विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.24
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf
106
74682
237983
237952
2026-10-17T12:12:30Z
कल्पनाशक्ती
3813
237983
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार" 156="वि.स. खांडेकर आणि सांगली" 164="नटवर्य मामा पेंडसे" 176="श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )" 191 ="राजमतीबाई पाटील" 197="श्री. दा. पानवलकर" 204 ="सय्यद अमीन" 207="क्रिकेटपटू विजय हजारे" 217 ="नंदू नाटेकर" 225="फोटो" 230="थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 236 ="वसंतदादा पाटील" 249="भैरवी..., मंगेशकरी सुरांना अभिवादन करुन..." 255="परिशिष्ट" 256 ="आणखी काही सांगलीकर" 266="सांगलीतील काही नामवंत संस्था"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

f2hiimequ709s1y7kg6mzru63hczdec
237987
237983
2026-10-17T12:45:55Z
कल्पनाशक्ती
3813
237987
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार" 156="वि.स. खांडेकर आणि सांगली" 164="नटवर्य मामा पेंडसे" 176="श्री. गणपतराव मोहिते (मा. अविनाश )" 191 ="राजमतीबाई पाटील" 197="श्री. दा. पानवलकर" 204 ="सय्यद अमीन" 207="क्रिकेटपटू विजय हजारे" 217 ="नंदू नाटेकर" 225="फोटो" 230="थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 236 ="वसंतदादा पाटील" 249="भैरवी..., मंगेशकरी सुरांना अभिवादन करुन..." 252="फोटो" 255="परिशिष्ट" 256 ="आणखी काही सांगलीकर" 266="सांगलीतील काही नामवंत संस्था"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

moc6hbsguhnv0taeaf29r007b1xnfbz
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५२
104
77797
237986
169825
2026-10-17T12:45:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237986
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:सांगली आणि सांगलीकर 252.jpg|center|borderless|मंगेशकरी सप्तसूर]]
{{center|{{x-larger|'''सुखावले सांगलीकरांना मंगेशकरी सप्तसुरांनी...'''}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
kl70v4grunzopvnt8cniqdnxrefmksi
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५३
104
77798
237988
169826
2026-10-17T12:50:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237988
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:सांगली आणि सांगलीकर 253 1 विलिंग्डन कॉलेज.jpg|borderless|center|विलिंग्डन कॉलेज, सांगली- १९२५ च्या सुमारास]]
{{center|'''विलिंग्डन कॉलेज (७५ वर्षापूर्वीचा फोटो)'''}}

|style="text-align:center;" |[[File:सांगली आणि सांगलीकर 253 2 शाहुमहाराजांची सांगली भेट.jpg|borderless|center|शाहुमहाराजांची सांगली भेट]]
'''छ. शाहुमहाराजांची सांगली भेट'''||style="text-align:center;" |[[File:सांगली आणि सांगलीकर 253 3 लॉर्ड विलिंग्डन यांची सांगली भेट.jpg|borderless|center|लॉर्ड विलिंग्डन यांची सांगली भेट]]
'''लॉर्ड विलिंग्डन यांची सांगली भेट'''

[[File:सांगली आणि सांगलीकर 253 4 धनंजयराव गाडगीळ वगैरेंचा दुर्मिळ फोटो.jpg|borderless|center|रँग्लर परांजपे, प्रि. भाटे, पी. एम. लिमये, धनंजयराव गाडगीळ वगैरेंचा दुर्मिळ फोटो]]
{{center|'''रँग्लर परांजपे, प्रि. भाटे, पी. एम. लिमये, धनंजयराव गाडगीळ वगैरेंचा दुर्मिळ फोटो'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
bfmxi63t68qpcgh52nvlb5mtiajm09k
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६२
104
77807
237979
169835
2026-10-17T11:59:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237979
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>'शांतिनिकेतन' या निसर्गरम्य परिसरात, १ जुलै १९६८ रोजी ही संस्था सुरु झाली. चित्रकलेच्या सर्व अंगांचे शास्त्रशुद्ध शिक्षण, तज्ञ अध्यापकांकडून या संस्थेत दिले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात, स्वतंत्र 'कलादालन' असणारे एकमेव महाविद्यालय असावे. त्यामुळे सांगलीची कलापरंपरा मोठ्या गौरवशाली मार्गाने वाटचाल करेल यात शंकाच नाही. सांगली परिसरात, कलावंत मंडळींची, आता एवढी प्रचंड क्षमता (Potential) आहे की सांगलीत एक मोठी 'आर्ट गॅलरी' लौकरात लौकर निर्माण होणे आवश्यक आहे.
{{gap}}कलापरंपरेत आता फोटोग्राफीचाही अुल्लेख करणे अगत्याचे आहे. जुन्या संस्थानी काळातील कै. सखारामपंत घारपुरे याना या क्षेत्रातील 'पायोनिअर' म्हणायला हरकत नाही. त्यापाठोपाठ व्ही. जी. लिमये, जप्तीवाले, धामणीकर, चिवटे अशी अनेक नावे डोळ्यासमोर येतात. त्यात नाना धामणीकरानी, प्रेस फोटोग्राफीत मोठे नाव कमावले. आता तर या क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली आहे. सांगलीच्याच गोपाळराव बोधे या छायाचित्रकाराने, जागतिक स्तरावर फोटोग्राफीत सांगलीचे नाव अुच्चस्थानावर नेले आहे. अलीकडेच त्यानी कौतुकाने आपल्या सांगली गावात भरवलेल्या भव्य प्रदर्शनाला रसिकानी तीन दिवस अलोट गर्दी केली होती. 'हॉबी सर्कल, 'प्रतिबिंब' अशा सांगलीतील संस्थांमुळे हौशी, धंदेवाईक छायाचित्रकारांची सध्या रेलचेल आहे. अशा संस्था वेळोवेळी जी प्रदर्शने भरवतात, त्यातून नवीन छायाचित्रकारांना मोठेच प्रोत्साहन मिळते.
{{gap}}'''सराफी परंपरा :''' सांगलीची सराफी परंपरा ही पण वैशिष्टयपूर्ण आहे. सांगली घाटाची चांदीची भांडी पूर्वी फार प्रसिद्ध होती. संपूर्ण महाराष्ट्रात या भांड्यांचा मोठा बोलबाला होता. यंत्रे आल्यावर मात्र आता पूर्वीसारखी भांडी बनवली जात नाहीत. सोन्याच्या अलंकारातील नाजूक आणि कुशल कारागीरीसाठी सांगली पेठेची मोठी प्रसिद्धी आहे. नेकलेस, अंगठ्या, बुगड्या, कर्णफुले, बांगड्या या अलंकारांप्रमाणेच अनेक बारीक कलाकुसरीचे दागिने सांगलीत बनविले जातात. १९६३ च्या सुवर्ण नियंत्रण कायद्याचा फटका, त्यावेळी जसा सराफाना बसला तसाच तो कुशल कारागीरानाही बसला.
{{gap}}'''सांगलीची औद्योगिक परंपरा :''' हा मोठाच विषय आहे. त्या संदर्भात पुस्तकात इतरत्र बरीच माहिती आलेली आहेच.
{{gap}}'''सांगलीतील सामाजिक परंपरा :''' सांगलीतील सामाजिक सुधारणांच्या परंपरेची सुरवात नाट्यचार्य देवल यांच्या शारदा नाटकापासूनच सांगलीत सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही. सांगलीचे राजेसाहेब आणि त्यांच्या सुसंस्कृत पत्नी<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३४ }}</noinclude>
fs0v4kjxng1z91ztv82g0rni6l8z9le
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६३
104
77808
237980
169836
2026-10-17T12:02:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237980
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सौ. सरस्वतीदेवी राणीसाहेब हे दोघेही प्रागतिक मतांचे असल्यामुळे त्यांनी सांगलीतील अनेक सामाजिक व शिक्षणसंस्थांना मदत करुन सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले. जुन्या काळातील विठ्ठलराव जोशी, गंगुनाना कानिटकर, डॉ. व्ही. एन. देसाई, डॉ. कृ.पां. बापट, अंबूताई मेहेंदळे, तिरमारे गुरुजी, आदी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख सांगलीच्या सामाजिक परंपरेच्या संदर्भात करावाच लागेल. असे अनेक सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. विस्तारभयास्तव सर्वांचा उल्लेख करता येत नाही. कै. बाबाराव सावरकर, (स्वा. सावरकरांचे ज्येष्ठ बंधू) त्यांच्या अखेरच्या काळात सांगलीतच राहत होते. अंदमानची खडतर शिक्षा भोगून त्यांनी केलेल्या राजकीय कार्याइतकेच त्यांचे सांगलीमधील सामाजिक कार्य महत्वाचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकतें का. भा. तथा काकासाहेब लिमये हे महाराष्ट्राचे पहिले प्रांतसंघचालक होते. काकासाहेब म्हणजे सांगलीमधील एक बुलंद व्यक्तिमत्त्व होते. पहिले सरसंघचालक केशवरावजी हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांजपासून तो लालकृष्ण अडवानी, अटलबिहारी वाजपेयी यांजपर्यंत अनेक महनीय व्यक्ती काकासाहेबांच्या घरी येऊन गेल्या आहेत. काकासाहेब सामाजिक, राजकीय, कार्यात अग्रेसर होतेच पण त्याखेरीज त्यांनी पत्रकारिताही केली होती. 'विक्रम' नावाचे साप्ताहिक त्यांनी चालविले होते तसेच 'पौरुष' नावाचे अर्धवार्षिकही ते आयुष्याच्या अखेरच्या दिवसात चालवत होते. याच संदर्भात कै. बापूराव साठे यांचेही वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. त्यांनी गोवा मुक्ती आंदोलन, हैद्राबाद मुक्ती संग्रामात स्वतंत्र हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून काम केले होते. मिरजेतील अरब हटाओ मोहिम, शुद्धिकार्य आदी अनेक प्रकारची सामाजिक कामे त्यांनी केली व स्वा. सावरकरांना अभिप्रेत असणाऱ्या सुधारणा बहुजन समाजात पोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच महत्वाचे सामाजिक काम सध्या संभाजीराव भिडे करीत आहेत. खादीची टोपी, धोतर आणि अनवाणी पायानी वावरणाऱ्या या विभुतीने हजारो लोकांपर्यंत शिवभक्ती व राष्ट्रभक्ती पोचविली आहे. त्यांच्या प्रेरणेने गडकोट मोहिम व रोज रायगडला शिववंदन अशी अभिमानास्पद कामे चालू आहेत. श्रीमती मालूताई जोशी यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. झोपडपट्टीमधील मुलांसाठी त्या अनेक उपक्रम राबवत आहेत.
{{gap}}सांगलीची कीर्ती जशी कर्तृत्ववान व्यक्तिंमुळे पसरली तशीच ती मळीकाठची वांगी, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसं, अुसाचा रस, फिके पेढे यामुळेहि पसरली. मुंबईचा पाहुणा परतताना आवर्जून कृष्णाकाठची वांगी, लुसलुशीत कोवळ्या काकड्या घेऊन जात असे. पण सांगलीचं नाव सर्वतोमुखी झालं ते मात्र कुरकुरीत, चटकदार भडंगामुळे. सांगलीचे भडंग सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आणि त्याचं श्रेय गोरे बंधुंकडे जातं!<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३५ }}</noinclude>
jpyn5x68d44as0j12ufhogmusic35pt
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६४
104
77809
237981
169837
2026-10-17T12:06:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237981
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आज तीस-पस्तीस कंपन्या भडंगनिर्मितीत गुंतल्या आहेत.
{{gap}}सांगलीच्या माणसाची ख्याती, उत्तम पोहणारे आणि अुत्तम खवय्ये म्हणून होती. जिलबीची अख्खी ताटेच्या ताटे बसल्या बैठकीला फस्त करणारे खवय्ये या सांगलीत अनेक होते. या खादाडीवरून सहजच आठवण होते ती सांगलीच्या कमलाताई ओगले यांची. विविध प्रांतातील, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांबाबत त्यानी आपल्या 'रुचिरा' या पाककला पुस्तकाद्वारे, समर्थपणे मार्गदर्शन केले आहे. पाककला या विषयावरील सर्वमान्य झालेलं 'रुचिरा' हे मराठीमधील पहिलंच पुस्तक असावं. त्यांच्या पाककलांच्या प्रात्यक्षिकांचे वर्ग परदेशातसुद्धा झाले.
{{gap}}तेव्हा कर्तृत्ववान सांगलीकरांची यादी करायची म्हटलं तर ती मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबतच जाते. अुपरोक्त वर्णनात स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकांचाच परामर्श प्रामुख्याने घेतला गेला आहे. अलीकडील पन्नास वर्षांच्या काळातील सांगलीकरांच्या कर्तृत्वाचा परामर्श घेण्यास आपण सहजपणे थांबू शकतो; मात्र विस्मृतीच्या गर्तेत जाणाऱ्या कर्तबगार आणि वैशिष्टयपूर्ण सांगलीकरांची स्मृती जतन करण्याच्या प्रयत्नात अनेक नावे ओठांवर येऊनही, बघता बघता अंतर्धान पावतात! महाराष्ट्राला 'स्वाध्याय ज्ञानेश्वरी' शिकविणारे आणि पट्टीचे वक्ते म्हणून सर्वमान्य झालेले केशवराव छापखाने, लोकमान्यांच्या 'गीतारहस्याचे' निर्भीडपणे खंडन करणारे व महाराष्ट्राला 'भागवतादर्श' दाखवणारे यशवंतराव कोल्हटकर सांगलीचेच. सुप्रसिध्द उद्योगपती आबासाहेब गरवारे हे सांगलीचेच. त्यांनी सांगलीत माधुकरी मागून स्वतःची उन्नती करुन घेतली होती. सांगलीत औद्योगिक पाया घालणाऱ्या अनेक सांगलीकरांपैकी, रामभाऊ भिडे हे अतिशय कल्पक गृहस्थ होते. शेंगा फोडण्याची मशिन्स प्रथम त्यांनी बनविली होती. ती किर्लोस्कर मंडळींना इतकी आवडली की त्यांनी त्याचे पेटंट भिडे मंडळींकडून घेतले. गणपतरावजी अभ्यंकर, गणपतीरावजी गोडबोले, केशवराव चौगुले, पाटील वकील वगैरे मान्यवरांनी वकिली क्षेत्रात नैपुण्य दाखविलेच पण त्याबरोबरच सामाजिक बांधिलकेचेही भान राखले. व्यायामपटू रास्तेमास्तर, स्काअुटमास्तर आठवले, क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले, नाना देवधर, शिक्षणतज्ञ वा.गो.शिराळकर अशा काही जुन्या सांगलीकरांपासून तो अलीकडच्या काळातील शिक्षणक्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या श्रीमती कळंत्रेअक्का, गुलाबराव पाटील, क्रिकेटपटू विजय भोसले, यांच्याबरोबरच आज सांगलीचे नाव गाजवलेले छायाचित्रकार गोपाळराव बोधे, एन्रॉनमधील अुच्चपदस्थ संजीव खांडेकर, मधुरा सिहांसने. आय. ए. एस. मध्ये नैपुण्य दाखविणारी अश्विनी कुलकर्णी, गुंडांशी सामना करणारी, धाडसी महिला पोलिस अधिकारी मृदुला लाड अशा अनेक सांगलीकरांची आठवण होते आणि एक किस्सा आठवतो.{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३६ }}</noinclude>
aqocezfs5yca5soote32flp24hpug9c
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६५
104
77810
237982
169838
2026-10-17T12:08:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237982
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}पुण्याच्या चतुःशृंगी भागात एक टुमदार बंगला आहे. मुख्य बंगल्याच्या चारी बाजूना भरपूर रिकामी जागा आहे. त्यावर सर्व प्रकारची झाडे, अगदी कलमी आंबा, नारळ, पोफळी, पेरू, सीताफळ, चिकू, जांभूळ, कवठ, रामफळ, चिंच, या फळझाडांपासून ते अगदी गुलाब, जाई-जुई मोगरा, झेंडू, तगर, सोनचाफा, डेलिया यापर्यंत अनेक फुलझाडे आहेत. या फळाफुलांखेरीज वड, पिंपळ, अुन्हाळ्यात फुलणारे लालचुटुक गुलमोहर अशी अनेक झाडे आहेत. या घरात राहणाऱ्या मुलाला 'माझे घर' या विषयावर शाळेत निबंध लिहायचा प्रसंग आला. तेव्हा घराचे वर्णन लिहिता लिहिता त्याने सर्व फळझाडांची, फुलझाडांची नावे लिहिली. निबंध तपासणाऱ्या बाई चकित झाल्या. त्याना अतिशयोक्ती वाटली. अशी घरं आजकाल कुठं असतात का? एवढी जागा असलेले घर केव्हाच बिल्डरच्या घशात गेलं असतं! असा विचार करुन केवळ कुतुहलापोटी त्यानी त्या मुलाच्या नकळत, शाळेच्या मधल्या सुट्टीत इतर दोन मुलांना त्याच्या घरी पाठवले. सगळ्या वृक्षवल्लींची यादी करायला. मुलं परत आली. बाईना म्हणाली 'अहो, त्यांच्या अंगणात याहूनही अधिक झाडे आहेत. किती तरी नावे लिहायला हाच विसरलाय!'
{{gap}}आपल्याच गावातील कर्तृत्ववान सांगलीकरांची मोजदाद करताना, वरील मुलासारखीच प्रस्तुत लेखकाची अवस्था झालीय!

{{center|■ ■ ■}}{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३७ }}</noinclude>
knivnlvtoax6hkis8lnzece5sbrqb0e
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६६
104
77811
237984
169839
2026-10-17T12:16:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237984
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''सांगलीतील काही नामवंत संस्था'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}सांगलीतील कर्तबगार व्यक्तिनी, जसं वैयक्तिक पातळीवर सांगलीचं नाव गाजवलं, तसंच काही संस्थांमुळे सांगली नावाजली गेली. सांगली नगरीला अशा संस्था भूषणभूत झाल्या. विविध क्षेत्रात अशा अनेक संस्था आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे या संस्थांचा यथोचित परिचय करून देणे हाच एक मोठ्या ग्रंथाचा विषय. कोणी तरी तसा प्रयत्न करायला हवा. अिथे फक्त प्रातिनिधिक स्वरुपातच काही संस्थांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे :-
{{gap}}'''१) सांगली (जिल्हा) नगरवाचनालय एक सांस्कृतिक व्यासपीठ :''' सांगलीचे सुप्रसिद्ध साहित्यिक कै. वि. स. खांडेकर यानी लेखक म्हणून झालेल्या आपल्या जडण-घडणीत सांगली नगरवाचनालयाचा मोठा वाटा होता असं प्रांजळपणाने सांगितलं आहे. असे हे वाचनालय आता वयाने १३२ वर्षांचे झाले आहे.
{{gap}}या नामवंत संस्थेची स्थापना १८६९ साली झाली. याचे बरेचसे श्रेय रावसाहेब बाळकृष्ण स. मोने या सद्गृहस्थाकडे जाते. सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत धुंडीराज तथा तात्यासाहेब पटवर्धन याना इंग्रजी शिकवण्यासाठी श्री. मोने यांची नेमणूक झालेली होती. त्यांना वाचनाची आवड होती. त्यानीच पुढाकार घेऊन हे वाचनालय सुरु केले. पहिली आठ-दहा वर्षे वाचनालयाची व्यवस्था पूर्ण सरकारी होती. पुढे वाचनालयाची व्यवस्था वर्गणीदार सभासदांकडे देण्यात आली तसे त्याचे स्वरूप सार्वजनिक झाले. पहिली काही वर्षे या संस्थेचे प्रचलीत नाव 'बुक क्लब' किंवा 'सांगली लायब्ररी' असे होते. संस्थेची पहिली घंटना १८९६ साली तयार करण्यात आली आणि त्या घटनेनुसार 'सांगली जनरल लायब्ररी' असे नाव ठेवण्यात आले. ॲडमिनिस्ट्रेटर बर्क यांच्या काळात तर ब्रिटीश धाटणीनुसार या संस्थेचे नाव 'सांगली नेटीव्ह जनरल लायब्ररी' असे लावण्यात येऊ लागले. मात्र १९२४ साली संस्थेची घटना जेव्हा प्रथमच छापून घेण्यात आली, तेंव्हा 'नगरवाचनालय' असे मराठी नामांतर करताना वरील इंग्रजी नावास फाटा देण्यात आला! हा नामांतराचा प्रवास १९५० साली शासनाकडून जिल्हा वाचनालयाचा दर्जा मिळाल्यानंतर संपला. आणि १९५० च्या घटनेत नोंद करून, 'सांगली (जिल्हा) नगर वाचनालय' असं नाव रूढ करण्यात आलं.
{{gap}}हे वाचनालय सुरुवातीच्या काळात केंगणेश्वरी चौकात आणि नंतर पांजरपोळाच्या वास्तूत 'वस्तीला' होते! जसजशी सभासद संख्या वाढू लागली तसतशी स्वतःच्या<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३८ }}</noinclude>
5uvee8e6qrxgeg2r8n5z16jpfhzj7vf
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६७
104
77813
237985
169840
2026-10-17T12:20:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237985
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वास्तूची गरज संस्थेला भासू लागली. तत्कालीन प्रशासक बर्क याना अनेकवार विनंती केल्यावर त्यांनी मोलाची मदत केली. सध्याची, राजवाडा चौकातील मध्यवर्ती ठिकाणी त्यानी जागा दिली आणि ३६ x १८' ची इमारत बांधण्यासाठी रु.४२००/- अनुदानाच्या स्वरुपात दिले. नव्या वास्तूत आल्यानंतर मात्र वाचनालयाची खऱ्या अर्थाने भरभराट सुरू झाली. व्याख्याने, चर्चासत्रे आदी अुपक्रम वाढू लागल्यावर मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली. संस्थेला आर्थिक दृष्ट्या मजबूती आणण्याची गरज जाणवू लागली तेव्हा व्यावहारिक विचार करून जुनी इमारत पाडून मोठी वास्तू बांधण्याचे ठरले. १९५८-५९ ते १९७० पर्यंत काम चालत चालत सध्याची टोलेजंग इमारत अुभी राहिली. दरम्यानच्या काळात वाचनालय टिळक स्मारक मंदिरामध्ये हलवण्यात आले होते.
{{gap}}'वाचकांसाठी पुस्तके, वर्तमानपत्रे संग्रहित करणे' या सुरुवातीच्या प्राथमिक हेतूपासून तो 'जनतेत चांगल्या ग्रंथांची वाचन-अभिरूची अुत्पन्न करून तिच्यामध्ये म्हणजे जनतेमध्ये बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे' या व्यापक अुद्देशापर्यंत वाचनालयाची व्याप्ति वाढली आहे. सध्याच्या तीन मजली अिमारतीच्या पहिल्या मजल्यावर पुस्तक-संग्रह आहे. आणि तिथेच पुस्तकांची देवघेव चालते, संस्थेचे ऑफिसहि पहिल्या मजल्यावरच आहे. दुसऱ्या मजल्यावर मुक्तद्वार वाचनालय आहे. वाचकांना इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी आणि कन्नड भाषेतील मासिके, वृत्तपत्रे विनामूल्य वाचावयास मिळतात. कै. बापूसाहेब दप्तरदार संदर्भ विभागात, गेल्या सहा महिन्यातील वृत्तपत्रे संदर्भासाठी मिळू शकतात. कै. सौ. कालिंदीबाई साने बाल-विभागात, छोट्या मुलांची सोय आहे. चार हजारांहून अधिक पुस्तके त्याना तिथे वाचायला मिळू शकतात. शिवाय मासिके, पाक्षिकेहि वाचावयास मिळतात. कै. सौ. अिंदुमती टिळक महिला विभागात, महिलांसाठी वाचनाची विनामूल्य स्वतंत्र व्यवस्था आहे. या विभागातर्फे स्त्रियांना वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्यासाठी भावगीत स्पर्धांचे आयोजन केले जाते तसेच महिलांसाठी वासंतिक हळदी-कुंक समारंभ प्रतिवर्षी आयोजित केले जातात. 'टिळक अभ्यासिका' या विभागात गरजू विद्यार्थ्याना आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याना अभ्यासासाठी जागा अुपलब्ध करून दिली जाते. कै. के. वा. जोशी नाट्यविभाग हे एक वैशिष्ट्यपूर्ण दालन आहे. या स्वतंत्र नाट्यविभागात, अगदी दुर्मिळ अशी नाट्यपुस्तके आहेत. २६१४ पुस्तकांचा दुर्मिळ असा हा महाराष्ट्रातील एकमेव संग्रह असावा. नाटकांशी संबंधित व्यक्तिनाच वा संस्थेला विनामूल्य वाचनासाठी पुस्तके यामधून दिली जातात. राजा राममोहन रॉय फाअुंडेशनकडून मिळालेल्या रंगीत टी. व्ही. वरून ठराविक कार्यक्रम रोज दाखवले जातात. तसेच ब्रिटीश कौन्सिल, न्यूजट्रॅकतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या व्ही.डी.ओ.<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२३९ }}</noinclude>
bdrazv9w0jg1w906h1gtorfhhab5zqw
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६८
104
77814
237989
169841
2026-10-18T06:25:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237989
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कॅसेटहि दाखवल्या जातात. तिसऱ्या मजल्यावर अुद्योगरत्न वेलणकर सभागृह आहे. त्याचा अपयोग सांस्कृतिक आणि सामाजिक कामांसाठी केला जातो. या नगरवाचनालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथ देवघेवीसाठी वाचकांना 'मुक्त प्रवेश' आहे.
{{gap}}राज्यस्तरावर 'अ' वर्गातील अुत्कृष्ट ग्रंथालय म्हणून या वाचनालयास राज्य शासनाने १९८६ सालीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला आहे. बँकिंग क्षेत्रात जशी जिल्ह्याजिल्ह्यात 'लीड बँक' असते तेच स्वरूप या वाचनालयाचे सांगली जिल्ह्यात आहे. तालुका आणि ग्रामीण वाचनालयांना 'सांखळी' योजनेतून राज्य सरकारने दिलेली पुस्तके पुरवली जातात. वाचनालयातर्फे ग्रामीण भागात ग्रंथप्रदर्शने भरवली जातात. वेळोवेळी भरवल्या जाणाऱ्या मेळाव्यांतून जिल्ह्यातील ग्रंथ कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले जातात. त्यांच्यासाठी भाषणे आयोजित केली जातात.
{{gap}}आजमितीला या वाचनालयातील ग्रंथसंग्रह ८६,००० च्या वर आहे. लौकरच हा संग्रह लाखाच्या घरात जाईल. वाचनालयाच्या वतीने सांगलीत आणखी काही अन्य ठिकाणी, वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकांची देवघेव चालते. रोटरी क्लब सांगली सिटी आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या आर्थिक सहकार्याने वाचनालयाचे संपूर्ण संगणकीकरण नुकतेच जवळपास पूर्ण झाले आहे. सभासद संख्या आता २००० च्या वर आहे. त्याखेरीज मुक्त वाचनालयाचा (वृत्तपत्रे - मासिके वगैरेसाठी) फायदा हजारो लोक घेत असतात. संस्थेचे पदाधिकारी-कार्यकारी मंडळ यांच्या डोळस प्रयत्नाने ही संस्था म्हणजे एक सांस्कृतिक व्यासपीठ बनले आहे. भावगीत, वक्तृत्व, पाठांतर, कथाकथन स्पर्धा, चर्चासत्रे, ज्ञानसत्रे, ग्रंथप्रदर्शने यामुळे नगरवाचनालय म्हणजे सांगली नगरीचे वैभवशाली सांस्कृतिक केंद्रच बनले आहे.
{{gap}}'''२) सव्वाशे वर्षांची 'सांगली नगरपालिका' :''' थोरल्या चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धनानी मिरज जहागीरीतून फुटून, 'सांगली' आपल्या जहागीरीची राजधानी केली; त्यावेळी सांगली गाव फक्त सहा गल्लीत सामावलेलं होतं. १८०० च्या सुमारास चिंतामणरावानी पेठा आखून गाव पद्धतशीपणे वसवण्यास प्रारंभ केला.
{{gap}}१८६४ मध्ये गावात 'शहर सफाई कचेरी' स्थापन झाली. आणि प्रत्यक्ष म्युनिसिपालिटीची (म्हणजे नगरपालिकेची; हा शब्द नंतर रूढ झाला) स्थापना, तत्कालीन ब्रिटीश ॲड्मिनिस्ट्रेटर मेजर वेस्ट यानी २१ फेब्रुवारी १८७६ रोजी केली. म्हणजे सध्याच्या महानगरपालिकेच्या पोटात असलेली सांगली नगरपालिका स्थापन होऊन आता जवळजवळ सव्वाशे वर्षे झाली. सुरवातीचा सांगली नगरपालिकेचा कारभार, मूळ गावभाग, पेठभाग, गणपतीमंदिर परिसर आणि गणेशदुर्ग परिसर एवढ्या भागापुरताच मर्यादित होता. जसजसे कृष्णा नदीच्या महापूराचे पाणी लोकवस्तीला<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४०}}</noinclude>
i40ppj075jwpkxcx93l90qx85t44trw
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६९
104
77815
237990
169842
2026-10-18T06:29:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237990
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्रासदायक होऊ लागले, तसतसा गावाचा विस्तार खणभाग, शिवाजीनगर असा वाढत गेला; आणि पर्यायाने नगरपालिकेचा अधिकारहि! १९१४ च्या महापुरानंतर आणि १९१९ च्या विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेनंतर, सांगली, मिरज-रस्त्याच्या बाजूला वाढू लागली. १९२९ मध्ये आयर्विन ब्रिज झाल्यावर सांगली नगरपालिकेची कक्षा पश्चिमेकडील भागात विस्तारली; मात्र अुत्तर दिशेच्या शेरी नाल्यामुळे सांगलीची त्या बाजूची वाढ मर्यादितच राहिली.
{{gap}}सुरुवातीच्या काळात नगरपालिकेसंबंधात काही मनोरंजक घटना आढळतात. १८७१ च्या सुमारास, कसबीणपट्टी नावाचा कर बसवण्यात आला होता. शहरातील नायकिणी आणि वेश्या यांजकडून त्यांच्या अुत्पन्नाच्या (?) मानाने दरसाल १ रूपया ते ५ रूपयांपर्यत कर घेतला जात असे; अर्थात् लौकरच हा कर रद्द करण्यात आला ही गोष्ट वेगळी. १८९६ च्या सुमारास म्युनिसिपालिटीच्या चेअरमनला म्हणजे 'सरपंचास' आपल्या दप्तरात कामकाजासाठी येण्यासाठी, वाहन म्हणून घोडा ठेवण्याची मुभा होती. आणि या घोड्यासाठी म्युनिसिपालिटी दरमहा १५ रु घोडेभत्ता म्हणून देत होती! १८८७ मध्ये प्रथमच सांगली गावाला काकडवाडीहून सायफन पद्धतीने स्वच्छ पाणी-पुरवठा सुरु झाला. १८९८ मध्ये सांगली गावात पहिली मोठी प्लेगची साथ आली. पंधरा-सोळा हजाराच्या त्यावेळच्या लोकवस्तीत २१५९ माणसं दगावली! लोकवस्तीच्या मानाने ही मोठीच हानी होती. नंतरहि बरीच वर्षे प्लेगच्या साथीचा त्रास सांगलीला होत होता. नगरपालिका सुरुवातीला नदीच्या बाजूच्या धर्मशाळेत होती. १९१७ मध्ये नगरपालिका स्वतःच्या इमारतीत आली. (म्हणजे सध्याची जुनी बिल्डिंग) ॲड्मिनिस्टेटर बर्क यांच्या पुढाकाराने सांगलीची शोभा वाढवणाऱ्या बऱ्याच इमारती बांधल्या गेल्या.
{{gap}}सांगली नगरपालिकेला निवडणुकीचा हक्क पहिल्यांदा १९०५ साली मिळाला. त्यावर्षीच्या १५ ऑक्टोबरला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी लोकांनी निवडून दिलेल्या सदस्यांची संख्या ७ होती तर सरकारनियुक्त सभासद ११ होते. १९०७ साली पहिला बिनसरकारी अध्यक्ष निवडण्यात आला. स्थानिक स्वराज्याचे हक्क विस्तृत होऊन १९३८ मध्ये प्रजेला भरीव प्रमाणात हक्कदानाची घोषणा सांगलीच्या राजेसाहेबानी केली. त्यानुसार १९३९ साली लोकांनी निवडून दिलेला अध्यक्ष नगरपालिकेला असावा, म्हणून नगरपालिकेत क्रांतीकारक घटना दुरुस्ती करण्यात आली. १९४७ मध्ये सांगली शहरासाठी प्रथमच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. १९४८ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांगली संस्थानच्या विलिनीकरणाच्या वेळी सांगलीच्या राजेसाहेबानी रु. ३५ लाखाचा ट्रस्ट करून सांगली नगरपालिकेच्या स्वाधीन केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तर नगरपालिकेच्या कामाची घोडदौडच चालू झाली.{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४१ }}</noinclude>
iicey557qgdcjnxe6jhgpe6znyxz34e
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७०
104
77817
237991
169843
2026-10-18T06:33:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237991
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}आज ज्या ऑक्ट्रायवरून रणकंदने माजतात त्या कराची सुरुवात म्युनिसिपालिटीने १९३१ मध्ये केली. त्यावेळी 'टर्मिनल टॅक्स' या नावाने, सांगली शहरात आवक होणाऱ्या मालावर हा टॅक्स घेतला जात असे. सुरुवातीला हा टॅक्स मालाच्या वजनानुसार आकारला जाई. नंतर ऑक्ट्रॉय, मालाच्या किमतीवर घेतला जाऊ लागला; अर्थात् काही बाबतीत मालाच्या वजनावर सुद्धा आकारला जातो. १९५४ मध्ये या टर्मिनल टॅक्सचे या ऑक्ट्रायमध्ये रुपांतर झाले.
{{gap}}एके काळी सांगली हवेसाठी प्रसिद्ध होते, (प्रदूषणापूर्वी) तसेच पाण्यासाठीहि होते. पाणीपुरवठा जास्तीत जास्त शुद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा यासाठी सर विश्वेश्वरय्या यांजसारख्या ख्यातनाम अिंजिनीअरकडून १९०७ साली, सांगली नगरपालिकेने पाहणी करवून घेतली होती. आज शेरीनाल्यामुळे पाण्याचा प्रश्न सर्वार्थानेच दूषित झाला आहे.
{{gap}}खरं म्हणजे सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या या सांगली नगरपालिकेचा इतिहास यापूर्वीच ग्रंथरुपाने प्रसिद्ध व्हावयास हवा होता. पण १९९८ साली सांगली- मिरज-कुपवाड महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे, सांगली नगरपालिकेचे वेगळे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता त्या इतिहासाचे महत्त्व अुरले नाही.
{{gap}}पण या महापालिकेमुळे सांगलीची स्वतःची अशी जी एकजिनसी ओळख होती तिला मात्र बाधा आल्याची भावना कुणा सांगलीकराच्या मनात आली तर ती गैर मानता येणार नाही.
{{gap}}'''३ ) "चेंबर ऑफ कॉमर्स" - शतकपूर्तीकडे वाटचाल करणारी गौरवशाली संस्था :''' आता शतकाच्या अुंबरठ्यावर असलेल्या सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली या संस्थेची रीतसर स्थापना १० जुलै १९१० रोजी, तत्कालीन सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत दुसरे चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने झाली.
{{gap}}आधुनिक सांगलीची जडण-घडण पहिल्या चिंतामणराव पटवर्धन यांच्यामुळे झाली. या राजाने अगदी योजनाबद्ध रीतीने सांगलीत पेठा वसवल्या. जवळपासच्या व्यापारी लोकाना मुद्दाम निमंत्रित करून, त्याना विविध सुखसोयी अुपलब्ध करून देऊन, किराणा, भुसारा, कापड, सराफी वगैरे प्रकारची दुकाने घालण्यास अुत्तेजन दिले.
{{gap}}सांगलीची भौगोलिक रचना, व्यापार-अुदीमास अनुकूल आहे. कृष्णा, वारणा, वेरळा यासारख्या जवळपासच्या नद्यांमुळे समृद्ध झालेल्या या भागातून भुईमूग, हळद, मिरची, तंबाखू, कापूस हा माल सांगलीच्या पेठेत मोठ्या प्रमाणावर येतो. १९०७ साली सांगलीला रेल्वेचा फाटा प्रथमच आला. त्यामुळे त्याचा सांगलीच्या व्यापार वाढीवर अनुकूल परिणाम झाला. शेंग, हळद, गूळ, मिरची, तंबाखू, या<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४२ }}</noinclude>
0s19s5sw44bdbi3dorf799zhvmap0xt
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७१
104
77818
237992
169844
2026-10-18T06:37:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237992
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जिन्नसांच्या व्यापारासाठी, सांगलीच्या पूर्व-अुत्तर भागात आखीव अशी बाजार पेठ वसविली गेली. ती म्हणजेच सांगलीची 'वखार पेठ.' (कालांतराने या पेठेचे सध्याच्या मार्केटयार्डात स्थलांतर झाले.)
{{gap}}या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली. मग ज्या ज्या गोष्टींमध्ये व्यापारी लोकांचे हितसंबंध जुळले आहेत, त्याबाबत एक समान धोरण राबवण्याची आवश्यकता निर्माण झाली. आपापसात काही व्यापारसंबंधाने काही भांडणे निर्माण झाली, मतभेद अुत्पन्न झाले तर काय करावे असा प्रश्न अुत्पन्न झाला. या प्रश्नांवर तोडगा काढता यावा, सलोख्याने आपापले प्रश्न सोडवावेत, या भूमिकेतूनच मूलतः चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली. सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत व्यापारी मंडळीची सभा होऊन अशी संस्था स्थापण्याचा निर्णय झाला.
{{gap}}या निर्णयाचा सुपरिणाम लागलीच दिसून येऊ लागला. व्यापारी मंडळींमध्ये आपल्या हितासंबंधी जागृती निर्माण झाली. अुदाहरणार्थ, जवळ असलेल्या कोल्हापूरच्या तुलनेत सांगलीचा व्यापार का मागे पडतो? कोल्हापूरला मिळत असलेल्या रेल्वेच्या सवलती आपल्याला का मिळू नयेत? सांगली संस्थानच्या अधिपतींमार्फत आपण तशी खटपट का करू नये? अशा स्वरुपाचे आत्मजागृतीचे प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात सजग झाले हा चेंबरच्या स्थापनेचा मोठाच फायदा झाला. कृष्णा नदीवर आजमितीस दिसणारा भव्य आयर्विनब्रिज हा सुद्धा चेंबरच्या सभासदांच्या व्यापारी आणि सामाजिक दृष्टीचेच फलित मानावे लागेल. अशा पुलाच्या अभावी आजूबाजूच्या गावातील लोकांचे अनेक प्रकारे हाल व्हायचेच; पण असा पूल बांधला तर अिस्लामपूरपासूनचा सर्व व्यापारी माल, कऱ्हाड पेठेकडे न जाता सांगलीकडे येईल, सांगली पेठेची आवक वाढेल आणि त्याहूनहि महत्वाचे म्हणजे दस्तुरीचे अत्पन्न (जकात- दर) वाढेल असा व्यापारी मंडळींचा दावा होता. विशेष म्हणजे २५-३-१९१६ च्या चेंबरच्या वार्षिक सभेतच तशा आशयाचा ठराव करण्यात आला होता. १९२९ साली बांधल्या गेलेल्या या पुलामुळे वरील सर्व अंदाज अपेक्षेपेक्षाहि खरे ठरले!
{{gap}}यानंतरच्या काळात व्यापारात वाढ झाली तशी चेंबरच्या कामात वाढ झाली. कारण स्वातंत्र्यापूर्वी फक्त सांगली संस्थानचे कायदे होते पण स्वातंत्र्योत्तर काळात राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कायद्यांमुळे व्यापाऱ्यांच्या समस्या वाढल्या आणि परिणामी चेंबरचे कार्यक्षेत्र वाढले. कामाचे स्वरूप बहुमुखी झाले. आज चेंबरला कोणकोणते विषय हाताळावे लागतात याची छोटीशी जंत्री बघितली तरी चेंबरच्या बहुविध कामाची कल्पना येते. मार्केट ॲक्ट, शॉप ॲक्ट, तंबाखू-जर्दा एक्साईज ड्युटी, गुळसाठा मर्यादा, जीवनावश्यक वस्तू- कायदे-परवाने, मुद्रांक शुल्क दरवाढ, विक्रीकरातील बदल, दरवाढ, विक्रीकरातील बदल, खाद्यतेल आवेष्टीत<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४३ }}</noinclude>
7wkgqlh42fnl2686mtyeturk7qivoeg
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७२
104
77820
237993
169845
2026-10-18T06:40:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237993
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कायदा, ऑक्ट्रॉय ड्युटी, वीजदर वाढ असे काही ठळक विषय बघितले तरी चेंबरच्या बहुविध कामाची व्याप्ती कळून येते. याखेरीज चेंबरचे स्वतःचे प्रश्न आहेतच. व्यापारी- अुद्योजक मेळावे, निरनिराळे वायदे बाजार, व्यापारी परिषदा अशा अनेक कामांचे व्याप चेंबरच्या पाठीशी असतात. बऱ्याच वेळा चेंबरला न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग चोखाळावा लागतो; अदा. जाचक कर, मार्केट ॲक्ट कायद्याची जाचक अंमलबजावणी, वीजदरवाढ आंदोलन, जकात वसुली वगैरे वगैरे.
{{gap}}सांगली चेंबरच्या एका महत्वपूर्ण वैशिष्ट्याचे सर्वत्र कौतुक होते. ते म्हणजे चेंबरची सामाजिक बांधिलकी. समाज जीवनापासून, समाजावरील विविध आपत्तींपासून चेंबर कधी अलिप्त राहिली नाहीच पण सदैव सक्रिय सहभागच त्यामध्ये चेंबरने दिला. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून तो आजतागायत; खरं म्हणजे हा एक स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.
{{gap}}१९१० च्या स्थापनेच्या दिवशी केवळ २१ सभासदांच्या सहभागापासून सुरवात झालेल्या या सांगली चेंबरचे आज ५४६ सभासद आहेत. ५० विविध व्यापारी संघटना संस्थेशी संलग्न आहेत. आज संस्थेची स्वतःची भव्य इमारत आहे. महाराष्ट्र चेंबर (१९२७) मराठा चेंबर (१९३४) या महाराष्ट्रातील प्रमुख संस्थांपेक्षाहि, सांगली चेंबर जुनी नामवंत संस्था असल्याने महाराष्ट्रात या संस्थेचा मोठा दबदबा आहे.
{{gap}}'''४) सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. :''' सांगली अर्बन को. ऑ. बँकेची स्थापना ४ नोव्हेंबर १९३५ रोजी सांगली संस्थानच्या सहकारी कायद्याखाली झाली. ६५-६६ वर्षापूर्वी ही बँक स्थापन होण्यापूर्वी, सांगली गावात दोनच बँका अस्तिवात होत्या; आणि त्या दोन्ही बँका सांगली संस्थानच्या, म्हणजे श्रीमंत राजेसाहेबांच्या पुढाकाराने स्थापन झाल्या होत्या. पैकी सांगली बँक ही व्यापार व अुद्योग क्षेत्रामधील लोकांसाठी होती, तर सांगली संस्थान मध्यवर्ती बँक (नंतर सांगली मध्यवर्ती जिल्हा बँक लि;) ही मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी होती. समाजातील दोन विभागांसाठी दोन बँका निघाल्या, मग समाजात जो मध्यम व गरीब वर्ग आहे, त्याना वाली कोण? अशा स्वरुपाच्या विचारमंथनातून कै. माधवराव गोडबोले यानी पुढाकार घेऊन या बँकेची स्थापना केली. दहा रुपयाचा एक शेअर याप्रमाणे रु.११००/-चे भाग भांडवल त्यानी जमविले. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाश्रयातून या बँकेचा जन्म झाला. सांगलीची म्युनिसिपल हद्द, एवढ्याच कार्यक्षेत्रात, व्यवहार करणाऱ्या या छोट्या बँकेला, सांगली संस्थानचा सहकारी कायदा, संस्थानच्या विलीनीकरणानंतर निर्माण झालेला दक्षिण सातारा आणि नंतरचा सांगली जिल्हा, स्वातंत्र्यानंतरचा मुंबई<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४४ }}</noinclude>
qnwloceigu2hz003d86waje33pht9im
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७३
104
77821
237994
169846
2026-10-18T06:44:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237994
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सरकारचा सहकारी कायदा, त्यांनतरचा महाराष्ट्र राज्य सरकारचा सहकारी कायदा, अशा अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. हे कमी पडत होते म्हणून की काय, १९६६ पासून रिझर्व्ह बँकेची नियंत्रणे आली! पण या सर्व संक्रमणांमधून बँकेने यशस्वीपणे मार्ग काढला आणि आता सहकारी क्षेत्रात मोठ्या मानाचे स्थान बँकेने संपादन केले आहे. आजमितीला सांगली अर्बन बँकेच्या ३५ हून अधिक शाखा गावोगावी आहेत. इतकेच काय पण सांगलीखेरीज इतर अनेक ठिकाणी बँकेच्या कार्यालयांसाठी स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. बँकिंग व्यवहारांशिवाय, सांगली अर्बन बँकेने, सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवले आहे. मुख्यत्वे, आपापल्या कार्यक्षेत्रातील शिक्षण संस्थांच्या मागे ठामपणे अुभे राहण्याचे धोरण बँकेने ठेवले आहे. म्हैसाळमधील कै. मधुकरराव देवल यांच्या मार्गदर्शनाखाली हरीजनांच्या सहकारी शेती-प्रकल्पामध्ये बँकेने मोठे आर्थिक योगदान दिले आहे.
{{gap}}'''५) सांगली बँक लि. :''' सांगली शहराची आणि पर्यायानी संस्थानची प्रगती व्हावयास हवी असेल तर येथील व्यापार पद्धतशीरपणे वाढला पाहिजे याची सांगलीच्या राजेसाहेबाना जाणीव होती. त्याच अुद्देशाने त्यानी १९०७ साली सांगली गाव रेल्वेच्या फाट्यावर आणले. त्याचा सुपरिणाम दिसून येऊन सांगलीचा व्यापार वाढू लागला. राजेसाहेबांच्या प्रोत्साहनाने सांगलीची गणपती पेठ आणि नंतर वखारभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाची पद्धतशीर योजना झाली. (स्वातंत्र्योत्तर काळात हा वखारभाग सध्याच्या मार्केटयार्डात गेला). व्यापार म्हटला की हरघडीच्या व्यवहाराच्या बँकेची नितांत आवश्यकता आहे हे जाणून राजेसाहेबानी स्वतःचे भांडवल मोठ्या प्रमाणात घालून अन्य व्यापारी, सराफ दुकानदारांच्या सहकार्याने ५ ऑक्टोबर १९१६ रोजी सांगली बँकेची स्थापना केली. म्हणजे ८४ वर्षांची ही बँक सांगलीमधील सर्वात जुनी बँक आहे. ज्या बँकेचे भाडवल सुरवातीला अवघे १ लाख रुपयांचे होते ती बँक आता कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करत आहे. नेहमीचे बँकिंग व्यवहार बँक करतेच त्याशिवाय विदेश विनिमयाचे व्यवहारसुद्धा बँक करते. भारतातील सहा राज्यांमध्ये मिळून बँकेच्या १८४ शाखा आहेत. व्यापार आणि अुद्योगक्षेत्रात सांगलीला या बँकेमुळे मोठे नाव मिळाले.
{{gap}}'''६ ) १७० वर्षांची परंपरा असलेली, मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढी :''' १९१४ साली कृष्णा नदीला महापूर आला होता. त्यावेळी आजचा भव्य आयर्विन पूल नव्हता. महाबळेश्वरला धुवांधार पाऊस पडत असल्याने आणि आजच्यासारखी पाणी अडवणारी धरणे नसल्याने पाणी सतत वाढत होते. घराघरातून पाणी यायला लागले. गुरंढोरं वाहून जायला लागली. ऐन वेळेला अुपयोगी पडणारं सोनं नाणं आता ठेवायचं तरी कुठं? कुणाच्या तरी डोक्यात गाडगीळ सराफांचं<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४५ }}</noinclude>
b80o7ulizrrlc8g7nlsadkkg4df1pbk
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७४
104
77822
237995
169847
2026-10-18T06:47:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237995
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नाव आलं. लोक आपापलं सोनं, किडूक- मिडूक बांधून त्यांच्या घरी आले. त्यांना दिलासा देत, त्या पेढीवरील बाळनाना गाडगीळ म्हणाले - "पुराचं पाणी कुठंपर्यंत चढेल देव जाणे! तुमचे जे होईल तेच कदाचित् आमचे. आपण सर्वजण विश्वासाने आलात. ठीक आहे. आपापल्या जिन्नसांना नावाची चिठ्ठी लावून ठेवा."
{{gap}}सुदैवाने, सांगलीच्या गजाननाचे कृपेने पाणी ओसरू लागले. बाळनाना देवाचा धावा करत पायरीवर रात्रभर बसून होते. पूर ओसरला. लोकांनी आपापला माल परत नेला. कुणाचा एक तुकडाही गमावला नाही!
{{gap}}मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ या सराफी पेढीचं एकमात्र भांडवल कोणतं असं विचारलं, तर लोकांचा त्या पेढीच्या सचोटीविषयीचा 'प्रचंड विश्वास' हे एकच एक अुत्तर संभवतं. गाडगीळांच्या पिढ्यांमागून पिढ्या बदलत्या. जिन्नस विकत घेणारी माणसं बदलली. पण एक गोष्ट बदलली नाही. अविचल राहिली. ती म्हणजे 'विश्वास.'
{{gap}}१८३२ साली स्थापन झालेल्या या पेढीला आता नव्या सहस्रकात प्रवेश करताना १७० वर्षे होतील. या अवधीत अस्तित्वात आलेल्या अनेक सराफी पेढ्या मागे पडल्या. नामशेष झाल्या. पण गाडगीळांची सुवर्णपेढी मात्र आज एखाद्या वटवृक्षाप्रमाणे विस्तार पावत आहे. या १७० वर्षात गाडगीळांच्या ६-७ पिढ्या अलटून गेल्या. त्यामध्ये दाजीसाहेब होते, गणेशपंत होते, पुरूषोत्तमराव होते, वासुदेवराव होते; नावे अनेक पण सर्वच्या सर्व, शब्दाच्या खऱ्या अर्थाने 'विश्वासराव' होते हे महत्त्वाचे!
{{gap}}ही गाडगीळ मंडळी मूळ कोकणातली. गुहागरजवळील वेळणेश्वराची. गाडगीळ घराण्यातील कै. गणेश नारायण गाडगीळ सांगलीत स्थायिक झाले आणि १८३२ साली त्यानी सराफी पेढी स्थापन केली. आज ऐकायला गमतीचे वाटेल पण सुरूवातीच्या काळात ही सराफ मंडळी, सोन्याचांदीचे जिन्नस पडशीत भरून सराफ कट्ट्यावर जाऊन मांडायचे आणि संध्याकाळी पुन्हा पडशी भरून घरी न्यायचे अशी पद्धत होती. कारण त्याकाळी लोखंडी तिजोऱ्या नव्हत्या. गाडगीळांच्या पेढीवर पहिली तिजोरी आली ती १९१० साली. सराफी धंद्याबरोबरच गहाणवटाचा व्यवसायही ही पेढी करत असे. स्वातंत्र्यपूर्वकाळात, संस्थाने असताना दक्षिण महाराष्ट्रातील सर्व राजघराण्यांचे गाडगीळ सराफी दुकान हे मोठे विश्वासाचे ठिकाण होते. तत्कालीन ब्रिटीश अधिकारी मुद्दाम काही दागिने बनवून नेत असत. दाखवलेल्या वस्तुबरहुकूम नवीन जिन्नस बनवणे व काही वेळा स्वतःच्या कल्पनेप्रमाणे वस्तू बनवून देणे हे या पेढीचे वैशिष्ट्य होते. सोने, चांदी, मोती यांची पारख करण्यात सर्वच गाडगीळ वाकबगार आणि अनुभवाचा वारसा जुन्या पिढीकडून पुढील पिढीकडे सर्व बारकाव्यांसह चालत आला आहे; म्हणून तर आज सहावी-सातवी पिढी, पूर्वसूरींच्या दिमाखात<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४६ }}</noinclude>
rotomdx3h3qlad7s731gv70gwltpqhw
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७५
104
77823
237996
169848
2026-10-18T06:50:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237996
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>काम करीत आहे. मालाच्या चोखपणाकडे आणि नाविन्याकडे जसं गाडगीळ मंडळींचं लक्ष असतं, तसंच नवीन कुशल कारागीर तयार करण्याकडेही त्यांचे बारीक लक्ष असते; त्यामुळेच कौशल्यपूर्ण कारागिरांच्या पिढ्या न पिढ्या गाडगीळांच्या पेढीवर काम करताना आढळतात. काही जणानी तर गाडगीळांपासून स्फूर्ती घेऊन स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही सुरू केला आहे.
{{gap}}या पेढीने सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात सजग ठेवली आहे. अनेक चांगल्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य दिलं आहे. सांगली बँकेवर संस्थानी काळात एकदा गंडांतर आले होते. मुंबईच्या दोन व्यापाऱ्यांनी दिवाळे काढून बँकेला गोत्यात आणले. साहजिकच ठेवीदारांनी घाबरून गर्दी केली. सांगलीचे राजेसाहेब, ज्यानी ही बँक स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता, ते महाबळेश्वरास गेले होते. अशा वेळी या गाडगीळ पेढीने भरपूर रोकड बँकेकडे पाठवली. त्यामुळे बँकेवरील आपत्ती टळली!
{{gap}}'एकदा विश्वास ढासळला की सर्वनाश' हे परम सत्य प्राणापलीकडे जपल्यामुळेच, ही पेढी आता द्विशतकाकडे दिमाखात वाटचाल करीत आहे.
{{gap}}'''७) मे. गोविंदराम शोभाराम आणि कंपनी :''' सांगलीची गणपती पेठ नेहमीच गजबजलेली दिसते. मसाल्याचे पदार्थ, हळद, नारळ, चहा, धान्ये व इतर किराणामाल यांची ही प्रमुख बाजारपेठ आहे. तांदुळवाले लिमये, माने आणि कंपनी, उपलेटावाला, मथुरादास मगनलाल अशा अनेक पेढ्या येथे फार जुन्या काळापासून कार्यरत आहेत. त्यापैकी एक १०० वर्षांपूर्वीची जुनी पेढी म्हणजे 'मे. गोविंदराम शोभाराम आणि कंपनी' ही आहे.
{{gap}}१८९० गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वसई डाबला गावातून आलेले श्रीमान शेठ लल्लूभाई गोविंदराम शाह आणि शेजारच्या गावातून आलेले श्रीमानशेठ मथुरादास मगनलाल व श्रीमान शेठ साखळचंद बबालाल या तिघांनी भागिदारीमध्ये 'गोविंदराम शोभाराम आणि कंपनी' ही किराणा मालाचा घाऊक व्यापार करणारी सुरु केली. १९४४ मध्ये या पेढीतील तीन भागीदारांच्या वाटण्या झाल्या व गोविंदराम शोभाराम आणि कंपनीची सूत्रे लल्लूभाईंचे सुपुत्र पुरुषोत्तमदास शेटजींकडे आली.
{{gap}}मेहसाण्याहून सांगलीला आलेले हे कुटुंब व गोविंदराम शोभाराम ही पेढी खऱ्या अर्थाने आज सांगलीकर झाली असून सांगलीच्या सामाजिक कार्यात सहभाग देऊन आणि व्यापाराच्या माध्यमातून ते सांगलीच्या वैभवात भर घालीत आहेत. सध्या सांगलीतील गोविंदराम शोभाराम आणि कंपनीचा व्याप स्व. पुरुषोत्तमदास शेटजींचे नातू महेशभाई, किरीटभाई व किरीटभाईंचे सुपुत्र राजेशभाई हे पाहतात.<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४७ }}</noinclude>
nkb5spwtgheuyxijpmy454b59g1jy0i
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७६
104
77824
237997
169849
2026-10-18T06:53:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237997
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चहाबरोबरच किराणा माल व तेलाचा घाऊक व्यापार या पेढीद्वारे केला जातो. आसामच्या सीटीसी चहाची चव प्रथम सांगलीकरांपर्यंत पोहोचविण्याचे काम या पेढीने केले असून 'जी. एस. चहा' या नांवाने त्यांचा चहा प्रसिद्ध आहे.
{{gap}}गोविंदराम शोभाराम कंपनीचे अध्वर्यू पुरुषोत्तमभाईंचे ज्येष्ठ पुत्र कै. कांतीभाई हे नुकतेच निवर्तले. कांतीभाई शहा हे १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभागी होते. कै. वसंतदादा आणि कै. यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरच अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सुरक्षितपणे भूमिगत ठेवण्यात त्यांचा सहभागी होता. कांतीभाई राष्ट्रसेवादलाचेहि सक्रीय कार्यकर्ते होते. साने गुरुजी आणि एस.एम. जोशी यांच्यासारख्या तळमळीच्या समाजवादी नेत्यांचे ते अनुयायी होते. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाचे कोणतेही प्रमाणपत्र अथवा मानधन स्वीकारले नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही कांतीभाईंनी सांगलीच्या सामाजिक कायापालटामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. सांगलीमध्ये रोटरी क्लबसारखी सेवाभावी संस्था उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कामाची सांगलीमधील सुरूवात, गुजराथी सेवा समाज, ही कांतीभाईच्या मोलाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने सुरु झालेली कांही वानगीदाखल उदाहरणे आहेत. श्रीसिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये तर कांतीभाईचा सिंहाचा वाटा होता. पण ते पूर्ण झालेले पाहण्याचा योग मात्र त्याना आला नाही.
{{gap}}व्यावसायिक सचोटी व प्रामाणिकपणा यांचा आदर्शच आपल्या कामगिरीने गोविंदराम शोभाराम आणि कंपनीने समाजाला घालून दिला आहे.
{{gap}}'''८) वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. :''' सांगलीसारख्या ठिकाणी साखर कारखान्याची अुभारणी ही चाळीस वर्षापूर्वी एक प्रकारची क्रांतीच होती. १९४८-४९ मध्ये प्रवरानगरला महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरु झाला तेव्हा वसंतदादाना चैन पडेना. या भागात साखर कारखान्याची कल्पना व्यवहार्य मानली जात नव्हती कारण सांगली भाग तसा कोरडवाहू शेतीचा. पण साखरं कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्याना चांगली बरकत येईल याची वसंतदादाना खात्री होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून, ५-६ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यानी साखर कारखान्याची अुभारणी केली (सांगली-माधवनगर रस्त्यावरील ९० एकर जागेवर) आणि १९५८ साली पहिला गळीत हंगाम सुरू करून दाखविला. या कारखान्याच्या क्षेत्रात ८५ अुपसा जलसिंचन योजना यशस्वीपणे चालविल्या जातात. त्यामुळे ७२,१५७ एकर जमीन ओलिताखाली येते. दररोज पाच हजार मे. टन अस गाळशक्तिचा तसेच क्षारपड / चिबड जमिन सुधारणा प्रकल्प राबवणारा<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४८ }}</noinclude>
3zfvkhtfp71lta5uhpo64ohbpwxjzkd
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७७
104
77825
237998
169850
2026-10-18T06:56:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237998
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>असा पहिलाच कारखाना आहे. या कारखान्यातून अनेक अुत्पादने तयार होतात. शुभ्र दाणेदार साखर हे तर सर्वात महत्वाचे अत्पादन. त्याचबरोबर ॲसिटाल्डिहाईड ॲसेटिक ॲसिड, ॲसेटिक अनहैड्राईड ही रसायने, सर्व प्रकारची अल्कोहोल्स, देशी व विदेशी मद्ये या कारखान्यात बनविली जातात. पशुपक्ष्यांसाठी समतोल आहार-खुराकाबरोबरच, वनीकरणासाठी, नर्सरीमधून, दरवर्षी सातत्याने विविध फळझाडे व इतर नगदी अुत्पन्न देणाऱ्या १० लाख रोपांची निर्मिती या कारखान्यात होते. या कारखान्यामार्फत डॉ. वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली हे इंजिनिअरींग कॉलेज व पॉलिटेक्नीकही १९८३ पासून चालवले जाते. सहकारी क्षेत्रात साखर आणि उप-पदार्थांचे अुत्पादन करणारा, आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना अशी या कारखान्याची प्रसिद्धी आहे.
{{gap}}'''९) तरुण भारत व्यायाम मंडळ :''' सांगलीमधील जुन्या जमान्यातील वैशिट्यपूर्ण व्यक्तिमत्वाचे क्रीडाशिक्षक, कै. नाना देवधर यानी, मराठी शाळा नं.१ च्या क्रीडांगणावर, १९३० मध्ये, गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर, 'तरुण भारत व्यायाम मंडळ' या संस्थेची २० सभासदांसह स्थापना केली. या सर्वांच्या अविश्रांत श्रमामुळेच, संस्थेचा पाया भक्कम झाला. सर्वसामान्य जनतेत, व्यायामाची, खेळाची आवड निर्माण करणे आणि त्यायोगे निरोगी, चारित्र्यवान नागरीक तयार करणे हा मंडळाचा प्रमुख अद्देश आहे. या मंडळाच्या स्थापनेपूर्वी, सांगलीत व्यायाम संस्था नव्हत्या असे नाही. पण त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते. आखाड्याच्या मर्यादित क्षेत्राचे रुपांतर, क्रीडांगणावरील विविध मैदानी आणि मर्दानी खेळांच्या व्यापक क्षेत्रांमध्ये करण्याचे श्रेय निश्चितपणे या संस्थेकडे जाते. सुरुवातीला लेजीम कवायती आणि सांघिक कसरती इतक्याच मर्यादेत काम करता करता, मंडळाने, हुतुतू, आट्यापाट्या, लंगडी, खो-खो, इत्यादि भारतीय सांघिक खेळांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष पुरविले. परिणामतः सांगलीत, मल्लांच्या पाठोपाठ, राष्ट्रीय खेळांमध्ये तरबेज असणाऱ्या खेळाडूंची पिढी नव्यानेच निर्माण होऊ लागली. मंडळाच्या स्थापनेच्या दोनच वर्षानंतर मंडळाचे खेळाडू गावोगावच्या क्रीडास्पर्धांमधून भाग घेऊ लागले. मंडळाच्या खेळाडूनी त्या स्पर्धांमधून अनेक वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिके मिळवली. विशेषतः हुतुतू हा खेळ किती अप्रतिम कौशल्याने खेळला जातो याचा एक वस्तुपाठच मंडळाच्या खेळाडूनी घालून दाखवला. नुसत्या क्रीडास्पर्धेतून भाग घेण्यात मंडळाने धन्यता मानली नाही तर १९४६ पासून, भव्य प्रमाणात राष्ट्रीय खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. १९८१ च्या जानेवारीत तर २९ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान या संस्थेला मिळाला. हा एक प्रकारचा बहुमानच होता. कारण अशा स्वरुपाच्या राष्ट्रीय स्पर्धा त्या त्या राज्यांच्या राजधानीतच भरतात. पण तरुण भारत व्यायाम<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२४९ }}</noinclude>
agk40zq4fjeuz1gjov96e5ed6r4dfwo
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७८
104
77826
237999
169851
2026-10-18T11:08:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237999
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मंडळाचे, या क्षेत्रातील अनुभव आणि कर्तृत्व पाहून ही संधी मंडळाने आपल्याकडे खेचून आणली म्हणायला हरकत नाही. याचवेळी भारत-पाकिस्तान कबड्डी-कसोटी सामनाही सांगलीत खेळला गेला. यानंतरच्या कालावधीत मंडळाची खूप भरभराट होत गेली. वसंतदादांच्या हस्ते १९८५ मध्ये पायाभरणी होऊन भव्य स्टेडियम बांधले गेले. १९९२ पर्यंत बांधकाम चालू होते. सरकारी अनुदान आणि लोकांच्या देणग्यांच्या आधारावर प्रचंड काम झाले. आज मंडळाकडे १०८ X ७४ मीटरचे भव्य क्रीडागंण आहे. चारी बाजूनी बंदीस्त असलेल्या या क्रीडांगणावरील खेळ, तिन्ही बाजूंच्या गॅलऱ्यांमधून २५-३० हजार प्रेक्षक पाहू शकतात. आता हे क्रीडांगण सुसज्ज आहे. व्हॉलीबॉल, रिंगटेनिस खेळण्याची सोय आहे. बॅडमिंटनसाठी प्रशस्त हॉल आहे. योगासने स्वतंत्रपणे शिकविण्याची सोय आहे. अुत्तम मार्गदर्शन करणारे कोच आहेत.
{{gap}}१९८७ पासून संस्थेने एका वेगळ्याच क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेने 'तरुण भारत बझार' या भव्य डिपार्टमेंटल स्टोअरची स्थापना केली आहे. क्रीडाक्षेत्रातील एका संस्थेने हे काम अंगावर घ्यावे हे थोडे मौजेचे वाटते. पण याला कारणीभूत झाली ती १९७२ या दुष्काळातील संस्थेच्या कार्यकर्त्यांची निरलस आणि चोख सेवा. १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तेंव्हा संस्थेच्या कार्यकर्त्यानी धान्यवाटपाचे काम स्वयंसेवी वृत्तीने केले. ते पाहून अशा तऱ्हेचे कायमस्वरुपी काम संस्थेने अंगावर घ्यावे अशी लोकांकडून मागणी होऊ लागली. आणि त्याच विचारमंथनातून 'तरुण भारत को-ऑप. सेंट्रल कंझ्युमर्स स्टोअर्स' ही संस्था सुरु झाली. सरकारी अनुदान आणि समाजातील उत्स्फुर्त देणग्या यांच्या माध्यमातून भाग भांडवल जमा झाले. ही योजना अपेक्षेपेक्षा फारच यशस्वी झाली.
{{gap}}'''१०) सांगली हायस्कूल, सांगली :''' भूतपूर्व सांगली संस्थानचे अधिपती शिक्षणप्रेमी होते. त्यामुळेच १८८४ साली सांगलीत 'सांगली हायस्कूल, या सांगलीतील सर्वात जुन्या हायस्कूलची स्थापना झाली. जवळजवळ ११६ वर्षापूर्वी म्हणजे १८८४ ते १९१४ पर्यंत सांगलीतील अनेक कर्तबगार व्यक्तिंची जडण-घडण करण्यात ही एकच एक संस्था कारणीभूत होती. १९१४ साली सिटी हायस्कूल या खासगी हायस्कूलची स्थापना होईपर्यंत, सांगली हायस्कूल हे त्याकाळातील एकमेव हायस्कूल होते. नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर, साधुदास, वि.स. खांडेकर यासारख्या मातब्बर व्यक्तिंची जडणघडण याच शाळेत झाली. श्रीपादशास्त्री देवधर, पाटीलशास्त्री यांच्यासारख्या संस्कृत शिक्षकांमुळे जशी शंकरशेट शिष्यवृत्तीची गौरवशाली परंपरा या शाळेला लाभली तशीच हणमंतराव भोसले या क्रीडाशिक्षकामुळे विजय हजारे, नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. ड्रॉईंग, गायन, तालिम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५० }}</noinclude>
pz19ug1ykcgju4edlt928vfuhcsqtuy
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७९
104
77827
238000
169852
2026-10-18T11:14:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238000
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>या शाळेत होती. या शाळेतील जुने फलक शोधले तरी विविध क्षेत्रांमध्ये स्पृहणीय यश मिळविणाऱ्या अनेक सांगलीकरांची नावे त्यात आढळतील. त्यांची नावे केवळ विस्तारभयास्तव देता येत नाहीत. १ एप्रिल १९५३ पासून ही शासकीय शाळा तंत्रशिक्षण देण्याच्या अटीवर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत झाली. तेव्हापासून या शाळेला वेगळेच वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे. या शाळेच्या सुसज्ज आणि भव्य वर्कशॉपमध्ये कारपेंटरी, फिटींग, टर्निंग, स्मिथी व मोल्डिंग आणि वायरींग असे अनेक विभाग आहेत. वरील ६ तंत्र विषयांबरोबरच 'इंजिनिअरींग' हा विषय शिकविला जातो. अलीकडे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, बिल्डिंग मेंटेनन्स, ॲटो. इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी अशा अनेक विषयांचे वेगळे विभाग सुरु झाले आहेत. एकविसाव्या शतकात अुपयुक्त ठरेल अशी गुणवत्ता जपणाऱ्या या शाळेत, आजमितीला जवळजवळ तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळेला शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचे असे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे.
{{gap}}'''११) सिटी हायस्कूल :''' आज नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या सिटी हायस्कूलची स्थापना ४ डिसेंबर १९१४ रोजी झाली. सर्वश्री सखदेव, विनायकराव जोशी, तोरो आणि चिकोडीकर या चार तरुणांनी, अवघ्या एका विद्यार्थ्याला घेऊन ही शाळा सुरू केली. आजमितीला या भव्य शाळेत दोन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९२१ साली या शाळेची पहिली तुकडी मॅट्रिकच्या परीक्षेला बसली. १९२६ मध्ये, या शाळेच्या एका विद्यार्थ्याने मॅट्रिकच्या परीक्षेत शाळेला पहिली शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून दिली, तेव्हापासून शाळेची गौरवशाली परंपरा अखंडितपणे चालू आहे. तो विद्यार्थी म्हणजे न्यायमूर्ती राम केशव रानडे. १९६३ मध्ये शुभांगी सबनीस या विद्यार्थिनीने एस.एस.सी. परीक्षेत, संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. १९८७ मध्ये एकाच वेळी शाळेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. वसंतराव वैद्य, जे.एल. रानडे, गजाननराव वाटवे, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, अशोक जी. परांजपे, आचार्य वि.प्र. लिमये, माधव खाडिलकर, भाग्यश्री ठिपसे, हरी नाना पवार, विष्णू सावर्डे, अक्षरवेडा र. कृ. जोशी, डॉ. सुभाष भेंडे, कल्याण शेटे, डी. टी. ओतारी अशा या शाळेच्या काही नामवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आणि शाळेचा लौकिक वाढवला. आणि या गुणी विद्यार्थ्यांची ज्यानी जडण-घडण केली, त्या गुरूजनांची नावे किती आणि कोणाकोणाची म्हणून घ्यायची?
{{gap}}अुच्च शैक्षणिक परंपरा असलेले सिटी हायस्कूल आपली जन्म शताब्दी या सहस्रकामध्ये मोठ्या डौलाने, आणि प्रतिष्ठेने साजरी करील यात काय शंका?{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५१ }}</noinclude>
9dmqbtl097rs221pcfxvy8n7cxi5eg9
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८०
104
77828
238001
169853
2026-10-18T11:19:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238001
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>'''१२) विलिंग्डन कॉलेज :''' २२ जून हा भौगोलिक दृष्ट्या मोठा दिवस असेल पण सांगलीकरांच्या दृष्टीने खराच मोठा दिवस आहे. कारण त्यादिवशी सांगली गावातीतल पहिल्या कॉलेजचा जन्म झाला. ८० वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रात अुच्चशिक्षणाची सोय, पुणे सोडल्यास कुठेच नव्हती. कोल्हापूरचे राजाराम कॉलेज काही कारणाने बंद होते. अशा काळात २२ जून १९१९ रोजी विलिंग्डन कॉलेजची स्थापना झाली. नेहमीप्रमाणे सांगलीच्या राजेसाहेबांचा या कार्यात मोठा पुढाकार होता. कॉलेजचे वर्ग सांगली गावातच त्यानी अुपलब्ध करुन दिलेल्या जागेत भरत. १९२४ मध्ये सध्याच्या ठिकाणी १२५ एकराच्या जागेवर कॉलेजची इमारत अुभी राहिली. सुरवातीला पूर्णपणे ओसाड असणाऱ्या या भागात हिरवळ अुगवली ती या कॉलेजमुळे. पहिले प्रिन्सिपॉल कै. गोविंद चिमणाजी भाटे यानी या कामासाठी अपार कष्ट अुपसले. सांगली गावाला शैक्षणिक अुंची प्राप्त करुन देण्यात या कॉलेजचा मोठा वाटा आहे. सुरवातीच्या काही वर्षात कॉलेजला नावारुपाला आणण्यात प.म. लिमये, द.गो. कर्वे, वि.कृ.गोकाक, के. गो. पंडित यांसारख्या प्राचार्यांचा मोठाच सहभाग होता. अुपराष्ट्रपती बी.डी. जत्ती, न्यायमूर्ती व्ही. ए. नाईक, पद्मभूषण डॉ. आर. एन. दांडेकर, डॉ. सरोजिनी महिषी, वि. स. पागे, पु. ल. देशपांडे, वसंतराव कानेटकर, डॉ. वि. रा. करंदीकर असे नामवंत याच कॉलेजात त्यांच्या विद्यार्थीदशेत शिक्षणासाठी होते. आज या कॉलेजात २२००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सांगलीची शैक्षणिक जडणघडण करण्यात या विलिंग्डन कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे.
'''१३ ) वालचंद कॉलेज :''' सांगली-मिरज रस्त्यावर १०० एकरांच्या विस्तृत जागेत १९४७ साली वालचंद कॉलेजची स्थापना झाली. दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्वात जुने तंत्रविद्यालय आहे. श्री. धोंडुमामा साठे यांच्या अथक प्रयत्नांनी या कॉलेजची उभारणी झाली. सुरुवातीला या कॉलेजचे नांव न्यू इंजिनिअरींग कॉलेज असे होते. १९५५ साली हे कॉलेज आर्थिक अडचणीत सापडले तेंव्हा शेठ वालचंद हिराचंद मेमोरिअल ट्रस्टने कॉलेजला मोलाची आर्थिक मदत केली. तेव्हापासून वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग असे नामकरण झाले. राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची कॉलेजला मदत आहेच. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींगसाठी सुसज्ज प्रयोगशाळा असलेल्या या कॉलेजात डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरींग कोर्सेसचे शिक्षण दिले जाते. या कॉलेजचे ग्रंथालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये ३६ हजार पुस्तके आहेत आणि १० हजारांवर तंत्रविषयक मासिके आहेत. या कॉलेजची मालमत्ता वास्तु, प्रयोगशाळा आणि इतर इमारतींसह ९ कोटी रुपयांच्या घरात जाईल इतकी मोठी आहे.
{{gap}}या कॉलेजमध्ये संशोधनात्मक अनेक प्रकल्प राबविले जातात. शेठ गुलाबचंद<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५२ }}</noinclude>
72slqcmrpb4g2klnmiet8hlo29vtb1t
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८१
104
77829
238002
169854
2026-10-18T11:22:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238002
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>रिसर्च फौंडेशन या नावाने हे संशोधन चालते. येथील अनेक प्राध्यापकांनी सादर केलेले संशोधनपर शोध निबंध मान्यता पावले आहेत. 'व्हिजन' या नावाने एक मोठे वैज्ञानिक व औद्योगिक प्रदर्शन या कॉलेजमार्फत भरविले जाते. कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या कॉलेजचे अनेक नामवंत विद्यार्थी इस्रो, नासा सारख्या विश्वविख्यात केंद्रांमध्ये व विविध औद्योगिक संस्थांमध्ये आपल्या बुद्धिची चमक दाखवत आहेत.
'''१४) स्वा. सावरकर प्रतिष्ठान :''' ज्येष्ठ समाजसेवक कै. बापूराव साठे यांनी स्थापन केलेली आणि वा. द. नामजोशीसरांनी अल्पावधीत नावारुपाला आणलेली ही संस्था १९७३ साली स्थापन झाली. समाजातील बुद्धिवान विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करुन या संस्थेने पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N. T.S.) ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. संस्थेची ही कामगिरी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या तोडीची आहे हे निःसंशय. स्वा. सावरकर प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थी वसतिगृह, विकास वाचनालय, हुतात्मा मदनलाल धिंग्रा व्यायाम शाळा आदी विभाग आहेत. या संस्थेची प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला ही सांगलीतील नामवंत शाळा असून दरवर्षी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत या शाळेचा निकाल ९० टक्क्याहून अधिक असून त्यांचे दरवर्षी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत असतात. स्वा. सावरकरांचा सैनिकीकरणाचा संदेश या संस्थेने राबवून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N.D.A.) मध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमाला सिनेअभिनेते चंद्रकांत गोखले व सोलापूर येथील विधिज्ञ श्री. नानासाहेब वळसंगकर यांनी बहुमोल आर्थिक सहाय्य केले आहे.
'''१५) भारती विद्यापीठ :''' आधुनिक काळात सांगलीच्या वैभवात भर टाकणाऱ्या ज्या काही भव्य अिमारती अभ्या राहिल्या त्यातील भारती विद्यापीठ विभागीय कार्यालय, सांगली या संस्थेची सात मजली इमारत सर्वांचे लक्ष एकदम वेधून घेते. वास्तु-शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून संस्थेची ही इमारत प्रेक्षणीय आहे. पण नुसतंच प्रेक्षणीय असणे एवढेच या वास्तूचे वैशिष्ट्य नाही तर त्या वास्तूत चालणारे अुपक्रमही तितकेच महत्वाचे आहेत. मा. नामदार डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यापीठाने भारतात अनेक ठिकाणी सांगली जिल्ह्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. परंतु सांगली जिल्ह्यात स्थापन झालेल्या भारतीय विद्यापीठाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरवात १९८३ साली झाली. तेंव्हा सांगलीच्या मध्यवर्ती भागात असलेली ही चावडीची जागा भारती विद्यापीठाने कै. वसंतदादा पाटील यांच्या सहकार्याने मिळवली. वास्तूचे बांधकाम १९८९ मध्ये पूर्ण झाले. त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रुरल डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन,<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५३ }}</noinclude>
1ip91en919mffj0k7kam8vodyf8yrxy
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८२
104
77830
238003
169855
2026-10-18T11:29:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238003
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>न्यू लॉ कॉलेज, भारती बँक या संस्थांचे कामकाज चालते. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये एम् बीए, एम् सीए, एम् सीएम् डीबीएम्, डीसीएम्, असे पदव्युत्तर कोर्सेसचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे या वास्तूमध्ये भारती विद्यापीठाचे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे विभागीय कार्यालय आणि डॉ. पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालयही आहे. पण सर्वसामान्य जनतेला ही वास्तू माहित असते ती तिथे असलेल्या भारती बझारमुळे. सर्व जीवनोपयोगी वस्तूंचे मोठे भांडारच तेथे असल्याने दिवसभर तेथे ग्राहकांची वर्दळ असते. भारती विद्यापीठाचे १५ वर्षापूर्वी स्थापन झालेले डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय आता सांगलीवाडी येथे स्वतःच्या भव्य इमारतीमध्ये सुरु आहे. तेथे कला, विज्ञान, आणि वाणिज्य अशा तिन्ही शाखांचे शिक्षण दिले जाते. डॉ. पतंगराव कदम यानी शैक्षणिक संस्थांचा जो सुनियोजित असा प्रचंड पसारा महाराष्ट्रात अुभा केला आहे त्याची थोडीशी कल्पना हे कॉलेज बघिल्यावर निश्चितच येते. या कॉलेजचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. म. शि. सगरे हे येथे अनेक प्रकारचे शैक्षणिक क्षेत्रातील चांगले प्रकल्प राबवित असतात.
'''१६ ) देवल स्मारक मंदिर :''' सांगली ही नाट्यपंढरी म्हणून गौरवली गेली असल्याने सांगलीत अनेक नाट्यसंस्था असणे स्वाभाविकच आहे. त्या सर्व संस्थांमधील 'देवल स्मारक मंदिर' ही सर्वात जुनी संस्था असावी. नाट्याचार्य देवलांच्या स्मृतिप्रित्यर्थ सांगलीतील नाट्यप्रेमी मंडळीनी १ जानेवारी १९२७ रोजी 'देवल क्लब' या नावाने एक संस्था स्थापन केली. याच संस्थेचे पुढे 'देवल स्मारक' असे नामकरण झाले. आता अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटके. वैभवशाली संगीत नाट्यपरंपरा हा मराठी रंगभूमीचा आत्मा. पण तीच गौरवशाली परंपरा आजकाल नष्टप्राय होऊ लागली आहे. या संस्थेने, गेल्या ७-८ वर्षांमध्ये ही परंपरा जपण्याच्या दृष्टीने स्पृहणीय कामगिरी बजावली आहे. संस्थेने 'शारदा', ‘स्वयंवर', 'मत्स्यगंधा', 'कट्यार काळजात घुसली', 'मंदारमाला' 'स्वरसम्राज्ञी', ‘संशयकल्लोळ’, ही संगीतप्रधान नाटके रसिकांसमोर सादर केली. १९९४ पासून बृहन महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धा, दिल्ली, महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा, आंतरराज्य संगीत नाट्य-प्रवेश स्पर्धा, अशा विविध स्पर्धांमधून अक्षरशः पारितोषिकांचा पाऊस पाडला. १९९७ मध्ये सादर केलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाला, दिल्लीच्या बृहन् महाराष्ट्र मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक तर मिळालेच: खेरीज १६ वैयक्तिक पारितोषिके संस्थेने मिळविली. या संस्थेला आजवर, बलवंत पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र केसरी पुरस्कार, सानंद न्यास, इंदूर, कर्नाटक संघ, मुंबई असे विविध सन्मान प्राप्त झाले आहेत.{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५४ }}</noinclude>
najdidjvkub0uft5b0vf1etb6to5fr5
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८३
104
77831
238004
169856
2026-10-18T11:33:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238004
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>'''१७) भावे नाट्यमंदिर :''' मराठीमधील आद्य नाटककार कै. विष्णुदास भावे यांच्या नावाने १९४२ साली स्थापन झालेली ही एक मान्यवर नाट्यसंस्था आहे. सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेली प्रशस्त जागा, भव्य रंगमंच आणि उत्कृष्ट ध्वनिव्यवस्था ही या नाट्यमंदिराची वैशिष्ट्ये आहेत. नाट्यक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीला प्रतिवर्षी विष्णुदास भावे यांच्या नावाने संस्थेतर्फे समारंभपूर्वक सुवर्णपदक दिले जाते. आचार्य अत्रे, रांगणेकर, वसंतराव कानेटकर, जयमाला शिलेदार, जोत्स्ना भोळे अशा नाट्यक्षेत्रातील अनेकांना आजवर अशी सुवर्णपदके दिली गेली आहेत. कोणत्याही नाट्यसंस्थेला प्रथम प्रयोग करण्यासाठी संस्थेतर्फे उतेजन म्हणून नाट्यमंदिर विनामूल्य दिले जाते.
'''१८) नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली :''' सांगली शहराला बुद्धिबळाची गौरवशाली परंपरा आहे याचा अुलेख आधी आला आहेच. पण या अद्भूत खेळाची पद्धतशीर जोपासना करण्याचे आणि खेळाला नवीन नवीन खेळाडू मिळवून देण्याचे फार मोठे काम गेली ६० वर्षे 'नूतन बुद्धिबळ मंडळ' ही संस्था करत आहे. या कार्यातील सिंहाचा वाटा मंडळाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान, श्री. न. व्यं. तथा भाऊसाहेब पडसलगीकर हे आहेत. अलीकडेच 'कॉमनवेल्थ चेस चैंपियनशिप- २०००' या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून, मंडळाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला आहे. २३ डिसेंबर १९४१ रोजी, सांगलीमधील, भाऊसाहेब राजवाडे, दाजीसाहेब दीक्षित आणि सोपानदेव शिंगारे यांनी 'नूतन बुद्धिबळ मंडळ' सांगली या संस्थेची स्थापना केली. बुद्धिबळ खेळाचा प्रसार करणे, प्रचार करणे, स्पर्धा भरविणे, खेळाचे वाङमय जमविणे, स्थायी स्वरुपी इमारत मंडळासाठी बांधणे अशी अद्दिष्टे ठेवून मंडळाचे कार्य सुरू झाले. सुप्रसिद्ध कवी आणि नामवंत बुद्धिबळपटू, साधुदास तथा गोपाळराव मुजुमदार, विनायकराव खाडिलकर, बाबासाहेब बोडस या जुन्या अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेने 'प्रविण' (Expert) खेळाडूंच्या स्पर्धा भरविण्यास १९४२ पासून सुरूवात केली. १९४९ पासून 'मास्टर्स मेमोरिअल स्पर्धा' भरविण्यास सुरुवात झाली. १९५५ पासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 'सदर्न मराठा कंट्री चेस' स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यास सुरुवात केली. १९६८ मध्ये सुप्रसिद्ध अुद्योगपती, वसंतराव वैद्य यानी दिलेल्या भरघोस देणगीमुळे, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, कै. श्रीधर केशव वैद्य स्पर्धा, प्रथमच राष्ट्रीय पातळीवर भरविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे देशातील आघाडीचे नामवंत खेळाडू या स्पर्धेसाठी सांगलीत येऊ लागले. अशाच देणग्या मिळवत मंडळाने १९६९ पासून १९ वर्षाच्या आतील मुलांसाठी आणि १९७६ नंतर महिला खेळाडूंसाठी खुली महिला स्पर्धा भरविण्यास सुरुवात केली. एकूण स्पर्धांच्या अनुभवातून आणि बुद्धिबळाविषयी, मुलांच्या मनात,<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५५ }}</noinclude>
raji4d91xsz1m28gagfmokn1pc7pp0k
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८४
104
77832
238005
169857
2026-10-18T11:36:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238005
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अधिक आवड निर्माण करण्याच्या अुद्देशाने, मंडळाने, निरनिराळ्या वयोगटातील मुलामुलींसाठी विविध स्पर्धा सुरु केल्या आहेत. त्यामुळे सांगली आणि बुद्धिबळ असे समीकरणच देशात रुढ होऊ लागले. नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करून मंडळाने, सांगलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दुमदुमत ठेवले. ही मंडळाची मोठीच कामगिरी म्हणायला हवी. या मंडळामुळे बुद्धिबळ क्षेत्रात, सांगलीला नामंकित खेळाडू देता आले. परदेशात बुद्धिबळ खेळण्यास जाणारा पहिला भारतीय खेळाडू हा एक सांगलीकरच होता. कै. विनायकराव खाडिलकर १९२४ साली अिंग्लडला गेले होते. नंतर कै. भालचंद्र म्हैसकर हे रशियाला जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिंपियाडसाठी, पहिल्या भारतीय संघाचे खेळाडू होते. सौ. भाग्यश्री साठे आणि स्वाती घाटे या मंडळाच्या महिला खेळाडूंविषयी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मंडळाचे अध्वर्यू, श्री भाऊराव पडसलगीकर १९८७ मध्ये रशियाला गेलेल्या ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. मंडळाने भरविलेल्या महिला स्पर्धामधूनच, सांगलीच्या भाग्यश्री साठे, आणि स्वाती घाटे यांखेरीज, शिला व विमल कानेटकर, जयश्री संकपाळ, शुभांगी मनोळकर, सुनंदा देसाई, पल्लवी शहा आदी महिला खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत.
{{gap}}विविध प्रकारच्या वयोगटापासून तो खुल्या स्पर्धा सातत्याने आयोजित करणारी संपूर्ण भारतातील ही एकमेव संस्था आहे ही वस्तुस्थितीच, मंडळाचे कार्यकर्तृत्व सांगण्यास पुरेशी बोलकी आहे.

{{center|■ ■ ■}}{{nop}}<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५६ }}</noinclude>
7i8fi0mk7jtbrrqqtvgkhdly7vyhml4
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८५
104
77833
238006
169858
2026-10-18T11:41:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238006
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''सांगलीतील प्रेक्षणीय स्थळे'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}सांगली हे गाव रम्य असले तरी ते काही पर्यटनस्थळ नव्हे. तरीपण पाहुण्याला आवर्जून दाखवावीत अशी काही प्रेक्षणीय स्थळे सांगलीत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय खालीलप्रमाणे : -
'''१. गणेशदुर्ग :''' श्रीमंत थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यानी १८०१ मध्ये सांगली हे संस्थानचे प्रमुख ठाणे अधिकृतपणे बनवल्यावर, मिरजेच्या किल्ल्यासारखी सुरक्षित जागा त्याना राजधानीसाठी आवश्यक वाटली असावी. त्यामुळे श्रीमंतानी गणपतीमंदिर बांधण्यापूर्वीच गणेशदुर्ग (राजवाडा) बांधायची योजना आखली. कृष्णा नदीपासून ४-५ फर्लांगावर असलेला हा गणेशदुर्ग, अुत्तराभिमुख असलेला भुईकोट किल्ला आहे. त्याच्या बांधकामास १८०५ साली सुरुवात झाली. तशी त्याची पूर्वतयारी १८०१ पासूनच सुरू झाली होती. १८०७ साली सर्व बांधकाम पूर्ण झाले होते. राजघराण्यातील मंडळीना निवासासाठी जागा आणि दरबार, कोर्ट-कचेऱ्यांसाठी जागा असे या गणेशदुर्गाचे स्वरुप होते. किल्ला आणि आतील वाड्याचा आराखडा जागेवर गारगोट्या मांडून आखण्यात आला होता. खुद्द श्रीमंत चिंतामणराव, पेशवे सरकारच्या वतीने अनेक मोहिमांमध्ये गुंतलेले असल्याने, राजघराण्यातील मंडळीनी प्रत्यक्ष राहायला सुरुवात १८१०-११ साली केली.
{{gap}}सांगलीच्या वैभवात भर टाकणारी ही वास्तू आजच्या काळातसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणून ओळखली जाते. किल्लयाच्या भोवती पूर्वी खंदक होता; त्यात पाणी होते. त्यालगत असलेल्या तटबंदीवर चारी बाजूनी ५ बुरूज होते. त्यांची नावे होती १ ) श्रीसंगमेश्वर बुरूज २) नाग बुरूज ३) कृष्णा बुरुज ४) चांद बुरूज आणि ५ ) सीकाचा बुरूज. काळाच्या ओघात खंदक बुजले, बऱ्याच ठिकाणची तटबंदी जमीनदोस्त झाली. तरीसुद्धा प्रवेशदारातच असलेल्या भव्य काटेदरवाज्याच्या समोर असलेला 'श्रीगणेश बुरूज' आणि काटेदरवाजाच्या लगत असलेले 'जय' बुरूज आणि 'विजय' बुरूज आजही विद्यमान आहेत. काटे दरवाज्यासाठी वापरलेले जाड लोखंडी पत्रे आणि मोळे-खिळे राजापूरच्या बाजारातून आणवले होते. मधील पटांगणात असलेल्या दरबार हॉलमधून संस्थानचा कारभार चालत असे. पटागंणात दरबार हॉलच्या समोर दिसणाऱ्या तीन भव्य दगडी कमानी नंतर म्हणजे १८८४ साली बांधण्यात आल्या होत्या. आज जिल्हाधिकारांच्या कचेऱ्या वाड्यातील अिमारतींमध्ये आहेत. गणेशदुर्गाच्या प्रवेशद्वारापाशी जिल्हा न्यायालये आहेत. आतील बाजूस सांगली स्टेट म्युझियम<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५७ }}</noinclude>
k18llghl7tq96dt41b0okn9ntaoo2p3
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८६
104
77834
238007
169859
2026-10-18T11:46:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238007
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>म्हणजे वस्तुसंग्रहालय आहे.
{{gap}}विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याच वास्तूत असलेल्या तुरूंगातून, खंदकातील पाण्यात अुड्या मारुन १९४३ मध्ये वसंतदादानी पलायन केले होते.
'''२. सांगलीचे आराध्यदैवत - श्री गणपती मंदिर :''' मिरज जहागिरीतून फुटून श्रीमंत आप्पासाहेबानी सांगली संस्थानची स्थापना केली हे आपण बघितलं. असं म्हणतात की वैतागून मिरजेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याजवळ फक्त सिंहासनारुढ ताम्र धातूची श्रीगणेशाची मूर्ती होती. त्यावेळी त्यानी मनोमन त्या मूर्तीची आराधना केली. "सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या होऊ द्यात. मी तुझी प्रतिष्ठापना एका मंदिरात करेन" सुदैवाने तसेच झाले. संरक्षणासाठी गणेशदुर्गाचं बांधकाम, धोंडजी वाघाची मोहीम अशा कामाच्या गर्दीतूनही श्रीमंताना आपल्यावर कृपाछत्र धरणाऱ्या या चिंतामणीचा विसर पडला नव्हता. निरनिराळ्या देवळांचे नकाशे अुतरून आणण्याचे काम चालू होतंच. आज कुणाला सांगितलं तर नवल वाटेल. मूळच्या योजनेनुसार, गणपतीमंदिराचे काम स्वानंदभुवनाच्या म्हणजे आजच्या माळबंगल्याच्या माळावर सुरू झाले होते. पुढे या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवल्याने, कृष्णातीरी म्हणजे सध्याच्या जागी मंदिर बांधण्याचे ठरले. पण इथली अडचण अगदी अुलट्या स्वरुपाची होती! म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी आणि जिकडे तिकडे पाण्याचा गाळच गाळ. या जागेत खाली धर नसल्यानं, सारा खोलगट भाग वाळू आणि चुन्यानं भरून काढावा लागला. कृष्णा नदीच्या पुरापासून सुरक्षित रहावं म्हणून या मंदिराची अुभारणी मोठ्या कल्पकतेने करण्यात आली आहे. सर्व मंदिराचा आकार, तीस ते चाळीस फूट खोल चुनेगच्चीने भरुन काढण्यात आला आहे. त्यामुळे गावात कृष्णेच्या पुराचे पाणी शिरले तरी त्याला मंदिरात प्रवेश नसतो! हे थोडं विलक्षणच आहे.
{{gap}}आता अशा नदीकाठच्या मंदिरासाठी दगड कसा कठीण हवा, म्हणून सर्वत्र शोध घेण्यात आला. तेव्हा ज्योतिबाच्या डोंगरावरुन काळा दणकट दगड आणण्यात आला. वाहतुकीची आजच्या सारखी सोय नव्हती. मोठ्या कष्टानं वडारी गाड्यांतून दगड आणावा लागला. प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात १८११ मध्ये झाली. तब्बल ३०-३२ वर्षे काम चालू होते. प्रमुख मंदिर म्हणजे श्री गजाननाचे भोवतालच्या रम्य परिसरात, श्री चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी देवी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे बांधण्यात आली. श्री गणपती पंचायतन म्हणजे शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण आणि गणपती असं पाच मूर्ती असलेले गणपती मंदिर अभावानंच आढळतं. पंचायतनाच्या पाचही देवांच्या मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाच्या<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५८ }}</noinclude>
3zk8yk1qt8d1emq4qftz1gvizswpam2
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८७
104
77835
238008
169860
2026-10-18T11:53:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238008
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आहेत. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यानी आणविलेल्या संगमरवरी दगडापैकी जो शिल्लक होता, तो आप्पासाहेबानी मिळवला होता. या मूर्ती अुभ्या असाव्यात की बसलेल्या, त्यांच्या हातात आयुधे कोणती असावीत, यासंबंधीचे सर्व बारीकसारीक तपशील पुण्याचे वे. शा. सं. चिंतामण दीक्षित आपटे यांच्याकडून घेण्यात आले. आणि त्याबरहुकुम मूर्ती घडविण्याचे काम स्थानिक कारागीर, मुकुंदा आणि भिमाण्णा पाथरवट यानी विलक्षण सुबकतेने केले. प्रत्येक मूर्तीच्या सिंहासनाखाली सोने, रुपे व पंचरत्ने घातलेली आहेत.
{{gap}}बांधकाम पूर्ण झाल्यावर म्हणजे १८४४ मध्ये (चैत्र शुद्ध १० शके १७६६) 'अर्चा' समारंभ एखाद्या लग्नकार्यासारखा मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. दूरदूरचे वैदिक आणि शास्त्रीपंडित बोलावून मोठा दानधर्म करून, राजेशाही इतमानाने आणि तितक्याच धार्मिकतेने पाचही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. चिंतामणराव आप्पासाहेबांजवळ असलेल्या ज्या मूर्तीचा वर अुल्लेख आलेला आहे, तिचीही स्थापना करण्यात आली. अशा रीतीने त्यांच्या प्रतिज्ञेची पूर्तता झाली. मात्र बांधकामाची कामे मधूनमधून चालूच होती. संस्थान विलीन झाल्यानंतरसुद्धा दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेबानी देवालयाच्या सभामंडपाचे आणि भव्य महाद्वाराचे काम पूर्ण केले.
{{gap}}'अर्चा' समारंभापासून म्हणजे १८४४ पासून संस्थानच्या गणपती अुत्सवाला प्रारंभ झाला; संस्थान विलीन झाले असले, तरी आजसुद्धा हा अुत्सव भक्तिभावाने होत असतो. सर्व पूजा-अर्चा नित्यनेमाने, पारंपारिक पद्धतीनुसार व्हाव्यात म्हणून, सांगलीकर राजेसाहेबानी 'श्री गणपती पंचायतन संस्थान' हा खाजगी ट्रस्ट निर्माण केला आहे. मंदिरात रोज सकाळी काकडआरती, सूर्योदय व सूर्यास्त यानंतर एक तासाने आरती, शेजारती आणि मंत्रपुष्प असते. सकाळी गायन असते. प्रत्येक महिन्यात विनायकी, संकष्टी, शिवरात्र शुद्ध सप्तमी, शुद्ध अष्टमी आणि शुद्ध चतुर्दशी असे सहा दिवस छबिने असतात. एकेकाळी मंदिराकडे १८ हत्ती होते. आता फक्त आबालवृद्धांचा लाडका 'बबलू' हत्ती, काही बैल, गायी, अुंट, घोडे अशी जनावरं राहिली आहेत.
{{gap}}राजस्थानी लाल-गुलाबी पाषाणाचे प्रवेशद्वार, अष्टखांबी विशाल सभामंडप, मध्यभागी असलेलं असंख्य लोलकांचं झुंबर, काळ्याशार गुळगुळीत आणि ताशी गाभाऱ्याच्या अग्रभागी, ऋद्धिसिद्धीसह विराजमान झालेली श्री गजाननाची सालंकृत मूर्ती, टवटवीत फुलांच्या हारांनी अधिकच खुलून दिसणारी, आजूबाजूच्या रम्य परिसरातील गणपती पंचायतन, मंदिरातील स्वच्छता, टापटीप, मंगलमय वातावरण यामुळं मंदिर कसं प्रसन्न असावं, मनोवेधक दिसावं याचा एक आदर्श वस्तूपाठच या गणपतीमंदिरानं घालून दिला आहे. सांगलीच्या सर्व जातीजमातीच्या लोकांचं हे एक<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२५९ }}</noinclude>
2jbe81kd0cgwc9su6g8okkc4e6vioso
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८८
104
77836
238009
169861
2026-10-18T11:58:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
238009
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>श्रद्धास्थान आहे. या 'विघ्नहर्त्या' चे दर्शन घेऊनच अनेक सांगलीकर मंडळी कामाला लागतात आणि आपल्या चिंतांचं ओझं या 'चिंतामणी' च्या पायाशी ठेवूनच झोपी जातात!
'''३. बागेतील गणपती :''' 'बागेतील गणपती' हे रम्य ठिकाण सांगलीकर जनतेसाठी, धार्मिक माहात्म्याबरोबरच, एक पिकनिक स्पॉट म्हणून अलीकडे लोकप्रिय झाले आहे. मिरज जहागिरीच्या गोविंद हरी पटवर्धन या पराक्रमी सरदारानी या देवालयाची स्थापना केली. श्रीगणपतीमंदिरापेक्षाहि हे मंदिर पुरातन आहे. त्यातील मूर्तीची प्रतिष्ठापना थाटामाटात १७६६-६७ च्या सुमारास झाली.
{{gap}}हे देवालय सांगली-हरीपूर रस्त्यावर, कृष्णा नदीच्या काठी आहे. पूर्वीच्या काळी या भागाला बोरवन व गायरान म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणी असलेल्या सुपीक कुरणात चिंचेची झाडे मुद्दाम एका रांगेत लावलेली होती. एका आख्यायिकेप्रमाणे, एका बैराग्याने ती चिंचेची बाग तयार केली आणि तिथंच त्याची समाधि आहे असं म्हणतात. मूळ मिरजेत वास्तव्य असणाऱ्या सरदार गोविंदहरीनी, त्या काळात सांगली आणि हरीपूरपासून जरा बाजूला असलेल्या या ठिकाणी आपल्या आराध्यदेवतेचे मंदिर कां बांधले असावे, याला काही ऐतिहासिक आधार नाही. बैराग्यासारख्या एखाद्या सत्पुरूषाच्या सांगण्यावरून असू शकेल. देवालय झाल्यानंतर, मूळ चिंचेच्या झाडांच्यापुढे मोठी बाग करण्यात आली होती. तिला 'हरीपूरबाग' असे म्हणत असत. आता बाग निघून गेली तरी या देवालयाला 'बागेतील गणपती मंदिर' असंच म्हणण्याचा प्रघात आहे. आज घडीलासुद्धा हा परिसर वृक्षराजींमुळे रम्य दिसतो. सांगलीचे माजी नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब कराळे यानी या परिसरात फुलझाडे लावून 'भक्तिबाग' स्थापन केली. इथे जेवणखाण्याच्या सोयी झाल्यामुळे अनेक हौशी मंडळी घरगुती समारंभांच्या निमित्ताने, खास वनभोजन येथे आयोजित करतात. धार्मिक अुत्सवांच्या वेळी या ठिकाणी मोठी वर्दळ असते. हौशी आणि रसिक लोक सकाळी फिरण्याच्या निमित्ताने या ठिकाणापर्यंत येतात आणि श्रीगजाननाचे दर्शन घेऊन नित्यकामाला लागतात.
'''४. हरीपूर :''' पटवर्धन घराण्यातील सरदार गोविंद हरी यानी इ.स. १७६८ मध्ये, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, त्यांच्या नावाने हा गाव वसवला. त्यासाठी सहाशे बिघे जमीन स्वतंत्र काढून, हे हरीपूर, शंभर ब्राम्हणाना अग्रहार दिले. सांगली गावाला अगदी खेटून असलेलं हे गाव, कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. नद्यांचा संगम फार सुरेख आहे. तेथील विशाल पात्र, निळ्या-हिरव्या पाण्यावरून डौलाने वाहतूक करणाऱ्या होड्या, नीख शांततेचा मधुर भंग करणारे हिरव्यागार पोपटांचे थवे, नदीकाठची सदाहरित झाडी, यामुळे पुण्या-<noinclude>{{rh|सांगली आणि सांगलीकर||२६० }}</noinclude>
jxthh0xjw3jxn20zy5e1tr4fhrz6963