली. त्यातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर वसंतदादा गोव्याला जाऊन हत्यारे घेऊन आले. (त्यावेळी तेथे पोर्तुगीजांची सत्ता होती) या अशा अुलाढालींमुळे वसंतदादांच्या खात्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याकाळी रु.१०००/- चे बक्षिस त्याना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने लावले होते. त्यामुळे वसंतदादाना भूमिगत अवस्थेत अर्धपोटी राहावे लागे. पोलिस सतत मागावर असल्याने त्याना चुकवण्यासाठी रानातून छपावे लागे. मग काय आज गवताच्या गंजीवर, तर अुद्या रानातल्या मळीवर, रात्र रात्र काढावी लागे. घरची माणसे दिसणे मुष्किल, मग त्यांच्या गाठी-भेटी कुठल्या? इकडे पोलिस पद्माळे गावातील लोकांना वसंतदादांचा ठावठिकाणा मिळावा म्हणून छळत असत. शामरावांचा तर अनन्वित छळ झाला. मारहाण झाली. पण माहीत असूनहि त्यांच्यापैकी कुणीही पोलिसांच्या ताकास तूर लावून दिली नाही. एका बाजूला असे निष्ठावंत होते तसे दुसऱ्या बाजूला स्वार्थी वृत्तीचे घरभेदेपण होते. त्यामुळेच वसंतदादा २२ जून १९४३ ला पकडले गेले. सांगलीच्या गणेशदुर्गात अितर कैद्यांबरोबर त्याना डांबण्यात आले. खटला सुरु झाला. शिक्षा नक्की होती. फांशी का जन्मठेप? एवढाच प्रश्न होता.
{{gap}}पण वसंतदादा असे थोडेच फुकाफुकी खितपत पडणार होते? अितर राजबंद्यांबरोबर त्यानी संधान बांधायला सुरुवात केली. प्रातर्विधीच्या निमित्ताने एकमेकाना<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१२ }}</noinclude> 4lxpm0j8cxat6h8l3ijs1rdlkj6la5w पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४० 104 77785 237957 169813 2026-10-17T06:32:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237957 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>भेटून 'ग्रेट एस्केप'च्या या योजना आखल्या जाऊ लागल्या. त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्याचा निकाल सोमवारी २४ जुलैला लागणार होता. २२ला शनिवार म्हणजे बाजारचा, गर्दीचा दिवस. त्याचा फायदा अुठवावा, नदीकाठच्या साचलेल्या गाळातून पलायन केले तर पोलिसाना पाठलाग करणे अवघड असा सर्व राजबंद्यांचा हिशोब होता. दुपारी दोनच्या सुमारास प्रातर्विधीसाठी काही कैद्यांना बाहेर काढले, तेव्हा चपळाईने दादांनी एका शिपायाची बंदूक हिसकावून घेतली. इतर कैद्यानी अुगाचच आमच्या दादाना का पकडले? दादाना का पकडले? असा खोटाच गलका सुरु केला. एक-दोन दिवसात खटल्याचा निकाल लागणार होताच; खेरीज शिपायांच्या डोक्यात शनिवारच्या बाजार-खरेदीचा विचार होता. त्यामुळे निर्माण झालेली थोडी ढिलाई आणि आताचा गलका यामुळे भांबावलेल्या शिपायांवर, बराकीतील बंदुका काबीज करुन रोखल्या गेल्या. हालचाल कराल तर गोळ्या घालू अशा धमक्या देत १६ कैदी तुरुंगालगतच्या तटावर चढले. सांगलीचा तुरुंग हा गणेशदुर्गात असून, पूर्वी त्याच्या चारी बाजूनी खोल खंदक होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने खंदकात पाणी होते. दादानी आणि इतरानी त्यामध्ये अुड्या मारल्या व पोहून पलीकडे गेले. अुडी नीट न पडल्याने एकाचा पाय मोडला. सांगलीच्या मारुती मंदिराच्या बाजूने मंडळी बाहेर पडली आणि कृष्णा नदीच्या पुलापलीकडील बाजूने पळत सुटली. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वसंतदादानी बाजीप्रभूप्रमाणे खिंड अडविली. मरण हाताच्या अंतरावर अभे होते पण ते दादांचे प्राण हिरावू शकले नाही. नियतीचीच अच्छा त्यांचेकडून काही भरीव कामगिरी करुन घेण्याची होती.
{{gap}}बेशुद्धावस्थेत पडलेल्या दादाना जबर जखमी अवस्थेत, सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट् केले गेले. त्यांचेवर मोठे ऑपरेशन होऊन बरगड्यांतून गोळ्या काढल्या गेल्या. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर पुन्हा दादा बंदिस्त झाले. खटल्याचा निकाल लागून दादाना एकूण १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. येरवडा जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. खतरनाक कैदी म्हणून दादाना दंडाबेडीत ठेवले गेले. खडतर कष्ट, झोप नष्ट करणारे असंख्य ढेकूण, अंगाला जागोजागी टोचणारे जाडेभरडे कपडे असा असह्य जीवनप्रवास सुरू झाला.
{{gap}}अशा धामधुमीत १९४६ साल अुजाडलं. दुसरे महायुद्ध संपले. त्यामुळे आपल्या साम्राज्यावर कधीहि सूर्य मावळत नाही अशी घमेंड मारणाऱ्या ब्रिटीश सत्तेची हाडे खिळखिळी झाली होती. स्वातंत्र्य त्यामुळेच आता दृष्टिपथात आलं होतं. वसंतदादांची सक्तमजुरी सांगलीच्या जनतेला साहवेना. त्यांची सुटका व्हावी म्हणून मोर्चे, आंदोलने यांची एकच धमाल अडाली. वसंतदादा सांगली संस्थानचे कैदी होते. सांगलीच्या<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१३ }}</noinclude> tebecj4fvnces2y0hdm8b0elbw4e5ip पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४१ 104 77786 237958 169814 2026-10-17T06:35:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237958 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>राजेसाहेबानी लोकमताची कदर करुन वसंतदादांची, २५ एप्रिल १९४६ रोजी, पूर्ण शिक्षा संपण्यापूर्वीच सुटका केली. वनवासाहून परतणाऱ्या प्रभू रामचंद्रासारखे अुत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असे दादांचे स्वागत, सांगलीच्या जनतेने केले. हजारोंच्या जनसमुदायाने रथातून त्यांची मिरवणूक काढली. जागोजागी त्यांचे सत्कार होऊ लागले.
{{gap}}स्वातंत्र्यप्राप्ती झाली. वसंतदादांच्या बाबतीत कौतुकाची बाब ही की स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तणूक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वर्तणूक, यामध्ये त्यानी जाणिवपूर्वक, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा दहशतवाद, बंदुकीचा वापर ही एक अपरिहार्य बाब होती. पण आता आपली सारी ताकद, शक्ती, विधायक कामांसाठी वापरणे ही काळाची गरज होती. वसंतदादांचे मोठेपण याच वस्तुस्थितीत की ती परिवर्तनाची गरज त्यानी वेळीच ओळखली! तत्कालीन सातारा जिल्ह्यातील गुंडगिरी कमी करण्यासाठी त्यानी प्रयत्न केले; क्रांतिकारक मार्गाने जाणाऱ्यानी पूर्वीचा मार्ग विसरावा, यासाठी त्यानी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मनापासून प्रयत्न केला. पण पूर्णपणाने तो यशस्वी झाला नाही.
{{gap}}ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास घडवून आणण्याचा वसंतदादानी आता निश्चय केला.
{{gap}}त्यांच्या विधायक कामांचा थोडक्यात आढावा असा घेता येईल,
{{gap}}१९४९ मध्ये सातारा जिल्ह्याचे विभाजन, अुत्तर सातारा आणि दक्षिण सातारा अशा दोन जिल्ह्यात झाले. द. साताऱ्याचे मुख्य ठिकाण सांगली झाले. हा जिल्हा दादांचे कार्यक्षेत्र बनला. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही अंगांनी दादांचे जीवन यापुढे बहरुनच गेले!
{{gap}}समाजकारण करताना लहानपणापासून अनुभवलेला शेतकरी वर्ग त्यांच्या डोळ्यांसमोर होता.
{{gap}}भारतात ७० टक्के लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने, त्यांच्या प्रगतीवरच देशाची आर्थिक सुस्थिती, व औद्योगिक विकास अवलंबून आहे, याची दादाना जाणीव होती. पण त्याचबरोबर पिढ्यान्पिढ्या शेती करुनही, सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी राहिला, ही वस्तुस्थिती पण त्यांच्या मनाला क्लेश देत होती. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळून, चार पैसे त्यांच्या गाठीला राहतील, हा दिलासा त्याना मिळणे अत्यावश्यक होते. त्यासाठी एकच मार्ग होता. तो म्हणजे नियंत्रित बाजारपेठेचा. अर्थात् ही गोष्ट अमलात आणणे सोपे नव्हते. सांगलीच्या राजेसाहेबानी पूर्वी यासंबंधात केलेला प्रयत्न व्यापारांच्या असहकारामुळे फसला<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१४ }}</noinclude> 6q1sjvugqcmvvuk1u18injzzmgkol58 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४२ 104 77787 237959 169815 2026-10-17T06:38:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237959 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>होता. या खेपेला पण व्यापाऱ्यांचा विरोध होताच. एक तर सांगलीत शेतव्यापारासाठी स्वतंत्र वखारभाग असल्याने, व्यापाऱ्यांना वेगळे अधिकृत मार्केटयार्ड नको होते. त्याहिपेक्षा या मार्केटयार्डामुळे काहीजणांच्या गैरवाजवी नफ्यास बाधा येणार होती; त्यांचा अनियंत्रित, अनिर्बंध, हक्क संपुष्टात येणार होता हे त्यांचे खरे दुखणे होते. अपेक्षेप्रमाणे त्यानी जोरदार विरोध केला. कोर्ट-कचेऱ्या केल्या. पण हायकोर्टाचा निर्णय त्यांचेविरुद्ध गेला. सांगलीच्या पूर्वेस १०० एकर जमिनीवर, व्यवस्थित प्लॉटस् पाडून, वसंतदादानी मार्केट यार्ड वसवले होते. त्यांच्या मनाचा मोठेपणा हा की जरी ते कायदेशीर लढाई जिंकले होते, तरी आपुलकीच्या आणि माणुसकीच्या भावनेतून, ते आपणहून व्यापाऱ्यांकडे गेले. त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यानी त्यांचे गैरसमज दूर केले. त्यांची मने जिंकली. १९५१ मध्ये मार्केट कमिटी स्थापन झाल्यापासून दादा चेअरमन म्हणून काम करत होते. तीन-चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १९५५ च्या गुढी पाडव्याच्या सुमुहूर्तावर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सांगलीला सुनियंत्रित बाजारपेठ व्हावी म्हणून सरकारदरबारी खटपट करण्यापासून, तो जागा मिळवून तेथे व्यापाऱ्याना गोडीने आणवून, प्रत्यक्ष व्यवहार सुरु करण्यापर्यंतच्या अनेक खटाटोपी दादानी स्वतः केल्या. शेतकऱ्याना, त्यांच्या मनासारखा बाजारभाव त्यांच्या शेतमालास मिळू लागला. व्यापारी, दलाल व शेतकरी यांच्यामधील सर्व व्यवहारांवर, मार्केट कमिटीचे नियंत्रण असल्याने, शेतकऱ्यांची फसवणूक थांबली. त्यांचा फायदा होऊ लागला. सर्व शेतकरी मंडळी दादाना दुवा देऊ लागली. सुरुवातीला ३००० रु. कर्ज काढून सुरु केलेली ही मार्केट कमिटी, आज घडीला कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करत आहे.
{{gap}}महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना, डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे १९४८-४९ मध्ये प्रवरानगर येथे सुरु झाला. १९५२ मध्ये साखरेवरील नियंत्रणे अुठल्यावर साखरेची मागणी भरमसाट वाढली. साखर आयात करण्यात मौल्यवान परकी चलन खर्ची पडू लागले. त्यामुळे देशांतर्गत साखरेचे अुत्पादन वाढवणे गरजेचे होते. महाराष्ट्रात अुसलागवडीच्या क्षेत्रात सहकारी साखर कारखाने अभे राहू लागले. आजूबाजूला सातारा-कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने निघाले. तेव्हा वसंतदादाना चैन पडेना. पण या भागात साखर कारखान्याची कल्पनाच अव्यवहार्य समजली जात असे. एकतर सांगली जिल्हा तसा कोरडवाहू शेतीचा जिल्हा होता. म्हैसाळ भागात थोडी फार अुसशेती होती, ती अुगार कारखान्याला अुपयोगी पडे. भिलवडी भागात पिकणारा अूस गूळ अुत्पादनात खर्ची पडे. पण दादाना फार वाटे की साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्याला चांगली<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१५ }}</noinclude> lre58hbuuppzhxjvzvi2h1pkyhvunn8 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४३ 104 77788 237960 169816 2026-10-17T06:42:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237960 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>बरकत येईल. त्यानी खटपट करुन साखर कारखाना अुभारणीसाठी, आवश्यक परवानगी सरकारकडून मिळविली. पुरेसा अूस नसला तरी कारखाना कार्यान्वित होईपर्यंत, भरपूर अूस अुपलब्ध करु, अशी खात्री त्यानी सरकारला दिली. मात्र भाग भांडवल गोळा करताना, आणि अूस लागवडीसाठी शेतकऱ्यांची मने वळवताना, वसंतदादांची अक्षरशः दमछाक झाली. ते आत्मविश्वासाने साखर कारखान्याची योजना त्याना समजावून सांगत. अुसाची लागवड केल्याने शेतकऱ्याला भरभराटीचे दिवस येतील याची खात्री देत. मार्केट कमिटीच्या यशामुळे दादांविषयी सर्वांच्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे बिचकत बिचकत का होईना, पण शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचे शेअर्स घ्यायला सुरुवात केली. ज्यांची शेअर्स घ्यायची अिच्छा आहे पण पैसा नाही अशा शेतकऱ्याना, वसंतदादानी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळवून दिले. १३ लाख रुपयांचे भाग भांडवल गोळा झाले. सरकारने आपला दहा लाखाचा वाटा अचलला. इंडस्ट्रिअल फायनान्स कॉर्पोरेशनने ५५ लाखाचे कर्ज मंजूर केले. बराच विचार-विनिमय होऊन, संचालक मंडळाने सांगली-माधवनगर रस्त्यावरील ९० एकर जागा खरेदी केली. जर्मनीहून मशिनरी आणण्यात आली. तीन-चार वर्षांच्या घोर तपश्चर्येनंतर, १९५८ साली पहिला गळीत हंगाम सुरु झाला. कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीपैकी, ५० एकर जमिनीवर अूस लागवड करण्यात आली होती. वस्तुतः कारखान्याचे रजिस्ट्रेशन मिळाल्यापासून ३९ महिन्याचा कालावधी, पहिला गळीत हंगाम सुरु करण्यासाठी मंजूर असतो. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन दादांनी, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने, अवघ्या २४ महिन्यातच गळीत हंगाम सुरु करुन दाखवला! हे मोठेच सुयश होते. सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील हा एक चमत्कार होता. आज मोठा प्रगत कारखाना म्हणून या कारखान्याची गणना होते. या कारखान्याने या भागाचा कायापालटच केला. त्यामुळे बरेच अुपधंदे सुरु झाले. अनेक लोक कामाला लागले. सायकल परवडत नसणारा शेतकरी बुलेट घेऊन धावू लागला!
{{gap}}१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर नामदार यशवंतरावानी पुणे-मुंबई सोडून, अितर भागात अुद्योगधंद्याची वाढ व्हावी, प्रादेशिक असमतोल दूर व्हावा या हेतूने सर्वाना प्रोत्साहित केले. त्यांचा अुजवा हात असणारे आणि प्रगतिशील विचारांचे वसंतदादा मागे कसे पडणार? साखर कारखान्याच्या पाठोपाठ पूरक अुद्योग व लहान अुद्योग सुरु केल्यास स्थानिक कामगारांना रोजगार अपलब्ध होणार होता. दादानी चीफ प्रमोटर म्हणून पुढाकार घेऊन औद्योगिक सहकारी सोसायटी स्थापन केली. दादा सांगलीतील काही कारखानदारांना घेऊन पंजाबातील अुद्योगधंद्याची<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१६ }}</noinclude> h6qwxu0vi0fwjsjmy6dooniectv4g9m पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४४ 104 77789 237961 169817 2026-10-17T06:45:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237961 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>पाहणी करुन आले. साखर कारखान्याजवळच्या माळरानावरची जागा निश्चित करण्यात आली. १३५ एकर जागा मिळवून जमिनीची मोजणी करुन प्लॉट्स पाडण्यात आले. सर्वानीच सहकाराचे, अुत्साहाचे वातावरण ठेवल्याने ऑक्टोबर १९६० मध्ये औद्योगिक सोसायटी कार्यान्वित झाली. भराभर शेड्स बांधण्यात आल्या. फॉन्ड्री, फोर्जिंग, सिमेंट वस्तू, लेदर गुड्स, काटेरी तार, रीरोलिंग मिल, ऑप्टिकल बंकेट पेपरमिल, फॅब्रिकेशन अशा विविध प्रकारांचे कारखाने, औद्योगिक वसाहतीमध्ये सुरु झाले.
{{gap}}यामुळे शेतीप्रधान कारखानदारीची वाढ होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील अुपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग विकासासाठी तर झालाच; शिवाय अनेक कारागिराना काम मिळाले. वसाहतीमधील कारखानदारांना कच्चा माल योग्य दरात मिळवून देण्यात, औद्योगिक सोसायटीने पुढाकार घेतला. स्थानिक तरुणांना तांत्रिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वसंतदादांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरु करण्यात पुढाकार घेतला; त्यामुळे कुशल कामगार तयार झाले.
{{gap}}महाराष्ट्रात पाऊस कमी पण नद्याना पाणी भरपूर असूनही त्याचा अुपयोग शेतीसाठी म्हणावा तसा करुन घेतला जात नव्हता. सरकारी माध्यमांच्या सहकार्याने वसंतदादानी, सांगली जिल्ह्यात पद्माळे, कसबे डिग्रज, आदी भागात नदीच्या पाण्यावर पंप बसवून, शेतीस पाणी पुरवठा करण्याच्या योजना, सहकारी तत्त्वावर सुरु करण्यात पुढाकार घेतला. साखर कारखान्यामार्फत या योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून गावोगाव सभा घेऊन, अशा योजनेचे फायदे त्यानी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो एकर जिराइती जमिनी पाण्याखाली आल्या. पाण्याचा पुरवठा सातत्याने राहिल्याने, वर्षातून दुबार पिके घेणे शक्य झाले. साखर कारखान्यासाठी हमखास अूस मिळण्याची सोय झाली.
{{gap}}१९५९-६० च्या सुमारास सांगली जिल्ह्यात सुमारे २५ लाख एकर जमिनीवर शेंगेचे अत्पादन होत असे. शेंग पिकवणारा जिराईत शेतकरी नेहमी निसर्गावर अवलंबून असे. त्यामुळे अुत्पन्नाची अनिश्चितता असे. पुन्हा शेंग खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांकडूनहि त्याची फसवणूक होत असे. हे टाळून शेतकऱ्यांना फायदा करुन द्यावा, या हेतूने शेंगपिकाचा प्रक्रियात्मक कृषिअद्योग सुरु केल्यास शेतकऱ्याचा फायदा होईल. असा दादानी विचार केला. शेंगेपासून तेल, पेंड, तेलावर प्रक्रिया करुन रिफाइन्ड तेल, वनस्पती तूप, पेंडीतील तेलाचा अंश काढून नैट्रोजनयुक्त खत, कॅटल व पोल्ट्रीसाठी पेंड मिळण्यासारखी होती. त्यासाठी तेल गिरण्या, साबण कारखाना, रिफायनरी, वनस्पती प्लॅट, कॅटल फीड कारखाना, वगैरे शेंगेवरील प्रक्रियात्मक अुद्योग अुभे करण्याचे ठरले. दादानी चीफ प्रमोटर म्हणून पुढाकार<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१७ }}</noinclude> kgkd61r17pbzcsxl8sfv50gwm9mfb85 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४५ 104 77790 237962 169818 2026-10-17T06:48:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237962 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>घेऊन, दि ग्राउंडनट प्रोसेसर्स को. ऑ. सोसायटी १९६० मध्ये काढली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तेलगिरण्या काढल्या.
{{gap}}अशा प्रकारे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दादानी विधायक, समाजोपयोगी कामात स्वतःला अक्षरशः गाडून घेतले होते. साखर कारखान्याची संपूर्ण यंत्रणा आजूबाजूच्या भागाच्या विकासासाठी कशी राबविता येईल याचा ते अहर्निश विचार करत. निदान आपल्या सांगली जिल्ह्यात तरी नावापुरता सुद्धा बेकार माणूस राहू नये ही त्यांची मनापासूनची अिच्छा होती.
{{gap}}विधायक कामे करता करता दादांनी शैक्षणिक कामाकडेही लक्ष पुरवले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे ते चेअरमन होते. त्या संस्थेमार्फत कॉलेज काढण्यात, तसेच मिरज येथे मेडिकल कॉलेज काढण्यात, त्यानी महत्त्वाचा वाटा उचलला. सांगलीच्या परिसरातील सांस्कृतिक शक्ती लक्षात घेऊन, १९६३ साली सांगलीला आकाशवाणी केंद्र मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. सांगलीच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि जिल्ह्यातील गरीब जनतेच्या वैद्यकीय गरजा भागवण्याच्या दृष्टीकोनातून १९६३ साली, प्रशस्त सिव्हिल हॉस्पिटल अभारण्यात त्यानी पुढाकार घेतला.
{{gap}}वसंतदादांचे राजकीय कर्तृत्व मात्र यशदायी झालं नाही.
{{gap}}दादांची विधायक कार्यकुशलता जशी सर्वसान्य झाली तशी त्यांची राजकीय कामगिरी झाली नाही. अुलट अनेक प्रसंगात ती वादग्रस्तच ठरली.
{{gap}}काँग्रेस पक्षावर त्यांची अनन्यसाधारण निष्ठा होती "आमच्यातून काँग्रेस वजा केली तर सार्वजनिक जीवनात आम्ही शून्य आहोत” अशी त्यांची धारणा होती.
{{gap}}१९३७ सालापासून दादानी गावकाँग्रेस पासून आपल्या राजकीय अुमेदवारीची सुरुवात केली. नंतर तालुका काँग्रेस, जिल्हा कॉंग्रेस, अशा चढत्या श्रेणीने एकेक जबाबदाऱ्या पार पाडत, ते राज्यस्तरावर आले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या असीम कर्तृत्वामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र झाले होतेच. त्यांच्या संघटना-कौशल्यामुळे, गोड वागणुकीमुळे आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे, प्रथम महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे सेक्रेटरीपद, नंतर अपाध्यक्षपद अशी वाटचाल करत करत, १९६६ मध्ये दादा प्रदेशाध्यक्ष झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होमगार्ड कमांडंट म्हणून त्यानी लक्षवेधक कार्य केले. पूर्वीचे भूमिगत कार्यकर्ते स्वातंत्र्यानंतर तशीच पुंडाई करत होते. परकीय सरकार विरुद्ध दाखवलेली मर्दुमकी आपल्याच सरकारपुढे दाखवण्यात शहाणपणा नव्हता आणि ती दादागिरी आपल्याच जनतेवर करण्यात शुद्ध वेडेपणा<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१८ }}</noinclude> g2eafeucgkem1l46q2eupa2kl65fjtv पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४६ 104 77791 237963 169819 2026-10-17T06:51:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237963 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>होता; अशा मंडळींना आणि पिढिजात गुंडांना आवरण्याचे काम करण्यात दादांचे संघटना-कौशल्य प्रगट झाले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुऱ्या जोमात होता. द्वैभाषिक राबवणे दादानाहि मनापासून मान्य नव्हते. पण एक निष्ठावंत पक्षकार्यकर्ता म्हणून तो अन्याय त्यानी निमूटपणे सहन केला. लोकक्षोभ असतानासुद्धा पुष्कळ अंशी स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर काँग्रेसचे अुमेदवार १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यानी यशस्वी केले. सांगली मतदार संघातून ते स्वतः १९५२ च्या निवडणुकीपासूनच प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. दादा ही एक मोठी शक्ती आहे याची दिल्लीकराना यथार्थ जाणीव झाली होती. म्हणूनच १९७२ मध्ये स्वतः इंदिरा गांधीनी, वसंतदादा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाहिजेत असा आग्रह धरल्याने, पाटबंधारे व वीज मंत्री म्हणून प्रथमच दादानी मंत्रीपद भूषवले. १९७६ पर्यंत त्यानी मंत्रीपद भूषवले. १९७६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यानी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करताना वसंतदादाना अचानक वगळले. सर्व महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद अुमटले. त्यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला अशी अपमानास्पद वर्तणूक देण्यात चूक झाली असे सर्वसामान्यपणे मानले जात होते. वसंतदादानी स्वतः ही गोष्ट फार मनाला लावून घेतली आणि एक प्रकारच्या अुद्वेगापोटी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.
{{gap}}इथून त्यांचे अखेरीपर्यंतचे जीवन हे राजकारणाच्या लहरीनुसार वाहावत गेले. 'बेरजेचे राजकारण' करता करता सर्वत्र 'बेरक्यांचे' राजकारण सुरु झाले. राजकारण वारांगनेपेक्षाहि चंचल बनले. खुद्द त्यांच्या लाडक्या काँग्रेस पक्षात फाटाफुटी, गटबाज्यांना ऊत आला. आमदारांची शक्ती ज्याच्यामागे तो नेता. मग त्याला जनमानसात आदराचे स्थान असो वा नसो. आमदारांची पुरेशी संख्या पाठीशी असली की मुख्यमंत्री, ती संख्या कुणी पाठीत खंजीर घालून घटवली की खुर्ची खाली, असा असभ्य प्रकार, इतर प्रांतांप्रमाणेच महाराष्ट्रातही चालू झाला. या प्रकारात वसंतदादा १९७६ ते १९८५ या कालावधीत एकूण चार वेळा मुख्यमंत्री झाले पण दुर्दैवाने एकाहि वेळेला त्याना सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगणे राहू द्याच पण चारी वेळेला एकत्र मिळूनसुद्धा चार वर्षे काही मुख्यमंत्रीपद लाभले नाही. प्रत्येक खेपेला कधी वर्ष-दीड वर्ष तर कधी फक्त चार-पाच महिने. या प्रकारात त्यांचे अनेक सहकारी कधी दुरावले तर कधी जवळ आले. पण सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या 'यशवंत-वसंत' जोडीने अभ्या महाराष्ट्राचा कायापालट केला, तीच जमलेली जोडी एकमेकाना दुरावली!
{{gap}}महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते कितीसे यशस्वी झाले हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या काळात त्याना सरकारी नोकरांचा<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२१९ }}</noinclude> dapvf1g7hf24xfiph6logyss27ip0vf पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४७ 104 77792 237964 169820 2026-10-17T06:54:49Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237964 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>संप, शिक्षकांचा संप, गिरणी कामगारांचा संप अशा अनेक अप्रिय गोष्टींना सामोरे जावे लागलेच, पण त्याहिपेक्षा पक्षांतर्गत कारवायांनी त्यांचा फार वेळ घेतला; शक्ती क्षीण केली. पण तरीसुद्धा त्यानी आपल्या व्यवहारी दृष्टीच्या आधारे सर्वंकष विकासाच्या योजनांवर भर दिला. याच व्यावहारिक दृष्टीकोनातून अुच्च तांत्रिक शिक्षण ही केवळ सधन व अुच्चभ्रू समाजाची मक्तेदारी होऊ नये, गरीब पण लायक अशा ग्रामीण भागातील मुलानाहि त्याचा लाभ व्हावा अशा हेतूने दादानी विना-अनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालयाना महाराष्ट्रात परवानगी दिली. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. त्यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्याना शेजारच्या राज्यात जाऊन भारी फी भरुन, मेडिकल, इंजिनिअरींग, शिक्षण घ्यावे लागत असे. आज ग्रामीण भागातून सुद्धा अिंजिनिअर्स, डॉक्टर्स निर्माण होऊ लागले आहेत हे एका अर्थी दादांच्या द्रष्टेपणामुळेच. मात्र अशा गुणवान विद्यार्थ्यांनी शहराकडे पळू नये, आपल्याच भागात समाजाला अुपयोगी पडावे ही त्यांची धारणा मात्र पूर्णांशाने फलद्रूप होताना दिसत नाही. दादांच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात दोन वैद्यकीय महाविद्यालये, ५५ अभियांत्रिकी विद्यालये, १०८ तंत्रनिकेतने, तर जवळजवळ ३०० औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु झाल्या. त्यांच्या परीने त्यानी जमीन सुधारणा, बेघरांना घरे, रोजगार हमी योजनेचा पाठपुरावा, मागासवर्गीयाना सर्वत्र कर्जवसुलीस माफी अशा अनेक थरांवर, कामाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला पण मुख्यमंत्री म्हणून एक सरसकट छाप अुमटवण्यात मात्र त्याना यश आले नाही. दिल्लीच्या नेहमीच्या पक्षीय प्रथेनुसार दादाना मनासारखे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. अुलट वेळीअवेळी त्यांचे पंख छाटण्याचेच प्रयत्न झाले. महाराष्ट्रात ते फार डोईजड होतात असे वाटले तेव्हा त्याना दिल्लीत, काँग्रेसचे अखिल भारतीय पातळीवरील सरचिटणीसपद देऊन अडकवून ठेवण्यात आले. हिमाचल प्रदेश, अुत्तर प्रदेश वगैरे भागातील काँग्रेस पक्षाच्या संघटनेची कामे त्यानी चांगली केली. महाराष्ट्रात तर त्यानी काँग्रेस पक्ष एकसंध बांधला होता. त्यामुळे बहुतेक सर्व निवडणुकांतून, इतर प्रांतातून काँग्रेसची पडझड झाली, तरी महाराष्ट्रात काँग्रेसला यशच मिळत राहिले होते. यामध्ये दादांच्या संघटनाकौशल्याचा मोठाच भाग होता. माणसे जोडणे, गोळा करणे, त्याना पक्षाशी आणि वैयक्तिकपणे स्वतःशी वर्षानुवर्षे बांधून घेणे, दादाना त्यांच्या गोड, आर्जवी, लाघवी स्वभावामुळेच शक्य झाले. म्हणून तर वसंतदादा म्हणजे 'माणसांची बँक' असे म्हणत. पण तेच दादा सचिवालयाच्या तंत्रात पुरे गोंधळले! तेथील नियम, कायदा, ऑडिट अशा जंजाळात त्यांचे मन गुदमरुन जाई. त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक वेळा चटकन निर्णय घ्यायला लागत. धाडशी निर्णय घ्यावे लागत. पण असे धाडस नियमांच्या आणि कायदेशीर तरतुदींच्या जंजाळात कुचकामी ठरे! मुख्यमंत्री म्हणून काम करताना इतर<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२२०}}</noinclude> kpaavsosycrj5ksgx3pa2o5hlx77kr9 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४८ 104 77793 237965 169821 2026-10-17T11:04:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237965 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अनेक बाबींबरोबर, दादाना ह्या नियमावलींचा पण त्रास झाला, भरीला मतलबी राजकारणाचे खेळ. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस त्याना राजस्थानचे राज्यपालपद देऊन, महाराष्ट्रापासून दूर ठेवल्याने, दादाना नाही म्हटले तरी मनस्ताप झाला असणारच. कौटुंबिक कलहांनी तर त्यांचा पिच्छाच पुरवला होता. मधुमेहाचा त्रास वर्षानुवर्षे होता. या सर्वांचा परिणाम त्यांची प्रकृती ढासळण्यात झाला आणि अखेरीस १ मार्च १९८९ रोजी त्यांची जीवनज्योत मालवली. श्री. राजीव गांधी दादांच्या अंत्यदर्शनासाठी मुद्दाम सांगलीत आले. त्यांच्या अुपस्थितीत लाखभर चहात्यांच्या अलोट गर्दीत कृष्णातीरी त्याना अखेरचा निरोप दिला गेला.
{{gap}}दादांच्या जीवनाचे मूल्यमापन अनेकानी केलंय; अनेकजण पुढे करतील. पण त्यांचा सगळा जीवनपट बघितल्यावर अनेकाना वाटतं की हा नेक दिलाचा माणूस राजकारणाच्या दलदलीत निष्कारण अडकला.
{{gap}}आपल्या आवडत्या विधायक कार्यातच गुंतून राहिला असता तर?
{{gap}}ते काही असो. सांगलीकर जेव्हा कृष्णाकाठी फिरायला जातो तेव्हा सरकारी घाटावर अभे राहिल्यावर, डाव्या बाजूला राजेसाहेबांची समाधि आणि अुजव्या बाजूला वसंतदादांची समाधी पाहून आणि सहा गल्लीवाल्या सांगलीचे आजचे स्वरुप लक्षात येऊन त्याच्या तोंडून सहजच अुद्गार निघतील, {{Block center|<poem>''"चिंतामणराये रचिला पाया'' ''वसंतराये कळस चढविला"''</poem>}} {{center|●●●}}{{nop}}<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२२१}}</noinclude> mt2x2v5vh1f58lnavzfqw4ac05jme19 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२४९ 104 77794 237966 169822 2026-10-17T11:10:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237966 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''भैरवी..., मंगेशकरी सुरांना अभिवादन करुन...'''}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}अिथवर सांगलीच्या बावीस सुपुत्रांचं गुणगान मी केलं. एक प्रकारे वेगवेगळ्या थाटांच्या बावीस रागरागिण्यांचेच हे गायन होते. मैफलीची अखेर भैरवीने व्हावी असा संकेत आहे. भैरवीचे सूर छेडायला गवयाने सुरुवात केली की मैफलीत आपोआप एक प्रकारची अुदासिनता पसरते. मनामनातून हुरहूर दाटून येते. हा काही नुसता भैरवीच्या आर्त सुरावटीचा परिणाम नसतो तर आता मैफल संपणार या दुःखाचीही जाणीव त्यामध्ये अंतर्भूत असते. तशीच काहीशी माझी अवस्था झाली आहे. या पुस्तकाचे स्वागत कसे होईल याची कल्पना नाही पण कर्तबगार सांगलीकरांचे स्तवन करण्याचा खटाटोप माझ्यापुरता तरी अत्यंत आनंददायी होता. गेली दोनतीन वर्षे मी त्यांच्याच सहवासात होतो म्हणानात.
{{gap}}आता भैरवीसाठी कोणती चिज आळवायची हा माझ्यापुढं प्रश्न नव्हताच. सांगलीतील वास्तव्यानं सांगलीला धन्यता प्राप्त करुन देणारी, कीर्तीवान करणारी ती चिज 'मंगेशकरी' सप्तसुरांचीच असणार होती. भारतीय संगीतात मंगेशकरी सूरमंडल हा एक विलक्षण चमत्कार आहे. असं आश्चर्य शतकातून एकदाच घडू शकतं. मा. दीनानाथ मंगेशकरांचा जन्म १९०० सालचा. २००० साल आता अुलटून गेलं तरी त्यांची मुलं, नातवंडं, त्यांच्याच तडफेने गात आहेत. संपूर्ण शंभर वर्षे एकाच घरातील सुरांची मोहिनी आसेतू-हिमाचल असावी हा चमत्कार नव्हे तर काय? म्हणून या गाणाऱ्या घराण्याला 'गंधर्व घराणे' म्हटलं जाते. कोणी 'मंगेशकर' आडनावाला एक मंत्रच संबोधतात. मा. दीनानाथ हा या गंधर्व घराण्याचा आद्यस्वर. मा. दीनानाथ, माई मंगेशकर आणि त्यांची पाच गुणवान मुलं या सर्वांचं मिळून एक सप्तसुरांचं अिंद्रधनुष्य निर्माण झालं. या मंगेशकरी सप्तसुरांमध्ये, माई मंगेशकरांचा समावेश मी मुद्दाम करतो. मा. दीनानाथांचं अकाली निधन झाल्यावर त्यांचे पंचप्राण असणाऱ्या, लता, मीना, आशा, अुषा आणि हृदयनाथ या पांचही सुरांना, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एकत्र बांधून ठेवण्याचं, बदसूर होऊ न देण्याचं मोठं काम माईनी केलंय. आणि सांगली नगरीचं परमभाग्य म्हणजे हे सप्तसूर एकाच वेळी सांगलीत निनादत होते. काही सूर बहरलेले होते. काही उमलत होते. काही उमलायचे. होते. मा. दीनानाथाचं ऐन अमेदीच्या काळात तब्बल १४ वर्षे सांगलीत वास्तव्य<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२२२ }}</noinclude> iz3cklgzqp9ztmgf2sy7r0mvgx01e7i पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५० 104 77795 237967 169823 2026-10-17T11:13:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237967 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>होतं. सांगलीत आल्यावर जी वास्तू त्यानी खरेदी केली आणि जिथं या सप्तसुरांचं वास्तव्य होतं ती वास्तू 'दीनानाथ चाळ' म्हणूनच ओळखली जाते. (आजही ती वास्तू सांगलीच्या एस.टी. स्टँडजवळ अुभी आहे). सांगलीच्या वास्तव्यात आपल्या तडफदार गायनशैलीने आणि अुंच खणखणीत आणि भिंगरीसारखी फिरत असलेल्या असामान्य आवाजाने, मा. दीनानाथानी मराठी रंगभूमी दणाणून सोडली. सांगलीचं आजचं 'सदासुख' थिअेटर हे सुरवातीला नाटकाचे थिअटर होतं. या सदासुखमध्ये आठवड्याला एक नाटक याप्रमाणे सतत आठ वर्षे दीनानाथानी आपल्या 'बलवंत नाटक मंडळी तर्फे' नाटके सादर केली. त्यांचं एक मोठं वैशिष्टय म्हणजे त्यांची राष्ट्रीय वृत्ती. त्यामुळे मानापमान, भावबंधन, सौभद्र यासारख्या पारंपारिक नाटकांबरोबरच त्यानी स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर वामनराव जोशी यांची राष्ट्रीय वृत्ती जोपासणारी नाटके केली. 'परवशता पाश दैवे' यासारखे गाणे पारतंत्राच्या काळात म्हणणे धाडसाचे होते. ते धाडस दीनानाथानी दाखवले. एकीकडे साक्षात बालगंधर्व आणि दुसरीकडे केशवराव भोसले यांच्यासारखे चंद्रसूर्य मराठी नाट्यसृष्टीत तळपत असताना सुद्धा दीनानाथानी रसिकमनांवर आपल्या स्वतंत्र गायनशैलीचा ठसा अुमटवला हे मुद्दाम लक्षात आणून दिले पाहिजे. नाट्यसृष्टीवर चित्रपटसृष्टीचे आक्रमण होऊ लागले तेव्हा त्याचा विपरीत परिणाम सर्वच नाट्यसंस्थांवर झाला. आपली नाटकसंस्था बंद ठेवून दीनानाथानी, विश्राम बेडेकर, चिंतामणराव कोल्हटकर, वा. ना. भट वगैरेच्या साहाय्याने 'बलवंत पिक्चर्स' नावाची संस्था, कृष्णाकाठी, गणपती मंदिराच्या पिछाडीला स्थापन केली. सांगली-हरिपूर भागात शूटींग करुन 'कृष्णार्जुनयुद्ध' नावाचा सिनेमा तयार केला. मोठी जाहिरात केली. पण दुदैवाने सिनेमा साफ कोसळला. कंपनी कर्जबाजारी झाली. सावकारांचे तगादे लागले. कोर्टकचेऱ्या सुरु झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दीनानाथाना झगडा करावा लागला आणि त्यातच अवघ्या ४२ व्या वर्षीच त्याना मृत्यूच्या आधीन व्हावे लागले हे त्यांचे आणि नाट्यरसिकांचे दुर्दैव.
{{gap}}दीनानाथ अकाली गेले पण मराठी रसिकांसाठी एक मोठा कल्पवृक्ष लावून गेले. लता, मीना, आशा, अुषा आणि हृदयनाथ या मुलांच्या रुपाने फार मोठी संपत्ती त्या 'शापित यक्षाने' आपल्यामागे ठेवली. या पाच भावंडापैकी, आशा भोसले, अुषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मच मुळी सांगलीत झाला. लता मंगेशकर सर्वात मोठ्या. साहजिकच अितर भावंडांच्या तुलनेत त्याना दीनानाथांचा सहवास अधिक लाभला. लताबाईंची सांगितिक जडणघडण त्यामुळे सांगलीतच झाली. पुढे आयुष्यात लंडनमधील आल्बर्ट हॉल गाजवणाऱ्या लताबाईनी आपल्या बालपणात, सांगली जिमखाना हॉल गाजवून आपल्या भावी कर्तृत्वाची झलक दाखवली होती. कर्तबगार वडिलांचा वारसा पुढील पिढीला सांभाळता येतोच असं नाही. पण<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२२३ }}</noinclude> pdnih0a0gefnvvst0p86k5a1dj5t6yl पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५१ 104 77796 237968 169824 2026-10-17T11:16:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237968 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>दीनानाथ फार भाग्यवान. पाचही मुलांच्या कर्तृत्वामुळे त्यानी लावलेला कल्पवृक्ष किती बहरला हे त्याना प्रत्यक्षात पाहायला मिळालं नाही तरी माईंच्या डोळ्यांनी त्यानी नक्कीच बघितले असेल. लतादीदी तर काय गळ्यात गंधार घेऊनच जन्माला आल्या. भारतीय गानकलेच्या नंदनवनातील ही स्वरलता म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त गानसम्राज्ञी आहे असे आचार्य अत्रे म्हणत. तिला 'मराठा' मधून अभिवादन करताना त्यानी म्हटलंय की "वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर हे अभिवादन करणे, म्हणजे एखाद्या अप्सरेच्या स्वागतासाठी तिच्या मृदू चरणकमलांखाली जाड्या भरड्या गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्याइतके, अथवा कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांचे चित्र काळ्या पाटीवर कोळशाच्या कांडीने रेखाटण्याचा प्रयत्न करण्याइतकेच विशोभित आहे, या जाणिवेने आमचे मन आम्हाला खात आहे." ३६ वर्षापूर्वी लताला 'भारतरत्न' ही सर्वोच्च पदवी द्यावी अशी मागणी करणाऱ्या आचार्य अत्र्यांची अिच्छा नुकतीच फलद्रुप झाली. लतादीदीनी सर्व प्रमुख भारतीय भाषांमधून तीस हजारांवर गाणी म्हटली असतील. तरीसुद्धा 'अतिपरिचयात् अवज्ञा' ही परिस्थिती त्यांच्याबाबतीत कधीच निर्माण होणार नाही. गंमत म्हणजे आशाबाई तशाच श्रेष्ठ गायिका आहेत. काही क्षेत्रातून तर त्या लताबाईंच्याही पुढे गेलेल्या आहेत. त्यानी स्वतःचे कर्तृत्व इतके सिद्ध केलेले आहे की, प्रसिद्धीमाध्यमे मुद्दाम लता श्रेष्ठ की आशा श्रेष्ठ असा वादंग निर्माण करतात. त्याबाबतीत एकदा आशाबाईनीच फार मार्मिकपणे सांगितलंय की "कात्रीची दोन्ही पाती वेगवेगळी जरुर होतात पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा जो त्यांच्यामध्ये सापडेल त्याचाच तुकडा पडतो." लता, आशाप्रमाणेच अुषा मंगेशकरही अुत्तम गातात. पाच हजारांहून अधिक अशी त्यांची गाणी आहेत. गायिका असूनही त्याना चित्रकलेचा मोठा छंद आहे. एम. आर. आचरेकर यांच्या सारखा चित्रतपस्वी त्याना गुरु म्हणून लाभला होता. अनेक कला दालनांमधून त्यानी स्वतःच्या चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. मीना मंगेशकरही अुत्तम गातात. त्यानी पार्श्वगायन केले पण कमी प्रमाणात केले. लहान मुलांच्यासाठी त्यानी वैशिष्ट्यपूर्ण अशी संगीतरचना केली. त्यांचा 'चॉकलेटचा बंगला' हा बालगीतांचा अल्बम प्रचंड गाजला. हृदयनाथ मंगेशकर हाही एक चमत्कार मानावा लागेल. स्वतः अुत्तम गायक ते आहेतच. पण त्यांचा खरा परिचय म्हणजे ते एक असामान्य, प्रयोगशील, अलौकिक प्रतिभा लाभलेले संगीतकार आहेत.
{{gap}}हाताची पाच बोटे एकसारखी नसतात. तशी ही पाच मंगेशकर भावंडं गुणात्मक दृष्ट्या कमी-जास्ती असतील पण पाची बोटांची मिळून जी मंगेशकरी मूठ बनते ती विलक्षण सामर्थ्याची आहे. या मंगेशकर मंडळींच्या गाण्यांची संख्या अेवढी प्रचंड आहे की, केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे या भावंडांनी या चंदेरी दुनियेतून 'आम्हाला<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२२४ }}</noinclude> bbxov059p127pjndt7cgx03qudmdo24 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५४ 104 77799 237969 169827 2026-10-17T11:18:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237969 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वगळा' म्हटले तर ही तारांगणे क्षणात हतप्रभ होतील. आकाशवाणी, दूरदर्शन, केबल वाहिन्या ठप्प होतील. थोडक्यात अंधारच अंधार. इतकं सामर्थ्य या मंगेशकरी मुठीत आहे.
{{gap}}सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौर श्री. सुरेश पाटील यानी या पाचही गुणवंत मंगेशकर भावंडांना एकत्रितपणे सांगलीत आणण्याचा दुर्मिळ योग साधला आणि त्या सर्वांचा मा. दीनानाथ यांच्या शताब्दि महोत्सवानिमित्ताने २६ फेब्रुवारी २००० रोजी महापालिकेतर्फे मानपत्र देऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार केला. तीन दिवस भरगच्च कार्यक्रम केले. सांगली आणि मंगेशकर हे संबंध त्यामुळे आता अधिकच दृढ झाले आहेत.
{{gap}}सांगलीकरांचे गौरवगान करावे तेवढे थोडेच. पण प्रत्येक मैफलीची अखेर भैरवीनी करावीच लागते त्याप्रमाणे कर्तृत्वान सांगलीकरांची ही गौरवगान मैफल मंगेशकर कुटुंबियांच्या गुणगौरवाने करुन ही मैफल मी येथेच थांबवितो.
{{center|●●●}}{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२२५ }}</noinclude> mbqvlk0t6lscoueonuq729r746ctwyo पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५५ 104 77800 237970 169828 2026-10-17T11:20:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237970 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''परिशिष्ट'''}}}} {{Block center|<poem>■ आणखी काही सांगलीकर
■ सांगलीतील काही नामवंत संस्था
■ सांगलीतील प्रेक्षणीय स्थळे
■ सांगली २०० वर्षांचा धावता इतिहास (१८०० ते २०००) 'कालपट'
■ "सांगली भूषण"</poem>}} {{nop}}<noinclude></noinclude> seynefqyhdl5m2mungb2hdx6wre7rwp 237971 237970 2026-10-17T11:21:24Z कल्पनाशक्ती 3813 237971 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''परिशिष्ट'''}}}} {{Block center|<poem>■ आणखी काही सांगलीकर
■ सांगलीतील काही नामवंत संस्था
■ सांगलीतील प्रेक्षणीय स्थळे
■ सांगली २०० वर्षांचा धावता इतिहास
{{gap}}(१८०० ते २०००) 'कालपट'
■ "सांगली भूषण"</poem>}} {{nop}}<noinclude></noinclude> 0bgub3j7e0n524a7tvktxsq467flar3 237972 237971 2026-10-17T11:21:49Z कल्पनाशक्ती 3813 237972 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''परिशिष्ट'''}}}}
{{Block center|<poem>■ आणखी काही सांगलीकर
■ सांगलीतील काही नामवंत संस्था
■ सांगलीतील प्रेक्षणीय स्थळे
■ सांगली २०० वर्षांचा धावता इतिहास
{{gap}}(१८०० ते २०००) 'कालपट'
■ "सांगली भूषण"</poem>}} {{nop}}<noinclude></noinclude> t83ho8u7o4zs1ppvqq52i0g8cgokrw7 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५६ 104 77801 237973 169829 2026-10-17T11:27:17Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237973 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''परिशिष्ट'''}}
{{xx-larger|'''आणखी काही सांगलीकर'''}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}एखाद्या प्रिय व्यक्तिविषयी लिहिताना किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. तीच अवस्था प्रस्तुत लेखकाची सांगली या विषयासंदर्भात होते. सांगली आणि निवडक सांगलीकर यांच्या विषयी बरंच लिहून झाल्यावरही अजून सांगलीविषयी कितीतरी लिहायचं राहिलंय असं वाटायला लागतं! असे अनेक सांगलीकर आहेत, सांगलीतील संस्था आहेत, प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांच्या विषयी नाही लिहायचं म्हणजे मनात एक अपराधी भावना निर्माण होते पण त्याचवेळी आर्थिक बाबीचाहि विचार नजरेआड करता येत नाही. तेव्हा त्या साऱ्या गोष्टींचा थोडक्यात परामर्श घ्यावा हे अुत्तम.
{{gap}}{{gap}}एक प्रकारे सांगलीचे हे कॅलिडिओस्कोपी दर्शनच!
{{gap}}सांगली हे काही पर्यटन स्थळ नव्हे. पण एखादा पाहुणा घरी आला की त्याला चार गोष्टी कशा आपण कौतुकाने दाखवतो त्याप्रमाणे सांगलीतील काही प्रेक्षणीय स्थळांची माहिती या परिशिष्टात दिलेली आहे.
{{gap}}सांगलीत अनेक नामवंत संस्था आहेत. काही शंभर वर्षाहून जुन्या म्हणून ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत तर काही गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, व्यापारी पेढ्या आहेत, व्यापारी, औद्योगिक संस्था आहेत तर काही कृषिविषयक संस्था आहेत. या विषयाला हात घातल्यावर लक्षात आलं की हा एका मोठ्या ग्रंथाचा विषय आहे! एकट्या-दुकट्या माणसाला जमणारं हे काम नाही. मात्र पुरेसं आर्थिक पाठबळ आणि अवधी मिळाल्यास अवश्य पाठपुरावा करावा असा हा महत्वाचा विषय आहे. सांगलीच्या सर्वांगीण जडणघडणीची यथार्थ कल्पना त्यामुळे येऊ शकेल. प्रस्तुत लेखकाने काहीच संस्थांचा प्रातिनिधिकपणे विचार करुन, केवळ आर्थिक कारणांसाठी हा विषय नाईलाजाने अर्धवट सोडून दिला आहे.
{{gap}}आता राहिले कर्तृत्ववान सांगलीकर.
{{gap}}असे सांगलीकर अनेक आहेत. त्यासाठी पद्धतशीर अभ्यास आणि संशोधनच करण्याची आवश्यकता आहे. इथं नमूद होणारे सांगलीकर केवळ स्मृतीवर भरोसा ठेवून नोंदलेले असल्यामुळे, अनेकांचा नामोल्लेख न होण्याची शक्यता आहे. त्याचा संपूर्ण दोष<noinclude>{{rh| सांगली आणि सांगलीकर||२२८ }}</noinclude> jwdyht55l5l8o58lcypuk8ne04822ze पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५७ 104 77802 237974 169830 2026-10-17T11:30:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237974 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>प्रस्तुत लेखकाकडे जातो. त्यांचा अुल्लेखहि कालानुक्रमे न होता विस्कळीतपणे झाला आहे. सांगली आणि साहित्य : साहित्यक्षेत्रातील सहज आठवणारं नाव म्हणजे नाटककार न. ग. कमतनूरकर यांचं. त्याना राम गणेश गडकऱ्यांचा पट्टशिष्य असल्याचा सार्थ अभिमान होता. त्यांच्या 'श्री' 'सज्जन' आणि 'स्त्री-पुरूष' या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली होती. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची सन्मानाने निवड झाली होती. त्यांच्याबरोबरीने त्यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनीबाईंचे नाव घ्यायला हवं. अनेक बंगाली कादंबऱ्यांची त्यानी मराठी भाषांतरे केली होती. त्या सध्या मुंबईस असतात. ८५-९० च्या आसपास त्यांचं आता वय आहे. मुंबईतील गोरेगाव भागात त्या राहतात. प्रस्तुत लेखकाने आवर्जून त्यांची भेट घेतली होती पण न.ग. कमतनूकरांविषयी संपूर्ण लेख लिहिण्याइतकी माहिती न मिळाल्याने तसा प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला.
{{gap}}मूळ रहिमतपूरचे असलेले कवी गिरीश (प्रा.शं. के. कानेटकर) सांगलीकरच म्हणायला हवेत, अितकं त्यांचं सांगलीत दीर्घकालीन वास्तव्य होतं. त्यांच्या वाङमयीन कर्तृत्वाविषयी वेगळे काही लिहिण्याची आवश्यकता नाहीच. अलीकडेच झालेल्या त्यांच्या जन्मशताद्विनिमित्ताने त्याला नव्याने अुजाळा मिळालाय. जुन्या विश्रामबाग स्टेशनसमोर असलेला त्यांचा 'कांचन' बंगला अनेक होतकरु साहित्यिकांचे आश्रयस्थान होता. खुद्द पु.ल. देशपांडे त्यांच्या छायेखाली एम.ए.च्या अभ्यासासाठी येऊन राहिले होते. कवी गिरीशांप्रमाणेच कवी यशवंत यांनासुद्धा सांगलीकरच मानायला हवं. साधुदासाना ते गुरु मानत. गिरीशांचे सुपुत्र आणि नुकतेच निधन पावलेले सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांची जडणघडण सांगलीतच झाली. सुप्रसिद्ध समीक्षक 'श्रीकेक्षी' (श्री. के. क्षीरसागर) सांगलीचेच. अनेक समीक्षा - ग्रंथांबरोबरच 'तसवीर आणि तकदीर' हे त्यांचं आत्मचरित्र वैशिष्टयपूर्ण आहे. प्रसिद्ध लेखिका कमल देसाई आता सांगलीतच स्थायिक झाल्या आहेत. कवी-संगीतकार, अशोक जी. परांजपे सांगलीजवळील हरिपुरचेच. डॉ. वि. रा. करंदीकर, प्रा. गोविंद जोशी सांगलीचेच. प्रा. मालतीबाई किर्लोस्कर आता सांगलीतच स्थायिक झालेल्या आहेत. समतोल विचाराचे आणि ज्यांच्या साहित्य-समीक्षेचा दबदबा, अभ्या महाराष्ट्रात आहे ते प्रा. म. द. हातकणंगलेकर म्हणजे आजमितीला सांगलीमधील एक चालती-बोलती साहित्य-संस्थाच आहे. तेच लोककलेच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. डॉ. सुभाष भेंडे या नामवंत लेखकाची जडणघडण सांगलीतच झाली. सिटी हायस्कूल आणि विलिंग्डन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२२९ }}</noinclude> f4fo903x4oh6008ei2xonx7zik3w5p1 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५८ 104 77803 237975 169831 2026-10-17T11:41:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237975 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>झाले. पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रासाठी त्यांनी विलिंग्डन महाविद्यालयाचा विद्यार्थी- वार्ताहर म्हणून आपल्या पत्रकारितेची सुरवात केली होती. सुदैवाने अनेक छोट्या- मोठ्या लेखकांनी सांगलीच्या साहित्य परंपरेचा वारसा समर्थपणे आज चालवलेला आहे. यथाकाल त्यांचा परामर्श घेतला जाईलच.
{{gap}}'''सांगली आणि नाट्य :''' नाट्याच्या बाबतीत तर काय सांगली ही बोलून चालून नाटयपंढरीच आहे. या पुस्तकात अुल्लेखलेल्या दिग्गजांबरोबरच सांगलीत नाट्यपंरपरेची पताका दिमाखात पुढे नेणाऱ्या मान्यवरांमध्ये मामा भट, बंडोपंत सोहनी, रघुनाथ इनामदार, बाबूराव नाईक, प्रा. जगन्नाथराव आठवले, विनायकराव पाटणकर, जगन्नाथराव पाटणकरांपासून आजकालच्या अर्चना जोगळेकर, माधव खाडिलकर, डॉ. गिरीश ओक अशा अनेक नामवंतांनी नाट्यक्षेत्रात चौफेर मुलुखगिरी केली आहे. रंगभूमीवर काम करता करता, ॲड. मधुसूदन करमरकर, यशवंत केळकर, अरुण नाईक, प्रा. दिलीप परदेशी, डॉ. मधु आपटे यांच्यासारखे नवे नवे नाटककार अुदयास आले. चित्तरंजन कोल्हटकर, अुदयराज गोडबोले ही मंडळीपण सांगलीचीच. मा. दीनानाथ, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, विश्राम बेडेकर यासांरख्या दिग्गजांचे सांगलीत काही काळ वास्तव्य होते. पहिली व्यावसायिक नाटक मंडळीपण सांगलीतच अुभी राहिली. विष्णुदास भावे यानीच 'सांगलीकर नाटक मंडळी' ही संस्था स्थापन करुन राजाश्रयाखाली असलेली मराठी रंगभूमी, प्रथमच लोकाश्रयाकडे वळवली. पुढे बळवंतराव मराठे यानी 'नूतन सांगलीकर नाटक मंडळी' स्थापन केली.
{{gap}}म्हणजे आजमितीला फोफावलेल्या नाटक-कंपन्यांची मुहुर्तमेढ सांगलीतच झाली होती. देवल स्मारक मंदिर, भावे नाटयमंदिर, ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असो. सस्नेह, ॲक्टिव्ह ग्रुप अशा अनेक संस्था आज सांगलीत कार्यरत आहेत. संगीत नाट्य-परंपरा पुढे नेणारे नवीन नवीन गुणवंत तरुण अुदयास येत आहेत. विस्तारभयास्तव सर्वांचा नामोल्लेख करता येत नाही.
{{gap}}'''सांगली आणि संगीत :''' मात्र नाटकाइतकी थोर अशी संगीतपरंपरा सांगलीपेक्षा मिरजेला अधिक आहे. सांगली-मिरज हा परिसर भौगोलिकदृष्टया वेगवेगळा दिसत असला तरी सांस्कृतिकदृष्टया एकमेकांत इतका मिसळून गेला आहे, की कधी कधी वेगवेगळे ओळखू येत नाही. त्यामुळेच पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, अब्दुल करीम खाँ सारखे संगीत-महर्षि सांगलीचेच वाटतात. काळेबुवा, गोडबोलेबुवा (रंगभूमीवरील अुदयराज गोडबोले यांचे वडील), गणपतराव डवरी, गुरव मंडळी यांच्यापासून चिंतुबुवा म्हैसकर, रत्नाकर दिवाकरांपर्यंत अनेकांनी सांगलीतील संगीतपरंपरा जपलेली आहे. हार्मोनिअम वादक नाना ताडेना जसं विसरता येत नाही तसं बाळकृष्णबुवा<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३० }}</noinclude> ny0jl2z1r0vlbd9muunryjz11zs9g9f पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५९ 104 77804 237976 169832 2026-10-17T11:47:47Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237976 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मोहितेना विसरता येत नाही. बाळकृष्णबुवांची तर पेटीवादनाची तयारी एवढी विलक्षण होती की अनेक जाणकार त्यांची तुलना गोविंदराव टेंबे यांच्या पेटीवादनाशी करत असत. अनेक नामवंत गायक-गायिकांना त्यानी साथ केली होती; किंबहुना त्यामधील अनेकजण बाळकृष्णबुवाना मुद्दाम पाचारण करत. त्यांचा स्वतःचा कमालीचा संकोची स्वभाव, प्रसिद्धीविन्मुख वृत्ती, आणि सांगलीसारख्या, पुण्या-मुंबईच्या तुलनेत छोट्या गावातील वास्तव्य, यामुळे त्यांच्या पेटीवादनातील नैपुण्याचा किंवा त्यानी स्वतः तयार केलेल्या २२ श्रुतींच्या हार्मोनिअमचा व्हावा तसा बोलबाला झाला नाही. हिराबाई बडोदेकरांची गायकी तंतोतंत आत्मसात करणाऱ्या आणि नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकरांच्या स्नुषा असणाऱ्या इंदिराबाई खाडिलकरानी, संगीत, नाट्य-संगीत क्षेत्रात सांगलीचं नाव चांगलंच गाजवलं. तीच संगीत परंपरा आता सांगलीच्या आशा खाडिलकर, वर्षा भावे पुढे नेत आहेत. आशा खाडिलकरांचं कौतुक म्हणजे त्यांच्या गुरु, माणिक वर्मा यांच्याप्रमाणेच त्या शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये पारंगत आहेत.
{{gap}}भावगीत गायनातील ज्येष्ठ गायक जे. एल. रानडे हे सांगलीचेच. खुद्द गजाननराव वाटवे सांगली गावाशी अनेक वर्षे संबंधित आहेत. जुन्या जमान्यातील बाळ कारंजकर यानी सुद्धा भावगीत गायनात नाव कमावलं.
{{gap}}आजमितीला मंगला जोशी, मंजिरी असनारे आणि मंजुषा कुलकर्णी या तीन 'मं' कारित- संगीत गायिका शास्त्रीय संगीतात सांगलीचं नाव सर्वत्र दुमदुमवत आहेत ही सांगलीकरांच्या अभिमानाची गोष्ट आहे.
{{gap}}'''सांगली आणि पत्रकारिता :''' १९३७ मध्ये सांगलीत 'दक्षिण महाराष्ट्र' आणि 'विजय' ही साप्ताहिके निघू लागली. तेव्हापासून सांगलीला पत्रकारितेची परंपरा आहे. या पत्रकारितेच्या क्षेत्रात, सदाशिवराव फडके. ह. गो. टिळक, भ.अं. तथा बापूसाहेब दप्तरदार, त्यांचे बंधू गणपतराव दप्तरदार, रामभाऊ जामदार, बी. जी. (काका) कुलकर्णी, गजाननराव भोसले, राष्ट्रशक्तीचे दीनानाथ भोसले अशी अनेकांची नावे घ्यावी लागतील. पुण्याच्या 'केसरी' चे संपादक अरविंद व्यं. गोखले हे मूळचे सांगलीचेच. आजमितीला सांगलीहून लोकमत, पुढारी, सकाळ, दक्षिण महाराष्ट्र केसरी, अशा अनेक वृत्तपत्रांचे प्रकाशन होते. त्याशिवाय राष्ट्रशक्ती, अग्रदूत, नवसंदेश, प्रभातदर्शन, जनप्रवास, ललकार यांसारखी दैनिके आज सांगलीत आहेत. 'विजयंत', 'बिझनेस एक्स्प्रेस' यांसारखी साप्ताहिकेही सांगलीतून निघतात.
{{gap}}'''संस्कृत परंपरा :''' श्रीपादशास्त्री देवधर, पाटीलशास्त्री, केशवराव दीक्षित अशा संस्कृत पंडितांनी, मुंबई विश्वविद्यालयाच्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती विजेत्यांची<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३१ }}</noinclude> sramfb7tqzn0jglvb8tb41njolgr79t पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६० 104 77805 237977 169833 2026-10-17T11:51:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237977 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>गौरवशाली परंपराच सांगलीमध्ये निर्माण केली. सांगली हायस्कूल आणि सिटी हायस्कूल मधील नामफलक बघितले म्हणजे किती तरी गुणवंत शंकरशेट स्कॉलर्स आढळतील. त्यातूनच अनेकजण आय.सी.एस. अधिकारी झाले. पं. महादेवशास्त्री जोशी यांचे सांगलीच्या वेदशास्त्रशाळेत शिक्षण झाले होते. प्राच्याविद्या संशोधक ग.वा. तगारे सांगलीचेच.
{{gap}}'''सहकार :''' वसंतदादांमुळे सांगली जिल्ह्यात सहकारक्षेत्राचे जाळेच विणले गेले. या क्षेत्रात राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील, धुळाप्पाण्णा नवले, आबासाहेब खेबूडकर, माधवराव गोडबोले, चारूभाई शहा वगैरे मंडळीनी मोठेच योगदान दिले. आज सांगलीत अनेक क्षेत्रांमध्ये 'सहकार' हा परवलीचा शब्द बनला आहे.
{{gap}}'''वैद्यक :''' वि.स. खांडेकरांनी ज्यांचं वर्णन, 'मला भेटलेला देवमाणूस' अशा शब्दांमध्ये केलं होतं ते परोपकारी डॉक्टर, हरी श्रीकृष्ण देव, डॉ. व्ही. एन. देसाई, डॉ. बापट अशा अनेक डॉक्टरांचा अुल्लेख नामवंत सांगलीकरांमध्ये करायला तर हवाच, पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा स्वतंत्रपणे मागोवा घ्यायला हवा. आजमितीला नेत्रतज्ञ, डॉ. भय्यासाहेब परांजपे यांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. नुकतेच दिवंगत झालेले ख्यातनाम साहित्यिक आणि महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणून सार्थपणे ज्यांचा अुल्लेख केला जातो, ते पु. ल. देशपांडे, डोळ्यांवर अुपचार करून घेण्यासाठी मुद्दाम या भय्यासाहेबांकडे येऊन रहात असत. आयुर्वेदाची सांगलीत जुनी परंपरा आहे. खुद्द आबासाहेब सांबारे यांचे दोन्ही बंधू निष्णात वैद्य होते. वेलणकर, वझे, दातार, जोशी, अशा अनेक मंडळीनी जुनी वैद्यकी चालू ठेवली. आज तर ॲलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे बघितले जाते. त्यामुळे डॉक्टरांबरोबरच आयुर्वेद वैद्यांचीहि सांगलीत मोठी संख्या आहे.
{{gap}}'''क्रीडापरंपरा :''' सांगलीची क्रीडापरंपरा ही पण अभिमानास्पद आहे. विजय हजारे, नंदू नाटेकर, हरिनाना पवार, यांचा या पुस्तकात अुल्लेख आलेला आहेच. त्याखेरीज नामवंत क्रीडापटुंमध्ये, व्यंकाप्पा बुरुड, ज्योतिरामदादा सावर्डेकर, मारुती माने, गणपतराव आंदळकर अशा सांगलीशी संबंधित मल्लांचा अुल्लेख करावा लागेल. या पैलवानमंडळीनी सांगलीचा नावलौकिक कुस्तीक्षेत्रात वाढवला. सांगलीच्या तरुण- तरुणीना, बालवयापासून क्रीडाक्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा लाभल्या पाहिजेत, अुत्कृष्ट मैदान मिळालं पाहिजे, यासाठी क्रीडासंघटक अण्णासाहेब गोटखिंडे यानी फार परिश्रम घेतले. तरुणभारत, आझाद व्यायाममंडळ, विजयंता व्यायाममंडळ, समर्थ व्यायाम मंडळ, अशा अनेक संस्थांच्या प्रयत्नांमुळे क्रीडाक्षेत्रात सांगली अग्रेसर राहिली आहे. बुद्धिबळ प्रशिक्षक भाऊसाहेब पडसलगीकर आणि त्यांच्या नूतन बुद्धिबळ<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३२ }}</noinclude> cpll2q2skwcot3kxot0jxwdy0fi56dt पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६१ 104 77806 237978 169834 2026-10-17T11:57:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 237978 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मंडळाचा अुल्लेख याआधी आलेला आहेच. या सर्वांच्यामुळे महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती' पुरस्कार अनेक सांगलीकरानी मिळविलेला आहे. मारुती माने (कुस्ती) अनिल पाटील (वेटलिफ्टिींग), सौ. भाग्यश्री साठे ठिपसे (बुद्धिबळ) नसरुद्दीन नायकवडी (कुस्ती), बशीर शेख (वेटलिफ्टिंग), श्रीराम भावसार (कबड्डी), सुजाता नवले-कल्याणी (व्हॉलीबॉल), अण्णासाहेब गोटखिंडे (क्रीडासंघटक), भाऊसाहेब पडसलगीकर (क्रीडा-प्रतिनिधी) स्वाती करंदीकर (कबड्डी) असे काही ठळक अुल्लेख. 'पौरुष' पारितोषिक विजेते व अंटार्टिकावरील मोहिमेचे कमांडिंग ऑफीसर कर्नल जगदीश खाडिलकर हे सांगलीचेच.
{{gap}}'''कला परंपरा :''' सांगली संस्थान, जवळच्या कोल्हापूर संस्थानाइतके मोठे नव्हते. किंबहुना कोल्हापूरला (ज्याचा अुल्लेख कौतुकाने कलापूर असा केला जातो) चित्रकला, शिल्पकला आदी बाबीना जसा राजाश्रय, धनिक सरदारमंडळींचा मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय लाभला, तसा प्रकार सांगलीत नव्हता. तथापि अलीकडच्या ५०-६० वर्षांच्या काळात सांगलीच्या कलाकारानी कलाक्षेत्रात स्पृहणीय कामगिरी बजावली. त्यामधील पायाभरणीचे काम, थोर चित्रकार, कै. पंत जांभळीकर यानी केले यात शंकाच नाही. १९३० साली मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या डिप्लोमा परीक्षेत फर्स्ट क्लास मिळून, त्याना त्या संस्थेची फेलोशिप मिळाली होती. तैलरंगातील आणि जलरंगातील त्यांची गाजलेली चित्रे, अनेक रसिकांच्या, संस्थांच्या दालनांची शोभा वाढवत आहेत. त्यांचे त्याहून महत्वाचे कार्य म्हणजे गुरूकुल पद्धतीने, चित्रकलेच्या सर्व प्रकारांचे ज्ञान देऊन, त्यानी मोठ्या प्रमाणावर शिष्य परंपरा निर्माण केली. त्यांच्यानंतर, माधवराज गुजर, अण्णासाहेब चौगुले, नाना पोतदार, ओतारी, वेदपाठक यासारख्या अनेक मंडळीनी, दिमाखात ही कला परंपरा पुढे नेली. ओतारी मंडळीनी शिल्पकलेतही मुसंडी मारली. जागोजागी अभे असलेले पुतळे त्याचे साक्षी आहेत. वेदपाठक मंडळींचे गणेशोत्सवातील देखावे, वैशिष्ट्यपूर्ण साईनबोर्डस् यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तात्यासाहेब वेदपाठकानी १९६४ च्या मडगाव-गोव्याच्या साहित्य संमेलनानिमित्त २०० फूट लांब आणि ३५ फूट अुंच, अशा भव्य प्रवेशद्वाराचे केलेले डेकोरेशन फार नावाजले गेले होते. अलीकडच्या काळातील कल्याणराव शेटे यांच्या कलाकृतीनी सांगलीचे नाव सर्वतोमुखी केले. पंढरपूरच्या देवळातील रुक्मिणी आख्यानावरील त्यांची चित्रमालिका खूप गाजली. ही पेंटिंग्ज, राजा रविवर्माच्या चित्रांची आठवण करून देतात असे धन्योद्गार, जागतिक कीर्तीचे चित्रकार, एफ्. एम्. हुसेन, एस्. एम्. पंडित आदी मंडळीनी काढले होते. कल्याणरावांची ५-६ हजारांहून अधिक चित्रे, महाराष्ट्रात सर्वत्र आणि महाराष्ट्राबाहेर पोचली आहेत. आता तर सांगलीमधे 'कलाविश्व महाविद्यालय' उभे आहे. सांगलीच्या<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३३ }}</noinclude> i5l0ydjdsufbhzfux8zh88uikv6p99t पान:महाराष्ट्रकविवर्यमुक्तेश्वरकृत महाभारत १.आदिपर्व.pdf/१ 104 112493 237943 2026-10-16T14:40:18Z ~2026-55463-01 6264 /* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले 237943 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="49.238.55.209" /></noinclude><noinclude></noinclude> hz1w0i7stfbi544g9um29u42dlkp5v0 सदस्य चर्चा:Ajit Ankush choudhari 3 112494 237944 2026-10-16T16:14:32Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 237944 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|name=Ajit Ankush choudhari}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २१:४४, १६ ऑक्टोबर २०२६ (IST) 6mtyiow30yjo8niwfzw99sqiby32i57