Wiktionary mrwiktionary https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.21 case-sensitive मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk आंतरजालस्पर्शी 0 8245 29409 29387 2026-09-29T00:02:04Z InternetArchiveBot 3088 Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.6 29409 wikitext text/x-wiki '''आंतरजालस्पर्शी''' ONLINE (ऑनलाइन) या इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये 'आंतरजालस्पर्शी' हा शब्द आहे.. (Internet ) इंटरनेट म्हणजे आंतरजाल.. स्पर्शी" म्हणजे स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संपर्कात येणारा… म्हणून ऑनलाईन (Online) साठी "इंटरनेटवरून (आंतरजालामार्फत) संपर्कात असलेला म्हणजे आंतरजालस्पर्शी ' अशी व्याख्या आपल्याला 'ऑनलाईन' साठी मराठीत वापरल्या जाणाऱ्या शब्दासाठी करता येईल. यावरून एकापेक्षा जास्त लोक ( मर्यादा असलेल्या) आंतरजालावरून संपर्कात येत असतील तर त्यावेळी 'कक्षीय आंतरजालस्पर्शी' असा शब्द वापरता येईल. '''आंतरजालस्पर्शी विरूध्द अजालस्पर्शी''' *मराठीमध्ये आपण इंटरनेट साठीचा शॉर्ट फॉर्म करून नेट हा शब्द वापरतो. त्याचप्रमाणे आपण 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाचा शॉर्ट फॉर्म 'जालस्पर्शी' हा शब्द वापरू शकतो. आंतरजालास्पर्शी या शब्दासाठी मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द म्हणून आपण 'आजालस्पर्शी' हा शब्द वापरू शकतो. हा विचार आंतरजालस्पर्शी हा शब्द तयार करताना करण्यात आला आहे. म्हणजे 'ऑफलाईन' या इंग्रजी शब्दासाठी 'अजालस्पर्शी' हा शब्द वापरता येतो खालीलप्रमाणे 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. 'आंतरजालस्पर्शी' या शब्दाची व्याकरण, शब्दरचना आणि अर्थ यांच्या दृष्टीने औपचारिक नोंद करता येईल. आंतरजालस्पर्शी शब्दप्रकार : विशेषण (आवश्यकतेनुसार नाम म्हणूनही वापरता येतो) व्युत्पत्ती : आंतरजाल = इंटरनेट (Inter + Net → आंतरजाल) स्पर्शी = स्पर्श करणारा, संपर्कात असलेला, संलग्न असलेला. समास : तत्पुरुष समास (आंतरजालाशी स्पर्श/संपर्क असलेला) उदाहरणे आज सर्व शासकीय सेवा आंतरजालस्पर्शी पद्धतीने उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आंतरजालस्पर्शी प्रणालीद्वारे भरावेत. बँकेची आंतरजालस्पर्शी व्यवहार सेवा चोवीस तास सुरू असते. आंतरजालस्पर्शी (Online) आंतरजालस्पर्शी झाली पहाट, हातातल्या यंत्रात अवघी वाट, पंढरीच्या विठूचे दर्शन होते घरी, दूरची माणसे वाटती जवळी खरी। आंतरजालस्पर्शी धागा नवा, जपून गुंफावा, जपून ठेवावा, यंत्रापेक्षा माणूस मोठा भारी, जपली तरच नाती राहतील सारी। आंतरजालस्पर्शी झाले जग सारे, एका स्पर्शाने उघडती दारे, गावाकडची माया अजूनही न्यारी, बोटावर फिरते तरी दुनिया सारी। 🌼भाषिक वैशिष्ट्य 'स्पर्शी' हा प्रत्यय मराठीत संपर्क किंवा संलग्नता दर्शवितो. त्यामुळे आंतरजालस्पर्शी म्हणजे "आंतरजालाशी (इंटरनेटशी) संपर्कात असलेला किंवा आंतरजालाद्वारे कार्य करणारा" असा अर्थ स्पष्ट होतो. हा शब्द इंग्रजीतील Online या संकल्पनेचा अर्थपूर्ण, मराठी व्याकरणाशी सुसंगत आणि सहज समजणारा प्रतिशब्द मानता येईल. शब्दाचा उगम (निर्मिती):मराठी भाषेमध्ये 'ऑनलाइन' या शब्दाऐवजी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द असावा, म्हणून या शब्दाची निर्मिती झाली. हा शब्द मराठी भाषेचे अभ्यासक आणि लेखक 'विजयकुमार मोटे' यांनी तयार केला असून, "विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, विजयकुमार कुबेर मोटे यांनी 'Online' या इंग्रजी शब्दासाठी 'आंतरजालस्पर्शी' हा मराठी प्रतिशब्द प्रस्तावित केला." == माध्यमांतील उल्लेख == ''आंतरजालस्पर्शी/जालस्पर्शी '' हा शब्द "ऑनलाइन" या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द म्हणून विजयकुमार कुबेर मोटे यांनी सुचविल्याची बातमी विविध मराठी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. या बातम्यांमध्ये मराठीतील तांत्रिक शब्दसंपदा समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा शब्द तयार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref>अकलूज वैभव, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान ४.</ref><ref>बळीचे राज्य, "ऑनलाइनला मराठी पर्याय; मोहोळच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती", ६ जुलै २०२६, पान २.</ref><ref> दैनिक पुढारी, [https://epaper.pudhari.news/editionname/MySolapur/PUDHARI_MSOL/page/4/article/PUDHARI_MSOL_20260710_04_8 ऑनलाइनला मराठी पर्याय 'आंतरजालस्पर्शी'; विजयकुमार मोटे यांची पर्यायी शब्दनिर्मिती], १० जुलै २०२६, माय सोलापूर पुरवणी पान.४.</ref><ref>दैनिक पुण्यनगरी,[https://web.archive.org/web/20260714130551/https://epaper.punyanagari.in/editionname/Solapur/PNAGARI_SSU/PNAGARI_SSU_20260712/date/2026-07-12/page/5/article/PNAGARI_SSU_20260712_05_4 ऑनलाइनला मराठी पर्याय; वाळूजच्या विजयकुमार मोटे यांची 'आंतरजालस्पर्शी' शब्दनिर्मिती],१२ जुलै २०२६, पान.५</ref> == संदर्भ == 263d1m7f9t4xabhad4chbfkh33wpy7v